मनाला सुन्न करणारी गोष्ट
कोरोनाच्या भीतीमुळे इटली,स्पेन अमेरिका सारखे सर्व प्रकारच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून सज्ज असलेले देश कोलमडून पडले आहेत. त्यांच्या देशात सरकारने दिलेल्या सूचना तंतोतंत पाळल्या जातात म्हणून ते कोरोनाशी चिवटपणे संघर्ष करून तग धरून आहेत.या उलट भारतात आहे,कायदा फाट्यावर मारणारे सुदैव्याने राज्य व केंद्रात सत्तेवर आहेत.त्यांच्या सुचना कुठेही जनता गांभीर्याने घेतांना दिसत नाही. प्रत्येक राज्यातील शहरात पोलिसांना लाठी चार्ज करावा लागत आहे. तरी ही रोडवरील गर्दी कमी होतांना दिसत नाही हे इतर देशांच्या लोकांना मनाला सुन्न करणारी गोष्ट आहे.परदेशात असलेले भारतीय लोक आपल्या लोकांना सावधान करण्यासाठी दररोज वेगवेगळ्या भागातून व्हिडीओ क्लिप पाठवीत आहेत. तरी आपण भारतीय लोक त्या गांभीर्याने पाहत नाही आणि विचार ही करत नाही. कोरोना च्या गंभीर संकटावर चर्चा होण्या ऐवजी पोलिसांनी दंडे का मारले त्यांना हा अधिकार कोणी दिला यावर जागोजागी मात्र चर्चा होतांना दिसते. ही मनाला सुन्न करणारी गोष्ट आहे.
एक डॉक्टर मरण्या पुर्वी आपल्या घरी बायको,मुलांना भेटण्यासाठी जातो, बायको मुलांना गेट वर थाबूंन बाहेरून पाहतो.थोडी विचार पूस करतो. अणि निघुन जातो.हॉस्पिटल मध्ये गेल्यावर निसर्गाच्या विज्ञानाच्या नियमानुसार या जगाचा निरोप घेऊन निघून जातो. किती दुःखाचा क्षण असेल तो की आपल्या बायकोची,मुलांची गळाभेट सुध्दा घेता आली नाही, ना प्रेम करता आले, ना पापी घेता आली आपल्या लेकरांची, ही मनाला सुन्न करणारी गोष्ट आहे कि नाही?.
डॉक्टर हा शेवटच्या क्षणा पर्यंत मानवाचा जीव वाचविण्यासाठी विज्ञानाचा सहारा घेऊन कार्यरथ असतो पण हीच वेळ त्यांच्यावर आली तर तो सर्वच बाजूने विचार करून निर्णय घेतो,तो भावनिक होत नाही, आणि स्वता न घाबरता इतरांना घाबरून सोडत नाही.हाच आदर्श सुशिक्षित उच्च शिक्षित लोकांनी घेऊन भविष्यात वागले पाहिजे.डॉक्टर सुधीर देहरीया यांच्या सेवा भावी कार्याने जगाला एक मोठा आदर्श घालून दिला.ते नवीन पिढीला नेहमीच प्रेरणादायी ठरेल त्यांच्या या मानव सेवा मानाचा मुजरा.
दुसरी घटना अखंड मानवजात आपली कर्जदार असेल डाॅ हैदियो अली हे नांव नेहमी लक्षात ठेवा, हे मार्मिक चित्र त्यागाची प्रतिक आहे हे इंडोनेशियाचे डाॅ हैदियो अली यांचा शेवटचा फोटो आहे,जे कोराना बाधीत रूग्णांचा इलाज करता करता स्वत सक्रंमित झाले. जेव्हा त्यांना वाटलं की ते आता वाचु शकत नाही तेव्हा ते आपल्या घरी गेले, बाहेरूनच आपल्या घराच्या गेटवर थाबुंन आपल्या पतीला व दोन लहान चिमुकल्या मुलांना मन भरून पाहीले, आणि निघुन गेल्या हॉस्पिटलमध्ये गेल्यावर सलाईन लाऊन ते इतर रुग्णांना तपासत होत्या डाॅ हैदियो अली हे माणसाच्या रूपात खरा सुपरहिरो ठरल्या आहेत, त्यांनी मानवजाती साठी दिलेले बलिदान व्यर्थ न जाण्या साठी आपण त्यांनी दिलेला संदेश पाळावा. कृपया आपल्या परिवाराच्या सुखी जीवनासाठी, तसेच देशासाठी,मानवजाती साठी घरीच रहा, कृपा करून बाहेर पडु नका.हीच खरी श्रध्दांजली असेल डॉक्टर सुधीर देहरीया आणि डाॅ हैदियो अली सारख्या देवदुताला असेल.
दोनच डॉक्टर साध्य सोशल मीडियावर व्हायरल होतात पण असे शेकडो डॉक्टरनी मानवसेवा करताकरता देह त्याग
केला आहे. इटली स्पेन,इंडोनेशिया,अमेरिका आणि विशेष वुवान मध्ये असा लक्षवेधी घटना घडल्या पण त्यावर सरकारची सेन्सर शिप असल्यामुळे चर्चा नाही,फेसबुक, व वॉट्स अप असल्यामुळे ह्या घटना आपल्यास समजतात. भारतीय नागरिकांना सरकारने किती विनवण्या करून सूचना दिल्या तरी न जुमानता रोडवर फिरणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही.त्यामुळे दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे म्हणजे परिस्थिती चिंताजनक आहे.
मनाला जे वाटल ते नियमितपणे लिहत असतो,वृत्तपत्राच्या संपादकांनी प्रसिध्द केले नाही केले तरी लिहत असतो. कृपा करून विनंती करतो काळजी घ्या आपली व आपल्या कुटुंबीयांची व देशाची!!!.
आज संपूर्ण देश कोरोनाशी झुंज देत आहे. यात आघाडीवर आहेत अर्थातच डॉक्टर आणि त्यांचे सहकारी. तळहातावर शिर घेऊन हे योद्धे मैदानात उतरले आहेत. नोकरीचा भाग म्हणून काम करणं वेगळं आणि एक मिशन समजून त्यात स्वतःला झोकून देणं वेगळं . जिथं विज्ञान थांबतं तिथं अध्यात्म सुरू होतं अशी शेखी मिरविणारे कीडे-मकोडे-भिडे भारतात पायलीचे पंधरा आहेत. अन् अशा हॉस्पिटल बाहेर वेड्यांचे भक्त तर पावला पावलावर भेटतील.अशा बिनडोक गुरुजीच्या बडबडीने दुखी न होता विज्ञानाची कास धरत कोरोना संकटाचा हे योद्धे निडरपणे आणि समर्पित भावनेने मुकाबला करत आहेत. कारण ते जाणतात अध्यात्माचा अंतिम थांबा विज्ञानच असून आपणास थांबता येणार नाही.
संकट आल्याशिवाय माणसं देव आणि डॉक्टरांचा धावा करत नाहीत. ही मानवी प्रव्रुती होय. कदाचित म्हणूनच 'गरज सरो... वैद्य मरो...' ही म्हण रूढ झाली असावी. एकच वाटतं- कोरोनावर मात करायची असेल तर देवाचा धावा नव्हे; तर डॉक्टरात देव शोधा. त्यांचे मनोबल वाढवा. कोरोनाला हरविण्यासाठी डोक्याला कफन बांधून लढणा-या डॉक्टर,नर्स आणि सर्व कामगार कर्मचारी वर्ग यांचा अभिमान वाटला पाहिजे. त्यांचे मानावेत तेवढे आभार कमी आहेत.
कोरोना संकाटला रोखले नाही तर मनाला सुन्न करणारी गोष्ट घटना घडेल याची कल्पना आहे काय ?.सरकारच्या सुचनाचे पालन नाही केले तर डॉक्टर आणि हॉस्पिटल बेड मिळणार नाही.भारत 135 कोटी लोकसंख्येचा देश. 84 हजार लोकांमागे 1 आयसोलेशन बेड, 36 हजार लोकांमागे 1 क्वारंटाईन बेड, देशात ॲलोपथी डाॅक्टर 11 लाख 54 हजार सरकारी रुग्णालयातील बेड्स 7 लाख ..आणखी तयार होत आहेत पण कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला तर नियंत्रण करणे अवघड होईल आणि डाॅक्टर, हाॅस्पिटल दोन्ही नाही मिळणार.म्हणूनच सर्वांनी
सरकारच्या सूचना पाळा.घरीच रहा !! सुरक्षित रहा !!!.
जन्मापासुन ते मृत्युपर्यत माणुस जगण्यासाठी प्रत्येकाशी शर्यतीत धावत असतो आणि तिथे जो थांबला तो संपला.पण आज आयुष्यात पहिल्यांदाचं अशी शर्यत होतेय,जो थांबेल तोच जिंकेल.घरीचं थांबा,आरोग्य सांभाळा.लॉकडाऊन मुळे मला उमगलेल्या काही गोष्टी तुम्हाला पण अनुभव आलाच असेल.मी घरात बसून अत्यावशक सेवा देत आहे.निवांतपणे झोप येत नाही.सतत असंघटीत कामगारांचे मोबाईलवर कॉल सुरु असतात. मनाला सुन्न करणारया गोष्टी आहेत.सतत लिहणार आहेच.
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडू प मुंबई.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा