इतिहासात विशेष पोलिस महानिरीक्षक (ना.ह.सं) विभागाचे
कैसर खालिद साहेबांचा कार्यकाल सुवर्णअक्षरांनी लिहला जाईल.
जातीच्या नांवा वर शिक्षणात व नोकरीत आरक्षणाची सवलत घेऊन उच्चपदस्थ झाल्यावर सर्व विसरतात.डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते शासन कर्ती जमात बना!. म्हणजे आमदार,खासदार बना असा अर्थ नव्हता,तर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक अश्या मोख्याच्या जागी जाऊन बहुजन समाजाला न्याय हक्क व अधिकारी मिळवून द्या असा त्यांचा अर्थ होता.या परीक्षेत किती मागासवर्गीय,ओबीसी आदिवासी अल्पसंख्याक अधिकारी पास झालेत?.
विशेष पोलिस महानिरीक्षक मा.कैसर खालिद साहेब यांनी नागरी हक्क संरक्षण विभागाची सूत्र हाती घेतल्यापासून आजपर्यंत या विभागात खुप सारे यशस्वी अमूलाग्र बदल केले आहेत.यु.पी.एस.कैसर खालिद यांचा जन्म 19 जुलै 1971 ला बिहार राज्यात झाला आहे.उर्दू भाषेवर प्रभुत्व असणारे खालिद साहेब उत्कृष्ट शायर आहेत.
विशेष पोलिस महानिरीक्षक झाल्यानंतर त्यांनी अनुसूचित जाती-अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय व विभागीय स्तरावर कायद्याच्या प्रसार-प्रचारासाठी सर्व उपविभागीय पोलिस अधीक्षक, सहाययक पोलिस आयुक्त,पैरवी अधिकारी यांचे प्रशिक्षण स्वतः कैसर खालिद अतिशय उत्तमरीत्या घेतात. यामध्ये कायद्यातील तरतुदी,कायद्याचे समज-गैरसमज, तपासातिल त्रुटी,शासन निर्णय,परिपत्रके पावर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे शिकवतात.त्यामुळे राज्यातील एट्रोसिटी ऍक्ट मध्ये शिक्षेचे प्रमाण वाढले आहे.
अत्याचार झालेला कोणताही पीडित व्यक्ती त्यांच्या विशेष पोलीस महानिरीक्षक ना.ह.स मुख्यालय मुंबई कार्यालयात गेला असता त्यांच्या शंकांचे निरसन करून संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाही करायला लावणे हा त्यांच्या दिनचर्येचा एक भाग झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोणताही अत्याचार पीडित व्यक्ती त्यांना भेटल्यानंतर अतिशय समाधानी दिसतो.जात,धर्म प्रांत,भाषा विसरून अन्याय,अत्याचार गस्त कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिक पणे काम करणारा अधिकारी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
मंत्रालयातील प्रत्येक बैठकीत बौद्ध मागासवर्गीय आदिवासी अल्पसंख्याकांच्या वरील अत्याचारात शिक्षेचे प्रमाण कसे वाढवता येईल आणि परिणामकारक अंमलबजावणी कशी होईल जलदगतीने न्याय कसा मिळवता येईल याबद्दल वस्तुनिष्ठ अहवाल सादर करून परखड मत व्यक्त करणारे खालिद साहेब अधिकारी आहेत.
त्यांच्या तीन वर्षांच्या काळात अनेक महत्वाची परिपत्रके काढलीत यामध्ये फिर्यादी व साक्षीदारांच्या अधिकारांच्या अंमलबजावणीचा तसेच शिक्षेचे प्रमाण वाढवण्यासाठीचे परिपत्रकांचा समावेश आहे.महत्वाचे म्हणजे ही सर्व परिपत्रके पोलिसांच्या महापोलिस या वेबसाईटवर अपलोड केली आहेत त्यामुळे परिपत्रके सर्वांना मिळवणे सहज शक्य झाले आहे.
नागरी हक्क संरक्षण विभागात अनेक बदल केले आहेत यामध्ये जिल्ह्याच्या नागरी हक्क संरक्षन पथकाच्या अधिकाऱ्यांनी 24 तासांच्या आत घटनास्थळी भेट देऊन फिर्यादीचे सोबतचा फोटो वॉट्सअप वर पाठवणे पंधरा दिवसांनी पुनश्च भेट देऊन तपासाचा प्रगती अहवाल पाठवण्यासारखे आदेश आहेत.
या बरोबरच पोलिसांचे मानसिक आरोग्य व्यवस्थित राहावे त्यांनी ताण तनावांपासून मुक्त राहण्यासाठी कार्यशाळेत वेगवेगळे कार्यक्रम घेतात खरंच या नागरी हक्क संरक्षण खात्यात यापूर्वीही असे ऐतिहासिक काम कोणीही केलेले नाही. यापुढेही शक्य होईल असे वाटत नाही परंतु मा.कैसर खालिद साहेबांनी करून ठेवलेल्या कामामुळे नवीन येणाऱ्या अधिकाऱ्यांना सुद्धा अशा प्रकारे काम करून दाखवावे लागेल.
हे मी अनुभवातून सांगतोय विशेष पोलीस महानिरीक्षक कैसर खालिद हे पोलीस वर्दीतील देवमाणूस आहेत असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही.त्यांचा कार्यकाल सुवर्णअक्षरांनी लिहला जाईल म्हणून कैसर खालिद साहेबांना आमचा क्रांतिकारी सलाम आहे
वैभव तानाजी गिते
राज्य सचिव
नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस महाराष्ट्र
इमेल- vaibhav10484@gmail. com
मो.8530945857
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा