आपल्या देशात एक म्हण खूप लोकप्रिय आहे,प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री चा हात असतो,आहे?.तसाच देशात काँग्रेसचे पानिपत होण्यास एका स्त्री चा हात आहे,आणि भाजपा प्रणित केंद्रात सत्ता पालट करण्यास एका पेक्षा एक सरस स्त्रीयांचा हात आहे.सुषमा,उमा,जया,हेमा स्मुर्ती,आणि भूमाता ते भारतमाता देशातील सर्वच पुरुषांना प्रेरणा देणाऱ्या आहेत,त्यांना मनुस्मृती नुसार कोणत्याही देवाच्या देवीच्या मंदिरात प्रवेश नसला तरी देशाच्या सर्वोच्य संसद भवनात त्यांना प्रवेश भेटून समान अधिकार सिद्ध करण्या करीता लढण्याची गर्जना करण्याची सुवर्णसंधी भारतीय संविधाना मुळे मिळाली.त्याचे क्रेडिट ते आज कोणालाही देत असल्या तरी सत्य जे आहे ते सत्य मेव जयतेच आहे.
संसद भवनात भारतमाताच्या घोषणांनी सुरवात होताच ती दिल्ली ते गल्ली बोळात पोहचली त्याच पद्धत ने राज्यात भूमाता अतुप्त तुप्तीच्या अंगात घुसली आणि तिने अनेक विक्रम मोडले गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर तिने शनिचा चौथरा ओलांडला अंबेच्या गाभारयातही तिने प्रवेश केला, त्याबद्दल तिचे कौतुक ही झाले.पण अतुप्ती सारख्या तुप्तीला चौथरा ओलांडायचा आहे तो स्त्रीयांच्या मनात वर्षानुवर्षे घट्ट रूतून बसलेल्या रूढीपरंपरांचा आणि पापपुण्याच्या भ्रामक कल्पनांचा.खरतर तथाकथित धर्माचा ठेका घेऊन देवावर अधिकार सांगणाऱ्यांना कदाचित या गोष्टीचा विसर पडला असेल की ज्या देवांना तू चालत नाहीस त्यांचा जन्म तुप्ती सारख्य स्त्रीयांच्या उदरातूनच झालाय. पण तिची लढाई समाजाशी नाही.सरकारशीही नाही.पुरूषांशी तर बिलकूल नाही.कारण तिच्या शिक्षणाची मुहुर्तमेढ ज्यांनी रोवली.त्या ज्योति सावित्री, विधवा विवाह आणि संतती नियमनाची सुरूवात करणारे महर्षि आणि रघुनाथ कर्वे, केशवपन आणि सती सारख्या अनिष्ट प्रथांविरोधात लढणारे राजा राम मोहन राॅय या आणि अशा कित्येक पुरूषांनी समाजाच्या विरोधात जाऊन तिच्या आयुष्याला अर्थ दिलाय.माणूस म्हणून तुला ओळख दिलीय.म्हणूनच तिची खरी लढाई फक्त आणि फक्त स्वतःशी आहे.
तू कवटाळून बसलेल्या खोटया कर्मकांडाशी आहे.कारण, पोटच्या तीन पोरांनी उपाशी ठेवल असतानाही 'एक मुलगा पाहिजेच' घराचा वारसदार म्हणून मुलगा पाहिजेच असा उपदेश देणारी तुच आहेस.बाहेर स्त्री समानतेच्या गप्पा मारून घरी मुलगाच हवा असा अट्टाहास धरणारीही तूच आहेस.त्याकरिता लहानपणा पासूनच उपासतापास,धर्माच्या रीतीरीवाजाला मुलीला आईवडिलाच्या बंधनात राहावे लागते.लग्न झाल्यावर पती सासूसासरे त्यांचं शब्दा बाहेर जाण्याची तिला परवानगी नाही.तिला मतमांडण्याचा अधिकारच नाही,तिच्या स्वाभिमानाला किंमतच नाही.जन्मा पासून मृत्यू पर्यंत तिला शारीरिकदृष्ट्या अपवित्रच मानले जाते.
गणपती-नवरात्रीला स्वतःला अपवित्र समजून पाळीच्या गोळया घेणारीही तूच आहेस.पाळी आल्यावर घरातील कोणत्या वस्तूला हात न लावणारी,कपडा,जमीनला स्पर्श होऊ नये म्हणून गोणपाटवर बसणारी झोपणारी तूच आहे.लग्न न होणार्या, मूल न होणार्या आणि विधवा झालेल्या स्त्रियांना जगणं नकोसं करणारीही तूच आहेस.आणि म्हणून मंदीर प्रवेशाला विरोध करणारयां मध्ये ही तूच आहेस.कारण तूच स्त्री आहेस.कोणता फरक पडणार आहे मंदिरातील गाभाऱ्यात जाऊन त्यातून स्रीयातील अज्ञान अंधश्रद्धा कमी होऊल कि वाढेल?.
अतुप्त तुप्ती, तुला बदलाव लागेल.एकवेळ देवीची खणानारळाने ओटी नाही भरलीस तरी चालेल,पण रस्त्याकडेला अर्धवट कपडयात निजलेल्या असहाय्य स्त्रीच शरीर तुला झाकावं लागेल.देवासमोर पंचपक्वांनाची आरास नाही केलीस तरी चालेल पण निराधार आणि गरीब मुलींच्या तोंडात अन्नाचा घास तुला भरवावा लागेल.अन्यायाने गांजलेल्या लेकीबालीना मदतीचा हात द्यावा लागेल.वासनांध समाजाची तुला भिती वाटते ना, मग तुझ्या मुलाच्या वासनेची शिकार कोणी होणार नाही याची जबाबदारी तुला घ्यावी लागेल.
'अशीच आमुची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही झालो असतो सुंदर रूपवान' असे म्हणून परस्त्रीकडे मातेसमान पहायला लावणारी शिवाजी महाराजांची दृष्टी म्हणजे दुसर तिसर काही नव्हत गं! ती जिजाऊंच्या संस्करांची ताकद होती, ही ताकद तुला तुझ्या 'मुलाच्या नजरेत आणावी लागेल.' मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केलास, म्हणून काहीच बदल होणार नाही,त्यापेक्षा तुझ्या मनाच्या गाभाऱ्यात जाऊन तुझ्यातल्या स्त्रीशक्तीच दर्शन तुला दाखवावे लागेल.तुझी बुध्दीमत्ता, विद्वत्ता, तुझं वात्सल्य, तुझा कणखरपणा, तुझी सहनशीलता, सृजनशीलता यांचा साक्षात्कार तुला झाला तरच बदल होईल.स्त्री शक्ती त्याग, समर्पण, नवनिर्मितीची क्षमता साऱ्या निसर्गशक्ती तुझा समोर हात जोडून उभ्या आहेत.तुझ्याशिवाय धर्मच काय सृष्टीच्या निर्मितीची कल्पना सुध्दा करता येत नाही.तुझ्या श्रध्देला कोणीच नाकारत नाही.अतुप्ती तुप्ती एवढच सांगणं आहे; श्रध्दा ठेवायची ती स्त्रित्वावर , जागर करायचा तो स्त्रिशक्तीचा, संहार करायचा तर स्वतःला अपवित्र, दुय्यम,समजणार्या स्वतःमधील दुष्ट प्रवृत्तींचा,आणि धर्म पाळायचा तो माणुसकीचा. मंदिर प्रवेश नव्हता तरी माॅसाहेब जिजाऊ 'राष्ट्रमाता' झाल्या.मंदिर प्रवेश नव्हता तरी आहिल्या बाई होळकर एक कुशल राज्य प्रशासक झाल्या.मंदिर प्रवेश नसला तरी सावित्रीबाई 'क्रांतीज्योती' शिक्षिका, मुख्याध्यापिका झाल्या.मंदिर प्रवेश नव्हता तरी लक्ष्मीबाई झीलकरी झाशीच्या 'राणी' झाल्या.मंदिर प्रवेश नव्हता तरी लतादीदी हिंदुस्थानच्या 'गानकोकिळा' झाल्या.मंदिर प्रवेश नव्हता तरी आनंदीबाई जोशी पहिल्या महिला डाॅक्टर झाल्या.मंदिर प्रवेश नव्हता तरीही कल्पना चावला पहिल्या महिला अंतराळवीर झाल्या.मंदिर प्रवेश नव्हता तरी इंदिरा गांधी देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या.मंदिर प्रवेश नव्हता तरी ममता,जयललिता,आनंदीबेन आणि मायावती मुख्यमंत्री झाल्या,मंदिर प्रवेश नव्हता तरीही प्रतिभाताई देशाच्या पहिल्या महिला 'राष्ट्रपती' झाल्या.
अतुप्ती तृप्ती तुम्हाला मंदिर प्रवेश मिळालायं.पण मासिक पाळीतून,बाळंतपणातून होणाऱ्या विटाळाला घराघरातुन कसे घालविणार ?.हे मोठे अज्ञान अंधश्रद्धा धर्ममातन्डानी स्रियांबाबत माणसाच्या मेंदूवर कोरून ठेवले ते कसे घालविणार?. निदान तुम्ही 'स्त्रीयापासून स्त्रीयांना होणाऱ्या मानसिक त्रासाला कसे मुक्त कराल?.कारण या देशात जिवंत स्त्रीयांची किंमत मेल्यावर भूमाता किंवा भारतमाता म्हणून केल्या जाते.ते मान्य नसणाऱ्यांना देशद्रोही मग अतुप्ती तुप्ती तुमचा संघर्ष कोणा बरोबर असायला पाहिजे होता,एकूणच सर्वच स्रियांनी याचा विचार मोबाईल कॉम्पुटर,नेटच्या जमान्यात केला पाहिजे.