सोमवार, २३ मार्च, २०२०

वधू वर सूचक मंडळ आणि वृद्धाश्रम

वधू वर सूचक मंडळ आणि वृद्धाश्रम 
भारतात धर्म रिती रिवाजाचे पालन करून समाजात राहावे लागते.ज्याने समाजाचे रिती रिवाज नाकारले त्यांची त्यांचे जवळचे नातलग सर्व संबधं तोडून टाकतात, गांव सोडून शहरात आलेले लोक सुशिक्षित सुरक्षित नोकरी करणारे असतात,आणि ते चाळ, बिल्डिंगच्या प्लॉट,बंगला, किंवा सरकारी निवास स्थानात राहत असल्यामुळे त्यांना त्यांच्या समाजाची नातलागची गरज वाटत नाही. कामावरील,कार्यालयातील सहकारी व राहतात त्याठिकाना वरील रहिवासी जवळचे नातलग मित्र मंडळी होत असतात. ते सुखा दुःखात सहभागी होत असतात,त्यामुळे बहुसंख्य लोक जात लपवून राहतात, हिंदू म्हणून सर्वच जातीचे लोक एकत्र सर्वच सण साजरे करतात.खरा प्रश्न उभा राहतो तो मुत्यू झाल्यावर किंवा लग्न करतांना इथे जात लपवता येत नाही, हिंदू धर्माच्या रिती रिवाजा नुसार नवरा मरो किंवा नवरी मरो ब्राम्हणाला दक्षिणा द्यावीच लागते.तसेच धर्मा नुसार बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल,इथेच जात लपवून राहणाऱ्या कुटुंबातील व्यक्तीची खरी गोची होते,इथेच समाज आणि नातलगातील आपले स्थान दिसून येते.लोक नालायक आहेत आपणच शहाणे आहोत.असा समज काही लोकांचा असतो.त्यामुळेच त्या लोकांना समाजात वधू वर सूचक मंडळाची गरज भासू लागते, हा चांगला उत्पन्न देणारा धंदा आहे.आणि वरून सामाजिक जबाबदारी म्हणून समाजसेवा आहे. लग्न जुळवून देण्याचे आमचे काम आहे. मुलामुलींवर जाती धर्मानुसार धार्मिक संस्कार, रितीरिवाज, एकत्र कुटुंबात राहण्याची मानसिकता याबाबत पुढे मुलामुलींच्या कुटुंबात कलह,तक्रारी भांडण तंटा कोणतीही घटना घडली तर आमची वधू वर सूचक मंडळांची जबाबदारी नाही हे सांगितले जाते.
प्रादेशिक जिल्हावाद त्यानुसार परंपरा त्यानंतर मुलगी वरील व मुलांवरील संस्कार एकत्र राहूच देत नाही, कारण आर्थिक मुबलता असल्यामुळे सर्व सेवा करणारे उपलब्द असतात. मग मुलीने सासरी घरातील कामे आणि सेवा करणे अशक्य असते.त्यामुळे मुलीला सासूसासरे चालत नाही,मुलीचे आईवडील मुलाच्या आईवडीलाला समजून घेत नाही, कोणालाच कोणाची म्हणजे नातलग समाजाची भीती नसल्यामुळे सुशिक्षित सुरक्षित नोकरी करणाऱ्यांना तडजोड किंवा घटस्फोट करावाच लागतो.यातूनच वृध्दाश्रमाची निर्मिती होत आहे. यातुन कोणताच समाज आणि जात धर्म सुटलेला नाही.
हिंदू धर्मात 6600 जाती आहेत.एका जातीचा दुसऱ्या जातीत बेटी व्यवहार होत नाही.मात्र लग्न आणि मुत्यूच्या सर्व प्रकारच्या विधी करण्यास ब्राम्हण असने बंधनकारक आहे.हिंदू धर्मातील कोणत्याही शहरात राहणाऱ्या उच्च शिक्षित माणसांची आजची परिस्थिती या पेक्षा वेगळी नाही. उच्च शिक्षित तरुण पिढी का घडत नाही? काही अज्ञानी अंधश्रद्धा मानणाऱ्या पालकांमुळे मानवधर्माची माहीती पुढील पिढीला पोहचत नाही. युवक युवतींना स्वत:च्या जाती धर्माची माहीती मिळविण्याची इच्छा शक्ती नाही.हिंदू धर्मातील तरुण पिढी परंपरा,रिती रिवाजा नुसार अज्ञान,अंधश्रद्धा यात सहभागी होतात.ते भीतीमुळे आईवडील,आजोबा, पणजोबा यांनी पालन केलेल्या परंपरा,रितीरिवाज डॉक्टर, वकील,इंजिनिअर, प्राध्यापक, शास्त्रज्ञन,विमान चालविणारा,पायलेट,रेल्वे इंजिन चालविणारा डॉयवर,चारचाकी चालवणार डॉयवर,कॉम्प्युटर सोफ्टवेअर हार्डवेअर इंजिनिअर कोणीही नाकारण्याची हिंमत करीत नाही. त्यामुळे काही प्रमाणात ते त्या त्या धर्माचे नऊ,दहा दिवस पालन करतात,नंतर जे करायचे ते करतातच. काही लोक हिंदू धर्मावर नेहमी टिका करतात पण हिंदू धर्मातील हजारो जाती,पोटजाती आरक्षनाच्या सवलती मुळे शिक्षण घेऊन सुशिक्षित झाल्या,त्यांच्या आर्थिक,सामाजिक,सांस्कृतिक आणि राजकिय परिस्थितीत परिवर्तन झाले.हे मान्य करीत नाही.विज्ञानाने किती ही झपाट्याने प्रगती केली तरी ते मान्य न करणारा बाप स्वतःच्या मुलीचे आंतरजातीय विवाह केला म्हणून शांत पणे तिचा खून करून जेलमध्ये जातो. शिक्षण घेतांनास मुलीने मनपसंत मुलाशी लग्न केले म्हणून घराण्याची इज्जत गेली म्हणणारा बाप मुलीचा खून करतो तेव्हा घराण्याची इज्जत जात नाही काय?.

बहुसंख्य लोक हिंदूंच्या देवा धिकांच्या मोहमाया तुन मुक्त झाले नाही, अर्ध्या पेक्षा जास्त युवकांना स्वत:ची जात नीट कळली नाही.ते फक्त गर्वसे कहो हम हिंदू है म्हणतात. कारण घरातील आणि परिसरातील वातावरण त्यांना योग्य मार्गाने जाऊ देत नाही.राजकारणाच्या स्पर्धेत सामाजिक, धार्मिक मार्ग दिशाहीन झाले आहेत. मानवधर्माचा प्रचार करायला लोकांना राजकीय आशीर्वाद लागतो. सर्वधर्मसमभावाचे कारण पुढे करून सर्रास हिंदु धर्माचा उदो उदो करत जाती जातीचा गणेशोत्सव,नवरात्रत्सोव, जत्रा,भंडारे मोठ्या उत्सवात साजरे होतात.मागासवर्गीय समाजातील लोकांना स्वजातीची अस्तित्वच नाही,ते हिंदू म्हणून जगतात,त्यांच्या समाजाचे प्रबोधन करायला कोणीही पुढे येत नाही आणि जरी कोणी येत असेल तर त्याला पाठींबा देत नाहीत.ते शिर्डी, तिरुपती, बालाजीला हजारो रुपयॆ देवून नवस करतील.मग असा लोकांच्या मुलामुलींचे लग्न समाजातील आणि नात्यातील लोक का म्हणुन करत नाही?.
हिंदू सर्व समाज कुलदेवता, ग्रामदेवतेच्या देवळात, शेंगाव,शिर्डीला जातात. तेव्हा विचार करा की यांच्या घरात कोणते संस्कार असतात. मग यांच्या मुलामुलीला लग्न करतांना वधु वर सूचक मंडळाचा पर्याय का निवडावा लागतो.वधु वर सूचक मंडळाने जुळविलेली लग्न दोनतीन वर्षात वेगळे होतात,फारशी टिकल्याची उदाहरण दिसत नाही.जी टिकतात त्यांचे आई किंवा वडील वृद्धाश्रमात असतात. मी अनेक वृध्दाश्रमाला भेट देऊन त्यांच्या मुलाची चौकशी केली तर हे सत्य बाहेर येते.पण त्यावर कोणीच कोणती कारवाई करीत नाही.कारण समाज आणि नातलगात न राहणारी मंडळी आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवते,राज्यात मुबलक वधुवर सूचक मंडळ आणि वृद्धाश्रम खोलली जात आहेत.त्यांच्या मागील ही कारण आहेत.वृद्धाश्रम बंद करण्या करीता सुनेने सासू, सासऱ्यांना संभाळण्या करीता मुलीवर संस्कार असणे आणि समाजाचे नातलगाचे दडपण असणे खूप गरजेचे आहे.म्हणुन सून करतांना मुलीचे शिक्षणा पेक्षा घरातील एकत्र कुटुंब राहण्याचे संस्कार महत्वाचे आहे, ते पहा उद्याच्या भविष्या करीता 
सागर रामभाऊ तायडे,
9920403859,भांडुप,मुंबई

(जमशेटजी नसरवानजी टाटा ३ मार्च जयंतीनिमित्त) सांगा आम्हाला बिर्ला बाटा टाटा कुठाय हो?

(जमशेटजी नसरवानजी टाटा ३ मार्च जयंतीनिमित्त)


सांगा आम्हाला बिर्ला बाटा टाटा कुठाय हो?
भारत हा कृषिप्रधान देश होता.बहुसंख्येने लोक हे शेतीवर अवलंबून होते,शेतकरी शेतमजूर यांना शेतीच्या कामासाठी लागणारे साहित्य कोण उपलब्ध करून देत होते. वखर,नांगर,खटारा,चाक,कुदळ, फावडा,टिकाव घमेल कोण बनवीत होते तर गांवातील लोहार,सुतार यांच्याकडे मुबलक प्रमाणात हे साहित्य उपलब्ध होत नव्हते.हे सर्व साहित्य उपलब्ध करुन देणारा देशातील पहिला उद्योगपती कोण आहे?.असे आजच्या सुशिक्षित पिढीला नांव विचारले तर सांगता येणार नाही. भारत माझा देश आहे सर्व भारतीय माझे बांधव आहेत.त्यांच्यासाठी लागणारे चांगल्या दर्जाचे साहित्य उपलब्ध करून देणे हे माझ्या कंपनीचे उद्धिष्ट आहे.असा म्हणणार भारतीय उद्योगपती आपणास माहिती आहे काय?.जमशेदजी नसरवानजी टाटा ३ मार्च १८३९ पारशी कुटुंबात यांचा जन्म झाला. तो देशातील पहिला उद्योगपती होता.तो पारशी होता म्हणून त्यांच्या कामाचा खऱ्या अर्थाने गौरव कुठेही होतांना दिसत नाही,तो जर ब्राम्हण असता तर गावागावात साप्ताहिक पारायणे झाली असती. ज्याप्रमाणे रामायण, महाभारत, पांडवप्रताप, कृष्णलीला, श्री समर्थ,यांच्या कथा आणि पारायणे सप्ताह गावागावात मोठ्या उत्साहात साजरा केले जातात. शेतकऱ्यांना शेतमजूरांना यांत कायमस्वरूपी गुंतवून ठेवले जाते.त्या जागी जमशेदजी नसरवानजी टाटा यांच्या देशभक्तीचे गुणगान झाले असते.तर देवा धर्माच्या देवळाच्या जागी, शाळा कॉलेज सुरू झाली असती.टाटा च्या कामाची दखल पाहिजे त्या प्रमाणात कुठे ही होतांना दिसत नाही.
बहुजन समाजाच्या एकूण चळवळीत विशेष आंबेडकरी चळवळीत लोकशाहीर वामन दादा कर्डक यांचे एक क्रांतिकारी गीत प्रत्येक कार्यकर्ताच्या तोंड पाठ असते.सांगा आम्हाला बिर्ला बाटा टाटा कुठाय हो?. सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठाय हो?. हे क्रांतिकारी गीत आहे. याबाबत शंकाच नाही, हे गीत लिहतांना कोणती परिस्थिती होती माहीती नाही. पण आज टाटा उद्योग समूहाची भारतीय नागरिकांच्यासाठी विशेष बहुजन समाजातील मागासवर्गीय जाती जमातीच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी, कल्याणकारी योजना कुठे राबविण्यात येत आहेत त्यांची माहिती दिली जात नाही.म्हणूनच ३ मार्च ही जमशेदजी टाटा यांच्या जयंती दिनानिमित्त मी पाहिलेल्या गोष्टीवर लिहत आहे.
भारतात अनेक उद्योगपती आहेत.पण त्यांचा भारतीय म्हणून उदोउदो करावा असे त्यांचे कोणतेही ठोस कार्य नाही.केवळ पैसा कमविण्यासाठी वाटेल त्या मार्गाने भारतीय जनताचे आर्थिक शोषण करावे त्यासाठी राजकीय पक्षांच्या नेत्यांना भ्रष्ट मार्गाने अर्थपुरवठा करून सत्ताधारी बनवून सर्व सार्वजनिक उद्योग धंदे ताब्यात घ्यावे हा त्यांचा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे. पण टाटा समूहाचा एकूण इतिहास पाहिला तर भारतीय नागरिकांना प्रेरणा देणारा आहे.ब्रिटिश सरकारच्या विरोधात आंदोलनात भाग घेण्यासाठी भरपगारी सुट्टी देणारा उद्योगपती देशात शोधला तर सापडणार नाही.अज्ञान अंधश्रद्धा यांच्यात गुरफटलेल्या बहुसंख्य बहुजन मागासवर्गीय समाजाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण देऊन कुशल मनुष्यबळ निर्माण करणारा उद्योग समूह म्हणून टाटा चे नांव गर्वाने सांगितले पाहिजे.शेतकरी शेतमजूर यांना शेतीच्या कामासाठी लागणारे साहित्य  वखर,नांगर,खटारा,चाक,कुदळ,फावडा,टिकाव घमेल व लोखंडी पत्रे स्वस्त आणि मस्त देणारा टाटा बँड सर्वांना माहिती आहे. लोक विश्वासाने सांगतात कोणतीही वस्तू खरेदी करायची असेल तर टाटा कंपनीची घ्यावी उत्तम दर्जाची टिकावी असण्याची शंभर टक्के विश्वसनीय असते.
जमशेटजी नसरवानजी टाटा यांच्या जन्म ३ मार्च १८३९ ला गुजरात मधील नवसारी येथे झाला. भारतात त्यांनी अनेक उद्योग धंद्याची सुरवात केली.त्यांच्या प्रत्येक उद्योग धंद्याला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी त्यांची माहिती आजच्या पिढीला निश्चितच प्रेरणादायी आहे.पण ती सांगितल्या जात नाही लिहल्या जात नाही. कारण विज्ञानवादी टाटा कंपनीच्या मुख्य कार्यकारी संचालक मंडळाच्या पदावर ब्राम्हणांचे वर्चस्व प्रस्थापित आहे.म्हणून जमशेटजी नसरवानजी टाटा च्या ३ मार्च जयंतीनिमित्त दोन शब्द बोलतांना गजानन महाराज प्रगट दिनाशी तुलना केली जाते. पण ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगितल्या जात नाही. बंगळुर येथे टाटा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स यांची स्थापना करून तिच्या शाखा,मुंबई, हैदराबाद,पटना, चेन्नई, दिल्ली येथे आहेत.समाजसेवक म्हणून प्रसिद्ध असणारे अनेक समाजसेवक एम एस डब्लू (MSW) मास्टर ऑफ सोशल वर्क  टीस TISS मधून झाले आहेत. तेच केंद्र व राज्य सरकारच्या योजना राबविण्याचे एन जी ओ मार्फत कामे करतात. टाटा यांच्या जीवनात चार घटना घडल्या त्यामुळे त्यांनी चार ध्येय पूर्ण करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केला. भारतीयांना लोकांडाच्या वस्तू लागतात त्या निर्माण करण्यासाठी पोलाद कंपनी जमशेदपूर येथे काढली,साची गांवात टाटाचा लोखंड व पोलाद प्रकल्प उभारला स्थानिक पातळीवरील लोकांना मोठ्या प्रमाणात नोकऱ्या मिळाल्या.जमशेद पूर आज झारखंडमध्ये नामांकित मोठे शहर म्हणून ओळखले जाते, टाटा स्टील पूर्वीची टाटा आर्यन आणि स्टील कंपनी लिमिटेड ही आशियातील पहिली व भारतातील सर्वात मोठी स्टील कंपनी होती.तिच्या कोरस ग्रुपने दरवर्षी २.८कोटी टन स्टील उत्पादन केल्यामुळे ती जगातील पाचव्या क्रमांकाची स्टील कंपनी ठरली.एक जागतिक दर्जाची शिक्षण संस्था,बंगलोरची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स विज्ञान आणि अभियांत्रिकी यामधील संशोधन व शिक्षण देण्यासाठी प्रख्यात भारतीय संस्था आहे.(TISS),  हायड्रो इलेक्ट्रिक वीजनिर्मिती कंपनी खपोली,भिरा, भिवपुरी, टाटा हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर सप्लाय कंपनी म्हणजे आताची टाटा पॉवर कंपनी आठ हजार मेगाव्हॉट पेक्षा जास्त क्षमतेची स्थापित क्षमतेची भारतातील सर्वात मोठी खाजगी वीज निर्मिती, पुरवठा,वितरण करणारी कंपनी आहे.गेट ऑफ इंडिया समोर जी ताजमहाल हॉटेल आहे तिचे ३ डिसेंबर १९०३ ला उद्घाटन झाले ती भारतातील पहिली स्वतःची वीज असणारी एकमेव हॉटेल आहे.एक अद्वितीय हॉटेल ते मुंबई सह प्रत्येक देशात आहे.  जमशेटजी नसरवानजी टाटा यांनी १८५३ हिराबाई दबू यांच्या सोबत लग्न केले,१८५८ शिक्षण पूर्ण करून वडिलांच्या व्यवसाया मध्ये सहभागी झाले.१८६८ ला स्वतःची कंपनी स्थापन केली.१८७४ महाराणी मिलची स्थापना केली.१९०१ ला युरोप, अमेरिका येथे स्टील उत्पादन व्यवस्थापन यांचे शिक्षण घेण्यासाठी यात्रा केली,१९०३ ताज हॉटेलची स्थापना केली. शेवटी १९ मे १९०४ ला निधन झाले. जमशेटजी नसरवानजी टाटा संपूर्ण भारताचे उद्योग क्षेत्रातील प्रेरणास्रोत म्हणून ओळखल्या जातात.त्यांची टाटा ग्रुप ऑफ कंपनी भारताचीच नव्हे तर जगातील सर्वात मोठी कंपनी म्हणून ओळखल्या जाते. त्या कंपनीचा मी एक कामगार कर्मचारी आहे नुकताच २५ वर्ष लॉग सर्व्हिस आवार्ड मला मिळाला आहे.जमशेटजी नसरवानजी टाटा यांच्या जयंतीनिमित्त सर्व कामगार कर्मचारी वर्गांना हार्दिक शुभेच्छा.
सागर रामभाऊ तायडे,भांडुप मुंबई- ९९२०४०३८५९,

(जमशेटजी नसरवानजी टाटा यांना अपमानास्पद वागणूक मिळाल्या मुळे त्यांनी काय काय केले आणि कसे केले हे पुढच्या भागात वाचा )

भाग 2 सांगा आम्हाला बिर्ला बाटा टाटा कुठाय हो?. सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठाय हो ?.

(भाग 2)
सांगा आम्हाला बिर्ला बाटा टाटा कुठाय हो?.
सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठाय हो ?.

जमशेदजी नसरवानजी टाटा ३ मार्चला जयंतीनिमित्त पहिला भाग अनेक वृत्तपत्रात प्रसिध्द झाला. जमशेदजीची १७७ वी जयंती टाटा ग्रुपच्या सर्व कंपन्यात आनंदात उत्स्फूर्तपणे साजरी झाली. टाटा ग्रुपची स्थापना शंभर वर्षा पुर्वी मुंबई येथे झाली होती.त्यांचा मुळ उद्देश हा उद्योगातुन देशसेवा करने हा होता.काही लोकांना ते आजही मान्य नाही. टाटाने पाण्याचा वापर करून वीज निर्मिती केली. त्यामुळे ते पाणी काही वर्षे रायगड जिल्ह्यातील लोक वापरत नव्हते.टाटा कंपनीचे सहा धरणे लोणावळा, वाळवण, सोमवाडी ठोकरवाडी शिरवटा आणि मुळशी पुणे जिल्ह्यात आहेत,आणि वीज निर्मिती करणारे संच भिवपुरी,खपोली,भिरा येथे रायगड जिल्ह्यात आहेत.धरणग्रस्तांच्या प्रत्येक कुटुंबातील व्यक्ती टाटा कंपनीत नोकरीला आहेत.काहींच्या चौथ्या पांचव्या पिढीतील तरुण इंजिनिअर झाले आहेत.
पहिल्या टप्प्यात सर्वच अंगठा बहाद्दर होते.पण प्रशिक्षण घेऊन ते कुशल कारागीर झाले.त्यांच्या कामाची पद्धत पाहून एम टेक,बी टेक इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर थक्क होत होते.कारण पुस्तकी ज्ञान आणि प्रत्येक्षात काम करून मिळविलेले ज्ञान यात निश्चितच फरक असतो.१६ ऑगस्ट १९९६ ला भिरा येथे माझी आणीबाणीच्या काळात टॉसफोर्स म्हणून नियुक्ती करण्यात आली.१५ ऑगस्ट १९९६ ला पाईपलाईन फुटून रायगड जिल्ह्यातील ३५ हजार गांवे पाण्यात वाहून गेले होते, गाई,म्हशी,घरे मोठी आर्थिक हानी झाली होती. पंधरा दिवसासाठी पाठविले होते.तेव्हा अडीच तीन वर्षे तिथे राहून मुळशी तालुक्यातील सर्व गांवे आणि माणगांव तालुक्यातील सर्व गांवाच्या लोकांशी ओळख निर्माण झाली. मुळशी धरणात ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांच्यासाठी महात्मा फुले यांनी आंदोलन केले होते, ब्रिटिशांनी टाटा कंपनीला जमीन देतांना प्रत्येक कुटुंबातील सदस्यानां कायमस्वरूपी नोकरी व गावाचे पुनर्वसनासाठी करण्याचे आश्वासन दिले होते.ते टाटा कंपनी ने पूर्ण केल्याचे सांगितले जाते. टाटा कंपनीने प्रत्येक गांवात रोड व शाळा बांधून दिल्या आहेत. पण राजकीय पक्षांच्या लोकांना टाटांच्या लोकांनी गांवात ढवळाढवळ करू नये असे वाटत होते. शाळा बांधण्या पेक्षा मंदिर बांधून द्या या मांगणीचा जोर होता.पण कंपनीच्या MSW अधिकाऱ्यांनी त्याला कधी मान्यता दिली नाही. याबाबतचे अनुभव खूप आहेत ते मी वेगळ्या पद्धतीने लिहणार आहे.
जमशेदजी नसरवानजी टाटा यांच्या ३ मार्च जयंतीनिमित्त लेख लिहावा असे खूप दिवसांपासून मनात होते, सांगा आम्हाला बिर्ला बाटा टाटा कुठाय हो?.सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठाय हो ?.असे जाहीरपणे विचारणारे लोक ते स्वीकारतील काय ही शंका मनात होती.पण टाटा ने देशासाठी देशातील गोरगरिबांसाठी काय काय केले.ते आपण पाहतो पण त्यावर चांगले चार शब्दांत कोणी लिहत नाही.
देशातील अनेक राज्यात टिस मधून समाजसेवक झालेले लोक माझा संपर्कात येतात. मी टाटा कंपनीत नोकरी करतो म्हणून नाही तर मी महात्मा ज्योतीबा फुले, रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या सत्यशोधक समाजाचे चळवळीचे असंघटित कामगारांना संघटित करून न्याय हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी काम करतो. म्हणून माझी ओळख होते. कारण टिस व निर्मला निकेतन कॉलेज ऑफ सोशल वर्क मध्ये जे BSW, MSW शिक्षण घेण्यासाठी येतात त्यांना स्थलांतरीत प्रवाशी कामगार,  इमारत बांधकाम कामगार, नाका कामगार, घरकामगार कुठे काम करतात व कुठे राहतात त्यांचा सर्व्ह करून रिपोर्ट लिहण्यास सांगितल्या जाते.तेव्हा सागर तायडे व सत्यशोधक कामगार संघटना यांचा संदर्भ दिल्या जातो. तेव्हा ते मला भेटतात मग ओळख होते, की टाटा गोरगरिबांसाठी काय करते.टाटा शिक्षण, आरोग्य आणि रोजगार यांचावर भर देते.योग्य शिक्षण मिळाले तर नोकरी, अज्ञान अंधश्रद्धा समस्या राहणार नाही. गंभीर आजार झाला तर टाटा हॉस्पिटल शिवाय पर्याय नाही. इतर आजारासाठी टाटा ट्रस्टच्या माध्यमातून मोठी आर्थिक मदत गोरगरिबांना नियमितपणे दिली जाते. गोरगरिबांच्या मुलांना इलेक्ट्रिकल, वायरमन, प्लंबर,फिटर,टर्नल हे कॉर्सचे मोफत प्रशिक्षण दिल्या जाते. जेणेकरून त्यांना गांवात कुठेही रोजगार उपलब्ध होऊ शकते. गोरगरिबांच्यासाठी बिर्ला,बाटा काय करते माहीत नाही. पण असंघटित गोरगरिबांना संघटित करणारी चळवळ जाहीर पणे विचारते.सांगा आम्हाला बिर्ला बाटा टाटा कुठाय हो?.सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठाय हो ?.
देशातील इतर उद्योगपती आणि टाटा यांचा देशासाठी देशातील नागरिकांसाठी काय करते हे सांगितल्या जात नाही. ते जी लूटमार करीत आहेत त्यांचे उघड समर्थन प्रिंट,चॅनल मीडिया करते.अशा उद्योगपतीमुळे देशातील स्वातंत्र्य, समता, बंधुभाव नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. मग टाटा ग्रुपचे मालक,संचालक,सर्व सर्वा रतन टाटा यांच्या 
जगभरात ९६ कंपन्या असूनही देशातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत त्यांचे नाव का नाही?.
आपल्या देशात अनेक तरूण उद्योजक जन्म घेत आहेत व हा आपल्या देशाच्या प्रगतीत हातभार लावणारा मोठ्ठा मुद्दा आहे. म्हणुनच तर आपल्या सरकारने मेक इन इंडियाचा नारा दिला. पण याच मेक इन इंडियाचा नारा आणखी एका व्यक्तीने स्वातंत्रपुर्व काळात देऊन आपल्या उद्योग जीवनाला आरंभ केला होता. ते थोर व्यक्तिमत्व म्हणजे जमशेदजी टाटा. अर्थातच टाटा ग्रुप चे संस्थापक. आज अनेक नवे उद्योजक टाटांचा आदर्श घेऊन आपल्या धंद्याला प्रारंभ करत असतात. पण देशासाठी,देशसेवा करण्यासाठी नाही तर नागरिकांचे आर्थिक शोषण करणे आमचा जन्म सिद्ध अधिकार आहे.त्यासाठी सर्व राजकीय सत्ताधारी आमचे गुलाम आहेत.हे दाखवून देण्यासाठी.
आता या टाटा ग्रुपची धुरा आहे रतन टाटा यांच्या हाती आहे. पण या टाटा ग्रुपच्या जगभरात इतक्या प्रमाणात उद्योग धंदे असुन सुध्दा ते भारतातल्या श्रीमंत लोकांच्या यादीत येत नाहीत. इतकंच नव्हे तर ते आपल्या देशातील अब्जाधीशांच्या यादीत सुध्दा येत नाहीत. तुम्ही म्हणाल हे कसं काय शक्य आहे?.  इतका मोठ्ठा उद्योगपती श्रीमंत कसा नाही?. याला काही कारणं आहेत. त्यांचेच प्रतिस्पर्धी मुकेश अंबानी मात्र भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत आपले नाव अबाधित ठेऊन आहेत.
पण लक्षवेधी आणि प्रेरणादायी घटना ही की मुकेश अंबानी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असुन सुध्दा त्यांची रिलायंन्स ग्रुप ही कंपनी भारतातील पहिल्या क्रमांकाची कंपनी नाही. तर भारतातील सर्वात मोठ्ठी कंपनी टाटा सन्स ची TCS ही आहे. टाटा कंन्सलटंन्सी सर्वीस प्रायव्हेट लि. ही कंपनी भारतातील सर्वात मोठ्ठी कंपनी असुन सुध्दा त्याचे मालक रतन टाटा देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती नाही आहेत.
६० टक्के मालकी सेवाभावी संस्थांकडे आहे.
टाटा ग्रुपची स्थापना शंभर वर्षा पुर्वी जमशेदजी टाटा यांनी मुंबई येथे केली. त्यांचा मुळ उद्देश हा उद्योगातुन देशसेवा करने हा होता. ते आपल्या उद्योगातुन भारताला इतर देशांप्रमाणे प्रगती पदावर घेऊन जायला इच्छुक होते. त्यांच्यानंतर जे.आर.डी. टाटा यांनी या कंपनीचे मालकत्व स्वीकारलं व १९९१ ला ही जबाबदारी रतन टाटा यांनी स्वीकारली. टाटांच्या जगभरात एकुण ९६ कंपन्या असुन २६ कंपन्यांचे शेअर्स लोकांसाठी शेअर मार्केट मध्ये उपलब्ध आहेत. म्हणजेच सामान्य लोक या २६ कंपन्यांचे शेअर्स खरेदी किंवा विक्री करू शकतात आणि या सर्व कंपन्यांची मदर कंपनी “टाटा ॲन्ड सन्स्” ही यांचे कामकाज चालवते. पण या कंपनीचे रतन टाटा हे पुर्ण मालक नाहीत. म्हणजे रतन टाटा यांच्याकडे या कंपनीचे पुर्ण मालकी ह्क्क नाहीत. या कंपनीचे ६० टक्के मालकी हक्क विविध संस्थांकडे आहेत. त्यामुळे कंपनीच्या नफ्यातील ६० टक्के हिस्सा या सेवाभावी संस्थांना जातो. या संस्थांमध्ये जे.डी. टाटा ट्रस्ट, श्री रतनजी टाटा ट्रस्ट इत्यादी संस्था कार्यरत आहेत. ज्या विविध समाज उपयोगी कामांना हातभार लावतात. या सर्व संस्थांची मालकी रतन टाटा यांच्या कडेच आहे. कारण टाटा ग्रुपचे मुख्य उद्दिष्ट देशसेवा आहे. "मेरे बाप का सपना सब हो अपना" ही नाही.

टाटा ग्रुपचा येवढा मोठ्ठा उद्योगाचा पसारा असुन सुध्दा रतन टाटा भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती नाहीत. पण जर या संस्थांचा हिस्सा नसता तर रतन टाटा हे केवळ भारतातील नव्हे तर श्रीमंतीच्या यादीत जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती असते. या वर त्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणतात की आपल्या उद्योगातुन देशाची प्रगती करणे हेच टाटा ग्रुपचे मुख्य उद्दिष्ट राहिले आहे. आणि तेच आम्ही निभावतो आहे. याउलट अंबानींचे उद्दिष्ट भारतीय नागरिकांचे आर्थिक पिळवणूक करून फक्त गडगंज नफा कमावने आहे.तरी अंबानीच्या वाईट प्रवृत्तीच्या विरोधात कोणी लिहत नाही,बोलत नाही. रतन टाटा यांना पत्रकारांनी मुकेश अंबानीं बाबत एक प्रश्न विचारला असता ते म्हणतात की “अंबानी हे बिझनेसमॅन आहेत पण मी एक साधा उद्योजक आहे.” त्यांच्या या वाक्यामुळे आपल्याला कळाले असेल की पैसा म्हणजे सर्व काही नाही. उद्योग उभा करायचा असेल तर प्रथम देशाचा विचार करूनच उद्योग सुरू करावा. याचे एक मुर्तीमंत उदाहरण म्हणजे रतनजी टाटा. ते पैशाने सर्वात श्रीमंत नसतीलही कदाचीत पण मनाने सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत रतन टाटा व टाटा ग्रुपचा क्रमांक सदैव पहिला राहिल आहे. मी अनेक उद्योगपती, बिल्डर च्या मुख्य कार्यालयात जातो,तिकडे मालकासाठी, एम डी साठी वेगळी लिप्ट असते,मालक येत असेल तर कोणीच कामगार कर्मचारी समोर दिसला नाही पाहिजे,टाटाच्या बॉम्ब हाऊस मुख्य कार्यालयात तसे नाही कामगार कर्मचारी अधिकारी रांगेत उभे राहतात,त्याच वेळी रतन टाटा आले तर ते ही रांगेत उभे राहतात.कॅन्टीन मध्ये सर्व बरोबर बसून जे कामगार कर्मचारी अधिकारी खातात तेच रतन टाटा खातात. अशा अनेक लक्षवेधी घटना  आहेत. की त्यांची तुलना मालक,कामगार, गरीब श्रीमंत अशी होतांना दिसते, पण जमशेदजी टाटा ते रतन टाटा पर्यत उद्योगातुन देशसेवा करने हेच उद्धिष्ट राहिले आहे.इतरांना ते जमणं शक्य नाही. ते आता देश विकून कमिशन मिळवण्यासाठी कोणत्याही स्तरावर जाण्यासाठी तयार आहेत मग सांगा त्यांना उद्योगातुन देशसेवा करायची आहे काय?.त्यांना जाहीर पणे विचारले पाहिजे.सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठाय हो?.
सागर रामभाऊ तायडे, भांडुप मुंबई ९९२०४०३८५९,

मुलगी (महिला) शिकली प्रगती झाली?.

मुलगी (महिला) शिकली प्रगती झाली?.              
भारत हा कृषीप्रधान देश आहे त्यात महिलांचे प्रमाण पुरुषा बरोबर ८५/९० टक्क्या पर्यंत आहे.महिला वर्ग हा सर्वात अज्ञानी,असुशिक्षित, असंघटीत आहे. मुठभर महिला सुशिक्षित आहेत त्या दरवर्षी महिला दिन आठ मार्चला साजरा करतात.पण ९० टक्के महिलांना आठ मार्च महिला दिन का साजरा करतात. ते सांगता येत नाही. मुलगी (महिला) शिकली प्रगती झाली?. जगातील महिला एकत्र येऊन त्यांनी मोठा संघर्ष केला म्हणून आठ मार्च जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो असे सांगितल्या जाते.पण त्या कोण महिला होत्या त्यांनी कोणा बरोबर संघर्ष केला.जातीव्यवस्थे विरोधात त्या लढल्या होत्या काय?. शिक्षण घेण्या करिता ब्राम्हणशाही विरोधात लढल्या काय?. त्याकाळी त्यांना शिक्षण घेण्याचा अधिकार कोणी नाकारला होता?. मनुस्मृती चे काय बंधन होती ?. मग महिलानी शिक्षण कसे घेतले?. मुलगी(महिला) शिकली प्रगती झाली?. असे आपण सर्वच म्हणतो. पण इतिहास सांगत नाही. जागतिक पातळीवरच्या महिलांनी डायरेक मतदानाचा अधिकार कसा काय मागितला?.
भारतात तो जगाचा जागतिक महिला दिन का पाळला जातो.भारतातील महिलाच्या आणि जगातील त्या महिलांचे समस्या समान होत्या काय?. या देशात सातच्या आत महिला घरात पाहिजे शिक्षणात, संपतीत,मालमतेत,आर्थिकदृष्ट्या तिला आजही किती अधिकार आहेत?. हे त्या महिला दिना निमित्य कोणी किती ऐतिहासिक कार्य केले. भारतातील बहुसंख्य असंघटीत महिलांना आठ मार्च महिला दिन कशाचा समजले पाहिजे. आठ मार्च महिला दिन साजरा करणाऱ्या संघटनांनी त्यांच्या प्रमुखांनी सांगितले पाहिजे,भारतातील प्रिंट, चॅनल मीडिया ते करत नाही. मृणाल कुलकर्णी, माधुरी दीक्षित, स्पृहा जोशी,केतकी चितळे, अमृता खानविलकर, अमृता फडणवीस,नेहा पेंडसे,आसावरी जोशी, गौतमी देशपांडे,अनिता दाते,केळकर,मृणाल दुसानीस, श्रुती मराठे,प्रिया बापट, तेजश्री प्रधान, यांनी भारतीय महिलांना शिक्षण घेण्यासाठी काय काय संघर्ष करावा लागला,कोणा बरोबर करावा लागला त्यांचा इतिहास सांगितला पाहिजे.मराठी सिरीयल मध्ये यांचेच वर्चस्व आहे.
भारतात महिला दिनाची सुरुवात मुंबई येथे ८ मार्च १९४३ रोजी पहिला महिला दिन साजरा करून झाली. त्यानंतर ८ मार्च १९७१ ला पुण्यातील काही संघटनानी मोर्चा काढला.त्यानंतर १९७५ ला युनोने जागतिक महिला वर्ष म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे जगातील समाजा समोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. स्त्रिया `बोलत्या' व्हायला लागल्या. बदलत्या सामाजिक,आर्थिक,राजकीय, सांस्कृतिक परिस्थिती नुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मांगण्याही बदलत गेल्या.आता शाळा, कॉलेज,बँका,रेल्वे सरकारी,निमसरकारी कार्यालये तसेच काही राजकीय घरा मधूनही ८ मार्च महिला दिन साजरा व्हायला लागला.टीव्ही सिरीयल वाले गणपती उत्सव, नवरात्र उत्सव, होळी त्या त्या सिरियालच्या कुटुंबात दाखवतात,तारक मेहताचा उलटा चष्मा बरोबर दखल घेतो,कथा पटकथा, संवाद लिहणाऱ्यांनां महिला दिनाची दखल घ्यावी असे का वाटत नाही?. 
  भारतात ज्या महिलेने पहिले स्वत शिक्षण घेऊन मुलीना शिक्षण देण्यासाठी पाहिली शाळा काढली. ती १ मे १८४७ रोजी. सावित्रीबाई फुले (जन्म ३ जानेवारी १८३१, जन्म स्थळ-नायगाव,सातारा- मृत्यू- १० मार्च १८९७ पुणे येथे झाला.) त्या पहिल्या महिला शिक्षिका, शिक्षण प्रसारक, समाज सुधारक महिला होत्या. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाची सुरुवात महात्मा ज्योतीराव फुले यांनी आपल्या पत्नीला शिक्षण देऊन केली. तो खरा महिला दिन किंवा महिला शिक्षण दिन असायला पाहिजे होता.पण.....तो होत नाही.मुलगी (महिला) शिकली प्रगती झाली?. कोणाची?.
संपूर्ण अमेरिका आणि युरोपसहित जवळ जवळ जगभरच्या स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरुवाती पर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता. हे सांगितल्या जाते पण त्यांना शिक्षणाचा अधिकार होता काय?. हे सांगितल्या जात नाही.पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्री-पुरुष विषमतेचे हे एक ढळढळीत उदाहरण देण्यात येते. या अन्याया विरुद्ध स्त्रिया (कोणत्या) आपापल्या परीने संघर्ष करीत होत्या?. १८९० मध्ये अमेरिकेत मतदानाच्या हक्का संदर्भात "द नॅशनल अमेरिकन सफ्रेजिस्ट असोसिएशन " स्थापन झाली.परंतु ही असोसिएशन सुद्धा वर्णद्वेषी आणि स्थालांतरीत पूर्वग्रह असणारी होती. दक्षिणे कडील देशांना काळया मतदात्यां पासून आणि उत्तर व पूर्वेकडील देशांना तेथील बहुसंख्य देशांतरीत मतदात्यां पासून वाचवण्या करता स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळायलाच हवा, अशा प्रकारचे आवाहन ती करत होती. अर्थात या मर्यादित हक्कांना बहुसंख्य काळया वर्णाच्या आणि देशांतरित कामगार स्त्रियांनी जोरदार विरोध केला आणि क्रांतिकारी मार्क्सवाद्यांनी केलेल्या सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या हक्कांच्या मागणीला पाठिंबा दिला. १९०७ साली स्टुटगार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली.त्यामध्ये क्लारा झेटकिन या अतिशय लढाऊ बाण्याच्या, झुंजार कम्युनिस्ट कार्यकर्तीने सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे. अशी घोषणा केली. 
   ८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता ह्या मागण्या केल्या. या दोन मागण्यां बरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमी निरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही जोरकसपणे केली.अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीने क्लारा झेटकिन अतिशय प्रभावित झाली.१९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत, ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा "जागतिक महिला-दिन" म्हणून स्वीकारावा असा जो ठराव क्लाराने मांडला, तो मंजूर झाला आणि त्यांचाच प्रचार झाला.यानंतर युरोप,अमेरिका वगैरे देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या. त्यांचा परिणाम म्हणून १९१८ साली इंग्लंडमध्ये व १९१९ साली अमेरिकेत या मागण्यांना यश मिळाले. तो महिला दिन डावे समाजवादी पुरोगामी भारतात साजरा करतात.
त्यांना भारतातील १८३१ ला जन्मलेली आणि १८४७ ला मुली करिता म्हणजे महिला करिता पाहिली शाळा काढलेली सावित्रीबाई फुलेचे कार्य आणि कर्तुत्व दिसत नाही?. ज्या महिला आणि शिक्षणसंस्था सरस्वती शिक्षणाची देवी मानतात त्याच महिला आठ मार्च महिला दिन मोठ्या उत्साहाने साजरा करतात.त्याच बरोबर ८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता ह्या मागण्या केल्या. या दोन मागण्यां बरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमी निरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागनीने अमेरिका न्यूयार्क हालविला सांगितल्या जाते. तेच काम भारतातील मुंबईच्या असंघटीत गिरणी कामगाराना संघटीत करण्याचे काम महात्मा ज्योतीराव फुले यांचे शिष्य रावबहादूर नारायण मेघांजी लोखंडे यांनी १८६० ते १८९० पर्यंत केल. त्याची नोंद मात्र डावे समाजवादी पुरोगामी घेत नाही.
  रावबहादूर नारायण मेंघाजी लोखंडे यांनी सप्टेंबर १८८४ मध्ये मुंबई येथे पहिली मोठी कामगार परिषद भरवून कारखाना आयोगाकडे ५,५०० कामगारांचे सह्याचे लेखी निवेदन पाठविले.त्यात दर रविवारी पगारी सुटी,दररोज नियमित कामाच्या १४ तासां ऐवजी १२ तास, मुलांचे नोकरीचे वय ७ वर्षांवरून ९ वर्षे करावे, दर महिन्याच्या १५ तारखेच्या आत वेतन मिळावे,कामगाराला दुखापत झाल्यास पगारी रजा मिळावी, तसेच फार मोठी शारीरिक इजा होऊन कामगार कामासाठी अपात्र ठरल्यास त्याच्या भावी जीवनासाठी आर्थिक तरतूद केली जावी. इ. मागण्यांचा समावेश करण्यात आला होता. या मागण्यांचे निवेदन कलकत्त्यास गव्हर्नर जनरलकडेही पाठविण्यात आले होते (१८८९).लोखंडे यांनी १८९०  मध्ये "मुंबई गिरणी कामगार संघ" (बॉम्बे मिलहँड्स असोसिएशन) नावाची भारतातील पहिली कामगार संघटना स्थापिली होती. एप्रिल १८९० मध्ये दहा हजार स्त्री-पुरुष कामगारांची मोठी परिषद रावबहादूर नारायण मेंघाजी लोखंडे यांनी मुंबईत भरविली. या परिषदेत स्त्रियांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. मुंबईतील औद्योगिक संघटनांच्या चळवळीतील ही महत्त्वाची घटना समजली जाते. त्यानंतर लगेचच १० जून १८९०  रोजी शासनाने कामगारांना दर रविवारी पगारी सुटी देण्याचा निर्णय जाहीर केला. १८९०  मध्ये कामगार कायदा संमत करण्यात येऊन लोखंडे यांच्या काही सूचनांचा त्यात समावेश करण्यात आला. सरकारने त्यांच्या कामगिरीची दखल देऊन त्यांना ‘जे.पी.’ हा किताब देऊन त्यांचा गौरव केला.हा इतिहास महिला दिन साजरा करणारे का विसरतात?. फुले लोखंडे याचे कार्या पेक्षा जात महत्वाची वाटते म्हणून का ?.
भारतातील स्रीमुक्ती चळवळीच्या महिला नेत्यांना आणि त्याच्या आदर्श नेत्यांना भारतातील सावित्रीबाई ज्योतीराव फुले डोळ्या समोर ठेऊन महिला दिन साजरा करावा असे का वाटत नाही.कारण काल त्या होत्या म्हणून तुम्ही आज सन्मानाने या ठिकाणी आहेत भारतातील सावित्रीमाई फुले कुठे कमी पडतात. ते भारतातील महिला दिनाचे गोडवे गाणाऱ्या महिला पत्रकार, थोर विचारवंत, महिला साहित्यिक,लढाऊ महिला नेत्या आणि सुशिक्षित सुरक्षित नोकरी करणाऱ्या महिलांनी जाहीर पणे सांगावे.आठ मार्च महिला दिन कोणत्या महिलाचा ?.मुलगी शिकली प्रगती झाली, भररस्त्यात तिला पेट्रोल टाकून जाळण्याची हिंमत कोणामुळे आली, किती महिला संघटना पुढे आल्या ?.कोणता महिला दिन साजरा केला जातो?.
धन्यवाद!.
   आपला
आयु.सागर रामभाऊ तायडे.
अध्यक्ष सत्यशोधक कामगार संघटना,स्वतंत्र मजदूर युनियन,महाराष्ट्र राज्य,भांडुप,मुंबई -मोब ९९२०४०३८५९,

कॉम्रेड रणजित परदेशी यांचे उद्घाटनपर भाषण प्रेम, नकार आणि हिंसा

कॉम्रेड रणजित परदेशी यांचे उद्घाटनपर भाषण
प्रेम, नकार आणि हिंसा 
मुंबई मध्ये प्रेम, नकार आणि हिंसा या विषयावर परिषद भरविण्यात आली आहे. परिषद भरविणाऱ्या कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतो.नव्या फॅसिसमच्या पर्वामध्ये जाती व्यवस्था आणि स्त्री दास्य यातून उदयास आलेल्या सामाजिक -राजकीय घटकांचा ते विचार करत आहे. निवडणुका आल्या आणि गेल्या राजकीय झुंडीला मात्र त्यांनी राजकीय आधार मिळवून दिला आणि संसदीय राजकारणामध्ये अभूतपूर्व अशी त्यांनी मुसंडी मारली. हा नवा फॅसिसम संसदीय संस्थाच्या आणि संविधानिक शक्ती स्रोतांचा आपल्या जाती पितृसत्ता वर्चस्वासाठी पुरेपूर वापर करत आहे. सामाजिक आणि आर्थिक समतेसाठी लढणाऱ्या चळवळींनी  या घटनांच्या मुळाशी असणाऱ्या तात्त्विक व राजकीय तसेच विचार प्रणालीच्या शक्ती स्रोतांना अजूनही पुढे आणलेले नाही परिणामी धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही यांचे संरक्षण संविधानात्मक संरक्षणाचा मुद्दा  प्रश्नचिन्ह म्हणून उभा आहे.हि परिषद ह्या मुद्यांना भिडण्याचे  आश्वासन देते असे दिसले पाहिजे. समता आणि स्वातंत्र्य निधर्मवाद आणि मूलभूतहक्क यासाठी लढणाऱ्या कार्यकर्ते आणि चळवळी यांना मी अभिवादन करतो.प्रेम ,नकार आणि हिंसा याची चर्चा महाराष्ट्रात गेल्या 20 वार्षांपासून आहे ,प्रत्येक तरुण तरुणीला प्रेमाचा अधिकार असतो आणि या प्रेम संबंधाला नकार देण्याचाही अधिकार असतो.लोकशाही मार्गाने विचार विनिमयाने सलोख्याच्या संबंधांकडे आणि आदर्श विवाह संस्थेकडे मार्गक्रमण होऊ शकते, परंतु सामाजिक व्यवस्था विषमता पारतंत्र्य आणि क्रौर्य  अशा शक्तीस्रोतांनी देखील बनलेली असते.विशिष्ठ परिस्तितीमध्ये समतोल भंग पावतो आणि बहुधा प्रेमाला नकार देणाऱ्या तरुणीचा खून होतो, वरवर पाहता प्रेम, नकार आणि हिंसा यांची घडामोड व्यक्तिगत संबंधावर उभी असल्याचा भास होतो.प्रत्येक्षात त्यामागे वर्ण- जाती व्यवस्थेचे क्रौर्य पितृसत्ता व स्त्री दास्य यावर आधारलेल्या प्रवृत्ती भांडवलशाहीतील आर्थिक शोषण हुकूमशाहीतील धर्मान्धता यांचे खोलवर रुतलेले शक्तीस्रोत असतात.या शक्ती स्रोतांना उजागर केले पाहिजे. बुद्ध ते फुले- आंबेडकर यांच्या वारशाचा मुक्तिध्वज उंच उभारला पाहिजे. आद्य गण माता निरुत्ती ते सत्यशोधक मुक्ता साळवे,सावित्रीबाई, यांच्या कृतीचा जयजयकार करत नवा इतिहास घडविण्याच्या दृष्टीने आगेकूच केली पाहिजे. याच दृष्टीने मी दोन शब्द बोलणार आहे.
          परिषदेने कोणती दिशा स्वीकारावी हा मुद्दा चर्चेसाठी पुढे आणणार आहे. रिंकू पाटील जाळन्यात आली, कारण तिने प्रेमाला नकार दिला, अमृता देशपांडेला तिच्या प्रियकराने भोकसले आणि ठार केले,तिच्या तडफडत्या रक्ताला साक्ष ठेऊन लढले पाहिजे. पुण्यात नीता हेंद्रेचा खून झाला तिच्या कोंडलेल्या श्वासामागे तिच्या प्रेरणा घेतल्या पाहिजे. विद्या प्रभू देसाईला मुंबईत जिवंत जाळले चेऱ्यावर ऍसिड फेकून नकार देणाऱ्या तरुणीचे जीवन संपवले. हा केवळ विकृतीचा भाग नाही, केवळ तात्कालिक पुरुषी प्रवृत्ती नाही ,तर बदलत्या समाज व्यवस्थेत वेगाने उसळणाऱ्या भांडवली प्रवृत्ती पुरुष सत्ता आणि जातीय शोषण दमन या सर्व घटकांचा हा परिणाम आहे. म्हणून आपला लढा व्यक्तिगत दुष्कृत्यांचा पाढा नाही, हि परिषद म्हणूनच वरील सर्व पायाभूत भौतिक आधारांची चिकित्सा करण्याकडे आपणास घेऊन जाईल अशी मी अपेक्षा करतो. आणि या परिषदेचे उदघाटन झाले घोषित करतो.
       या परिषदेने आपली हत्यारे ह्या भारतीय प्रबोधनासाठी सज्ज ठेवावी असे आव्हान मी करतो. त्या दृष्टीने चळवळीच्या कार्यकर्त्यांनी सुचविलेल्या काही दिशा सूत्रे आपणा समोर मांडतो. पुढील सूत्रांबाबत परिषदेने ठरावाच्या स्वरूपात मार्गदर्शक व्हावे ,अशी आकांशा व्यक्त करतो. या परिषदेने जातीव्यस्था अंताचा प्रश्न अजेंडयावर आणला पाहिजे,याचे कारण जाती व्यवस्थेच्या दमनकारी आणि शोषक स्वरूपामूळे भारतीय समाजात तरुण- तरुणी खरे प्रेम करूच शकत नाही.अनेकवेळा प्रेम झाल्याचा भासच तरुण तरुणींना होतो. ते प्रेम भासापुरते राहते आणि जातीय भांडवली मूल्यांच्या धुमश्चक्रीत कधीच अंतर्धान पावते.वर्ण व्यवस्था व जाती व्यवस्था यांनी विवाह विषयक मनूने दंडक निर्दयीपणे राबवली. त्यामुळे मनापासून प्रेम करणे बहुसंख्ये स्त्री-पुरुषांना अशक्यच होते. उच्च जातीयांनी लादलेले प्रेम हि एकतर्फी सक्ती होती. आजही श्रम कार्यातील स्त्री पुरुषांनी उच्च जाती वर्गासाठी उत्पादन करणारे शूद्राती शुद्र राहावे, या पद्धतीने दंडक योजना कार्य करते, त्यामुळे आजची हिंसा आणि नकार यांचे स्वरूप समजून घेतले पाहिजे. त्या शिवाय हिंसे विरोधात मुकाबला होणे शक्य नाही.
       प्रेम,नकार आणि हिंसा या सूत्राला आधार देणारी महत्वपूर्ण शक्ती आहे पितृसत्ता. पितृसत्ता म्हणजे समाजात कुटुंबात पुरुषांच्या हातात सत्तेचे केंद्रीकरण असणे वारसा हक्क, मालमत्ता यांचा हक्क, हा स्रियांना परंपरेने मिळत नाही. परिणामी स्रिया आर्थिकदृष्टया दुर्बल राहतात.स्त्रीयांनी आपले शरीर अथवा मन ऋषी पुरुष किंव्हा शूर पुरुष यांच्या अधीन करावे,स्त्रीयांनी व्यक्ती स्वातंत्र्याचा विचार करू नये.असे पवित्र दंडक मनुस्मुर्ती लादते.पुरुषाने जिंकावे आणि स्त्रीयांनी शरण जावे हि हजारो वर्षांची धर्म परंपरा आहे त्यामुळे परशुराम आपल्या बापाच्या आदेशाने आपल्या आईचे मुंडके उडवतो. इंद्राच्या कुकर्माची शिक्षा अहिलेला दिली जाते. सीतेवर स्वशील भंग केल्याचा आरोप केला जातो.अग्निदिव्य केल्यानंतरही तिला हाकलले जाते. या घटनांमध्ये सूचित करण्यात येते कि, स्त्रीला अशुद्ध करण्याचा अधिकार पुरुषांना आहे. अरबस्तान, अफगाणिस्तान यात स्रियांवर आधी शिक्षा लादली जाते त्यांनी ईश निंदा केली आहे असा आरोप ठेवला जाते, म्हणून त्यांना दगडाने ठेचून मारण्यात येते .त्यानंतर न्यायालयीन निर्णय येतो कि त्या शुद्ध होत्या.
       आजही विविध जातीत शेकडो महिला परित्यक्ता म्हणून कुंभमेळ्यात सोडून देण्यात येतात.स्त्रीयांच्या चारित्र्यांवर वादळ उठून त्यांना कुटूंबातून हाकलून देण्यात येते काश्मीरमध्ये स्रिया बलात्कारी गुंडांना बळी पडतात, त्यांना संरक्षण देणारी यंत्रणा नाही.
     आपल्या विषमतेवर उभ्या समाजात आर्थिक दुरष्टया पुरुष अधिक बलवान असतो,स्त्री अधिक बलहीन असते.साधन संपत्तीची मालकी पुरुष पतिकडे असते. विवाहास नकार देणाऱ्या तरुणीला ठार करण्याची सत्ता त्याच्या आर्थिक व शारीरिक सत्ता सामर्थयात असते. मालमत्तेचा हक्क, घरा वरील हक्क, शासकीय सुविधांची प्राप्ती यात पुरुषाचा अरेरावीपूर्ण असा शिक्का असतो. त्यामुळे हजारो गावांमध्ये परीत्येकता आणि विधवा निराधार असतात त्यांच्या शोषणाच्या कथांची दखल घ्यावी आणि संघर्ष द्यावा हि प्रेरणा भांडवली जगात अधिकाधिक कमजोर होत आहे.                    
 स्त्री पुरुष भेद दोघांतील विषम दर्जा हि स्थिती वर्ग समाजात असते, परन्तु जाती समाजात ह्या विषमतेला दंडुकाधारी जात पंचायत आणि नाते- गोते संबंध यांचा आधार मिळतो.प्रत्येक्ष खून झाल्यामुळे तो दडपला जातो. कारण लोकशाहीत सत्ताकरणात पुरुषांनी निर्दोष सुटणे याला जातीय सत्तेचा आधार मिळतो. स्रियांवर हिंसा विविध मार्गांनी लादली जाते. शिक्षण आणि आर्थिक सुविधा यातील प्रभावी सहभागापासून ग्रामीण भागात रोखले जाण्याचे प्रमाण मोठे आहे. जमात रुढीनुसार काही जमातीत स्रियांना वारसा हक्क नसतो, तर शहरी भागात स्त्रीला संपत्तीच्या वाट्यात सहभाग देण्यात येत नाही.या रूढीचा परिणाम स्रियांना परावलम्बी करण्यात व पुरुषांना सबल करण्यात होतो. घर आणि शाळा यांच्या प्रांगणात असलेली विषमता खुनी गुन्हेगारांचे हात बळकट करत असतात. 
      आधुनिक भांडवलशाहीत भांडवलहि निर्धारशक्ती असते ती विविध आघाड्यांवर पुरुषासत्ता  बळकट करण्याचे काम करते. तिच्यामूळे स्रियांमधील बेरोजगारी वाढते आहे.श्रमकार्यातील तिचा वाटा घसरता आहे, स्त्रीयांचे हे परावलंबन त्यांना हतबल बनवते,तर पुरुषी हिंसेला प्रोत्सान देते.म्हणून या परिषदेने भारतीय प्रेमाचे विध्वसक शक्ती असलेल्या जाती व्यस्थेशी संघर्ष दिला पाहिजे.स्त्री दास्यांचा उगम वर्ग व्यवस्थेत झालेला नाही हे लक्षात घेऊन लढले पाहिजे. भारतातील दमन आणि शोषण सामाजिक व राजकीय प्रक्रियेला हिंसेकडे खेचून नेते स्त्री जातीवर हिंसा लादणारी परिस्थिती सामुदायिक व्यस्थेत हिचा जन्म झाला. (मार्क्सवाद,फुले आंबेडकर वाद- शरद पाटील) दलित स्त्री हि आर्थिक दृष्ट्या अधिक शोषित आहे, त्यामुळे शोषक अर्थव्यवस्था बदलण्यात ती प्रेरक शक्ती म्हणून कार्य करू शकते. सर्वात जास्त शोषण आणि दमन भटक्या जमातीतील पुरुष सत्ता करते.तिच्या दास्याला आधार जमात व्यवस्था आणि वर्ग व्यवस्था आहे, या विरोधात संघर्ष केला पाहिजे.
कॉम्रेड रणजित परदेशी 

रंगपंचमी म्हणजे डोळ्यात धूळ आणि डोक्यात नशा

रंगपंचमी म्हणजे डोळ्यात धूळ आणि डोक्यात नशा
 होळी व धुलीवंदन रंगपंचमी सर्व जातीचे लोक विशेष तरुण तरुणी अतिशय उत्स्फूर्तपणे होळी साजरी करतांना दिसतात.९० टक्के तरुणांना हे सांगता येत नाही की होळी का जाळतात. गौड राजा हिरण्यकश्यपू यांची बहीण होलिका हिला आर्यांनी म्हणजेच भटा ब्राम्हणांनी कपट नीती ने बलात्कार करून भर चौकात संध्याकाळी रात्र झाल्यावर जिवंत जाळले तिच्या भवती चारीबाजूने लांब बाबू घेऊन ते तिला लाकडाच्या सरणातून बाहेर पडू देत नव्हते हे बघून गावातील लोक जोर जोराने ओरडत,बोबळत होते. त्यासरणात होलिका जळत होती, ब्राम्हण कोणालाच जवळ येऊ देत नव्हते.त्यामुळे परिसरात लोकांच्या मनात प्रचंड चीड होणार यांची खात्री असल्यामुळे आर्यांनी दुधात भंग टाकून चारीबाजूने माठ भरून ठेवले होते.लोक ओरडायला लागले की त्यांना तांबे भरून भांग पिण्यासाठी दिली जात होती.भांग पिलेला माणूस थोड्या वेळाने गुंगायला लागतो. सर्व विसरतो जिथे जागा भेटलं तेथे लुढकतो. ही पुराणिक कथा आहे.होळी जर चारित्र्य वान होती तर जाळली का?.आणि चारित्र्य हीन असेल तर तिची पूजा का केली जाते. ही परंपरा, रितीरिवाज किती वर्षांपासून दरवर्षी उत्स्फूर्तपणे साजरी केली जाते. 
होळी जाळल्या नंतर दुसऱ्या दिवशी धुळीवंदन म्हणजे रंग पंचमी रंग लावण्याचा बहाण्याने मुली,महिलांच्या शरीराशी छेळाछेळी करणे आलेच,रंग कोणाला लावायचा यांची पूर्वजांनी अलिखित निमावली केली होती. वहिनी, नणंद, दीर भावजय,मामाची मुलगी,आत्याचा मुलगा अशी काही नात्यातील लोकांना धुलीवंदनाच्या म्हणजेच रंगपंचमीच्या दिवशी रंग लावण्याची रीत होती.आता ती पूर्णपणे बदलली दिसत आहे.आता स्वराचार,गलिच्छ तिरस्कार वाढवणारे प्रकार होत आहेत.
शहरात विविध जाती धर्माचे लोक चाळीत,सोसायटीत प्लॉट मध्ये एकत्र राहतात.तिथे एकत्र येण्याचे निमित्त पाहिजे असते.त्यात सकारात्मक विचारांचे उत्साहित लोकच भाग घेतात,आणि नकारात्मक विचारांचे लोक लांब राहण्याचा प्रयत्न करतात अशा लोकांना होळी,धूळवंदनाच्या निमित्ताने बरोबर टार्गेट केले जाते, "बुरा मत मानो भाई होळी है"  असे म्हटले जाते.शाळा, कॉलेज मध्ये जाणाऱ्यामुली मुलांच्या टार्गेट असतात.त्यामुळे विनयभंग हा सर्रास होत असतो. त्यालाच धुलीवंदन, रंगपंचमी म्हणजे डोळ्यात धूळ आणि डोक्यात नशा म्हणतात.हा प्रकार गल्लीबोळात होतांना दिसतो.
पुराण कथा सांगतात की होलिका प्रल्हाद ला मांडीवर बसुन जाळल्या गेली पण प्रल्हाद वाचून बाहेर आला नि होलिका जाळली,त्यांचा आनंद उत्सव दुसऱ्या दिवशी आर्यांनी रंग उधळून साजरा केला. होलिका म्हणजे एक राजाची बहन ,मुलगी तिला दहशत निर्माण करण्यासाठी भर चौकात लोकांच्या समोर जिवंत जाळली त्यामुळे ब्राह्मण किती भयानक मनोवृत्तीचे असतात हे दाखऊन देतात.दर पांच दहा वर्षात असे भयानक आघात समाजात परिणाम करणारे घडविले जातात त्यांचा मग सण, उत्सव साजरा केला जातो. अनेक संतांचे प्रगट दिन साजरा होतात,जन्म मृत्यू कुठे, कधी झाला हे सांगितले जात नाही.कोणी विचारण्याची हिंमत करत नाही. संत तुकाराम महाराज सारखे संत नदीत डुबकी मारून मारले जातात व पुष्पक विमानात बसुन वैकुंठाला गेल्याची रसभरीत कथा तयार केली जाते. पुढे गोविंद पानसरे, गौरी लंकेश,कलबुर्गी सारखेच घडविले जाते त्यांचे शास्त्र, पुराण कथा लिहून त्यांना म्हणजेच सर्व हिंदूंना,मराठा,मागासवर्गीय बहुजन समाजाला गुलाम बनवून ठेवले जाते तेच लोक असे सण उत्सव म्हणून साजरे करतात. 
हे आजच्या स्मार्टफोन, कॉम्प्युटर, नेटवर्क, वायफाय वापरणाऱ्या जमान्यात लोक आंधळ्या सारखे होळी जाळून दुःख,नष्ट होण्याची अपेक्षा करतात. मुंबई ही भारताची औद्योगिक राजधानी म्हटल्या जाते.इथे अनेक देशाचे राज्यांचे लोक कामगार,कर्मचारी आणि अधिकारी म्हणून एकत्र नोकरी करत असतात. त्यामुळेे सर्वांची चांगलीच मैत्री झाली असते. मराठी कामगार,कर्मचारी आणि अधिकारी होळी साजरी करण्यासाठी गांवी कोकणात सुट्टी टाकून जातात.मराठी कामगार, कर्मचारी अधिकारी मोठ्या संख्येने सुट्टी टाकून उत्सव साजरा करण्यासाठी गांवी जातात. कसा साजरा करतात हा उत्सव थोडक्यात सांगायच तर सुकी ओली लाकड एकत्र रचतात.दहा ते पंधरा फूट उंच आणि पंधरावीस फूटाची रुदी असलेला ओल्या सुक्या लाकडांचा ढीग मध्ये मध्ये सुके गवत लावून जो ढीग रचतो तीला होळी म्हणतात.या होळीची गांवात महिला एकत्र येऊन तिची पूजा करतात आणि मग या होळीला पेटविल्या जाते.आणि पेटणाऱ्या होळीच्या भोवती लोक बेबंद होऊन नाचतात,बोंबलतात.मोठा आनंद व्यक्त करतात.जसे आर्यांनी होलिकेला जाळले तसेच अनुकरण आजचे लोक करतात. ते न चुकता केले जाते. हे फक्त एकाच गावात नाही,तर राज्यातील प्रत्येक गावागावात होळी पेटवतात तेेव्हा करतात.
 शहरात ही होळी लहान स्वरुपात असते पण गावात मोठी असते.या निमित्ताने कोकणात जाणा-या बसेस,रेल्वे प्रायव्हेट वाहनांना खूप गर्दी असते.लोक कुठे असतील तिथून आपल्या गावाकडे गर्दी चेंगराचेंगरी, टॉफिक जाम असतानां ही गाव गाठतात. बायको पोरांसह. नुसती लाकड जाळायला इतक्या लांबून लोक वाट्टेल तो खर्च,त्रास सहन करून गावाला जातात. या होळीत दुःख, दैन्य अज्ञान, भेदभाव,जाळून ते लोक होळी मातेकडे सुखा समृध्दीची शांतीची आरोग्याची मागणी करतात. 
कोकणातीलच नाही एकूण मराठा,मागासवर्गीय बहुजन समाजातील लोकांची होळीत दुःख जळली?. यांचा हिशेब आज पर्यत कोणी लिहला नाही.दैन्यही या होळीत जळते. म्हणजे दारीद्र्य नष्ट होते?. मग ते जळल्यावर गावातले किती लोक दारीद्र्य मूक्त झालीत?.अहंकार अज्ञानही जळते म्हणतात?. आज पर्यंत कोणा कोणाचा अहंकार, अज्ञान, दैन्य भेदभाव जळाला ते कोणीच सांगत नाहीत. गरीब श्रीमंतातला भेद जळतो?. काळा गोरा हा भेद जळतो ?. भारतात जातीयतेचा भयानक भेदभाव आहे तो जळतो ?. म्हणतात पण जळायला ते काय वस्तू आहे.हे कोणी मान्य करीत नाही.
अग्नीत लोखंड ही वितळवण्याची,भस्म करण्याची ताकद आहे.पण लोखंड ही वस्तू आहे.अहंकार,दुःख,दैन्य,अज्ञान, भेदभाव या कोणत्याही वस्तू नाहीत. हे आहेत माणसांच्या मनाचे रोग आहेत. माणसान निर्माण केलेल्या या व्यवस्था आहेत. एक तरी होळी दरिद्री माणसासाठी सुखसमृध्दी मागून त्याला सुखी करून गेल्याचा पुरावा म्हणून एखाद्या माणूस त्यांचे कुटुंब दाखवता येईल काय?.
एकतरी कॅन्सरचा रोगी बरा झाल्याचे उदाहरण दाखवा?.  असे लाकड जाळून अन देवळात लोळून घालून माणसाचा आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक सांस्कृतिक विकास आणि कल्याण झाले असते.तर भारतात भ्रष्टाचार,बलात्कार, जातीयता,राजकीय पक्षांची अंदाधुंदी माजलीच नसती. 
याचा अर्थ असाच आहे की हे सणवार कर्मकांड आणि देव थांबवू शकत नाही. हे सगळ थांबवतील फक्त आणि फक्त मानवतावादी विचारसरणी. मानवतावादी विचारसरणीचे लोक शासन प्रशासनात आणले पाहिजे. कर्मकांड आणि धर्मांध जातीयवादी लोक असतील तर असे उत्सव वाढत जातील.
परंपरा रितीरिवाजाच्या नांवावर हिंसक वळण लागत आहे. लैंगिकता, विनयभंग बलात्कार या सारखे एकतर्फी प्रेम वाढत जात आहेत. आजची पिढी सुशिक्षित आहे, स्मार्टफोन, कॉम्प्युटर, फोरजी नेट,वायफाय वापरणारी असतांना ही परंपरा, रितीरिवाजाच्या नांवा खाली नवीन संकल्पना पुढे येत आहेत. होळी का जाळली जाते आणि दुसऱ्या दिवशी धुलीवंदन,रंगपंचमी का खेळली जाते.यांची माहिती दिली जात नाही. आजच्या पिढीला त्यांची गरज वाटत नाही. फक्त एन्जॉय करण्यासाठी निमित्त पाहिजे. म्हणूनच धुळीवंदन म्हणजे डोळ्यात धूळ आणि डोक्यात नशा झाली आहे. खाली काही छायाचित्रे दिली आहेत यातुन आपण काय बोध घेणार ???.
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडुप, मुंबई


श्रमिक बेघरांना प्रधानमंत्री आवास योजना लागू करण्याची मागणी

श्रमिक बेघरांना प्रधानमंत्री आवास योजना लागू करण्याची मागणी
मुंबई  दिनांक(9 मार्च)-शहराचे नाले सफाई,रस्ते सफाईचे काम,फुले-खेळणी,फुगे विक्रेते एकंदरीत शहराची सेवा करणारे हे श्रमिक नाल्याच्या बाजूला,पदपथावर,सिग्नलच्या बाजूला,पुलाखाली राहणारे बेघरानी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे घर अधिकाराची मागणी केली. 
  श्रमिक बेघरांना मुंबई महानगरपालिका पाण्याचा अधिकार नाकारतेय पण ओ.सी.नसलेल्या इमारतींना मानवतेच्या आधारे पाणी अधिकार देतेय,ही मुंबईमहापालिकेची विषमतेची वागणूक श्रमिकां प्रति दिसून येत असल्याचे आरोप सीपीडी संस्थेचे जगदीश पाटणकर यांनी केला.
    गेल्या 35 वर्षांपासून पार्ला पश्चिम रेल्वे स्टेशन रुळांजवळ राहणारे सुनीता गाडे यांनी सांगितले की,रेल्वे रुळ रुंदीकरना मुले रेल्वेने आम्हाला बाहेर हाकलून लावले त्यामुळे बाहेर रस्त्यावर राहत असल्याने बीएमसी नेहमी सामानाचे तोडमोड करते.नेहमी होणाऱ्या या तोडामोडी मुळे आमचे पूर्वीचे वास्तवाचे कागदपत्र गहाळ केली जातात.मग आम्ही कोणते कागदपत्र दाखवावेत?
  तसेच,हनुमान नगर पार्ला येथे राहणारे भरती सुपय्या यांनी त्यांचा नवऱ्याचे प्रेत ही दोन मिनिटं थांबू दिले नाही,नेहमीच बीएमसी ची गाडी येऊन सामानाचे नुकसान करतात,येथे राहूच नका,असा दम मारतात.
आम्ही ही माणसे आहोत,आम्ही देखील या शहराचे-भारताचे नागरिक आहोत.आज आम्ही कचरा उचलून  पोट भरत असलो तरी शहराच्या सफाईचेच काम करीत आहोत.
   आज झालेल्या श्रमिक बेघरांच्या मागणीपत्र पत्रकार परिषदे मध्ये सेंटर फॉर प्रोमोटिंग डेमोक्रॅसी या संस्थेच्या वतीने श्रमिक बेघर कुठे आणि कश्या पध्दतीने राहतात - काम करतात,याचे फोटो प्रदर्शन द्वारे शहराच्या सेवेमध्ये कश्या पध्दतीने योगदान देत असल्याचे दाखवून दिले. 
     सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने बीएमसी ने शहरी बेघरांकरिता 125 निवारे बांधने बंधनकारक होते मात्र आतापर्यंत फक्त 23 निवारे चालविले जात आहेत म्हणजेच सरकारे सुद्धा संवेनशून्य असल्याचे मत सिताराम शेलार यांनी स्पष्ट केले.
      श्रमिक बेघरांनी आपल्या मागणीपत्रा मध्ये 1)प्रधानमंत्री आवास योजनेतून घर अधिकार मिळावा, 2)बीएमसी द्वारा नेहमी होणारी तोडमोड थांबविण्यात यावी व मुलांचे शालेय वह्या पुस्तके,जेवणाचे सामान जप्त करू नये, 3)पाणी अधिकार मिळावा,शहरी नागरी आजीविका मिशनच्या गाईडलाइन नुसार बेघरांकरिता शेलतर(निवारे) 125 बनविण्यात यावेत, 4))भिकारी म्हणून  पोलिसां द्वारा होणारी कारवाई थांबविण्यात यावी,5)पुढील वर्षी 2021 या वर्षी होणाऱ्या राष्ट्रीय जनगणने मध्ये बेघरां करीत विशेष मोहीम राबविण्यात यावी.आदी प्रकारच्या मागण्या शहरी श्रमिकांनी प्रसारमाध्यमांद्वारे सरकार पर्यंत पोचविण्याचे विनंतीवजा आवाहन केले.
   या बेघरांच्या मूलभूत अधिकारांच्या मागणी पत्रासाठी सीपीडी संस्थेचे सिताराम शेलार,जगदीश पाटणकर,योगेश बोले,पूजा कांबळे,तसेच आकार मुंबईच्या शारदा आरोनदेकर,युवाचे अमृतलाल बेतवाला,यांनी सुद्धा मते मांडली.
अधिक माहिती करीता संपर्क 
जगदीश पाटणकर 9029597241
======================================================================================
५ लाख मेंबरशिप चे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा संकल्प.
स्वतंत्र मजदूर युनियनच्या राज्य कार्यकारिणीची वार्षिक सर्वसाधारण सभा आज नागपूर येथे संपन्नझाली.५ लाख मेंबरशिप चे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा संकल्प करण्यात आला.
स्वतंत्र मजदूर युनियनच्या राज्य कार्यकारिणीची वार्षिक सर्वसाधारण सभा आज दि. ८ मार्च रोजी ३१४, निलकमल काम्प्लेक्स, महाजन मार्केट, सिताबर्डी, नागपूर येथे राष्ट्रीय अध्यक्ष मा. जे. एस. पाटील साहेब यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
   या सभेमध्ये सर्व संलग्न संघटनांच्या मागील वर्षाच्या कार्याचा आढावा घेण्यात येऊन ५ लाख मेंबरशिप चे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा संकल्प करण्यात आला. तसेच राज्यातील सर्व जिल्ह्य़ात मे २०२० पर्यंत संलग्न युनियनच्या शाखा आणि आय एल यु जिल्हा कमिटी निर्माण करण्याचाही संकल्प करण्यात आला.
   या महत्त्वपूर्ण सभेला राज्य अध्यक्ष मा. सागर तायडे, सरचिटणीस मा. डि. एम. खैरे, उपाध्यक्ष मा. विकास गौर, प्रसिद्धि सचिव मा. एन. बी. जारोंडे, संघटन सचिव मा. गणेश उके,सुनील तेलतुंबडे,अध्यक्ष शिक्षक संघटना, प्रफुल्लता लोणारे,अंगणवाडी संघटना यांचे सह संलग्न संघटनांचे पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. 
आपली ओळख कामगार,कर्मचारी आणि अधिकारी म्हणून फक्त कार्यालयात आहे. बाहेर पडल्यावर आपण कोण आहेत?. ते सांगण्यासाठी युनियनच्या माध्यमातून काम करा, जेथे जो कामगार,कर्मचारी अधिकारी भेटलं त्याला कोणत्या युनियन चे सभासद आहेत हे विचारा मग त्याला डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या कामगार चळवळी बाबतची भूमिका समजावून सांगा,असे सागर तायडे यांनी सांगितले. तर कामगार संघटना स्थापन करा,तीला गतिमान करा, आपली समस्या सोडविण्यासाठी, आपले नेतृत्व तयार करा,विचारधारेच्या आधारे संघटना चालवली तर समस्या निर्माण होणार नाहीत, चुकीच्या विचारधारे सोबत मागासवर्गीय कामगार अधिकृतपणे जोडला गेला असल्यामुळे त्यांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत, फॅशनेबल कार्य करणाऱ्यांची संख्या वाढत आहे, म्हणून आपल्याला विचारधारेला समर्पित कार्यकर्ता तयार करावा लागेल,तरच ५ लाख मेंबरशिप चे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा संकल्प पूर्ण होऊ शकते असे मान जे एस पाटील साहेब राष्ट्रीय अध्यक्ष स्वतंत्र मजदूर युनियन (आय एल यु) यांनी सांगितले,सर्व संलग्न संघटना,युनियनच्या अध्यक्ष सचिवांनी सभेला उपस्थिती दाखविली होती. सभेचे सूत्रसंचालन गणेश उके यांनी तर गौतम पाटील यांनी आभार मानतो.

कांशीरामजी यांच्या ८६ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख. कांशी तेरी नेक कमाई,तुने सोती कोम जगाई!.

कांशीरामजी यांच्या ८६ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख.
कांशी तेरी नेक कमाई,तुने सोती कोम जगाई!.
बहुजनांच्या म्हणजे मागासवर्गीय,ओबीसी,आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजाचे राष्ट्रीय पातळीवर समर्थ नेतृत्व करेल असे एक ही व्यक्ती राजकीय पातळीवर नाही.हा सर्व बहुजन समाज विविध पक्षात स्वार्थासाठी विभागला आहे,कोणती ही एक ठोस विचारधारा न मानणारा हा बहुजन समाज आज पुन्हा पुन्हा विखुरलल्या जात आहे. आणि त्यांच्यात प्रचंड असंतोष आहे.राज्यात व केंद्रात त्या त्या समाजांचे प्रतिनिधित्व आहे,पण ते स्वाभिमानी नाही,लाचार,गुलामगिरी पत्कारलेल वैचारिक दृष्ट्या अपंगत्व असलेलं आहे. मान्यवर कांशीराम यांचा बसपा हा राष्ट्रीय पातळीवर तिसऱ्या,चौथ्या क्रमांकावरचा पक्ष होता.बहन मायावती यांच्या कार्यपद्धतीमुळे सर्वच राज्यात तो आता दखल पात्र राहिला नाही.त्यांचे वैचारिक आत्मपरीक्षण,समीक्षा मान्यवर कांशीरामजी यांच्या ८६ व्या जयंतीनिमित्त आजच्या काळात होणे आवश्यकता आहे.
      आज भारतात बहुसंख्य बहुजन समाजातील सर्व जाती मध्ये राजकीय स्पर्धा निर्माण झाली.ते निर्माण करणारे मान्यवर कांशीरामजी यांनी मागासवर्गीय समाजात प्रबोधन केले म्हणून झाली.त्यासाठी ते भारताच्या काश्मीर ते कन्याकुमारी पर्यत गावागावात फिरले. असा माणूस ज्याने ४००० हजार किलोमीटर सायकल चालवुन फुले,शाहू, आंबेडकरांचे विचारांचे प्रबोधन करून आंदोलन उभे करून यशस्वी राजकारण केले.व देशातल्या विमान आणि हेलिकॉप्टर मध्ये फिरून राजकारण करणाऱ्या नेत्यांना निवडणुकाद्वारे आपली ओळख निर्माण करून दाखविली, बहुजन समाजात आत्मविश्वास निर्माण केला. त्यामुळेच एक जोश पूर्ण घोषणा तयार झाली होती. "कांशी तेरी नेक कमाई तुने सोती कोम जगाई" मात्र आज या घोषणेचा अर्थ आणि सत्यपरिस्थिती पूर्ण बदलली आहे. बहुजन समाजातील जाणकार, राजकारणी काय म्हणतात "कांशी तेरी नेक कमाई,किस किसने बेच के खाई" मान्यवर कांशीराम यांनी खूप मेहनत करून मागासवर्गीय समाजाला बहुजन समाज म्हणुन संघटित केले त्यासाठी त्यांनी क्रांतिकारी घोषणा दिल्या. त्यामुळे समाजात प्रचंड प्रबोधन झाले.त्या त्या घोषणा सत्ता मिळविण्याच्या स्पर्धेत अर्थपूर्ण बदलल्या त्या घोषणा मुळे बहुजन समाजात जनजागृती झाली.त्याच घोषणांचा आज प्रत्येक मतदारसंघात बहुजन समाज म्हणजे आपला बिकाऊ गुलाम मतदार आहे. असा समज वरिष्ठ पक्ष नेतृत्वाला झाला आहे.जिसकी सांख्य भारी उतनी उसकी भागेदारी म्हणायचे आणि ज्याचा पैसे भारी त्याला उमेदवारी देऊन मतदार संख्येच्या हिशेबाने रुपये रोख घ्याचे,हा धंदा झाल्यामुळे बहुजन समाज पक्षा पासुन विचारधारे पासुन दूर गेला आहे.तीनशे पस्तीस दिवस कॅडर बेस कार्यकर्ते म्हणून काम करणारे मात्र निवडणूकीच्या काळात पक्षाने दिलेल्या उमेदवारांना प्रत्येक कामाचा पैसा मागतात प्रत्येक बूथ वर बसणारा पुलिंग प्रतिनिधी मोबदला मिळत नसेल तर बसत नाही, कॅडर बेस कार्यकर्ते म्हणतात ते आमचे काम नाही, ते उमेदवाराने व्यवस्था केली पाहिजे.यांचा परिणाम सेक्टर,बूथ पातळीवर झाला.त्याचं मुळे जाती तोडो,समाज जोडो, सर्व जातीचा वैचारिक भाईचारा संपला, आता स्वार्थासाठी युती आघाडी होत आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर ते मायावती व्हाया मान्यवर कांशीराम यांची ही चळवळ १९३२ ते २००७ पर्यंत जनजागृती व संघर्ष करून सर्व राजकीय गणिते मोडून पूर्ण बहुमताने उतर प्रदेशात निवडून आली आणि देशात एक नवा इतिहास लिहला गेला होता.तो केवळ मान्यवर कांशीराम यांच्या वैचारिक संघटना कौशल्यामुळे होता.जी बसपा देशातील बहुजन समाजाला सांगत होती " बाबा तेरा मिशन अदूर बी एस पी करेगी पुरा !." ती बसपा २०१२ च्या विधान सभा आणि लोकसभा निवडणुकीत चारीमुंड्य चीत झाली होती. त्यामुळे देशातील बहुजन समाज प्रचंड दुःखी झाला होता. आज ही दुःखी आहे.कारण मान्यवर कांशीराम यांनी आपल्या जीवनभर चमचा युगाचा धिक्कार केला. सत्ता आल्यावर कसे चमचे तयार होतात त्याचा वापर समाजाला तोडणाऱ्या हत्यार म्हणून कसा सारखा होतो हे मायावतीच्या कार्यकाळात दिसून आला.त्यासाठी आपण प्रथम कांशीरामजीची हत्यार आणि चमचा ही मांडणी समजून घेणे जरुरी आहे.
 डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी पुणे करारावर प्रतिकीर्या देताना सांगितले होते कि संयुक्त मतदार संघ म्हणजे एक गलिच्छ उपनगर ज्या नगराचा उमेदवार ठरविण्याचा अधिकार उच्च वर्णीय लोकांना आहे.आणि त्याचा समाजाचा सत्यानाश करण्यासाठी वापर करने म्हणजेच कांशीरामजीच्या शब्दात चमचा.(आजचे राष्ट्रपती) चमचा हा घराघरात वापरल्या जाणारे हत्यार आहे.जे स्वत कोणतेही काम करू शकत नाही.पुणे करारा नंतर राजकारण्यांनी असेच चमचे मागासवर्गीय, असंघटित, कष्टकरी शोषित पीडित,आदिवाशी आणि अल्पसंख्याक समाजात निर्माण केले.चमचा चा वापर नेहमी आपल्या फायद्या साठीच होतो.त्यामुळे तो कोणाचे नुकसान स्वत करीत नाही कोणाच्या सांगण्या वरून करतो.
    कांशीराम यांच्या बसपा ची बहुजन हिताय बहुजन सुखाय घोषणा जेव्हा मायावतीने सर्वजण हिताय केली तेव्हा सत्ता आल्यावर चमचा आणि हत्यार कसे वापल्या जाते हे दिसून आले.मायावती सत्ता चालविण्यास, समाजाच्या आणि राज्याच्या हिताचे निर्णय घेण्यास समर्थ होत्या.उतर प्रदेशात स्मारक आणि स्वताच्या प्रतिमा लावण्यास राज्य शासनाचा निर्णय असल्या मुळे सुप्रीम कोर्ट भी मायावतीला रोखू शकले नाही.पण मायावतीने राज्यात कांशीराम आणि मायावतीचे पुतळे उभे करण्या पेक्षा बहुजन समाजातील मुलामुलींना शिक्षण,रोजगार यावर भर दिला असतात तर आजचे चित्र वेगळे असते केवळ अनेक विद्यालयाला महाविद्यालयाला महापुरुषाच्या नांवे देऊन वैचारिक समाज क्रांती होत नाही. जिल्ह्याचे नांव सर्व महापुरुष संत महामाताच्या नांवे केले. त्यामुळे मागासवर्गीय समाजात विशेष चमार समाजात काय बदल झाला?. आज चमार समाजांचे पक्षात काय स्थान आहे?. ठाकूर, बनिया,ब्राह्मणांचे वर्चस्व प्रत्येक मतदारसंघात आहे.
हे कांशीरामजीचे तत्वज्ञान मायावतीने केवळ सत्ता मिळवण्यासाठी मातीमोल करून ठेवले. हे आता सर्वच कॅडर बेस, बामसेफचे उच्चशिक्षित अधिकारी खाजगीत म्हणतात. त्यामुळे चमचा युग काय करू शकते २०१२ च्या निवडणुकीने बहुजन समाजाला दाखवून दिले. 
 मुझे पढे लिखे लोगोने धोका दिया असे.डॉ बाबासाहेब आंबेडकर खेदाने मत व्यक्त केले होते.पण त्याच पढे लिखे लोकांना संघटीत करून कांशीरामजी यांनी बामसेफ संघटना बनविली आणि त्याच्या कडून सक्तीने आर्थिक मदत मिळविली त्यातूनच त्यांनी डीएस फोर DS4 दलित शोषित समाज संघर्ष समिती द्वारे समाजात जनजागृती केली.त्याची सुरुवात ही सायकलवरून झाली. ते कार्यकर्त्यानां सांगत सायकल ही माझ्या साठी एकमात्र साधन आहे.ते केवळ साधनच नाही तर बहुजन मिशनचे सर्वात महत्वाचे साधन आहे.यावरच त्यांनी भारत भर सायकल यात्रा काढली.आज कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या घरी दोन तीन चारचाकी गाड्या आहेत तरी जिल्हाभर फिरण्याची तयारी नाही.
 कांशीराम जी यांनी आपल्या पन्नास वर्षात बहुजन समाजात जनजागृतीसाठी चाळीस दिवसात चार हजार किलोमीटर सायकलवरून यात्रा केली.देशातील नव्हे तर जगातील कोणत्याही समाज सुधारक,राजकिय नेत्याने असे धाडस केले नाही. कांशीराम जी यांनी पहिली सायकल यात्रा पेरियार ई व्ही रामास्वामी नायकर यांच्या जयंती दिनी म्हणजे सतरा सप्टेंबर १९८८ ला कन्याकुमारी वरून सुरवात केली होती.दुसरी कोहिमा,तिसरी कारगिल,चौथी पुरी,पांचवी पोरबंदर वरून काढली आणि २७ मार्च १९८९ दिल्ली विशाल रैलीत बदल करून बहुजन समाजाची शक्ती दाखवून दिली.  
  कांशीराम जी ने रात्र दिवस मेहनत करून वाढविलेली बसपा मायावतीने चमच्या लोकांच्या सल्ल्याने देश भरातील कॅडर बेस कार्यकर्ते संपवले.मायावतीचे सर्व निर्णय अचूक असतील तर चाळीस मंत्री भष्टाचार कसे करू शकतात हा प्रश्न आज ही विचारात घेतल्या जात नाही. यांची समीक्षा बैठक होत नाही.आमदार,मंत्रीमंडळ, कैबिनेटचे सर्व निर्णय जर मायावती घेत असतील तर पक्ष संघटनेत चमचे कसे निर्माण होतात.कांशीरामजीने मायावतीवर जो विश्वास दाखविला त्याला तडा गेला आहे.मिशनरी कार्यकर्त्यांना चमचा समजून पक्षातुन बेदखल करून बसपाचे न भरून येणारे नुकसान झाले आहे.काही चमच्यांना त्याच्या समाजाच्या विरोधात उभे केले जाते.तर मिशनरी कार्यकर्त्यांना त्यांच्या समाजाच्या हिता साठी उभे केले जाते.चमचा आपल्या समाजाच्या नेत्याला कमजोर बनवितो तर मिशनरी कार्यकर्ता आपल्या समाजातील सच्या नेत्याला मजबूत बनवितो.कांशीरामजीची संघटन कौशल्य आणि मायावतीचे संघटन कौशल्य यातील फरक आज प्रत्येक राज्यात दिसून येत आहे.गरीब प्रामाणिक,वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व करणाऱ्या कार्यकर्त्यांची आज पक्षाला गरज नाही.फॅन्टर,चिटर आणि फंडिंग जमा करून देणाऱ्यांनी बसपा कमकुवत करून ठेवली.
   राज्याचा विचार केला तर लक्ष्मीपुत्र विलास गरुड यांनी एका ही तालुक्यात, जिल्ह्यात नेतृत्व निर्माण होऊ दिले नाही.एकाही विधानसभा, लोकसभा मतदारसंघात उमेदवार हक्क सांगेल असा नेता निर्माण होऊ दिला नाही. मुलगा तरुण झाला,सुशिक्षित झाला म्हणून आईवडीलानां घराच्या बाहेर काढत नाही,वेळोवेळी त्यांचा मानसन्मान ठेऊन सल्ला घेतच असतोनां. पक्षात माजी अध्यक्ष झाला तर नवीन अध्यक्षांनी त्याला सोबत ठेऊ नये त्याला कोणत्याही कार्यात सहभागी होऊ देऊ नये ही पद्धत आज खुद्द गरुड बाबत वापरली जात आहे. म्हणजे निसर्गाचा नियम आहे,जे पेरले तेच उगवते. जे विचारधारा मानणारे कॅडर बेस कार्यकर्ते असतात ते कोणत्याही परिस्थितीत दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाही. आणि गेले तर जास्त दिवस टिकू शकत नाही. एक वेळ पक्ष बदलला तर त्यांना समाजात काम करता येत नाही. मग ते सामाजिक,धार्मिक शैक्षणिक सांस्कृतिक कार्या कडे वळतात.तिथे ही त्यांना सारखा वैचारिक संघर्ष करावा लागतो.(उत्तम उदाहरण किरण मोहिते नाशिक)
बहुजनांच्या म्हणजे मागासवर्गीय,ओबीसी,आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजाच्या कोणत्याही मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पक्ष व पक्षांचे कार्यकर्ते जनांदोलन करून न्याय मिळवून देण्यासाठी काम करत नसतील तर त्यांना निवडणूकीत मतदान मागण्याचा काय अधिकार आहे. महापुरुषांच्या नांवावर मत मागायचे तर त्यांनी ज्या असंघटित कष्टकरी मागासवर्गीय,ओबीसी, आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजाला सहा मूलभूत अधिकार मिळवून दिले अन्न, वस्त्र,निवारा, शिक्षण, रोजगार आणि आरोग्य त्याबाबत पक्षाच्या वतीने कोणतेच काम होत नाही. राज्य व केंद्रांच्या अनेक योजना या बहुजन समाजाला मिळत नाहीत. उच्चवर्णीय सरकारी अधिकारी आणि उच्चवर्णीय शासन मान्यता असलेले ठेकेदार या बहुजन समाजाचे मुक्त शोषण करतांना दिसतात.त्यातही राजकीय चमच्याची रोजीरोटी यांचे आर्थिक शोषण करूनच चालते.त्यावर महापुरुषांच्या विचारांचा वारसा सांगणारा पक्ष कोणत्याही ठोस कृती कार्यक्रम राबवीत नसेल तर त्याला मतदान मागण्याचा काय अधिकार आहे. न बिकनेवाला समाज बनविण्यासाठी न बिकनेवाला कार्यकर्ता,नेता आणि उमेदवारी. पक्षाला बनवावी लागेल. तरच मायावती बहुजन समाजाला जागृत करण्यासाठी देशभरात मान्यवर कांशीराम जी सारख्या यात्रा काढू शकतील. आज देशात भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. मायावती यांनी कांशीरामजीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांनी केलेल्या कार्यपद्धतीने काम सुरू केल्यास  बहुजन समाज पक्षाला नवीन उभारी मिळू शकते.
त्यामुळे "कांशी तेरी नेक कमाई तुने सोती कोम जगाई"  ही घोषण मान्यवर कांशीराम (१५ मार्च १९३४) यांच्या ८६ व्या जयंती दिनी बहुजन समाजाला विसरता येणार नाही 
सागर रामभाऊ तायडे,भांडूप मुंबई - ९९२०४०३८५९
Email:- srt1961@gmail.com

कोरोनाचा प्रतिकार विज्ञानाच्या चौकटीत राहून करा.

कोरोनाचा प्रतिकार विज्ञानाच्या चौकटीत राहून करा.
भारत हा कृषिप्रधान देश आहे,आणि तेहतीस कोटी देवाचे देवीचे जागृत भव्यदिव्य देवास्थाने,मंदिरे भूतलावर आहेत. सर्व भारतीय नागरिकांच्या मन, मेंदू व शरीरावर बटू वामनाने हजारो वर्षांपासून वर्चस्व प्रस्थापित केले आहे. आता ही रिमोट बटू वामनाच्या वारसदारांच्या हातात आहे. परंतु चायनाच्या कोरोना विषाणूने ने सर्व रिमोटच्या सेलची बॅटरी निकामी करून ठेवली.
कोरोना व्हायरसचा इलाज फक्त विज्ञानाद्वारे होऊ शकतो इतर कुठल्याही धर्माच्या विधी,प्रार्थणा,भजन,भक्ती,होम,यज्ञ नमाज, वंदना याद्वारे कुठलाही इलाज होत नाही. यांची खात्री आता तरी भारतीय संस्कृतीचे नित्यनेमाने पालन करणाऱ्या लोकांना झाले असेल अशी अपेक्षा आहे. देवाच बोलावणे आल्याशिवाय मृत्यु येत नाही असं म्हणनारे या रोगाबाबत सावधगिरी बाळगतांना दिसतात.सावधगिरीचा  उपाय म्हणून गर्दीत जाणे टाळत आहेत. म्हणजे मृत्यु जवळ पाहीला की देवापेक्षा विज्ञानावर विश्वास ठेवून ताबडतोब मोठ्या हॉस्पिटलच्या आय सी यु मध्ये दाखल केल्या जाते. 
जगातील मानवाची संपूर्ण सुरक्षा ही जय जवान, जय किसान, जय विज्ञान यांच्या हाती आहे आणि हे शंभर टक्के हेच सत्य आहे.
हे कोणत्याही देशाच्या नागरिकांची व सरकारची नाकारण्याची हिंमत नाही.म्हणूनच स्कूल-कॉलेज बंद,माल-गोदाम बंद,देश-विदेश येणे,जाणे बंद,मन्दिर-मस्जिद-काबा बंद,भगवान,ईश्वर-अल्लाह चे दरवाजे बंद, एका "कोरोना वायरस" ची भयानक भीती माणसाच्या मनात डोक्यात घुसली. त्यामुळे भिऊ नको मी तुझा पाठीशी आहे म्हणणारे तंत्र-मंत्र वाले चुप झालेत.होम,हवन-यज्ञ करणारे चुप झालेत,शनि-राहु-केतु उतरवणारे बाबा चिडीचुप झाले. महंत,पंडे-पुजारी चुप झाले.काझी,मौलवी-मौलाना चुप झाले.चर्च चे पादरी,फादर चुप झाले.तेहतीस कोटी देवी-देवता ज्यांच्या ताब्यात असतात ते तीन टक्के वाले सुध्दा चिडी चुप झाले. त्यांचा धंदा बंद झाला.तरी त्यांनी हिंमत होत नाही.भक्तांना आवाहन करण्याची बाकीच्या वेळी दक्षिणा मिळाल्यावर देवाला खुश करणारे मंत्र कोरोनावर चालणार नाही यांची त्यांना खात्री आहे.म्हणूनच सर सलामत तर पगडी हजार. विज्ञानाच्या समोर सर्व शरणार्थी झाले.
 भारतात दरवर्षी शेतकरी आत्महत्या करतात, त्यांची दखल पाहिजे त्या प्रमाणात घेतली जात नाही. कॉंगोमध्ये एड्स आढळला,मलेशिया मध्ये निपाह सापडला,मेक्सिकोमध्ये स्वाईन फ्ल्यू आढळला, आफ्रिकेत इबोला सापडला, हॉंगकॉंगमध्ये डेंगु आढळला,आता चीनमध्ये कोरोना सापडला.निसर्गाची ताकद आणी मानवाची कुवत कमी पडते,विज्ञानाने जग जवळ आले होते आता त्याने विषाणूचा शोध घेतला, तो एकाचवेळी किती लोकांचा बळी घेऊ शकतो यांचा अंदाज करता येते नाही. म्हणूनच स्वतःची सुरक्षा करून कुटुंबातील लोकांची काळजी घ्या.
एका कोरोना व्हायरसने १५० करोडचा चीन घरातच बंदिस्त झाला. रस्ते विरान झाले चीनचे अध्यक्ष भुमीगत झाले.
एक अत्यंत सूक्ष्म जंतू.१५० कोटींचा चीन चीडीचूप झाला. अगदी अदृश्य अशा एका जंतू ने चीनची दानादान उडवली .
अख्ख जग एका क्षणात झोपावयाची ताकद निसर्गात आहे. आणी मानव मात्र अहंकाराने एकमेकांना संपवन्याची धारणा ठेवतो. करोना ने थोडाही जातीभेद,वर्णभेद,धर्मभेद किंवा प्रांत भेद केला नाही.सगळ्यावर सारखे प्रेम दाखवत घरातच डांबले आहे.
    मानव मात्र हे माझे ते माझे. मी वरच्या कुळाचा वरच्या जातीचा वरच्या धर्माचा असा अहंकार मिरवत फिरत असतो.ही शेखी करोना ने एका क्षणात उतरवली. गेल्या काही वर्षात जरा जास्तच खुमखुमी व जास्तच ताठा असलेला चीनचा तानाशहा अक्षरश: पळून गेला. 
मरणाच्या भीतीने आपल्याच वीस हजार लोकांना ठार मारण्याची भाषा करु लागला.जगातील कोणताही जीव हा निसर्गापुढे अगदीच कस्पटा समान आहे.करोनाने एकच संदेश दिला आहे स्वयम प्रकाशित व्हा,स्वतःच्या सवयी बदलला,स्वछतेचे नियम पाळा,निरोगी रहा व जगा आणि इतरांनाही जगू द्या.
टाटा हॉस्पिटल मुंबई यांनी दिलेल्या सूचना पाळा चीन मधून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरस पासून संरक्षणासाठी घ्यावयाची काळजी. 
1)कोरोना विषाणू चा आकार मोठा आहे 400-500 मायक्रो,त्यामुळे कोणत्याही साध्या मास्क मुळे संरक्षण होऊ शकते, खर्चिक मास्क घेण्याची आवश्यकता नाही.
2) विषाणू चे वजन जास्त असल्यामुळे तो हवेत तरंगत नाही, खाली पडतो, त्यामुळे त्याचा संसर्ग हवेतून होत नाही
3) कपड्यांवर पडलेला विषाणू नऊ तास राहतो, केवळ स्वच्छ कपडे धुवून वाळवल्यास विषाणू मरतो.
4) हातावर पडलेला विषाणू दहा मिनिटे जगतो, स्वच्छ साबणाने हात धुणे किंवा hand sanitizer वापरणे हे प्रतिबंध करण्यास पुरेसे आहे
5) थंड अन्न आणि icecream खाणे टाळा.
6) कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या केल्यास विषाणू घशातच मारला जातो, फुफुसात संसर्ग होत नाही.
7) 26 ते 27 डिग्री तापमानात विषाणू टिकाव धरू शकत नाही, त्यामुळे उष्ण प्रदेशात विषाणू जगू शकत नाही
8) गर्दीच्या ठिकाणी जाऊच नका.
9) भारतीय जीवनशैलीचा वापर करा म्हणजे हात जोडून नमस्कार करा.
10) प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी रोज सूर्यनमस्कार सारखा व्यायाम करावा.
11) वाचून शेअर करा म्हणजे इतर मित्रांना व नातेवाईकांना सावध करा म्हणजे निदान त्यांच्या मार्फत कोरोना तुमच्या पर्यंत पोहोचणार नाही.देशसेवे साठी नेहमीच प्रामाणिकपणे सेवा देणारे उद्योगपती टाटा यांच्या टाटा हॉस्पिटलने हा संदेश दिला आहे. इतर उद्योगपती लोक संकटात असले की आर्थिक शोषण कसे करता येईल यांचा विचार करतात. 
कोरोना रोखण्यासाठी जगातील सर्व सरकारे मोठ्या प्रमाण सुरक्षा व्यवस्था ठेवण्यासाठी जाहिरात बाजीवर खर्च करीत आहेत. तरी ही जगातील मानवाची संपूर्ण सुरक्षा ही जय जवान, जय किसान, जय विज्ञान यांच्या हाती आहे आणि हे शंभर टक्के हेच सत्य आहे. कोरोनाचा प्रतिकार विज्ञानाच्या चौकटीत राहून करा,हीच प्रत्येक भारतीय नागरिकांना विनंती,
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडुप मुंबई,

   (छायाचित्र दगडाला मास्क लावणारे भारतातील महान मेरीटधारी लोक)
Attachments area

"श्रमिक शिक्षा,विकास की दीक्षा" तीन दिवशीय प्रशिक्षण शिबिर संपन्न


"श्रमिक शिक्षा,विकास की दीक्षा"  तीन दिवशीय प्रशिक्षण शिबिर संपन्न 
भारतीय कामगार शिक्षण संस्था मुंबई संस्थापित दतोपंत ठेंगडी राष्ट्रीय कामगार शिक्षण व विकास बोर्ड,श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार आणि सत्यशोधक कामगार संघटनेच्या संयुक्त विदयामानाने तीन दिवशीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यात असंघटित क्षेत्राकरीता सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजना या विषयावर कामगार संघटना प्रतिनिधीचे १२ मार्च ते १४ मार्च २०२० रोजी श्रमिक शिक्षण भवन कॉम्प्स कुर्ला पश्चिम मुंबई येथे संपन्न झाले.सदर प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन प्रमुख पाहुणे श्रीमती सविता पावसकर मॅडम समुपदेशक बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून करण्यात आला. या प्रसंगी त्यांनी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना,प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना,अटल पेन्शन योजना यावर मार्गदर्शन केले.मान झेड ए बागवान उपसंचालक प्रशिक्षण यांनी "श्रमिक शिक्षा,विकास की दीक्षा" यावर आपले अभ्यासपूर्ण विचार मांडले.तीन दिवशीय प्रशिक्षण शिबिरात प्रमुख वक्त्यांनी आपले विचार प्रगट केले. त्यात सर्वश्री अश्विन काकटकर साहेब अतिरिक्त श्रम आयुक्त मुंबई विभाग यांनी इमारत बांधकाम व इतर कामगार कल्याणकारी मंडळ,नांव नोंदणी, कार्यपद्धती व लाभ यांची सविस्तर माहिती प्रशिक्षणार्थीनां दिली,यानंतर मान जी बी गावडे सर संचालक आंबेकर श्रम प्रशिक्षण संस्था यांनी कामगार व कामगारांच्या संघटनेची कार्यपद्धत यावर मार्गदर्शन केले.मान परेश चिटणीस यांनी संघ कार्यपद्धती चे महत्व आणि मान सुरेश जिरीमाळी यांनी संवाद कौशल्य व कामगार संघटना यावर आपले विचार मांडले,मॅडम ज्ञानेश्वरी सोनावणे, यांनी एच आय व्ही व एड्स यावर मार्गदर्शन केले.शेवटच्या दिवशी १४ मार्चला सांगता समारोह प्रमुख पाहुणे मान एन डी राठोड सेवा निवृत्त उप आयुक्त श्रम विभाग यांच्या हस्ते २८ प्रशिक्षणार्थीनां प्रमाण पत्र देऊन गौरविण्यात आले. प्रशिक्षण शिबिरांचे मुख्य प्रभारी मान रमेश मडावीप्रशिक्षण अधिकारी यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत करून आभार व्यक्त केले. सूत्रसंचालन श्रीमती अस्मिता देशमुख यांनी केले.

(सागर तायडे यांस कडून)
 
 

शहराची स्वच्छता करणाऱ्या कामगारांनी स्वतःची काळजी घ्यावी,

शहराची स्वच्छता करणाऱ्या कामगारांनी स्वतःची काळजी घ्यावी,
शहराच्या गल्लीबोळात झाडू मारून,गटार नाले साफ सफाई करणारा कामगार चार दिवस आजारी पडला तर कोणालाही दुःख होणार नाही.परंतु चार दिवसात रस्त्यावर कचरा गोळा झाला, गटार नाले तुंबले तर गल्लीबोळातील थोर समाजसेवक जागे होऊन तोंडी,लेखी शेकडो तक्रारी करतील.म्हणून कामगार बंधुभगीनीनों तुमच्या आरोग्याची काळजी तुम्ही स्वतः घ्यावी.
आपणास स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कळविण्यात येते की काही दिवसांपूर्वी चीन या देशात हाहाकार माजवणारऱ्या कोरोना ( COVID 19) ह्या विषाणूने हजारो नागरीकांचे बळी घेतले असून त्याचा फैलाव झपाटय़ाने जगभर होत आहे. परिणामी सर्व देशांनी त्यांच्या नागरिकांना वैद्यकीय सेवा व या आजाराबद्दल जनजागृती करण्यासाठी कंबर कसली आहे. ह्या विषाणूने आता आपल्या भारत देशातही फैलाव सुरू केला आहे. आपल्या देशात या आजाराचे बळी गेल्याची माहिती अद्याप तरी शासनामार्फत जाहीर जरी करण्यात आली नसली तरी देश पातळीवर जनजागृती करण्यात येत आहे. आपण सर्व महाराष्ट्रातील ग्रामपंचायत ते महानगरपालिका यामध्ये सफाई कामगार म्हणून काम करत आहात. आपण नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये म्हणून अहोरात्र झटत आहात. आपण ही सेवा करत असताना आपल्या शरिराची सुरक्षा पण करणे गरजेचे आहे. तरी आपणास आपल्या आरोग्याच्या दृष्टीने स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य कमिटीच्या वतीने काही महत्त्वपूर्ण सूचना करण्यात येत आहेत.तरी आपण त्या तंतोतंत पाळाव्यात हिच अपेक्षा.
 १)आपणास स्वच्छतेच्या कामासाठी दिलेले मास्क, हातमोजे तसेच गमशूज यांचा वापर करावा. 
 २)आपण काम करताना आपले शरिर व्यवस्थित झाकले जाईल असा गणवेश धारण करावा. 
 ३)विशेषतः खाजगी तसेच सरकारी रुग्णालयातील तसेच सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या इमारतीतील घनकचरा उचलताना सदर कचऱ्यावर रासायनिक द्रव्यांची फवारणी केली असल्याची खात्री करून तो उचलावा. 
 ४)आपले स्वच्छतेचे काम पूर्ण होईपर्यंत मास्क, हातमोजे, गमशूज आणि गणवेश काढण्याचा प्रयत्न करू नये.
 ५)आपले काम संपल्यानंतर ताबोडतोब स्नान करावे. त्यासाठी चांगल्याप्रतीचा साबण अथवा शाम्पू वापरावा.
६) अनोळखी माणसाशी हस्तांदोलन करू नका,
७) उच्चभ्रू सोसायटी मधील व्यक्ती कडून कोणतेही वस्तू बक्षीस म्हणून स्वीकारू नका.
 ८)शासनाने प्रारित केलेल्या सूचनांचे पालन करावे.
 ९)कोणत्याही धार्मिक संघटना अथवा प्रसारमाध्यमांनी प्रसारित केलेल्या अवैज्ञानिक गोष्टींना प्राधान्य तसेच प्रसिद्धी देऊ नये व त्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करु नये. 
 १०)सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अफवांवर विश्वास ठेऊ नका तसेच ते प्रसारित पण करू नका.
 ११)वैद्यकीय अधिकारी यांनी ह्या आजाराबद्दल सांगितलेली सदृश्य लक्षणे स्वतःमध्ये तसेच आपल्या आजूबाजूच्या इतर कोणामध्ये आढळून आल्यास सरकारी दवाखाने अथवा खाजगी दवाखान्यातच निदान करून घ्यावे.
 १२)स्वत: काळजी घ्या आणि आपल्या सेवेतून नागरिकांचीही काळजी घ्या.
म्हणूनच शहराची स्वच्छता करणाऱ्या कामगारांनी स्वतःची काळजी घ्यावी, सर्वांनी मिळून एक लढा कोरोना सोबत लढूया अन् देश वाचवूया.
 जय हिंद! जय भारत!! जय कामगार!!! 

निलेश नादावडेकर 9892847838
 कार्यालय सचिव व प्रसिद्धी प्रमुख 
 स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य कमिटी
संलग्न: स्वतंत्र मजदूर युनियन,