जो थांबेल तोच जिंकेल.
जगात असा निसर्गाचा नियम आहे. जन्मापासुन ते मृत्युपर्यत माणुस शिक्षण घेण्यासाठी,नोकरी साठी नंतर मुलाबाळांना संबालण्यासाठी म्हणजेच एकूण जगण्यासाठी प्रत्येकाशी कालानिरूप शर्यतीत धावत असतो आणि तिथे जो थांबला तिथे तोच तो संपला.हा सध्याच्या काळातील नियम आहे.घडयाळाच्या कट्या बरोबर तो धावत असतो.आज राज्यात देशात नव्हे तर जगातील १९७ देशातील १८५ देशात कोरोनामुळे सर्व प्रकारची शर्यत थांबली आहे.त्यामुळेच आज आयुष्यात पहिल्यांदाचं अशी शर्यत होतेय, जो थांबेल तोच जिंकणार आहे.जगातील आरोग्य तज्ञ डॉक्टर सांगत आहेत घरीचं थांबा आणि आरोग्य सांभाळा.नी निरोगी रहा.लॉक डाऊन हा शब्द आमच्या जीवनात कुठे ही नव्हता आज जगातील प्रत्येक देशात लॉक डाऊन मुळे अनेक घटना वाचण्यात येत आहेत.लॉकडाऊनमुळे प्रत्येक माणसाला वेगवेगळा अनुभव मिळत आहे. तुम्हाला पण अनुभव आलाच असेल तो कधी शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करा.एक जग प्रसिद्ध म्हण आहे. जो "वाचेल तोच वाचेल"
आता तीनशे चारशे पानाचे पुस्तक वाचण्याचा काळ नाही.तर फेसबुक वाटस अप सोशल मीडियामुळे जग खूप जवळ आले आहे.क्षणाक्षणाला नव नवीन माहिती आपल्याला मिळत असते.ती चांगली कोणती आणि वाईट कोणती ते आपल्या वैचारिक मानसिकतेवर अवलंबून आहे.ज्यावेळेस आपण नकारात्मक विचार करतो त्यावेळेस विश्वात जेवढी नकारात्मक तरंग आहेत त्याच्याशी आपण जोडले जातो. नकारात्मक विचारांची गर्दी आपल्या भोवती होते.मनात,डोक्यात अस्वस्थता, उदासीनता,भय आपोआप निर्माण होते. नकळतपणे यातून नैराश्याकडे वाटचाल सुरू होते.
म्हणून नकारात्मक विचारांना - सकारात्मक करणे गरजेचे असते. सकारात्मक विचार आपली शक्ती,आत्मविश्वास,मनोबल वाढवतात.नकारात्मक विचारांना सकारात्मक करणे म्हणजे मनाचेच - मनाशी युध्द करणे होय. यालाच तुकाराम महाराज म्हणतात. ‘‘रात्रं दिनं आम्हां युदधाचा प्रसंग’’ आता आपण २१ दिवस घरात बसून आहात.गेल्या कितीक दिवसात कुटुंबातील माणसा बरोबर एकत्र जेवण घेतले होते काय ?.कधी बाहेरच्या घटना बाबत एकत्र बसून घरात चर्चा केली आहे काय ?.घरात बसून आपली किंमत आणि हिंमत वाढली की कमी झाली. कुटुंबात पैसा पेक्षा माणसाची किंमत वाढली,धन दौलती पेक्षा जीवाची किंमत मोठी आहे हे कळले असेलच.किती सवयी बदलल्या असतील.घरात जेवण बनवून सुद्धा घरातले मेंबर बाहेरच सकाळ संध्याकाळ ऑनलाईन मागवून खायचे ते बंद झाले असेल. घरात बनविलेल्या चपात्या,बाजी भाकरी अन्नाची नासाडी बंद झाली असेल.
आई कुठे काम करते.घरातील बायकांना कुठे काम असते.स्त्रियांना घरात (गृहिणींना) किती काम असते हे पुरुषांना कळायला लागले असेलच. घरी कधीतरी स्वयंपाक करणाऱ्या स्त्रिया रोज स्वयंपाक करू लागल्या ने मुलांना,पुरुषांना घरच्या जेवणाची चव आणि किंमत कळू लागली असेल.घरात काम करणारी बाई आणि नोकरी करणारी बाई समजली असावी.निसर्गाला सर्व समानच असतात. तो गरिब,श्रीमंत अ सा भेदभाव करत नाही.महत्वाचे म्हणजे शेतकऱ्यांची किंमत समजली असेल कारण आज सर्व सेवा बंद असतांना भाजीपाला,दूध इत्या दी जिवनावश्यक गोष्टीमाञ मिळत आहेत.ग्रामीण भागातून शहरात ते कोणते अग्निदिव्यातून येते यांची कल्पना करवत नाही.आजच्या परिस्थतीत सर्वात दुखी कोण असेल तर जे नेहमी म्हणायचे मला दारू पिल्या शिवाय हात पाय चालत नाहीत ते, अस्वस्थ होते बाहेर गेल्यावर पोलिसांचे दंडे बसल्यावर त्यां ना वेळेच भान न पिता आले.घरातील छोटे छोटे भांडणे रुसवेफुगवे कमी झाले.आईला,बायकोला घरात काम करतांना मदतीची किती गरज आहे हे कळायला लागले असेल.
लॉक डाऊन ने लोकांना कमीत कमी वस्तू वापरुन जीवन जास्त चांगले जगता येते.आणि प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीला ब्रँड पाहिजेच. ही मानसिकता आता कमी होत आहे. वेळेला जे मिळते त्यात सुध्दा आनंद मानता आला पाहिजे हे सर्वात जास्त लोक शिकले असावेत.लोक नेहमी म्हणतात माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत,हा गैरसमज होता,आहे व तो निसर्गाने उत्तम रित्या समजावून सांगितले आहे.आता तरी शेतकरी राजाचे महत्व सगळ्या जगाला कळले असावे. जगाचा पोशिंदा बळीराजाच आहे अडते,दलाल,व्यापारी नाही हे पुन्हा सिद्ध झालं.जगायला सुरक्षित ठिकाण, खायला अन्न आणि मायेची माणसं लागतात. पैसे शिजवून खाता येत नाहीत हे कळालं. हा अनुभव जगातील १८५ देश घेत असतांना त्यातून भारता नांवाचा देश आणि भारतीय नागरिक काही शिकतील काय?.
भारतातील अनेक लोक नोकरी निमित्याने वेगवेगळ्या देशात आहेत. कोरोना महासंकटाला ते कसे सामोरे जातात त्यांचा अनुभव ते सोशल मिडिया द्वारे शेयर करतात.सारे जग कोरोनामुळे "बंदिस्त" असतांनाही जपान "शांत" कसा?.एका जपानमधील भारतीय विद्यार्थ्यांचा अनुभव!.चीनमधुन जपानमध्ये "डायमंड प्रिन्सेस" हे जहाज जानेवारी महिन्यात येऊनही जपान हे पहिले कोरोनाबाधित राष्ट्र होऊन येथील कोरोना हा इतर युरोपियन राष्ट्रांप्रमाणे चौथ्या टप्प्यात कां पोचला नाही, हे मला पडलेले कोडे आहे!.ज्यावेळी जपानमध्ये कोरोनाविषाणू हल्ला झाल्याचे कळले त्यावेळी माझ्या आईवडिलांनी मला त्वरीत भारतात येऊन तेथील परिस्थिती निवळल्यावर मग परत जाण्याच्या सुचना दिल्या.परंतु जपानमध्ये आजही सर्वकाही आलबेल आहे.आम्ही रोज ऑफिसमध्ये जातो.सर्व अत्यावश्यक सेवा पुरवठा केंद्राला भेट देतो.कुठलेही उपहारगृह बंद नाही!.कुठलेही माॅल बंद नाही. मेट्रो रेल्वे चालू आहे.बुलेट ट्रेन धावताहेत!.कुठलाही लाॅक डाऊन नाही!.सर्व आंतरराष्ट्रीय सिमा खुल्या आहेत.जपानमध्ये वृध्दांचे प्रमाण इटलीपेक्षा जास्त आहे.टोकीयोत परदेशी लोकांचे वास्तव्य सगळ्यात जास्त आहे व ते पर्यटकांचे आवडते शहर आहे.तेथे परदेशी प्रवाशांना बंदी नाही.फक्त शैक्षणिक सेवा व सार्वजनिक उपक्रमांवर बंदी आहे!.कोरोना विषाणू साखळी बंद करण्याविषयी थिअरीचा मी अभ्यास करत आहे.
लाॅक डाऊन मुळे भारतासारख्या दाट लोकवस्तीच्या देशात कोरोना विषाणू साखळी बंद केली जाते.
परंतु टोकियो सारख्या दाट वस्तीत मात्र लाॅक डाऊन शिवाय सारे काही सुरळीत चालू आहे व नियंत्रणात आहे!
मला भारतातील बातम्यांमुळे व सततच्या परिस्थितीमुळे भिति वाटते!.मी यांचे खालीलप्रमाणे विश्लेषण केले आहे.जपानी संस्कृतीत लहानपणापासून दिलेल्या शिस्तीच्या बाळकडूमुळे कोरोनाप्रतिबंधक नियम आपोआप पाळले जात आहेत!.जपानी प्रवासाला बाहेर पडताना चे मास्क घालतात.६०%जपानी नेहमी मास्क घालुन बाहेर पडतात.थोडी सर्दी झाली तरी ते मास्क लावतात. त्यांच्या या संस्कृतीमुळेच कोरोनाविषाणू साखळी खंडीत होत आहे.जपानमध्ये स्वागतकक्षातील लोक,नर्स, डॉक्टर,सरकार अधिकारी, स्टेशनमा स्तर, रेल्वे कर्मचारी वर्ग नेहमी मास्क वापरतात.हिवाळ्यात मुलं सर्दी होऊ नये म्हणून मास्क लावतात.
जपानमध्ये घरोघरी कोडोमो मास्कची पेटी असते.कोडोमो मास्क लहान मुलांना फीट बसतो.जपानी जीवनपध्दतीत आपल्या सवयींमुळे इतरांना ऊपद्रव होणार नाही,याची काळजी घेतली जाते.ते कुठेही थुंकत नाही,खोकत नाही,शिंकरत नाही.स्वच्छता हा त्यांच्या संस्कृतिचा एक भाग आहे.
शाळेतच त्यांना बाराखडी शिकविण्याआधी सार्वजनिक स्वच्छता व आदर्श नागरीकतेचे धडे शिकवले जातात.ते हस्तांदोलन न करता वाकुन स्वागत करतात!.हात धूणे हा त्यांच्या संस्कृतिचा एक भाग आहे.सार्वजनिक स्वच्छतागृहात, कार्यालयात प्रवेश करण्याचे जागी स्वच्छके वापरली जातात.विश्रांतीगृहात स्वच्छकाने हात धुवून सिंक स्वच्छ केले जाते जेणेकरून नंतर वापरणारया व्यक्तीस ते सुस्थितीत मिळावे.हे मेट्रो स्टेशनमध्ये नेहमी पहायला मिळते.जपानी लोक नेहमी ओला रुमाल हात पुसण्यासाठी सोबत बाळगतात.सोशल डिस्टंसींग (चार हात दुर)ते पुर्वीपासूनच ठेवत आले आहेत.ही एक साधनाच आहे!.कोरोनाप्रसारावर नियंत्रण ठेवण्यात बनविलेले नियम हे त्यांच्या जीवनपध्दती व संस्कृतिचा भाग आहेत.या सर्व गोष्टींमुळेच कोरोनाप्रसारावर नियंत्रण ठेवण्यात जपानला यश मिळाले आहे!.कारण जपान हे बौद्ध राष्ट्र आहे आणि ते विज्ञानाचा स्विकार करतात.आपण जपानपासुन एवढे शिकलो तरी पुरे!
भारतातील लोक जगातील कोरोनाशी मुकाबला करणाऱ्यां लोकांचे अनुभव नियमितपणे पाठवत आहेत. परंतु भारतीय लोक त्यापासून कोणताही बोध घेतांना दिसत नाही.लॉकडाऊन म्हणजे घराच्या बाहेर निघू नये.रस्तावर येऊ नये.तरी काही लोक त्यांचे गांभीर्य लक्षात घेत नाही.काही काम नसतांना रस्तावर फिरतांना दिसतात.काही कोरोना गस्त रुग्ण असतांना लपूनछपून राहतात.जास्त त्रास झाल्यावर रुग्णालयात धावतात.तेव्हा कळते की ती व्यक्ती किती लोकांना बाधित करून आली असेल.आज मुंबईत असेच रुग्ण मिळत आहे.अनेक विभागात लोक योग्य सहकार्य देत नाही.म्हणूनच भारतात कोरोनाचा धोका प्रचंड वाढला आहे.त्याची दक्षता जागतिक आरोग्य संघटना घेत आहे.ते भारत सरकारला वेळोवेळी सूचना देत आहे.पण भारतीय नागरिकांना खोटे बोलून फसवणूक करण्याचा अनुभव असलेले मोदी जागतिक आरोग्य संघटनेला खोटी माहिती देत आहेत.टाळ्या,थाळ्या वाजवून झाल्यावर आता दिवा लावण्यास सांगितल्यावर किती कोरोना रोखल्या गेला यांचे उतर देत नाही.लोक भूके कंगाल फिरतात त्याचे काय.रुग्णालयात डॉक्टर नर्स,कर्मचारी यांना योग्य सुरक्षा कीट आणि औषध दवागोळी उपलब्ध नाही त्यांचा बाबत काय ?. सरकार एकच सांगत आहे.लॉक डाऊन आहे घरात थांबा जो थांबेल तोच जिंकेल ...!!!
सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९, सी सी डी -175412.