शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०२२

मी काही करीन आणि मी पुन्हा येईन,मी पुन्हा येईन

 मी काही करीन आणि मी पुन्हा येईन,मी पुन्हा येईन



          वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जळून गेल्यावर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते.डोळे बंद केले म्हणून संकट जात नाही.आणि संकट आल्या शिवाय, डोळे उघडत नाहीत.राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं,तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात.मी पुन्हा येईन,मी पुन्हा येईन म्हणणारे राजकारणातील तरुण तडफदार अभ्यासू कावेबाज अण्णाजी पंत म्हणजेच आदरणीय देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय प्रवास आपण पाहत असाल,वाचत असाल.तो महारष्ट्राला कुठे नेणारा आहे.निसर्गाचा नियम जल बिन मछ्ली म्हणजे पाण्याच्या बाहेर जिवंत मासळी काढली तर ती कशी करते कधी पाहिले काय?. ती पाण्यात जाण्यासाठी ज्या जिद्दीने तडफड करते ते पाहिल्यावर कोणत्याही माणसांचे मन हेलावून निघते. असाच प्रकार सध्या महाराष्ट्र राज्यात सुरू आहे, माजी मुख्यमंत्री,माजी विरोधी पक्षनेते आणि आजचे राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणविस साहेबांची परिस्थिती त्या माश्या सारखी झाली आहे. मी काही करीन आणि मी पुन्हा येईन,मी पुन्हा येईन हे त्यांनी करून दाखविले.
           महाराष्ट्रात अहोरात्र खोटे बोलून शेतकरी,मराठा,धनगर,ओबीसी,मागासवर्गीय आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजाची दिशाभूल करून ई व्ही एम मुळे निवडणूक जिंकली आणि सर्वात मोठा पक्ष म्हणून मुख्यमंत्री पद आपले हक्काचे आहे.शंभर टक्के गृहीत धरून चालले असतांना शिवसेनेच्या वाघांची डळकाळी फोडून शिकाऱ्याने शिकार सहजतेने करून नेली.त्यामुळेच देवेन्द्र फडणवीस यांची हालत एका वाटसरू सारखी झाली.विश्रांतीसाठी एखाद्या झाडाखाली बसावं. समोरचं एक विंचू दिसावा.त्याला मारण्या साठी दगड उचलावा.दगडाखालून साप निघावा. त्याने आपला पाठलाग करावा.पळताना ठेच लागून विहीरीत पडावं. विहीरीत मोठी मगर असावी.तिने वेग घेण्यापूर्वी,एखाद्या फांदीचा वेध घ्यावा.वर येण्याचा प्रयत्न करावा. वरती भूकेला वाघ असावा. त्याच्या भितीने फांदीचा हात सुटावा.फांदी वरील मधमाशांनी भडका करावा. आणि अशा अवस्थेत मधाच्या पोळीतून पडणारा, मधाचा एक थेंब तोंडाने झेलण्याचा प्रयत्न करावा.तर हात सुटून विहीरीत पडण्याची भिती यालाच तोंडाशी आलेला घास गेला असे म्हणतात.म्हणूनच आपण प्रतिज्ञा केली होती.मी काही करीन आणि मी पुन्हा येईन,मी पुन्हा येईन.आता आला तर महाराष्ट्राचा विकास करण्याचे स्वप्ना पहा.गुजरातचे नाही.
         देशात कोरोनाचा धुमाकूळ सुरु असतांना.केवळ महाराष्ट्रात नाही? सर्व राज्यासह देशभरात सुरू असतांना देवेंद्रजी फडणविस यांना रात्रंदिवस झोप लागत नव्हती.जागोजागी त्यांना महाराष्ट्र आणि राज्याचा मुख्यमंत्री दिसतो.त्यांना सारखा शेतकरी आत्महत्या करतो,वयोवृद्ध शेतकरी धर्मा पाटील मंत्रालयात येऊन आत्महत्या करतो.जेंव्हा ऐशी वर्षाच्या शेतकऱ्याने आपल्या कार्यकाळात मंत्रालयात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला व आपन कित्येएक दिवस त्याच्या कुटुंबियांना आपण नजरकैदेत ठेवले होते.हा इतिहास शेतकरी विसरला नाही.विसरला असेल तर तो शेतकरी नसावा.
     "एक मराठा लाख मराठा" मराठ्यांचे लाखोंचे क्रांती मुक मोर्चे शिस्तप्रीय पद्धतीने निघाले होते व बावीस बांधवांनी बलीदान दिले तरी आपन मुग गिळून गप्प बसलात होता. म्हणे अभ्यास सुरु आहे. जेंव्हा न्याय्य मागण्यासाठी आमचा आदिवाशी कष्टकरी बांधव नाशिक ते मुंबई पायी प्रवास करत आसताना उन्हामुळे पिघळनाऱ्या डांबरी रस्त्यावर  चालल्यामुळे त्याचे पाय सोलुन निघत असतांना ही तो आझाद मैदानात आला होता.त्याच्या सातबाराचे काय केले.हा इतिहास वनविभागाची जमीन कसणारा आदिवासी विसरला नाही. विसरला असेल तर तो भूमिहीन आदिवासी नसावा. 
    फडणविस साहेब महाराष्ट्र कोरोना महामारीमुळे आर्थिक आडचणींचा सामना करत सताना, तुम्ही मोदीच्या पी एम केयरला मदत करा असे आवाहन करत होता. हे सांगताना महाराष्ट्र राज्याशी थोडी तरी सामाजिक बांधिलकी ठेऊन बोलले पाहिजे होते.  आपन फार अभ्यासू राजकारणी व्यक्तीमत्व आहात असे तुमचे लोक म्हणतात.संपूर्ण जग कोरोनाच्या संकटाचा सामना करीत होता.तेव्हा जगाच्या पाठीवर कोरोनाचे राजकारण  करनारे आपन एकटेच होता. आपनही पाच वर्षे महाराष्ट्रातचे मुख्यमंत्री राहीलात आपन राज्यात कीती हॉस्पिटल व पायाभुत सुविधा ऊभ्या केल्या होत्या व महाआघाडी सरकारने त्या बंद केल्या त्यामुळे महाराष्ट्र संकटात सापडला. हे सांगितले पाहिजे ना?.
        अच्छे दिन दाखविण्यासाठी तुम्हाला वृतपात्रांना संपूर्ण पाच वर्षात दरदिवशी ऐशी हजार रुपये जाहीरातींवर खर्च करावे लागले. हे आम्ही सांगत नाही माहिती अधिकारात ऊघड झाले आहे.देवेंद्रजी संपुर्ण देशामध्येच कोरोनाच्या रुग्नांचा आकडा वाढत होता.मग ते अपयश सन्माननिय मोदी साहेबांचे अपयश नव्हते का?. जी,एस,टी चे एकविस हजार कोटी  केंद्राकडे अडकुन पडले होते.मी काही करीन ते राज्यात घेऊन येण्यास मदत असे कधीच म्हटले नाही.मदत करण्या ऐवजी महाराष्ट्राला संकटात टाकण्याचे महापाप आपण त्यावेळी केले होते. असे आम्हाला वाटते.तुम्हाला वाटत नाही काय?. 
     सांगली महापुराच्या वेळी आपण विरोधी पक्षांच्या नेत्यांना काय मार्गदर्शन करीत होता, त्याच्या बातम्या आणि व्हीडीवो क्लिप पाहता काय?.राजकारणात यशस्वी होण्यासाठी सहकार्याचा आणि मतदारांचा विश्वासघात करण्याचा अनुभव प्रचंड असतांना आपणास विरोधीपक्ष नेते बनावे लागले. आणि कोणताही राजकारणात विश्वासघात करण्याचा अनुभव नसणारे मुख्यमंत्री ऊध्दवजी ठाकरे साहेब हे महाराष्ट्रात अतीशय चांगले काम करत होते. ते आपणास शांतपणे पाहण्याची इच्छा नव्हती.म्हणूनच मी काही करीन आणि मी पुन्हा येईन,मी पुन्हा येईन असे जाहीरपणे सांगत होता.ते आपण पूर्ण करून दाखवले.आप तरुण तड फड करणारे राजकारणातील कुशल संघटक हरहुन्नरी नेते आहातमी काही करीन आणि मी पुन्हा येईन,मी पुन्हा येईन. आता आला आहात तर मतदारसंघात फिरतांना मतदारांनी महाराष्ट्र संकटात असतांना आपण काय करीत होता?. असे विचारले नाही पाहिजे,यासाठी महाराष्ट्रातील जनतेला मतदारांना वाचविण्यासाठी  संविधानाच्या चौकटीत काम करा.हीच आपणास मतदारांच्या वतीने विनंती करतो.
सागर रामभाऊ तायडे ,९९२०४०३८५९,भांडूप मुंबई.

गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२

सर्वात मोठे धन कोणते?.

 सर्वात मोठे धन कोणते?.



 आज काल काही लोक श्रीमंतीचे जास्त प्रदर्शन करतात.गाडी,बंगला,सोने चांदी हिरे मोती असे दाखवतात की त्यांच्याकडे अफाट खरी संपत्ती आहे.पण त्यांना त्यांचे शरीर साथ देत नाही.त्यामुळे त्यांना अनेक गोष्टीनां मुखावे लागते. खाण्या पिण्यावर बंधन असली की माणूस नावाचा प्राणी कावळा बावळा होतो. निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासाठी निसर्गाच्या नियमांचे पालन करावे लागते. आणि नियमांचे उल्लंघन केले तर डोके ठिकाणावर राहत नाही. म्हणूनच एक सुप्रसिद्ध म्हण आहे, "शरीर ओके तर ठिकाणावर डोके".पैसे असल्यावर सर्वच विकत मिळू शकते, पण शरीर आणि शरीरातील अवयव मिळणे अशक्य असते. ते आपल्या शरीरातील अवयव देण्याची वेळ येते तेव्हा जवळची माणसं तोंड फिरवून उभी राहतात.तेव्हा आपली कोण आणि परकी कोण हे लक्षात येते.आपल्यांशी बोलतांना आनंद दुप्पट असतो आणि दुःख अर्धे होत असते. तीच माणसं आपली वाटत असतात,जग परके वाटत असते.
   आईवडीलांनी जन्म दिला असतो,तेच लहानपणी संगोपन करून नांव देतात,शिक्षण शाळेत मिळते आणि संस्कार समाज देतो.शिक्षणामुळे नोकरी मिळते आणि संस्कारामुळे मानसन्मान मिळतो.तुमचे आचरण व स्वभाव तुमची ओळख निर्माण करते.तुमचे शिक्षण,पद कोणी विचारात घेत नाही.पण तुमच्या चेहऱ्यावरील हास्य (स्माई) गाडी वरचा वाहन चालक,गेटवरचा सुरक्षा रक्षक ते कार्यालयातील कर्मचारी अधिकारी कायम लक्षात ठेवून उत्साहात उत्स्पुर्तपणे नमस्कार करून स्वागत करतात.त्यांचा आनंद घेता आला पाहिजे.
    कर्मचारी अधिकारी वर्गाने किंवा प्रत्येक माणसाने एक लक्षात असु द्यावे.आपल्या वडिलांचे नांव व संपत्ती,आपल्याला मिळू शकते,पण आरोग्य,शरीर,आपले आपल्यालाच कमवावे लागते,ते वारसाहक्काने मिळत नाही.आता पर्यंत पैसा श्रेष्ठ होता,पण इथुन पुढे ज्याचं आरोग्य उत्तम,तोचं खरा श्रीमंत.असचं म्हटलं जाईल. म्हणूनच सर्वात मोठे धन कोणते?.विचारले तर उतर एकच आहे आरोग्य धन.प्राॅपर्टी,पैसा,समृद्धी,खुप असेल तर,पण ते खाता येत नाहीये,हे सर्वात मोठं दुर्दैव आहे,म्हणून शरीर,आरोग्य हे जपा.म्हणूनच सर्वात मोठे धन आरोग्य धन असते हे कायमस्वरूपी जपून ठेवावे. 
     प्राॅपर्टी,पैसा,समृद्धी,खुप असेल पण चांगले मित्र आणि नातलग नसतील तर त्याची किंमत शून्य असते.मेल्यानंतर ही काही माणस आपल्या शरीराला स्मशानभूमीत नेण्यासाठी आवश्यक असतात.त्यासाठी चांगली माणसं ही जपा.कारण जसे उत्तम शरीराशिवाय,आनंद नाही,तसेच चांगले नातेवाईक,जिवलग मित्र-मैत्रीण शिवाय,जीवनात आनंद नाही.जगताना स्वतःच्या बोलण्यात,इतका सरळपणा व तिखटपणा ठेवा.की,वाईट लोकांना त्याचा ठसका,आणि चांगल्या लोकांना त्याची चवच लागली पाहिजे. प्रत्येकाच्या जीवनात तीन महत्त्वाच्या गोष्टी असतात, "प्रेम, काळजी आणि आदर" पहिल्या दोन तुम्ही दिल्या कि तिसरी तुम्हाला आपोआपच मिळते.कोणतही फुल कधीच दुसऱ्या फुलांशी स्पर्धा करत नाही कारण त्यांना पण माहीत असतं की निसर्गाने प्रत्येकालाच वेगळं बनवलयं,प्रत्येकाला काही तरी सुंदर दिलयं.पाण्यापेक्षा तहान किती आहे याला जास्त किंमत असते. मृत्यू पेक्षा श्वासाला जास्त किंमत असते.या जगात नाते तर सर्वच जोडतात.पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते.मोठ्यामोठ्या शब्दांनी नाते टिकत नसतं तर छोट्या छोट्या भावना समजून घेतल्या तर नातं घट्ट होते
आरश्याची किमंत भलेही हि-यापेक्षा कमी असेल, पण लाखभर हि-याचे घातलेले दागिने पाहायचे तर शंभर रुपयांचा आरसाच लागतो. शब्द देवुन "आस" निर्माण करण्यापेक्षा,साथ देवुन "विश्वास" निर्माण करा,म्हणूनच माणसांनी माणसांना धीर देण सुद्धा अत्यावश्यक असते.ते अतिआवश्यक सेवेतच मोडते.वेळेचे महत्व लक्षात घेऊन प्रत्येक माणसांनी वागले पाहिजे.वेळ निघून गेल्यावर हात जोडून पाया पडले तरी त्यांची भरपाई होऊ शकत नाही.
  जगात भीती पेक्षा मोठा कोणताही व्हायरस नाही आणि हिंमतीपेक्षा मोठी कोणतीच लस जगाच्या प्रयोग शाळेत तयार झाली नाही.प्राॅपर्टी,पैसा,समृद्धी,खुप असेल तेव्हा आपल्या चेहऱ्यावरील डाग कोणी सत्य सांगणार नाही.त्यासाठी आरसाचं लागतो.तो जे आहे तेच आपल्या चेह-यावरील "डाग" दाखवतो. त्यावेळी राग येवून आपण आरसा नाही फोडला पाहिजे.तर चेहऱ्यावरील तो डाग साफ केला पाहिजे.अहंकारी लोक नेहमी सत्य दाखविणार आरसाच बदली करतात.स्वतच्या चेहऱ्यावरील डाग,आणि आचरणातील नकारत्मक विचार घालवत नाही.म्हणूनच ते कायम दुखी दिसतात.इतरांना हसत चेहऱ्याने पाहिले की त्यांना त्याचे दुखाच वाटते.
      प्राॅपर्टी,पैसा,समृद्धी असलेले लोक देवाला खूप घाबरतात.ते मंदिरात कायम देव शोधात असतात.मंदिरात दान दक्षिणा सढळ हस्ते देत असतात. दु:खी गरजू माणसांत त्यांना कधीच देव दिसत नाही. देव हा शब्द आहे,जो तुम्हाला पुस्तकात मिळेल.देव मूर्ती आहे,जी तुम्हाला मंदिरात मिळेल.देव माणूस आहे,जो तुम्हाला समाजात मिळेल.पण देव जीवनात आहे,तो तुमच्या आत मिळेल.निसर्गाने खूप काही चमत्कारी बनवून ठेवले त्याचा लाभ घेता आला पाहिजे.निसर्गाने हवेची निर्मिती केली.म्हणूनच हवेची पण गंमत पहांना,चाकातून गेली की,चाक पळत नाही. डोक्यात गेली की,चांगल-वाईट कळत नाही. आणि शरीरातून श्वासोच्छवास सोडून गेली की,घरात कोणी चार तासापेक्षा जास्त ठेवत नाही.त्यावेळी तुमच्या प्राॅपर्टी,पैसा,समृद्धीला काहीच किंमत राहत नाही.म्हणूनच आरोग्याची योग्य वेळी काळजी घ्यावी कारण तेच सर्वात मोठे धन आहे.
         माणसांनी माणसांना धीर देण अतिआवश्यक सेवेतच मोडते. सकारत्मक विचाराने कायम वागले पाहिजे.नकारत्मक विचाराने वागल्यास कायम नुकसान होते.माचीसच्या काडीला डोकं असतं पण मेंदू नसतो,म्हणून थोड्या घर्षणाने ती पेटून उठते. आणि स्वतःच जळते.परंतु,आपल्याजवळ तर डोकं आहे आणि मेंदू सुद्धा आहे.मग आपण का लहानसहान गोष्टीने नकारत्मक विचाराने पेटून उठतो.सकारत्मक विचाराने शांत रहा.निरोगी व स्वस्थ रहा.घर्षण करून पेटविणाऱ्यां पासून सावध रहा.आपण जगण्यासाठी आहोत जळण्यासाठी नाही.जीवन खुप सुंदर आहे ते आनंदाने जगा.इतरांना जगवा त्यामुळे आपल्या मृत्यूनंतर ही आपले नांव निघेल.त्यालाच लोक कुशल कर्म,कुशल पुण्य आणि सामाजिक बांधिलकी ठेवणारी व्यक्ती म्हणून नोंद घेतली जाते.त्यासाठी सर्वात मोठे धन सांबाळून ठेवा.आणि इतरांना ही सांबाळून ठेवण्यास सांगा.
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडूप मुंबई.

आजचा भारतीय बेईमान स्वार्थी उच्चशिक्षित उच्चपदस्थ अधिकारी.

 आजचा भारतीय बेईमान स्वार्थी उच्चशिक्षित उच्चपदस्थ अधिकारी.



         १५ ऑगस्ट २०२२ ला आपला महान भारत देशाचा ७५ वर्षाचा झाला.त्याचा स्वातंत्र्य दिवस म्हणजे अमृत महोत्सव साजरा झाला.आजचे सुशिक्षित निरक्षर हे कालच्या अशिक्षित साक्षर पेक्षा श्रेष्ठ ठरले आहेत. देशभक्तीच्या नांवावर धंदा करणारे राजकीय व्यापारी जात दांडगे धन दांडगे यशस्वी झाले आहेत.घरा घरावर राष्ट्रीय ध्वज लावून त्यांनी त्याचा सन्मान करण्या ऐवजी अपमान केला.यांची खंत आजच्या उच्चशिक्षित लोकांना वाटत नाही.पदावर असतांना अनेक उच्चपदस्थ प्रशासकीय अधिकारी समोर घडणाऱ्या चुकीच्या गोष्टी निष्क्रियपणे पहात बसतात.तेव्हा ते कर्त्यव्यदक्षता दाखवत नाही. नंतर मात्र पदत्याग करताना किंवा निवृत्तीनंतर "हे असे व्हायला हवे होते" असे मत प्रकट करून आपण किती हुशार दिड शहाणे आहोत हे बेशरमपणे प्रचार प्रसार माध्यमांना सांगतात.  त्यामुळेच भारतीय बेईमान स्वार्थी उच्चशिक्षित उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची शिखंडीची औलाद निर्माण होत आहे.(शिखंडी चा अर्थ कृपया समजून घ्यावा अर्जुनाच्या गांxxत एवढी मर्दानगी नव्हती कि तो भीष्मार्यावर धनुष्यबाण चालून जमीनवर झोपविल,त्यासाठी  श्रीकृष्णांनी भीष्माचार्या समोर शिखंडी उभा करून भीष्माचार्यांवर धनुष्य बाणाचा वर्षा केला.हेच महाभारत सांगते.) भारतात असे उच्चशिक्षण घेऊन उच्चपदस्थ काबीज करणारी फौज आज नागरिक आणि मोदीच्या मध्ये उभी आहे.जी शिखंडीची भूमिका घेऊन उभी आहे. नागरिकांशी व देशाशी उघड उघड बेईमानी करीत आहे.कारण अशा बेईमान अधिकारी वर्गाला निवृत्तीनंतरचे लाभार्थी व्हावयाचे असते. एकूणच असे प्रशासकीय अधिकारी आणि केंद्र सरकार यांना देशातील सामान्य जनतेच्या प्रश्नांपेक्षा आपली सत्ता टिकवण्यासाठी अशा पद्धतीने स्वत:चा स्वार्थ साधणे जास्त महत्त्वाचे वाटते.म्हणूनच त्यांची आजचा भारतीय बेईमान स्वार्थी उच्चशिक्षित उच्चपदस्थ अधिकारी अशी नोंद इतिहास झाल्या शिवाय राहणार नाही.
     १९४७ साली भारत स्वतंत्र झाला.त्यावेळेस भारताचा साक्षरता दर १३ टक्के होता.याचा अर्थ भारतात ८७ टक्के जनता अशिक्षित होती.आज सन २०२२ आला भारताचा साक्षरता दर ८४ टक्के झाला.म्हणजे कागदावर देश सुशिक्षित झाला.वरील दोन गोष्टी भारतीय जनतेचे डोळे उघडणाऱ्या आहेत.आत्मपरीक्षण करायला लावणाऱ्या आहेत.स्वातंत्र्य पुर्व काळात ८७ टक्के जनता निरक्षर असतांना ती जनता ब्रिटिशांनी केलेल्या अत्याचाराच्या विरोधात पेटून उठली आणि प्रचंड संघर्ष केला.त्यामुळेच भ्रष्ट अत्याचारी ब्रिटिशांना देश सोडून पळून जाण्याशिवाय पर्याय राहिला नाही.स्वातंत्र्या नंतर त्यांनी शासन निवडताना देशाचे भले करणारे नेतृत्व निवडून दिले.त्यांनी भ्रष्टाचार करणाऱ्यांना सत्तेतून बाजूला ठेवले.हळूहळू देश साक्षर होऊ लागला.जसजसा देश साक्षर झाला धर्मांधता वाढू लागली. जातीयवाद वाढू लागला.आर्थिक गुलामगिरी वाढू लागली.जन कल्याणाचे काम करणारे नेतृत्व जनता नाकारु लागली.भ्रष्टाचारी,दलबदलू,गुंड,कोणताही अनुभव नसलेले राजपुत्र, दारू,जुगार,ठेकेदार,कमिशन एजंट यांना सामाजिक प्रतिष्ठा जनता देऊ लागली.तेच देशद्रोही आज देशभक्त बनून देशाची राष्ट्रीय संपती विकत आहे. अशा वेळी आजचा भारतीय बेईमान स्वार्थी उच्चशिक्षित उच्चपदस्थ अधिकारी शिखंडी बनून उभा आहे.
     आज माझा भारत देश भ्रष्टाचारी,गुंड,तस्कर,जातांध नेतृत्वांच्या विळख्यात सापडला आहे.उच्च साक्षर लोक देखील मतदान विकताना दिसतात.आम्ही नाही घेतले तर कुणी तरी आमच्या नावावरचे खाणार असे समाधान व्यक्त करून आनंदाने भ्रष्टाचार करणाऱ्यांचे भागीदार होतात व निवडून देतात.काही उच्च साक्षर तर मतदानाचा दिवस म्हणजे सार्वजनिक सुट्टीत मज्जा करण्याचा दिवस समजतात.उच्च साक्षर नोकरी निमित्त बाहेर जातात.दोन दोन ठिकाणी नाव नोंदवतात आणि दोन ठिकाणी एकाच वेळेस मतदान करतात.जर भारताचा साक्षरता दर ८४ टक्के झाला हे सत्य आहे तर, भारताचा सुशिक्षित होण्याचा दर ढासाळला असेच खेदाने लिहावे लागेल.स्वातंत्र्य पुर्व काळातील जनता ८७ टक्के निरक्षर होती पण सुशिक्षित संस्कारित होती. आता ८४ टक्के जनता साक्षर झाली पण सुशिक्षित आणि संस्कारित नाही तर बेईमानी, भ्रष्टाचारी होण्याचा दर वाढवणारी आहे.
      शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे जो पिईल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.हे आजच्या भारतीय बेईमान स्वार्थी उच्चशिक्षित उच्चपदस्थ अधिकारी वर्गाने खोटे ठरवले आहे.आजचे शिक्षण माणसाला आर्थिक श्रीमंत ‌व वैचारिक गुलाम करु शकते असेच खेदाने लिहावे लागते.आपल्या देशाच्या हितासाठीमतदारसंघाच्या हितासाठी,वार्डाच्या हितासाठी स्वच्छ, चारित्र्यवान उमेदवार आपण निवडून देऊ शकत नाही ही शोकांतिका आहे.हेच प्रथम मान्य करावे लागेल.त्यामुळेच आजचा भारतीय बेईमान स्वार्थी उच्चशिक्षित उच्चपदस्थ अधिकारी देशद्रोही ठरला आहे.कारण अशा गुन्हेगार वृत्तीच्या चरित्र हीन लोकांना उमेदवारी अर्ज भरताच आला नाही पाहिजे.हे काम हे नामर्द अधिकारी करत नाही.म्हणून हे गुंड याच अधिकारी वर्गाच्या डोक्यावर बसून त्यांना जे हवे ते त्या पद्धतीने दुष्कृत्य करतात.
      कृषिप्रधान भारतीय नागरिकांनी आत्मपरिक्षण करावे. आपल्या पेक्षा आपले निरक्षर पुर्वज श्रेष्ठ होते.आपण उच्च शिक्षण घेऊन बौध्दिक वेठबिगारी झालो आहोत.देश,गाव, तालुका,राज्य हितासाठी आपण काबाडकष्ट करणारे,देशहित जपणारे,प्रामाणिक नेतृत्व आपण भ्रष्टाचाराच्या संपत्तीच्या लखलखाटात नाकारतो व देशाचे व आपले न भरून येणारे नुकसान करीत आहोत.वाटोळे करतो.आजच्या वर्तमान परिस्थितीचे तटस्थ पणे निरीक्षण करून त्यावर जीव धोक्यात घालून नेहमीच आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण लिहणारा एक तळमळणारा,अराजकीय,धर्मनिरपेक्ष,लोकहीतवादी,लोकशाही रक्षक,संविधान अभ्यासक असंघटीत कामगार,सामान्य भारतीय नागरिक.आजचा भारतीय बेईमान स्वार्थी उच्चशिक्षित उच्चपदस्थ अधिकारी जिथे भेटेल तिथे त्यांच्या कार्य कर्तुत्वाची माहिती त्यांना द्या.
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई.

मनुवादी न्यायव्यवस्था व लाचार उच्चशिक्षित लोकशाहीचा अंत करीत आहेत.

 मनुवादी न्यायव्यवस्था व लाचार उच्चशिक्षित लोकशाहीचा अंत करीत आहेत.



     भारतातील लोकशाही बहुसंख्य हिंदू धर्मातील नागरिक मतदार स्वतःच्या हाताने नष्ट करून पायावर नव्हे तर डोक्यात दगड मारून घेत आहेत.मनुवादी न्यायव्यवस्थेमूळे लाचार उच्चशिक्षित उच्चवर्णीय न्यायमूर्ती लोकशाहीचा अंत करीत आहेत.आणि भारतीय नागरिक हताश पणे त्याकडे पाहत आहेत.अदानी अंबानी नियंत्रणाखाली संपूर्ण देश गेल्यावर  भविष्यात हिंदुनी हिंदू कडून न्याय मागण्याची अपेक्षा कोणीच ठेऊ शकत नाही.एकनाथ शिंदे आणि 39 आमदार पात्र की अपात्र हेच न्यायालयात याचिका दाखल करून निर्णय घेतला जात नसेल तर आजचे महाराष्ट्र राज्य सरकार पात्र कसे काय असु शकते?.
       लोकशाही मार्गाने मतदारसंघातुन निवडून आलेला लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार खासदार तो व्यक्ती म्हणून मतदारांना मत मागत नाही तर एक राजकीय पक्षाची विचारधारा मानणारा सैनिक अनुयायी सभासद म्हणून मत दान करण्याची याचना करतो.आणि नागरिक मतदार व्यक्ती पेक्षा पक्ष मोठा आणि पक्षा पेक्षा विचारधारा मोठी समजून मत दान करतात. त्यामुळेच एक सर्व सामान्य नागरिक पक्षाचा कार्यकर्ता, पदाधिकारी बनतो नंतर चं तो आमदार खासदार बनण्याच्या प्रात्रतेचा असतो.तोच भ्रष्टाचार करून अफाट संपत्ती गोळा करून गुन्हेगार ठरत असेल.तर त्यांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी तो पक्षाचा राजीनामा देऊन बाहेर पडू शकतो. पण पक्ष शिस्त आणि निवडणूक आयोगाच्या नियमानुसार तो बंड करून दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाही. त्याला पक्षांतर कायद्याने बंदी असतांना तो ते करत असेल तर न्यायालय त्यांना अपात्र ठरवून पुन्हा निवडणूक घेऊन निवडून येण्याचा निर्णय देऊ शकतात.पण दुर्दैवाने महाराष्ट्रात असे न होता अपात्र आमदार अधर्माने सरकार स्थापन करून निर्णय घेत आहेत. त्यामुळेच एकनाथ शिंदे सरकार आता 2024 पर्यत निर्धास्तपणे असंवेदनशील, असंविधानिक निर्णय घेत राहील.ही भविष्यात देशातील राजकीय वाटचालीसाठी भयानक परिस्थिती असेल. 
       आर एस एस प्रणित भाजपा व मनुवादी प्रशासकीय अधिकारी यांच्या कटकारस्थाना मुळेच पद्धतशीरपणे सर्व गोष्टी घडवून आणल्या गेल्या,आधी शिवसेना फोडली,मग राज्यपाल हाताशी धरलं,मग चिन्हाचा घोळ,आता डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तीची सुद्धा हिम्मत करीत नाही.यांच्या विरोधात बोलायची.हीच भारतीय लोकशाही मानणाऱ्या जगातील मोठ्या देशाची शोकांतिका म्हणावी लागेल.उच्चशिक्षित न्यायमूर्ती न्याय देण्यासाठी असमर्थ असतील तर त्यांच्या शिक्षणाचा दर्जा कोणत्या मानसिकतेत तयार झाला असेल हे जागतिक पातळीवर चर्चेचा विषय ठरत आहे.सध्याचे चीफ जस्टीस रामन्ना सेवानिवृत्त होणार आहेत.त्यांनी सुनावलेले खडेबोल सदविवेकबुध्दी असणाऱ्यांना नागरिकासाठी झणझणीत अंजन घालणारी आहे.
         आज महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष हा न्यायालात असतांना नवीन नवीन कारणे देऊन पुढे पुढे ढकलल्या जात आहे.म्हणजेच आता कायमचं लांबणीवर जाणार आहे. चित्रपटात दाखवल्या प्रमाणे तारीख पे तारीख होत आहे.मागच्या सुनावणीत CJI ने 25 तारखेला लिस्ट करा असं सांगूनही कारवाई न होणे आश्चर्यजनक आहे.निवडणूक आयोगाच्या कारवाईला कधीपर्यंत स्थगिती.हे पण सांगण्याची हिंमत निवडणूक आयोगाला होत नाही.कायद्याच्या चौकटीत सत्तासंघर्ष बसत नाही कि धर्माला अधर्माची गीता वाचावी लागत आहे.हेच कळत नाही.या परिस्थितीवरून एक स्पष्टपणे दिसते कि न्याय करण्याची पद्धत जात,धर्म,वर्ण आणि पक्ष पाहून ठरविल्या जाते.
         देशात विशिष्ट समाजाबद्ल सतत गरळ ओकणारा आर एस एस प्रणित भाजपचा दलाल पत्रकार अर्णब गोस्वामीसाठी न्यायालय मध्यरात्री सुनावणी घेऊ शकते.अर्णब गोस्वामी हे एक वृत्तनिवेदक आणि भारतीय पत्रकार आहेत. ते रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य संपादक आहेत. रिपब्लिक टीव्हीच्या आधी, गोस्वामी हे २००६ ते २०१६ पर्यंत टाइम्स नाऊ आणि ईटी नाऊचे मुख्य संपादक आणि वृत्त अँकर होते. यापूर्वी त्यांनी एनडीटीव्ही आणि द टेलिग्राफमध्येही काम केले होते.त्याच्यासाठी केंद्र सरकार संपूर्ण झेड सुरक्षा देऊन न्यायालय उघडून देऊन न्याय देऊ शकते.मग आमदारांसाठी वेगळा न्याय का?.
           भारताला प्रचंड संघर्ष करून मिळालेले १५ ऑगस्ट १९४७ सालचे स्वातंत्र्य भीक आहे असं म्हणणाऱ्या सिनेमा सृष्टीत देह प्रदर्शन करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावत साठी देशाचे पट्टी बांधलेले न्यायालय मध्यरात्री उघडते आणि केंद्र सरकार तिला रातोरात झेड सुरक्षा प्रधान करते.म्हणजे ही न्याय देण्याची पद्धत कोणत्या ही देशात नसेल. म्हणूनच लिहावे लागते की मनुवादी न्यायव्यवस्था व लाचार उच्चशिक्षित लोकशाहीचा अंत करीत आहे.
विधानसभा सभागृहात आमदारांना समस्या मांडण्यासाठी निवेदन देता येते.विधानसभेत आपण कोणत्या पक्षाचे आहोत हे सत्य प्रतिज्ञा सादर करावे लागते.किंवा सत्ताधारी पक्षाच्या मुख्यमंत्री व मंत्रीमंडळावर अविश्वास ठराव आणून मतदान घेऊ शकतात.असा न करता राज्यातुन परराज्यात सुरत,गुवाहाटी गोवा पळून जाण्याची गरज नव्हती. तिकडून अर्ज केल्या जातो की विधानसभेच्या उपाध्यक्षांनी आपल्यावर बडतर्फीची कारवाई करू नये.आणि यासाठी विशेष गुवाहाटीत लपून बसलेल्या आमदारांची तक्रार मनलावून काळजीपूर्वक ऐकून घेण्यासाठी देशाचे न्यायालय आठवड्याची हक्काची रविवार सुट्टी असून सुद्धा ऐकून घेते.आणि तेच न्यायालय १४ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्र राज्याला ,देशाला सर्वाधिक महसूल (रेव्हेन्यू) देणाऱ्या प्रगत राज्यातले सरकार अनैतिक मार्गांनी पाडल्याची सुनावणी घ्यायला टाळाटाळ करते.म्हणजेच मनुवादी न्यायव्यवस्था व लाचार उच्चशिक्षित लोकशाहीचा अंत करीत आहेत.आणि आपल्याला अजूनही वाटतं की देशात लोकशाही जिवंत आहे.भारतीय संविधान ज्या महामानवाने लिहून देशाला लोकशाही दिली.तिची कार्यप्रणाली या देशात राबविली ती लोकशाही देशात पद्धतशीर पणे संपविल्या जात आहे.भारतीय नागरिक ते हिंदू असो कि मुसलमान शिख,पारसी,जैन,क्रीचन,इसाई, मागासवर्गीय ओबीसी म्हणजे ५२ टक्के हिंदूच सर्वांनी गांभियाने विचार केला पाहिजे. नक्कीचं विचार करा,नाही तर आपली ताकद विसरून एकदा गुलाम झाले कि आपल्या ताकदीची व संख्येची जाणीव आपल्याला कधीच होणार नाही. त्याचा परिणाम मग२०२४ नंतर देशात निवडणुका घेण्याची गरजच राहणार नाही.हेच अधिकृतरीत्या घोषणा सर्वोच्य न्यायालय केल्याशिवाय राहणार नाही.डायरेक्ट हुकूमशाहीची अधिकृत घोषणा होईल.तेव्हा आपणास भारतीय नागरिक म्हणून विचार करण्याचा आणि न्याय मागण्याची अधिकार राहणार नाही.कृपया ह्याकडे पण लक्ष द्यावे.
सागर रामभाऊ तायडे.९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई.

निर्भीड,निःपक्षपाती न्यायमूर्तीनी योग्य निर्णय घेतल्यास मोदी सरकार बरखास्त होऊ शकते?

 निर्भीड,निःपक्षपाती न्यायमूर्तीनी योग्य निर्णय घेतल्यास मोदी सरकार बरखास्त होऊ शकते?



       मेरा देश महान म्हणता म्हणता आजच्या परिस्थितीत तीन टक्के लोकसंख्या असलेला समाज भारत देश हिंदुराष्ट्र बनण्यासाठी जीवाचा आटा पिटा करतांना दिसत आहे.प्रिंट मिडिया,वृत्तवाहिन्या सर्व त्यांच्या ताब्यात आहेत.८५ टक्के मागासवगीर्य समाज हिंदू म्हणून त्यांच्या सोबत आहे.नव्हे त्यांच्या शब्दाबाहेर जाण्याची कोणाचीच हिंमत नाही.तरी त्यांना भारतीय संविधानाची भिती वाटते.म्हणूनच त्यांना भारताचे संविधान बदली करून मनुवादी मनु संहिता आचरणासाठी हिंदूराष्ट्र पाहिजे.महागाई,बेरोजगारी,भ्रष्टाचार,खाजगीकरण ही देशातील कोणत्याही सुशिक्षित उच्चशिक्षित हिंदूंची समस्या नाही.१३ टक्क्या मधील ५ टक्के आंबेडकरी विचारांचे बौद्ध आणि इतर दिड टक्केवाले पुरोगामी त्यांच्या विरोधात बोलतात किंवा लिहतात.तेच त्यांच्या दुष्टीने देशद्रोही ठरतात.आज देशात बलत्कार करणारा तीन टक्क्यावाल्या समाजाचा आरोपी निर्दोष सुटून त्याचा तीनटक्के  असलेला समाज जाहीर सत्कार करतो.त्या केसचा निर्णय देणारा न्यायमूर्ती जाहीर पणे माफी मागतो.शाळे मध्ये शिक्षण देणारा शिक्षक देशाचे सुजान नागरिक घडविण्याचे प्राथमिक शिक्षण देतो.तोच मठातील पाणी पिले म्हणून विद्यार्थाला बेदम मारतो.त्या शिक्षकाच्या समर्थनात तीन टक्केवाला समाज पुन्हा पुन्हा देशाच्या कायदा सुव्यवस्थेला आव्हान देतो.तरी उच्चशिक्षित उच्चपदस्थ स्पर्धा परीक्षा देऊन आय ए एस,IAS (Indian Administrative Service) भारतीय प्रशासकिय सेवा.आय पी एस IPS  (Indian Police Serviceम्हणजे भारतीय पोलीस सेवा झालेला अधिकारी गुलामा सारखा चूप राहतो.हे जगातील सर्व श्रेष्ठ संविधान असलेल्या लोकशाही देशात घडत आहे.
        अमेरिका देशात निर्भीड,निःपक्षपाती प्रशासकीय यंत्रणा सांबाळणारे अधिकारी असल्यामुळे देशाचा प्रधानमंत्री जन आंदोलन करणाऱ्या देशवासीय समोर गुदगे टेकून माफी मागतो.आपल्या महान भारत देशात शेपन इंच छाती असणारा प्रधानमंत्री महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार,खाजगीकरण विरोधात जन आंदोलन करणाऱ्यांना आंदोलनजीवी देशद्रोही ठरविण्यास यशस्वी होतो. दुर्द्व्याने ते सर्वच बहुसंख्य हिंदू आहेत.आणि  उच्चशिक्षित उच्चपदस्थ स्पर्धा परीक्षा देऊन आय ए एस,आय पी एस झालेला अधिकारी गुलामा सारखा चूप राहतो.
          उच्चशिक्षित उच्चपदस्थ स्पर्धा परीक्षा देऊन आय ए एस,आय पी एस झालेला अधिकारी काय करू शकतो.भारतीय राज्यघटनेतील कलम 21,37,38,39 आणि 300 नुसार,केंद्र सरकार खाजगीकरण करू शकत नाही किंवा खाजगीकरणावर कोणताही कायदा करू शकत नाही. जर सरकारने राज्यघटनेचे उल्लंघन केले आणि खाजगीकरणासाठी मनमानी कायदे केले तर उच्चशिक्षित उच्चपदस्थ स्पर्धा परीक्षा देऊन आय ए एस,आय पी एस अधिकारी सरकारला जाब विचारण्यासाठी विशेष याचिका न्यायालयात दाखल करू शकतात.मग न्यायालय सरकारला जाब विचारु शकते.आणि योग्य निर्णय घेऊन न्याययालय विद्यमान सरकारला दोषी ठरवून शिक्षा करू शकते.खऱ्या अर्थाने राज्यघटनेचे उल्लंघन करणे हा देशद्रोहाचा गुन्हा आहे आणि सदर गुन्ह्यांत जन्मठेपेची तरतूद आहे न्यायालयाने योग्य निर्णय घेतल्यास सरकार बरखास्त करता येते.त्यासाठीच उच्चशिक्षित उच्चपदस्थ स्पर्धा परीक्षा देऊन आय ए एस,आय पी एस झालेला अधिकारी हा मानसिक, वैचारिक गुलाम नसावा तर भारतीय संविधानाच्या चौकटीत कर्तव्यदक्षता दाखवून देणारा अधिकारी वर्ग हवा.तरच ते इतिहासात सुवर्ण अक्षराने त्याच्या नांवाची नोंदणी करून जगात प्रेरणादायी अधिकारी होऊ शकतात. असी कर्तव्यदक्षता दाखवून देणारे अनेक अधिकारी देशात झाले आहेत.
    जागरूक वाचकांनो,संविधान सभेमध्ये सविस्तर चर्चा झाली की देशात खाजगी क्षेत्र निर्माण व्हावे की सार्वजनिक क्षेत्र,सरकारी क्षेत्र. यावर मात करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्र म्हणजेच सरकारी क्षेत्र तयार केले पाहिजे. हे संविधान सभेने हे मान्य केले होते. हे उच्चशिक्षित उच्चपदस्थ स्पर्धा परीक्षा देऊन आय ए एस,आय पी एस झालेल्या अधिकारी वर्गाने वाचले पाहिजे.त्यांनी ते वाचले नसेल असे वाटत नाही.आणि वाचले असले तरी ते वैचारिक गुलाम म्हणून सोयीस्करपणे विसरतात किंवा त्याकडे दुर्लक्ष करता. 
          विधानसभा आणि राज्यघटनेतील कलम 37,38,39 केवळ सरकारी क्षेत्राला प्रोत्साहन देत नाही तर असे कोणतेही धोरण बनवण्यासही मनाई करते.व खाजगीकरणाला प्रोत्साहन देऊ नये, हे राज्यघटनेत नमूद करण्यात आले आहे की कोणतेही सरकार असे धोरण अंमलात आणू शकत नाही.जेणेकरून देशाचा बहुतांश पैसा, मालमत्ता,संपत्ती काही निवडक धनदांडगे लोकांच्या हातात जाऊ नये यासाठी राज्यघटनेत 42 वी घटनादुरुस्ती  करण्यात आली ज्याला माननीय सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. ज्यामध्ये असे म्हटले होते की विषमता दूर करण्यासाठी खासगीकरणाऐवजी सरकारी क्षेत्राला प्रोत्साहन दिले पाहिजे.एवढेच नव्हे, तर इंदिरा साहनीच्या निर्णयातही, माननीय सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेच्या या कलमांना व्यापक जनहितासाठी पूर्णपणे योग्य मानले आहेकाही उद्योगपतींना याचा लाभ मिळू नये म्हणून घटनेने खाजगीकरणाला मनाई केली आहे.जेथे आज केंद्रातील मोदी सरकार सरकारी क्षेत्र खाजगी उद्योगपतीना विकत आहे. आणि अशा परिस्थितीत परदेशी कंपन्या भारतीय कंपन्यांबरोबर भारतीय संपत्ती खरेदी करून ते देशाला गुलामही बनवू शकतात.त्यामुळे घटनेच्या कलम 300 चे देखील उल्लंघन केले जात आहे आणि हे देखील स्पष्ट झाले आहे की,जागतिक बँकेच्या अनेक अहवालांमध्ये की खाजगीकरण देशात विषमता पसरवते, खाजगी उद्योगांतील नोकरदारांना कामाचा पूर्ण मोबदला मिळणार नाही आणि खाजगी नोकरदाराकडून जास्तीचे काम करून घेतले जाईल आणि खाजगी व सरकारी कर्मचारी यांना पेन्शन आणि आरोग्या सारख्या अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागेल व पेन्शन, भविष्य निर्वाह निधी आणि वैद्यकीय आरोग्य सुविधा आणि विमा इत्यादी शासकीय क्षेत्रांमध्ये कामाचे ठराविक आठ तास आहेत तर खाजगी क्षेत्रात वेठबिगारी. अर्थात गुलामाप्रमाणे जबरीने श्रम करावे लागतील.हे होत असतांना बारा राष्ट्रीय ट्रेड युनियन पोटतिडकीने संघर्ष करतांना दिसत नाही आणि उच्चशिक्षित उच्चपदस्थ स्पर्धा परीक्षा देऊन आय ए एस,आय पी एस झालेला अधिकारी गुंगा,बहिरा आंधळा झालेला आहे.त्यांनी घेतलेली देशसेवेची प्रतिज्ञा तो पूर्णपणे विसरला आहे.
          राज्यघटनेने जबरदस्तीने काम करण्यास मनाई केली आहे, तर खाजगीकरणामुळे 1947 पूर्वी देशात सुरू असलेल्या सक्तीची कामगार व्यवस्था म्हणजे गुलामगिरी,वेटबिगारी  पुन्हा सुरू होईल.जेव्हा संसाधनांचा तुटवडा होता,त्यावेळी सरकारी क्षेत्राचा विकास करण्यासाठी सत्तेवर असलेल्या सरकारची जबाबदारी असते त्या त्या क्षेत्राचा विकास करणे. आज देशात सर्व काही असूनही,सरकारी क्षेत्रे खाजगी हातात का विकली जात आहेत.हे सांगण्यास केंद्र सरकार असमर्थ आहे.केंद्र सरकार कोणत्या ही ध्येय धोरणा बाबत जाहीर पत्रकार परिषद घेऊन पत्रकारा समोरा समोर बोलण्याची हिंमत करीत नाही.सरकार उघडपणे देशाच्या राज्यघटनेचे उल्लंघन करत आहे आणि आम जनतेच्या जीवनाशी म्हणजेच बहुसंख्य हिंदूंच्या जीवनाशी खेळत आहे. आणि उच्चशिक्षित उच्चपदस्थ स्पर्धा परीक्षा देऊन आय ए एस,आय पी एस झालेले अधिकारी षंडा सारखे बघत आहेत. करिता माझी सर्व उच्चशिक्षित उच्चपदस्थ स्पर्धा परीक्षा देऊन आय ए एस,आय पी एस झालेल्या अधिकारी वर्गाना नम्र विनंती आहे.या सरकारला आपल्या संविधानाने दिलेल्या अधिकाराचा उपयोग करून या सरकारला लगाम घातला पाहिजे.तर भविष्यात देश सुरक्षित राहील. तुमची मुलमुली सुरक्षित राहती.बहुसंख्य हिंदू सुरक्षित राहतील.विचार करा निर्भीड, निःपक्षपाती न्यायमूर्तीनी योग्य निर्णय घेतल्यास मोदी सरकार बरखास्त होऊ शकते की नाही?.
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई.

भिमसैनिक असते तर प्रबुद्ध भारत दैनिक असते.

 भिमसैनिक असते तर प्रबुद्ध भारत दैनिक असते.


डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ३१ जानेवारी १९२० ला पाक्षिक मूकनायक सुरु केले होते त्याचा १०२ वा वर्धापनदिन ३१ जानेवारी २०२२ ला आहे त्यानिमित्ताने हा विशेष लेख देत आहे वाचकांनी तो वाचून निर्भीड,निपक्ष प्रतिक्रिया व्यक्त कराव्यात ही सुरवातलाच अपेक्षा करतो.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजन समाजात जागृती निर्माण करण्यासाठी अनेक वृत्तपत्रे व पाक्षिकांचे प्रकाशन आणि संपादन केले. त्यांना या वृत्तपत्र-पाक्षिकांनी बहुजन चळवळीला पुढे नेण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. खरे तर डॉ.बाबासाहेब आंबेडकरच बहुजन पत्रकारितेचे आधार स्तंभ आहेत. ते बहुजन समाजाचे पाक्षिकाचे प्रथम संपादक,संस्थापक व प्रकाशक आहेत, त्यांच्या द्वारा संपादित वृत्तपत्र आजच्या पत्रकारितेसाठी एक मानदण्ड आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर द्वारा निघालेले वृत्तपत्र-पाक्षिकांची नावे वेळोवेळी बदललेल्या परिस्थितीनुसार नांव दिली आहेत. पाक्षिक मूकनायक म्हणजे न बोलणाऱ्यांना बोलण्याची संधी व नेतृत्वाची सुवर्ण संधी,बोलणारे लिहणारे आणि लढणारे झाले तेव्हा त्यांनी नांव दिले जनता,त्याचा बहुजन समजात समानता असावी म्हणून नांव दिले समता,जेव्हा हाच बहुजन समाज बहिष्कृत होता तेव्हा त्यांनी नांव दिले बहिष्कृत भारत.आणि बहिष्कृत भारतातून जेव्हा आम्ही बाहेर आलो तेव्हा प्रबुद्ध भारत.
प्रबुद्ध भारत हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सुरू केलेले शेवटचे वृत्तपत्र होते. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली तेव्हा पाच कोटी लोक होते असे म्हणतात. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर हे पाक्षिक बंद पडले.बुद्ध धम्माची दीक्षा घेतल्यामुळे समाजात प्रचंड बदल झाला असावा.कारण महार समाजाचे लोक भिमसैनिक झाले असावे.लाखो करोडो भिमसैनिक असल्यामुळे पाक्षिक प्रबुद्ध भारत दैनिक प्रबुद्ध भारत झाले पाहिजे होते.बाळासाहेब ठाकरेचे (बाळ सैनिक) शिवसैनिक आहेत म्हणून सामना दैनिक आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे भिमसैनिक असते तर प्रबुद्ध भारत दैनिक असते.
११ एप्रिल २०१७ रोजी महात्मा ज्योतिबा फुले जयंतीचे औचित्य साधीत बाबासाहेबांचे नातू प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी प्रबुद्ध भारत हे पाक्षिक नव्या स्वरूपात पुन्हा प्रकाशित करण्याचे जाहिर केले व १० मे २०१७ रोजी याचा पहिला अंक प्रकाशित झाला.तो आज पर्यंत त्यांच्या पक्ष संघटनेचे मुखपत्र झाला आहे.भारिप बहुजन महासंघ ते वंचित भक्तांच्या पलीकडे तो भिमसैनिकाचा पाक्षिक (दैनिक) होऊ शकला नाही. 
आंबेडकरी चळवळीत बातम्या देणारे पेपर खूप आहेत.त्यांना आपण शुद्ध मराठीत वृत्त देणारे पत्र म्हणजे वृतपत्र म्हणतो.पण बहुजन समाजाची योग्य दखल घेऊन त्यावर वैचारिक लढा उभारून सडेतोड उतर देणारे एकही दैनिक नाही.रोखठोक, निर्भीडपणे, निपक्षपाती लिहणे अपेक्षित असते. चुकीचे वागणाऱ्या नेत्यांना त्यांची भूमिका कशी वैचारिक पातळीवर चुकीची आहे.हे सांगण्याचे काम वैचारिक पातळीवर संपादक बुद्धीजीवी विचारवंतानी केलेच पाहिजे.ते होत नसल्यामुळेच आंबेडकरी चळवळीत संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष जन्म येत आहेत.त्याकारणाने चळवळ व समाज दिशाहीन झाला आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, "कोणतीही चळवळ यशस्वी करण्यासाठी त्या चळवळीचे वर्तमानपत्र असावे लागते. ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसते, तीची अवस्था पंख तूटलेल्या पक्षाप्रमाणे होते." हे वाक्य वापरून ज्यांनी ज्यांनी पत्रकारिता केली, त्यांचे क्रांतिकारी विचारांची चळवळ उभी करणे हे उदिष्ट कधीच नव्हते. त्यांनी शब्दात शहाणपण, विचारात निष्ठा,वर्तनात चारित्र्य या ब्रिदवाक्यनुसार चळवळीतील कार्यकर्ते,नेते याची दररोज चे जगण्याची साधन आणि पद्धत जवळून तपासली पाहिजेत. समाजातील असे कार्यकर्ते नेते कोणती चळवळ चालविणार आणि मग त्यांना कोणत्या चळवळीला यशस्वी होण्यासाठी तिला वर्तमानपत्राची आवश्यकता लागेल.ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसेल तिची अवस्था पंख तुटलेल्या पक्षाप्रमाणे होते.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वाक्य सांगून फक्त वैचारिक लेख प्रसिद्ध करीत राहिलो.तर क्रांतिकारी विचारांची अंमलबजावणी कोणी करावी?. कधी करावी?. कशी करावी?. हेच ठरत नसल्यामुळे आंबेडकरी विचारांची क्रांतिकारी चळवळ मात्र आज ही पंख तुटलेल्या पक्षा प्रमाणे होती त्यापेक्षा दिशाहीन झाली आहे. म्हणूनच शिस्तबद्ध भिमसैनिकांचा दैनिक हवा आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या मूकनायक १०२ व्या वर्धापनदिना निमित्य हार्दिक शुभेच्छा देताना अपेक्षा लाखो वाचक करतात.
आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करणारे अनेक लेख मी लिहले त्यामुळे मी ज्या असंघटीत कष्टकरी कामगारांच्या न्याय,हक्क व प्रतिष्ठे साठी झटणारी सत्यशोधक कामगार संघटनाचे काम करतो.ते लोक कसे जगतात,त्यांना रोजीरोटीसाठी काय काय करावे लागते.याचा कोणीच विचार करीत नाही.तरी हाच असंघटीत कष्टकरी समाज आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते,नेत्या सोबत अन्याय अत्याचार आणि पुतळा विटंबना झाल्या नंतर कोणत्याही आंदोलनात सर्वात पुढे असतो.तोच खरी चळवळ पुढे आणि मागे नेतो.त्याला  शिस्तबद्ध भिमसैनिक म्हणून उभे केल्यास अनेक समस्या चुटकीसरशी सुटतील आणि भिमसैनिकांचे प्रबुद्ध भारत दैनिक चळवळीला योग्य दिशा दाखवून योग्य दिशेला घेऊन जाणार त्यासाठी इच्छाशक्ती हवी,तीच बुद्धीजीवी विचारवंतानी दाखविली पाहिजे. असे मला वाटते.लाखो करोडो भिमसैनिक अनुयायी,भक्त,शिष्य आहेत.पण शिस्त नसेल तर काय कामाचे?.क्रांतिकारी आंबेडकरी विचार मान्य असणाऱ्यांनी गांभीर्याने विचार करावा,चर्चा, संवाद,मैत्रीभावना जागृत करावी आणि सकारत्मक विचारांची उर्जा असेल तर संपर्क करावा. जागरूक वाचकांना पाक्षिक मूकनायक १०२ व्या वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
आपला 
सागर रामभाऊ तायडे,भांडूप-मुंबई -९९२०४०३८५९.  

बहुजन समाजाला दिशा दाखविणारा आमचा अभिमान

 बहुजन समाजाला दिशा दाखविणारा आमचा अभिमान 



      जगात अशी एक न दिसणारी वस्तू असते.पण तिचा सुगंध लपत नाही लोक तिचा नाकाने शोध घेतात. अश्या सुगंधाने लोक एकत्र येऊन वातावरण बदलू शकतात.  सत्य,अहिंसा आणि निष्ठा या तत्वाचे आचरण करणारा सायं दैनिक आमचा अभिमान या नावाचा अर्थ कधी समजून घेतला नाही.बहुजन शब्दाचा अर्थ बहुसंख्य होतो.तर आमचा अभिमानचा अर्थ कोणाला सांगता येत नाही. म्हणजे आमचा अभिमान काय असेल तर अन्याय अत्याचाराला वाचा फोडून समाजाला सत्य, अहिंसा आणि निष्ठा या तत्वाने योग्य दिशेला घेऊन जाणारा मार्गदाता असलेला  सायं दैनिक आमचा अभिमान असेल. असा हा सायं दैनिक आमचा अभिमान घटना जशी बातमी तशी हे ब्रीदवाक्य घेऊन बहुजनाच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मुखपत्र सतरा वर्षाचे झाले आहे. आणि अठराव्या वर्षात प्रदार्पण करीत आहे.त्याच्या वर्धापनदिनला शुभेच्छा देतांना आनंद होत आहे.
       देशात आणि राज्यात बहुसंख्य वृत्तपत्र आहेत.आंबेडकरी चळवळीत बातम्या देणारे पेपर खूप कमी आहेत.त्यांना आपण शुद्ध मराठीत वृत्त देणारे पत्र म्हणजे वृतपत्र म्हणतो. पण बहुजन समाजाची योग्य दखल घेऊन दिशाहीन बहुजन समाजाला दिशा दाखविणारा सायं दैनिक आमचा अभिमान एक पत्र नव्हे तर एक सत्य चित्र दाखवणार आरसा वाटतो.आरसा कधी खोटे बोलत नाही.म्हणूनच घटना जशी बातमी तशी या तत्वानुसार दैनिक खोट कधी लिहत नाही असा शंभर टक्के सर्व सामान्य जनतेचा विश्वास असतो. गेल्या सतरा वर्षात सायं दैनिक आमचा अभिमानने बहुजन समाजाच्या मनात विश्वास निर्माण केला आहे.सोशल मिडीयाच्या जलद प्रचार प्रसारावर हे नेटद्वारे पीडीएफ (pdf) च्या माध्यमातून वाचकांच्या पसंतीला उतरला आहे.हे मी का सांगू अथवा लिहू शकतो, कारण माझे नियमितपणे सायं दैनिक आमचा अभिमान मध्ये लेख व मी पाठविलेल्या मित्रांचे लेख व बातम्या प्रसिद्ध होत असतात.त्यामुळे अनेक वाचकांच्या प्रतिकीर्या नियमितपणे मिळतात आणि त्यांनी मला त्यांच्या वाट्साप ग्रुपवर घेतल्यामुळे मैत्रीभावना वाढली आहे.
     दैनिक काढण्यासाठी निर्भीडपणे लिहण्यासाठी बौद्धिक ताकद आणि आर्थिकबल खर्च करण्यास खूप हिंमत लागते. दैनिक सुरु करणे म्हणजे एखाद्या कामधंदा सुुरु करण्याचे साधे काम नाही.एक उद्दिष्ट ध्येय डोळ्यासमोर ठेऊन वृतपत्र काढण्याचे धाडस माननीय संस्थापक राजेंद्रकुमार बाबुराव होळकर यांनी केले.त्यांचे आणि संपादकीय मंडळांचे सर्वांनी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन केले पाहिजे.
     वृत्तपत्र चालविण्यासाठी वेळोवेळी राजकीय पक्षाशी साटे लोटे करावे लागते. तेव्हा त्यांच्या कडून जाहिराती मिळतात. वृत्तपत्र केवळ जाहिराती वरच चालतात. त्याशिवाय कोणतेही दैनिक चालूच शकत नाही.पण सायं दैनिक आमचा अभिमान बहुजन समाजातील चळवळीतील प्रामाणिक वाचकांच्या बळावर सत्य, अहिंसा आणि निष्ठा या तत्वाने गेली सतरा वर्ष चालू आहे. बहुजन समाजाच्या चळवळीतील कायम किर्याशील कामामुळे व अनुभवामुळे त्यांनी प्रेरणादायी टीम उभी केली ती कायमस्वरूपी यशस्वी झाल्या शिवाय राहणार नाही.अमजद खान उपसंपादक,सय्यद फेरोजअली उपसंपादक, दादासाहेब कसबे विशेष प्रतिनिधी,  भागवत देशपांडे,महादेव गित्ते,एम देशमुख, किशोर निकाळजे,किसन भदरगे, अनिल वैरागे ही नांवे वाचली तरी बहुजन समाजाची पत्रकारिता क्षेत्रातील वैचारिक वारसा सांगणारी आमचा अभिमान दाखवणारी प्रेरणादायी टीम दिसते.त्यांच्या विचारांचे सत्य,अहिंसा आणि निष्ठा या तत्वाचे प्रतिबिंब दररोजच्या सायं दैनिक आमचा अभिमान मध्ये वाचायला पाहायला मिळते.
     त्यांचा मला व्यक्तिगत आनंद होत आहे.कारण मी आणि माझी असंघटित कामगारांच्या न्याय हक्क,प्रतिष्ठीसाठी लढणारी "सत्यशोधक कामगार संघटना" पार परदेशात पोचली,आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांची ट्रेड युनियन स्वतंत्र मजदूर युनियन (इंडिपेंडन्ट लेबर युनियन ILU) च्या माध्यमातून संघटीत व असंघटीत कामगारा पर्यंत सायं दैनिक आमचा अभिमान पोचला आहे. 
दिशाहीन समाजाला दिशा दाखविणारा सायं दैनिक आमचा अभिमान बहुजन मिशनचा कॅडर बेस कार्यकर्ता,नेता आहे,चळवळीतील कार्यकर्ते,नेते आणि समाज याची दररोज वैचारिक भूक भागवितांना,त्यांच्या जनसंघर्षला ठळक प्रसिद्धी देण्याचे काम सायं दैनिक आमचा अभिमान करीत आहे.चळवळीला यशस्वी होण्यासाठी तिला वर्तमानपत्राची आवश्यकता असते. ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसेल तिची अवस्था पंख तुटलेल्या पक्षाप्रमाणे होते.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या या वाक्यचा वापर करून गेली काही वर्ष काही वृत्तपत्र धंदा करीत आहेत. नालायकाला "नालायक" आणि मूर्खाला "मूर्ख" म्हणून सत्य मांडण्याची हिंमत जर बुद्धिजीवी संपादकात नसेल तर ते वृत्तपत्र केवळ धंदाच करणार, रोखठोक भूमिका घेण्याची शक्ती नसल्यामुळे बहुजन समाजाची क्रांतिकारी महापुरुषांच्या विचारांची आंबेडकरी चळवळ मात्र आज ही पंख तुटलेल्या पक्षा प्रमाणे आहे,नव्हे त्यापेक्षा ही दिशाहीन झाली आहे. म्हणून बहुजन समाजाला दिशा दाखविणारा सत्य,अहिंसा आणि निष्ठा या तत्वाचे आचरण करणारा सायं दैनिक आमचा अभिमान बहुजन चळवळीतील बुद्धिजीवी,साहित्यिक,जागरूक वाचक,अनुयायांना मार्गदर्शक वाटतो,सायं दैनिक आमचा अभिमान अठराव्या वर्षात प्रवेश करीत आहे,त्यांच्या त्या संघर्षाला मानाचा जयभिम,आणि वर्धापनदिना निमित्य वाचकांना हार्दिक शुभेच्छा.
      आज पर्यत आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करणारे अनेक लेख मी लिहले, त्याला  सायं दैनिक आमचा अभिमान यांनी विशेष दखल घेऊन प्रसिद्धी दिली.त्याचा मला व्यक्तिगत खूप आनंद होत आहे. कारण तो मला होणारा आनंद कोणत्याही यंत्राने मोजता येत नाही.सायं दैनिक आमचा अभिमान मराठवाडा प्रदेशातील बीड सारख्या ग्रामीण भागातून निघते आणि मी मुंबईत राहतो.तरी जागरूक वाचकांची संध्याकाळी पाच वाजताच प्रतिकिया मिळते.म्हणजे विचारांचे नेटवर्क वाट्साप सुपरफास्ट असते.माजलगांवचे धडाडीचे कार्यकर्ते अनिल साळवे,अंबाजोगाई विश्वनाथ कांबळे मानव मित्र हे कायमस्वरूपी जागरूक वाचक अनेक ग्रुपवर पीडीएफ टाकून मोकळे होतात.त्याचा बरोबर सायं दैनिक आमचा अभिमान संपादक माननीय राजेंद्रकुमार बाबुराव होळकर वाट्साप वर नियमितपणे संपर्कात असतात. मी रात्री त्यांचे आभार मानून अभिनंदन करतो. म्हणूनच बहुजन समाजाला दिशा दाखविणारा आमचा अभिमान हा सतरा वर्ष पुर्ण करून अठराव्या वर्षात पदार्पण करीत आहे त्यानिमित्ताने माननीय संपादक सर्व संपादकीय मंडळांतील सहकारी आणि जागरूक वाचकांना वर्धापनदिना निमित्ताने हार्दिक शुभेच्छा.आणि मनपूर्वक हार्दिक अभिनंदन.पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
आपला जागरूक वाचक आणि स्तंभ लेखक 
सागर रामभाऊ तायडे,भांडूप-मुंबई -९९२०४०३८५९

Who you are,makes a difference. तुझ्या असण्यामुळे (माझे) आयुष्य बदलले आहे.

 Who you are,makes a difference. 

तुझ्या असण्यामुळे (माझे) आयुष्य बदलले आहे.



          न्यूयॉर्क शहरातल्या एका शिक्षिकेने वर्षाच्या शेवटी तिच्या वर्गातल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या शर्टावर 'पिंक रिबन' चा बो लावला. त्या रिबनवर लिहिले होते Who you are,makes a difference. तुझ्या असण्यामुळे (माझे) आयुष्य बदलले आहे.प्रत्येक विद्यार्थ्याला संदेश वाचून खूप आनंद झाला.''वा,माझ्यामुळे टीचरच्या आयुष्यात फरक पडला आहे.'' पण नुसते एवढेच करून ती शिक्षिका थांबली नाही. तिने प्रत्येक विद्यार्थ्याला अजून तीन रिबन दिल्या व सांगितले, ''तुमच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या व्यक्तींना धन्यवाद द्या व त्यांच्या कपड्यावर ही पिंक रिबन लावा.'' एका विद्यार्थ्याने शेजारच्या घरात राहणार्‍या एका तरुणाच्या शर्टावर ''थँक यू, तुझ्यामुळे माझे आयुष्य बदलले आहे म्हणून मी तुला ही पिंक रिबन लावतो'' असे म्हणत रिबन लावली. तो शेजारी एका ऑफिसमध्ये ज्युनियर कर्मचारी होता. त्याने त्या विद्यार्थ्याला अभ्यासात मदत केल्यामुळे विद्यार्थ्याला परीक्षेत अव्वल नंबर मिळाला होता.
          विद्यार्थ्याने उरलेल्या दोन रिबन त्याला दाखवत विचारले, ''आम्ही शाळेसाठी एक प्रोजेक्ट करतो आहोत. तुझ्या आयुष्यात ज्या माणसामुळे चांगला बदल झाला आहे त्यांना ही रिबन लावशील का?'' कर्मचारी लगेच तयार झाला. दुसर्‍या दिवशी त्याने आपल्या बॉसपाशी जाऊन ''थँक यू You made a difference in my life" असे म्हणत पिंक रिबनचा बो लावला. बॉस अत्यंत हुशार होता, कंपनी त्याच्यामुळे चालली होती; पण तो खडूस म्हणूनही प्रसिद्ध होता. तरीही कर्मचार्‍याने बो लावल्यावर बॉसच्या डोळ्यात टचकन पाणी आले. तो म्हणाला, ''माझ्यामुळे तुझ्या आयुष्यात बदल झालाय? तुझ्यासाठी मी इतका महत्त्वाचा आहे हे मला माहीतच नव्हते. थॅक्यू.'' कर्मचार्‍याने त्याला विचारले, ''ही कल्पना माझी नाही. हे एका शाळेतले प्रोजेक्ट आहे. आयुष्यात बदल करणार्‍या लोकांना धन्यवाद देऊन त्यांना हा पिंक रिबनचा बो लावायचा. तुम्हाला आवडेल असे करायला?'' बॉस एकदम म्हणाला, ''हो नक्की आवडेल. आहे तुझ्याकडे अजून एखादा बो?'' कर्मचार्‍याने आपल्याकडचा उरलेला बो बॉसला दिला.बॉस घरी गेला. त्याने आपल्या मुलाला बोलावले . मुलाच्या शर्टावर पिंक रिबनचा बो लावत तो म्हणाला, ''मी कामामुळे उशिरा घरी येतो, घरी आल्यावर माझी चिडचिड होते, मी तुझ्याशी प्रेमाने बोलतही नाही, मी आजवर तुला कधी हे सांगितले नाही, पण तू जसा आहेस तसाच रहा. तुझे असणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. Who you are, makes a difference in my life" मुलगा ढसाढसा रडायला लागला. तो म्हणाला, ''डॅड , मला वाटायचे की तुला मी अजिबात आवडत नाही. मी तुला कधीच खूश करू शकणार नाही म्हणून आज रात्री मी आत्महत्या करणार होतोही बघ, मी तुला व आईला चिठ्ठी लिहून ठेवली होती. पण ही रिबन लावलीस आणि माझं आयुष्य बदलवलेस डॅड.''बॉसने चिठ्ठी वाचली. त्याने आपल्या मुलाला घट्ट पोटाशी धरले. दोघेही एकमेकांच्या मिठीत आनंदाचे अश्रू ढाळत होते. त्या एका रिबनमुळे मुलाला बाबा व आयुष्य दोन्ही मिळाले होते आणि बापालाही मुलगा मिळाला होता.
      आई मुलांविषयीचे प्रेम सहज व्यक्त करू शकते.मुलेही आईशी मोकळेपणाने बोलू शकतात.आईला ते जन्मजात कसब असते. कारण स्त्री ही क्षणाची पत्नी व अनंतकाळची माता असते.पण पुरुष हा क्षणाचा पिता असतो, पण म्हणून त्यांचे महत्त्व मुलाच्या आयुष्यात कमी नसते. उलट अनेक मुले वडिलांच्या नजरेतही आपण कोणीतरी असावे यासाठी आयुष्यभर झटतात,पण काही वडिलांना त्याबद्दल काहीच वाटत नसते. मुलांकडे पूर्णत: दुर्लक्ष करत हे पुरुष कामात मग्न रहातात.म्हणतात की, Any man can be a Father but it takes someone special to be a Dad.कोणीही पुरुष बाप सहज बनू शकतो,पण बाबा होणे काहींनाच जमते.चांगला पालक होणे ही प्रवृत्ती आहे. असिधारा व्रत आहे. त्यासाठी शिक्षण,जात,धर्म यांपैकी कशाचीही जरूर नसते. फक्त इच्छा असावी लागते.सदर पोस्ट आवडल्यास ही  "पिंक रिबन" इतरांनाही पाठवा कदाचित त्यांच्यामुळे तुमचं आयुष्य बदलले असेल."जेवणात जर कोणी विष कालवले तर त्यावर उपचार आहे, परंतु मनामध्ये जर कोणी विष भरवले तर त्यावर कोणताच उपचार नाही."पिंक रिबन"अप्रतिम आयुष्य बिघडवायला वेळ लागत नाही पण घडवायला आत्मविश्वास लागतो मन मोठं असावं लागतं.
संकलन - सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई.

भारतीय संविधानातील कामगारांचे अधिकार व अंमलबजावणीचे वास्तव

 भारतीय संविधानातील कामगारांचे अधिकार व अंमलबजावणीचे वास्तव



         जगातील कामगारांनो एक व्हा म्हणणारे कम्युनिस्ट मार्क्सवादी,जाती धर्माच्या नावावर होणाऱ्या शोषणाच्या विरोध बोलत नाही,गांधीवादी,गोळवलकरवादी यांना कामगार दिसत नाही. त्यांना शूद्र समाज वाटतो म्हणूनच ते मागासवर्गीय ओबीसी,आदिवासी अल्पसंख्याक समाजाला कामगार म्हणून "समान न्याय समान वेतन" मिळावे असे त्यांना वाटत नाही. तरी बहुसंख्य कामगार विशेष शूद्र समाजाचे कामगार,कर्मचारी अधिकारी त्यांच्या संघटनेचे सभासद होऊन त्यांच्या उच्चवर्णीय नेतृत्वाखाली मुकाटपणे काम करतात.म्हणूनच भारतीय संविधानातील कामगारांचे अधिकार असून ही त्यांची अंमलबजावणी होत नाही. हे आजचे भारतीय कामगार चळवळीचे वास्तव आहे.
      महात्मा ज्योतिबा फुले,रावबहादूर नारायण मेंघाजी लोखंडे यांनी संघटित असंघटित कामगारांना मानसन्मान मिळवून दिला,त्यांची कामगार चळवळ तिला भारतीय संविधानात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी न्याय हक्क व अधिकार मिळवूण दिला.कामगार कायदे बनविले. आणि तेव्हाच त्यांनी धोक्याची सूचना दिली होती. ते म्हणजे कामगार वर्गाचे दोन दुष्मन एक भांडवलशाही दुसरी ब्राह्मणशाही हे कामगार विसरले म्हणून मोठ्या प्रमाणात सरकारी सार्वजनिक उद्योग धंद्याचे खासगीकरण होत असतांना कम्युनिस्ट मार्क्सवादी,समाजवादी,गांधीवादी,गोळवलकरवादी विचारांच्या राष्ट्रीय ट्रेंड युनियन पोटतिडकीने लढतांना दिसत नाही.संघर्षाचे दोन मार्ग असतात. एकतर सनदशीर मार्गाने दुसरे रस्त्यावर उतरून तीव्र जन आंदोलने आवश्यक असतांना गांभीर्याने कोणीच लढतांना दिसत नाही. त्यात संघटित असंघटित कामगारांची संख्या मोठी असतांना भारतीय संविधानातील कामगारांचे अधिकार त्यांना मिळत नाही.आणि अंमलबजावणी होत नसल्यामुळे कामगार भरडल्या जात आहेत हे वास्तव कोणी नाकारू शकत नाही.
        देशातील विविध क्षेत्रातील कामगारांवर सरकारने सुलतानी कायदे लादले आहेत. कष्टकरी कामगारांच्या श्रमाची किंमत कमी केली आणि अन्न धान्याची किंमत वाढवली त्यामुळेच एका भाकरीचे अनेक तुकडे केले जेणेकरून कष्टकरी कामगारांना पोटभर जेवण मिळु नये किंवा तो सतत अडचणीत राहिला पाहिजे.म्हणजे तो बंड करून उठण्याची हिंमत करणार नाही. हे आर एस एस प्रणित मोदी सरकारने ठरविले आहे. त्याची अंमलबजावणी राज्य सरकार ला करावीच लागेल.सर्व प्रथम एक लक्षात घ्या कामगार कर्मचारी अधिकारी मित्रांनो सरकार कुठल्याही पक्षाचे असो गोरगरिबांना कधीही न्याय मिळणार नाही.अशी ब्राम्हणी प्रशासकीय व्यवस्था मोक्याच्या ठिकाणी बसलेली आहे. म्हणूनच भारतीय संविधानातील कामगारांचे अधिकार व अंमलबजावणीचे वास्तव संघटित असंघटित कामगारांना दिसते पण कळत नाही.कारण भारतीय संविधानातील कामगारांचे अधिकार व अंमलबजावणी करणाऱ्याचे नेतृत्व उच्चवर्णीयांच्या हाती आहे.हे वास्तव स्वीकारले पाहिजे. 
    शेतकरी हा शेतकरीच असतो त्याला जात,धर्म,प्रांत राज्य नसते.पण अलीकडे शेतकरी हा जात,धर्माच्या आणि पक्षाच्या चौकटीत अटकलेला दिसतो.मग त्यामुळेच त्याच्या आंदोलनला जात,धर्म आणि पक्षाचे लेबर लागते.दिल्लीच्या सीमेवर शेतकरी जवळपास एक वर्षे आंदोलन करीत होते,त्यांची संविधानाच्या चौकटीत नोंद घेतल्या गेली नाही. मनुवादी विचारांच्या केंद्र सरकारने आणि त्यांच्या प्रशासकीय व्यवस्थेने त्यांना देशद्रोही,अतिरेकी ठरविले.त्यांना भारतीय संविधानिक सर्वोच्य न्याय व्यवस्था म्हणजेच न्यायालयाने न्याय देण्यास असमर्थता दाखविली. म्हणजेच न्यायव्यवस्था अपंग होऊन हॉस्पिटल मध्ये विकलांग व्यवस्थेत खाटीवर पडली होती.आणि आज ही आहे. ती भारतीय संविधानाच्या चौकटीत न्याय देत नाही तर मनुवादी वर्ण व्यवस्थेनुसार न्याय देतांना दिसत आहे.भारतीय संविधानातील कामगारांचे अधिकार व अंमलबजावणीचे वास्तव संघटित असंघटित कामगार भरडल्या जातात.
        बहुजन हिताय बहुजन सुखाय ब्रीदवाक्य असलेले एस टी महामंडळ.एसटी कर्मचारी पाच महिन्या पासून आंदोलन करीत होते. त्यांना न्याय का मिळाला नाही?.कम्युनिस्ट मार्क्सवादी,समाजवादी,गांधीवादी,गोळवलकरवादी विचारांच्या मान्यताप्राप्त राष्ट्रीय ट्रेंड युनियननी या बाबत ठोस भूमिका का घेतली.भारतीय संविधानातील कामगारांचे अधिकार व अंमलबजावणीचे वास्तव एस टी कामगार भरडल्या गेला.कारण कामगारांचे नेतृत्व कामगार संघटनांनी ट्रेड युनियन यांनी केले पाहिजे असते.ज्यांचा कामगार चळवळीशी संबध नाही असे लोक कामगारांचे नेतृत्व करणार असतील तर त्यांचे उदिष्ट कामगारांना न्याय मिळवून देणे नसतेच तर खरेदी,विक्री करणे हेच असते.हे कामगारांनी लेक्षात ठेवले पाहिजे.म्हणून राजकारणी लोक कामगारांचे नेतृत्व करायला लागले तर सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्यासाठी विरोधीपक्ष महत्वाची भूमिका बजावत असते.त्यांचे एकच उदिष्ट असते मी पुन्हा येईल.त्यात संघटित असंघटित कामगार भरडल्या जातात?.भारतीय संविधानातील कामगारांचे अधिकार असूनही त्यांची अंमलबजावणी होत नाही,होऊ दिला जात नाही.हे आज चे वास्तव आहे. 
       कम्युनिस्ट मार्क्सवादी,समाजवादी,गांधीवादी,गोळवलकरवादी विचारांच्या राष्ट्रीय ट्रेंड युनियन शा कर्मचारी,बालवाडी कर्मचारी,अंगणवाडी सेविका,मदतनीस यांच्या करिता गेली अनेक वर्षे देशभरात आंदोलन करीत असतात.अजून पर्यंत त्यांना न्याय का मिळाला नाही.यांच्या विचारांच्या पक्षाचे आमदार,खासदार सभागृहात आवाज का उचलत नाही. कारण विषमतावादी विचारांच्या नेतृत्वाला समतावादी विचारांची न्याय व्यवस्था कशी चालेल?. म्हणूनच मनुवादी वर्णव्यवस्था भारतीय संविधानातील कामगारांचे अधिकार व त्यांची अंमलबजावणी होऊ न देता त्यांना कामगारांना मरू ही देत नाही आणि जगू ही देत नाही.
        बहुजन समाजाचे म्हणजेच बहुसंख्य कामगारांचे मुलमुली सरकारी शाळा महाविद्यालयात शिकत होती.जिल्हापरिषद शाळेच्या शिक्षकांना वेगवेगळी कामे लावली शाळेचे अनुदान कमी केले.परिणामी जिल्हापरिषद शाळा बंद करण्याचे नियोजन करण्यात आले.तर दुसरीकडे जात दांडगे,धन दांडगे आमदार,खासदारांना विना अनुदान शाळा महाविद्यालय काढण्यासाठी विशेष जागा,पाणी,लाईट देऊन शिक्षणाचे व्यापारीकरण करुन ठेवले. त्यामुळेच विध्यार्थी त्यांचे पालक आणि शिक्षक हे विना अनुदान दिल्या शिवाय शिक्षण व नोकरी करू शकत नाहीत. त्यामुळेच विना नुदानीत शिक्षक गेली अनेक वर्षे  सरकारच्या दारात आंदोलन करीतआहेत.त्यांना न्याय का मिळाला  नाही. कारण सरकार हे त्याच संस्था संचालक संस्थापक अध्यक्ष आमदार खासदारांचे आहे.ते काल विरोधी पक्षात होते,आज सत्ताधारी पक्षात आहेत.आज सत्ताधारी असले तरी येत्या पाच वर्षांनी विरोधी पक्षात असतील.त्यांना काहीच फरक पडणार नाही.कम्युनिस्ट मार्क्सवादी,समाजवादी,गांधीवादी,गोळवलकरवादी विचारांच्या मान्यताप्राप्त राष्ट्रीय ट्रेंड युनियनच्या या बाबत ठोस भूमिका कधीच का घेत नाहीत.कारण कामगारांचे नेतृत्व कामगार कार्यकर्त्यांनी नेत्यांनी संघटनांनी ट्रेड युनियन यांनी केले पाहिजे,कामगारांचे नेतृत्व करणारा कार्यकर्ता नेता हा प्रशिक्षण घेतलेला प्रशिक्षित असला पाहिये,हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते.राजकीय नेत्यांनी कामगारांचे नेतृत्व केले तर खरेदी विक्री होते आणि संघटित असंघटित कर्मचारी म्हणून भरडल्या जातात?. हे भारतीय संविधानातील कामगारांचे अधिकार व अंमलबजावणीचे वास्तव हे स्पष्टपणे दिसत आहे.
        देशभरातील बहुजन समाजाचे कामगार म्हणजेच मागासवर्गीय ओबीसी,एस सी,एस टी,व्ही जे एन टी,आदिवासी,अल्पसंख्याक समाजाचे कामगार गोरगरीब कष्टकरी असंघटीत लोक गेली अनेक वर्षे कम्युनिस्ट मार्क्सवादी,समाजवादी,गांधीवादी,गोळवलकरवादी विचारांच्या मान्यताप्राप्त राष्ट्रीय ट्रेंड युनियनच्या नेतृत्वाखाली आंदोलने करीत आहेत.पण न्याय का मिळत नाही.कामगार,कर्मचारी अधिकारी तसेच विद्यार्थ्यांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागते.परंतु लवकर न्याय मिळत नाही.असंघटीत कष्टकरी कामगारंना न्याय हक्का व प्रतिष्ठा मिळविण्यासाठी आंदोलन करावेच लागते.कारण मागितल्याने मिळत नाही आणि संघर्षा शिवाय पर्याय नाही.यात तिळमात्र शंका नाही, उतावळेपणाणे आंदोलन करता येत नाही कारण ते हानिकारक असु शकते.कामगारांनी सकारत्मक विचारांची उर्जा कमी होऊ देऊ नये. परंतु लक्षात घ्या "अतिघाई संकटात नेई" असे होता कामा नये. असंघटीत कष्टकरी कामगारंना न्याय हक्का व प्रतिष्ठा मिळविण्यासाठी त्यांना त्यांच्या प्रश्नाची जाणीव करून द्यावी लागेल.डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात "गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल." उठसूट बाबासाहेबाच्या नावाचा जयजयकार करणारेच कम्युनिस्ट मार्क्सवादी,समाजवादी,गांधीवादी,गोळवलकरवादी विचारांच्या मान्यताप्राप्त राष्ट्रीय ट्रेंड युनियन मध्ये जास्त संख्येने दिसतात. आणि घरात नगरात जयजयकार करतात आणि कामाच्या ठिकाणी आंबेडकरी विचारांच्या शत्रुना आर्थिकदृष्ट्या वर्गणी,देणगी देऊन मोठे करतात. ही खूप मोठी खेदाची गोष्ट आहे.म्हणूनच भारतीय संविधानातील कामगारांचे अधिकार व अंमलबजावणीचे वास्तव लक्षात न घेतल्यामुळे संघटित असंघटित कामगार भरडल्या जातात?.
      देशभरातील बहुजन समाजाचे कामगार म्हणजेच मागासवर्गीय ओबीसी,एस सी,एस टी,व्ही जे एन टी,आदिवासी,अल्पसंख्याक समाजाचे कामगार,कर्मचारी अधिकारी यांनी आदरणीय जे.एस पाटील यांच्या त्यागी अभ्यासू कुशल नेतृत्वाखाली चालणाऱ्या क्रांतिकारी आंबेडकरी विचारांच्या स्वतंत्र मजदूर युनियन (Independent Labour Union - ILU ) राष्ट्रीय ट्रेड युनियन मध्ये सभासद म्हणून सहभागी होऊन मान्यताप्राप्त झाले पाहिजे. तरच भारतीय संविधानातील कामगारांचे अधिकार व त्यांची प्रभावी अंमलबजावणी झाल्या शिवाय राहणार नाही. हे वास्तव संघटित असंघटित कामगारांनी स्वीकारले पाहिजे.
सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९,
अध्यक्ष स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य

गोष्ट सासूच्या अज्ञानाची आणि सुनेच्या विज्ञानाची

 गोष्ट सासूच्या अज्ञानाची आणि सुनेच्या विज्ञानाची 



      मुलाच नवीन नवीन लग्न होत.नवी सून घरात आली. दोन तीन दिवस गेल्यावर सासू सुनेला विचारते तू सगळ्यात जास्त कुणाला मानतेस?सूनेन उत्तर दिल आईला.एक जीने मला जन्म दिला.आणि दुसरी तुम्ही.सासू असलात तरी मला आई समानच आहात.हे उत्तर ऐकून सासू खूप खूष होते. आपल्याला खूप चांगली आणि हुशार सून मिळाली असे तीला वाटते.पुढे सासू सुनेला बोलते हे बघ तुला किनई आणखी एका आईला मानाव लागेल. आपल्या कुळ देवीला.आपण उद्या जायच दर्शनाला. दोघी दुस-या दिवशी जातात देवळात. जाताना एका गाईच वासरु गाईच दूध पिताना दिसत. सून सासूला बोलते आई थोड थांबा,मी बालदी आणून दूध काढते. सासू कप्पाळावर हात मारते आणि म्हणते अरे देवा मी जीला हुशार समजत होते ती माझी सून मूर्ख आहे,ठार वेडी आहे.मी फसले.सासू सूनेवर ओरडते, अग इतकही कळत नाही तुला की ही गाय आणि वासरु दगडाची आहे.त्या दोघी पुढ जातात,सासू पुढ,सून माग माग चाललेल्या असतात.पुढ काही आंतरावर गेल्यावर सून अचानक सासूला माग ओढत.आई पुढ नका जाऊ,तो सिंहं तुम्हाला खाईल.सासून पुन्हा कप्पाळाला हात लावला.अग तो दगडाचा सिंह मला कसा खाईल.सासू वैतागत सूनेला देवळात नेते आणि म्हणते ही आपली कुळ देवी. हात जोड आणि माग हवे ते.सून सासूला विचारते माझ्यासाठीच मागू कि तुमच्या साठी पण? सासू बोलते तुझ्या मनाला वाटेल ते मनापासून माग.सून विचारते दागिने मागू?. सासू बोलते नको.तसल काही मागायच नसत.मग पैसे मागू ? सासू बोलते नको, तसल काही मागायच नसत.मग कपडे? नको ग तसल काही मागायच नसते.
     आई मग मला कि नई खूप भूक लागली आहे,चांगली पंचपक्वानांनी भरलेली दोन ताट मागू?.सासू चिडते आणि म्हणते तस काही मागायच नसत ग.बघ मी तुला सांगते ते माग. सासू सुनेला सांगते आणि सून देवीजवळ ते मागते. आणि मांडी घालून खाली बसते.सासूला वाटते सून देवीला बसून प्रार्थना करते,सासू थोडावेळ उभी राहून वाट बघते सून आता उठेल, आता उठेल.पण सून बसूनच राहीली.सासू विचारते, काय ग का बसलीस अशी इतका वेळ..? तर सून म्हणते,तुम्हाला नातवाच तोंड बघायचय ना?.देवीजवळ मागितलय ना आत्ता आपण.मी वाट बघतेय देवी कधी देतेय याची.
       आता सासू भांभावून गेली आणि सूनेवर खेकसली.तू इतकी मूर्ख असशील अस वाटल नव्हत,माझ्या लेकाच नशीब फुटक.आसली येडी त्याच्या पदरात पडली.कसं होईल माझ्या लेकाच..? सासू रडवेली झाली. त्यात सून विचारते आई माझ काही चुकल का..? सासू आणखी चवताळते आणि बोलते,नाही माझच चुकलं,काय गं काल तर एकदम शहाण्या सारख उत्तर दिलस आणि आज अशी मूर्खासारखी का वागतेस..? 
    दगडाची गाय वासरु पाहून दूध काढायला जातेस, अग दगडाची गाय कधी दूध देते काय..?दगडी सिंहं पाहून घाबरलीस, दगडाचा सिंहं माणसाला काही करु शकतो का..? सांग. इतकही कस कळत नाही तुला..?.सून बोलते आई दगडाची गाय दूध देत नाही, दगडाचा सिंहं माणसाला काहीच करु शकत नाही. मग दगडाची देवी कसं काय आपण मागितलेल देईल..?
    आजोबा पणजोबा पासून रीतीरिवाज परंपरा ने आजवर हे दगडच आपल्याला सगळ काही देतात अस आपण मानत आलो.पण आई आपण कष्ट करतो तेंव्हाच धन संप्पत्ती मिळते. अन्न मिळत. हवा सर्वत्र भरलेली आहे पण ती आपण नाकानं आत ओढण्याच कष्ट करतो म्हणून जगतो, ती हवाही आपोआप फुफ्फुसात जात नाही. या दगडांना पायाखाली धरुन आकार दिला माणसान. ज्याला माणूस घडवतो तो माणसाला काय देऊ शकतो. गाडगे बाबा म्हणतात देवळात देव नसतो. देवळात असते पुजा-याचे पोट. गणपतीच वाहन उंदीर आपण दगडी उंदराला पुजतो, पण घरातल्या उंदरांना विष घालून मारतो. नाग शंकराच्या गळ्यात असतो म्हणून आपण मातीचा नाग पूजतो. पण खरा नाग दिसला तर मारुन टाकतो.खंडोबा म्हणजे कुत्रा,दत्ताचा आवडता कुत्रा, दिसला की हाड हाड, दगडांचा मार. आजून किती काळ हे निरुपयोगी माती धोंड्याचे देव पुजायचे..?. कुठला असा देव आहे तो आज भुकेलेल्याला जेवण आणि तहानलेल्याला पाणी देईल. शेतकरी पाणी नाही म्हणून आत्महत्या करतात. का तिथ पाऊस पडत नाही. देवळात बलात्कार होतात,बाँम्बस्फोट होतात, चो-या होतात,चांदीचे,सोन्याचे देवाचे डोळे चोर काढून नेतात. म्हणून गाडगे बाबा म्हणतात आरे, जो त्याच्या पुढ्तल्या जेवणावर बसणारा कावळा पिटाळू शकत नाही तो तुमच्या जीवनातल दुः खा दैन्य काय दूर करणार..? ब्राम्हणांनी स्वत:चं पोट जाळण्यासाठी अनेक थोतांडे तुमच्या डोक्यात भरली..! तुम्हाला मानसिक गुलाम केले..!.यातलं उघड सत्य स्वीकारायला माणूस तयार नाही आणि शिडीला तिरूपतीला पायी जातो.पंढरपूरला पायी चालतो,परंतू चोख्याला विठ्ठलाच्या पायरी खाली कां पुरले याचा विचार करत नाही, तुकाराम महाराजांचे तुकडे करून पाण्यात बुडवून मारले हे विसरून जातो..!.बुद्धीची देवता गणपतीची दिड दिवसापासून दहा दिवस मनोभावो पूजा अर्चा उपास,नवस करून हजारो रुपये खर्च करून विज्ञानाच्या तत्वज्ञाने बनविलेली यंत्रणा वापरतात. तेव्हा माणूस मेंदूची,पैशाची आणि वेळेची बरबादी करतो..!! अज्ञान अंधश्रद्धा सर्व श्रेष्ठ ठरविल्या जाते.विज्ञानाला हार मानवी लागते.स्मार्ट मोबाईल,गुगल नेटवर्क वापरून ही विज्ञान कळत नसेल तर?.कधी कळेल विज्ञान..?.कधी जळेल अज्ञान..?. आजच्या सासूला असे विचारणारी सुशिक्षित सून मिळाली पाहिजे.माफ करा वाचकांनो त्यात सून विचारते आई माझ काही चुकल का..? हे बरोबर आहे ना ???.
   संकलन:- सागर रामभाऊ तायडे,9920403859,भांडुप,मुंबई.