शुक्रवार, १३ एप्रिल, २०१८

कांशी तेरी नेक कमाई तुने सोती कोम जगाई

कांशी तेरी नेक कमाई तुने सोती कोम जगाई 
भारतीय राजकारणात जातीला आणि त्यांच्या समूहाला जे नांव दिल्या जाते तेच त्याचे हुकमी पत्ते असते.छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वजाती धर्मातून जे तडपदार तरुण गोळा केले त्यांना त्यांनी नांव दिले होते मावळे.हेच मावळे शिवाजी महाराजा च्या नेतृत्वात संघटीत झाले.स्वकियाशी ३२आणि परकीयाशी १२ लढाया लढून त्यांनी रयतेचे राज्य स्थापन करून स्वराज निर्माण केले, महात्मा जोतीराव फुलेंनी सर्व ब्राम्हण सोडून सर्व समाजाला ब्राम्हणेतर म्हणून संघटित केले आणि सत्यशोधक समाज निर्माण केला. देशातील पहिली असंघटीत बांधकाम व गिरणी कामगार संघटना बांधली.त्यांना कामगार म्हणून मान्यता मिळवून रावबहादूर नारायण मेंघाजी लोखंडे सारखा तडपदार वैचारिक संघर्ष करणारा नेता दिला.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मूक नायक समाजाला प्रबुद्ध मानव बनविले आणि सामाजिक,शैक्षणिक,आर्थिक परिवर्तन घडवून राजकीय परिवर्तन घडविण्याची ताकद मागासवर्गीय समाजात निर्माण केली.म्हणूनच देश भरात मागासवर्गीय समाजाचे लोकप्रतिनिधी ग्रामपंचायत ते राष्ट्रपती पर्यंत निवडून जातात. कांशी तेरी नेक कमाई तुने सोती कोम जगाई पण ते गुलामी स्विकारतात त्याला नाईलाज आहे. 
कांशीराम यांचा जन्म १५ मार्च १९३४ ला झाला.मृत्यू ९ ऑक्टोंबर २००६ ते भारतीय राजकारणातील व ​सामाजिक क्षेत्रातील विशेष तदन म्हणून ओळखल्या जात होते.त्यांनी भारतीय वर्ण व्यवस्था मोडून काढण्यासाठी सर्व मागासवर्गीय समाजात प्रचंड प्रबोधन करून जनजागृती केली.बहुजन समाज हि देशात ओळख निर्माण केली राजकीय परिवर्तन केले.दलित शोषित संघर्ष समिती डीएसफोर च्यामुळे उतरभारतात मागासवर्गीय समाजाची ओळख बहुजन समाज झाली. ​१९७१ ला त्यांनी अखिल भारतीय पिछडा और अल्पसंख्याक समुदाय कर्मचारी महासंघ म्हणजे All India Backward and Minority Communities Employees Federation (BAMCEF) १४ एप्रिल १९८४ बहुजन समाज पार्टी BSP ची स्थापना केली.सर्व समस्यांची गुरुकिल्ली हि सत्ता असते सत्ता सर्व कुलुपाची चाबी असते. डॉ बाबासाहेब आंबेडकर ते मायावती व्हाया मान्यवर कांशीराम यांची ही चळवळ १९३२ ते १९८२ प्रबोधन करून संघर्ष करीत संघटित झाली,म्हणूनच २००७ ला उतर प्रदेशात पूर्ण बहुमताने निवडून आली होती आणि देशात एक नवा प्रेरणादायी इतिहास लिहला गेला होता.देशातील पहिला  मागासवर्गीय महिला व देशातील सर्वात मोठ्या राज्याची मुख्यमंत्री बनली.आणि त्याच बरोबर २००७/२००८ यावर्षी २६ करोड रुपये इन्कमटॅक्स भरणारी पहिली एक राजकीय दलित महिला नेता ठरली होती.ते केवळ मान्यवर कांशीराम यांच्या वैचारिक संघटना कौशल्यावर.जी बसपा देशातील बहुजन समाजाला सांगत होती " बाबा तेरा मिशन अदूर बी एस पी करेगी पुरा !." ती बसपा २०१२ च्या विधान सभा आणि लोकसभा निवडणुकीत चारीमुंड्य चीत झाली. त्यामुळे देशातील मागासवर्गीय समाज आपल्या १९३२ च्या परिस्थिती वर आला.ज्या हिंदुत्वाच्या विरोधात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संघर्ष सुरु केला होता त्याच जाग्यावर मायावती येऊन थांबल्या आहेत.कारण मान्यवर कांशीराम यांनी आपल्या जीवनभर चमचा युगाचा धिक्कार केला.सत्ता आल्यावर कसे चमचे तयार होतात त्याचा वापर समाजाला तोडणारे हत्यार म्हणून कसा सारखा होतो हे मायावतीच्या कार्यकाळात दिसून आला.त्यासाठी आपण प्रथम कांशीरामजीची हत्यार आणि चमचा ही मांडणी समजून घेणे जरुरी आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी पुणे करारावर प्रतिकीर्या देताना सांगितले होते कि संयुक्त मतदार संघ म्हणजे एक गलिच्छ उपनगर ज्या नगराचा उमेदवार ठरविण्याचा अधिकार उच्च वर्णीय लोकांना आहे.आणि त्याचा समाजाचा सत्यानाश करण्यासाठी वापर करने म्हणजेच कांशीरामजी च्या शब्दात चमचा.चमचा हा घराघरात वापरल्या जाणारे हत्यार आहे.जे स्वत कोणतेही काम करू शकत नाही.पुणे करारा नंतर राजकारण्यांनी असेच चमचे मागासवर्गीय समाजात अल्पसंख्याक पीडित शोषित आदिवाशी समाजात निर्माण केले.चमचा चा वापर नेहमी आपल्या फायद्या साठीच होतो.त्यामुळे तो कोणाचे नुकसान स्वत करीत नाही कोणाच्या सांगण्या वरून करतो.कांशीराम यांच्या बसपा ची बहुजन हिताय बहुजन सुखाय घोषणा जेव्हा मायावतीने सर्वजण हिताय केली तेव्हा सत्ता आल्यावर चमचा आणि हत्यार कसे वापल्या जाते हे दिसून येते.मायावती सत्ता चालविण्यास,समाजाच्या आणि राज्याच्या हिताचे निर्णय घेण्यास समर्थ आहे.उतर प्रदेशात स्मारक आणि स्वताच्या प्रतिमा लावण्यास राज्य शासनाचा निर्णय असल्या मुळे सुप्रीम कोर्ट भी मायावतीला रोखू शकले नाही.पण मायावतीने राज्यात कांशीराम आणि मायावतीचे पुतळे उभे करण्या पेक्षा बहुजन समाजातील मुलामुलींना शिक्षणा वर भर दिला असता तर आजचे चित्र वेगळे असते.केवळ अनेक विद्यालयाला महाविद्यालयाला महापुरुषाच्या नांवे देऊन वैचरिक समाज क्रांती होत नाही. जिल्ह्याचे नांव सर्व महापुरुष संत महामाताच्या नांवे केले. त्यामुळे मागासवर्गीय समाजात विशेष चमार समाजात काय बदल झाला?.हे कांशीरामजीचे तत्वज्ञान मायावतीने मातीमोल करून ठेवले त्यामुळे चमचा युग काय करू शकते २०१२ च्या निवडणुकीने दाखवून दिले. 
मुझे पढे लिखे लोगोने धोका दिया असे.डॉ बाबासाहेब आंबेडकर खेदाने मत व्यक्त केले होते.पण त्याच पढे लिखे लोकांना संघटीत करून बामसेफ संघटना बनविली आणि त्याच्या कडून पैसा व बुद्धी प्रशासकीय अनुभव समाजास मिळवुन दिला.त्यातूनच त्यांनी डीएस फोर DS4 दलित शोषित समाज संघर्ष समिती द्वारे समाजात जनजागृती केली.त्याची सुरुवात ही सायकलवरून झाली.पुण्याला असताना त्याची एक दिवस इराणी हॉटेल समोर ठेवलेली सायकल चोरी गेली.त्यामुळे खूप कोध्रीत झाले.त्यांनी हॉटेल मालकावर खूप राग काढला तेव्हा मालकाने आपले लोक कामाला लावले तेव्हा ते खूप खुश झाले. कार्यकर्त्याना सांगितले सायकल हि माझ्या साठी एकमात्र साधन आहे.ते केवळ साधनच नाही तर बहुजन मिशनचे सर्वात महत्वाचे साधन आहे.यावरच त्यांनी भारत भर सायकल यात्रा काढली.कांशीराम जी यांनी आपल्या पन्नास वर्षात बहुजन समाजात जनजागृतीसाठी चाळीस दिवसात चार हजार किलोमीटर सायकलवरून यात्रा केली.देशातील नव्हे तर जगातील कोणत्याही समाज सुधारक,राजकिय नेत्याने असे धाडस केलेले नाही.कांशीराम जी यांनी पहिली सायकल यात्रा पेरियार ई व्ही रामास्वामी नायकर यांच्या जयंती दिनी म्हणजे सतरा सप्टेंबर १९८८ ला कन्याकुमारी वरून सुरवात केली.दुसरी कोहिमा ,तिसरी कारगिल,चौथी पुरी,पांचवी पोरबंदर वरून काढली आणि २७ मार्च १९८९ दिल्ली विशाल रैलीत बदल करून बहुजन समाजाची शक्ती दाखवून दिली.  
कांशीराम जी ने रात्र दिवस मेहनत करून वाढविलेली बसपा मायावतीने चमच्या लोकांच्या सल्ल्याने देश भरातील कॅडर बेस कार्यकर्ते संपवले.मायावतीचे सर्व निर्णय अचूक असतील तर चाळीस मंत्री भष्टाचार कसे करतात. आमदार,मंत्रीमंडळ, कैबिनेटचे सर्व निर्णय जर मायावती घेत असतील तर पक्ष संघटनेत चमचे कसे निर्माण होतात. कांशीरामजीने मायावतीवर जो विश्वास दाखविला त्याला तडा गेला आहे.मिशनरी कार्यकर्त्यांना चमचा समजून पक्षातुन बेदखल करून बसपाचे न भरून येणारे नुकसान झाले आहे.काही चमच्यांना त्याच्या समाजाच्या विरोधात उभे केले जाते.तर मिशनरी कार्यकर्त्यांना त्यांच्या समाजाच्या हिता साठी उभे केले जाते.चमचा आपल्या समजतील सच्या नेत्याला कमजोर बनवितो तर मिशनरी कार्यकर्ता आपल्या समाजातील सच्या नेत्याला मजबूत बनवितो.कांशीरामजीची संघटन कौशल्य आणि मायावतीचे संघटन कौशल्य यातील फरक आज प्रत्येक राज्यात दिसून येत आहे.त्यामुळे कांशी तेरी नेक कमाई तुने सोती कोम जगाई या घोषणाचा 
​असर आज कमी झालेला वाटत असला तरी हाच मागासवर्गीय समाज देशभरातील विविध क्षेत्रात सत्तेत भागीदार झालेला आहे तो मान्यवर कांशीराम यांच्यामुळे त्यांना त्यांच्या जयंती दिना निमित्य त्यांच्या क्रांतिकारी विचाराला कोटी कोटी प्रमाण  
सागर रामभाऊ तायडे,भांडूप मुंबई - ९९२०४०३८५९

हाच का सम्राट अशोकाचा भारत?.

हाच का सम्राट अशोकाचा भारत?.

 सम्राट अशोकाला भारताच्या इतिहासात सर्वांत महान सम्राटांचे स्थान दिले आहे. प्राचीन भारताच्या परंपरेत चक्रवर्ती सम्राटांची पदवी ज्यांनी जनमानसावर तसेच भारताच्या मोठ्या भूभागावर राज्य केले अशाच महान सम्राटांना दिली जाते. भारताच्या इतिहासात असे अनेक चक्रवर्ती सम्राट होउन गेले ज्यांचे उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये रामायण,महाभारत इत्यादी आहेत प्राचीन चक्रवर्ती सम्राटांच्या पंक्तीतील अशोक हा शेवटचा चक्रवर्ती सम्राट झाला त्यानंतर कोणीही त्या तोडीचा राज्यकर्ता भारतात झाला नाही.म्हणूनच मान्यवर कांशीराम आपल्या कॅडरबेस कार्यकर्त्यांना नेहमी सांगत होते बहुजन ​समाज पार्टीला सम्राट अशोकाचा भारत निर्माण करायचा आहे.अशोकने भारताच्या बहुतांशी भागावर राज्य केले​.​बसपाला मानणारा बहुसंख्य बहुजन समाज भारताच्या कोण्या कोण्यात बसलेला आहे.उत्तर भारतातील बहुसंख्य ओबीसीनी मुंबईत व नागपुरात धम्मदिक्षा घेतली,ज्यात मौर्य समाजाचे मोठे योगदान आहे,मौर्य समाज हा सम्राट अशोकाच्या रक्ताचा वारसदार आहे असे म्हणतात ​पण तो मोठ्या संख्येने हिंदुत्व मानसिकतेने पछाडलेला होता आणि आहे.उत्तर प्रदेश च्या एका पोटनिवडणुकीत समाजवादी पार्टीचा मागासवर्गीय उमेदवार ?.
लडाक ​,जम्मू, काश्मीर मध्ये बसपाचा आमदार, खासदार निवडून येण्या मागे सम्राट अशोकाचा भारत ही विचारधारा 
होती
.पाकीस्थान,अफगाणीस्तान पूर्वेकडे बांग्लादेश ते दक्षिणेकडील केरळ पर्यंत अशोकाच्या साम्राज्याच्या सीमा होत्या. कलिंगाच्या युद्धातील महासंहारा नंतर कलिंग काबीज झाला, जे कोणत्याही मौर्य राज्यकर्त्यास पूर्वी जमले नव्हते. ते सम्राट अशोकाने करून दाखविले. त्याच्या राज्याचे केंद्रस्थान ज्याला आताचे बिहार म्हणजे तेव्हाचा मगध होता, बिहारची राजधानी पाटणा म्हणून ओळखली जाणारी तेव्हाची पाटीलपुत्र ही त्याची राजधानी होती.याचे एतिहासिक पुरावे आज पटना शहरात पाहण्यास मिळतात.कलिंगाच्या युद्धात  झालेल्या प्रचंड मनुष्य हानी पाहून सम्राट अशोकाने हिंसेचा त्याग केला व बौद्ध धर्माचा स्वीकार केला व नंतरच्या आयुष्यात त्याने स्वतःला बौध्द धम्मचा प्रचार आणि प्रसार करण्या करिता समर्पित केले अशोकाच्या काळातील अशोकाच्या संदर्भातील अनेक शिलालेख भारताच्या काना कोपर्‍यात सापडतात त्यामुळे अशोकाबाबतची उपलब्ध ऐतिहासिक माहिती भारताच्या प्राचीन काळातल्या कोणत्याही ऐतिहासिक व्यक्तीपेक्षा अधिक आहे.
अशोकाने कलिंगचे युद्ध पार पडल्यानंतर जिकलेल्या रणांगणाची व शहरांची पहाणी करायची ठरवले. त्यावेळेस त्याने फक्त सर्वत्र पडलेले प्रेतांचे ढीग, सडण्याचा दुर्गंध, जळलेली शेती, घरे व मालमत्ता पाहिली. ते पाहून अशोकाचे मन उदास झाले व यासाठीच का मी हे युद्ध जिंकले, व हा विजय नाही तर पराजय आहे, असे म्हणून स्वतःला त्या प्रचंड विनाशाचे कारण मानले. हा पराक्रम आहे की दंगल, व बायका मुले व इतर अबलांचा हत्या कशासाठी व यात कसला प्रराक्रम असे स्वतःलाच प्रश्न विचारले. एका राज्याची श्रीमंती वाढवण्यासाठी दुसर्‍या राज्याचे अस्तित्वच हिरावून घ्यायचे? ह्या विनाशकारी युद्धानंतर शांती,अहिंसा, प्रेम,दया ही मूलभूत तत्त्वे असलेला बौद्ध धम्माचा मार्ग अशोकाने अवलंबायचे ठरवले. त्याने स्वतः बौद्ध धर्माचा प्रसारक म्हणूनही काम करायचे ठरवले. यानंतर अशोकाने केलेले कार्य त्याला इतर कोणत्याही महान सम्राटांपेक्षा वेगळे ठरवतात. ज्यात क्रूरकर्मा राज्यकर्त्याचे महान दयाळू सम्राटात रुपांतर झाले अशीकलिंगाचे युद्ध ही इतिहासातील एक अतिशय वेगळी घटना समजली जाते. बौद्ध धर्माचा जगभर झालेल्या प्रसारास खूप मोठ्या प्रमाणावर अशोकाने केलेले कार्य जबाबदार होते असे बहुतेक इतिहासकार मानतात.तरी उत्तर भारतातील मागासवर्गीय ओबीसी बौद्ध धम्मा​कडे न जाता स्वतःला जास्तच सवर्ण समजत होते.जेव्हा अन्याय अत्याचार आणि भीषण हत्याकांड झाली तेव्हाच त्यांना आपण कोण आहोत आणि आपले पूर्वज कोण होते यांची आठवण होते.त्यांनी लोकसंख्येच्या बळावर राजकीय परिवर्तन घडविणे अपेक्षित असते.मान्यवर कांशीराम यांनी बौद्धधम्माची दिक्षा जाहीर पणे घेतली असती तर उत्तर भारत सम्राट अशोकाचा भारत झाला असता.त्यांची चूक उत्तर भारतातील ओबीसी नी सुधारली आता मायावतीने कोणाचा आदर्श घ्यावा हे ठरविले पाहिजे. किती दिवस आर एस एस प्रणित भाजपा​ला धर्मपरिवर्तनाच्या धमक्या देणार?.आणि राजकारण करणार करीत राहणार?.सम्राट अशोकाचा भारत बौद्धमय करण्यासाठी मागासवर्गीय ओबीसी तयार आहे हे देशातील धम्मदिक्षा सोहळ्यावरून दिसत आहे.
इतिहास सांगतो वैशाली (बिहार) येथील अशोक स्तंभ अशोकाच्या ह्या कार्यात त्याला देवीपासून झालेल्या मुलांची मोठी मदत झाली.अशोकाचा मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्रा ह्यांनी भारताबाहेर श्रीलंकेत जाउन तेथील राजाला बौद्ध धम्माची ​शिकवण दिली यामुळे भारतापुरते मर्यादित राहिलेला हा ​धम्म भारताबाहेर पसरण्यास सुरुवात झाली. असे मानतात की अशोकाने बौद्ध धर्मीयांसाठी हजारो स्तूपांची व विहारांची निर्मिती केली. त्यांतील काही स्तूपांचे अवशेष आजही पहावयास मिळतात. यातील मध्यप्रदेशात सांची येथील स्तूप प्रसिद्ध आहे, हा स्तूप अशोकाने बांधला आहे.​
मायावतीने असेच बुद्ध सम्राट अशोक,महात्मा ज्योतिबा फुले,राजर्षी शाहू महाराज डॉ भिमराव बाबासाहेब आंबेडकर यांचा वैचारिक वारसा सांगून ऐतिहासिक वास्तू जिल्हे,विद्यापीठ निर्माण केले पण धम्मदिक्षा घेतली काय?.सम्राट अशोकाने आपल्या कारकिदीतील पुढील वर्षांमध्ये अहिंसा हे राष्ट्रीय धोरण बनवले, जंगलामध्ये चैनीसाठी होणारी प्राण्यांची शिकारीवर बंदी आणली, प्राण्यांवर होणार्‍या कोणत्याही प्रकारची हिंसकतेवर ही बंदी आणली तसेच शाकाहाराला प्रोत्साहन देण्यात आले. शिक्षा मिळालेल्या कैद्यांना अशोकाने सहिष्णूपणे वागवले. गुणी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी अनेक विद्यापीठे तसेच, शेतकर्‍यांसाठी पाण्याचे कालवे बांधले. त्याच्या राज्यात सर्व प्रकारच्या जातीधर्माच्या लोकांना सहिष्णुरीत्या वागवले जाई. तसेच अशोकाने आपले एकेकाळी ज्याच्यांशी युद्धे केली त्यांच्याशीही मैत्रीपूर्ण संबध वाढवले. सम्राट अशोकाने अनेक समाजोपयोगी कार्ये केली.अशोकाने आपल्या कारकीर्दीत राज्यात अनेक रुग्णालये व महामार्गाचे जाळे निर्माण केले, रस्त्यांच्या कडेला वृक्षांची लागवड ही अशोकाचीच कल्पना आहे, असे मानतात. आपण सम्राट असल्याच्या अधिकाराचा फायदा त्याने समाजोपयोगी कार्यासाठी केला. त्यानंतर अशोकाला धम्मअशोक असे म्हणू लागले. अशोकाने धम्माची प्रमुख आचारतत्त्वे विशद केली, अहिंसा, सर्व जातिधर्मांबद्दल सहिष्णुता, वडिलधार्‍या माणसांना मान देणे,संत​,महात्मा​, शिक्षकांना योग्य तो मान देणे, दासांना माणुसकीने वागवणे. अशा आचार तत्त्वांना जगात कोणताही समाज नाकारू शकणार नाही. अशोकाच्या इतिहासकारांनुसार त्याने कलिंगाच्या युद्धानंतर कोणतेही प्रमुख युद्ध छेडले नाही परंतु त्याला शेजारी राष्ट्रांशी ग्रीक राज्ये, चोल साम्राज्ययाच्याशी त्याला नेहमी युद्धाची शक्यता वाटत होती. परंतु अशोकाने पूर्वायुष्यातील केलेल्या मोहिमांमुळे व मगधच्या सामर्थ्यामुळे अशोकने बौद्ध धर्म स्वीकारला तरी त्याच्या शेजारी राज्यांनी त्याला छेडण्याचे साहस केले नाही. तसेच बौद्ध धर्म स्वीकारला, अहिंसा हे राष्ट्रीय धोरण बनवले तरी मगधाचे सैनिकी सामर्थ्य अबाध्य ठेवले. अशोकाला ग्रीक जगताची माहिती होती असे कळते. तसेच चंद्रगुप्त मौर्याने केलेल्या ग्रीकांविरुद्धच्या मोहिमांमुळे मौर्य साम्राज्याची कीर्ती ग्रीस,  इजिप्तपर्यंत पोहोचली होती असे कळते.मग सम्राट अशोकाचा भारत बौद्धमय होण्यास वेळ का लागतो. राजकीय गणिते मांडत राहिल्यास अशोकाचा भारत बौद्धमय होईल काय?. हे देशभरातील भव्य धम्मदिक्षा सोहळे केवळ ढोंग आहेत असे म्हणल्यास चूक ठरणार नाही. आज देशात लोकशाही मार्गाने सत्ता काबीज करून लोकशाहीचा सरळ खून करण्याचे कारस्थान उघड उघड होत आहे.लोकशाहीची सर्व मूल्य पायदळी तुडवून ठोकशाही,हुकूमशाही निर्माण होतांना दिसत आहे.सम्राट अशोक ते छत्रपती शिवाजी,संभाजी महाराज यांना ज्या मनूस्मृती संपविले त्याचं पद्धतीने आज लोकशाही संपत आहे.म्हणूनच विचारावेसे वाटते हाच का सम्राट अशोकाचा भारत?.
 सागर रामभाऊ तायडे भांडुप मुंबई ९९२०४०३८५९.

रामराज्याची सुरवात झाली!.

रामराज्याची सुरवात झाली!.
रामराज्यात शूद्र अतीशुद्रानां,महिलांना शिक्षण घेण्याचा ,ज्ञान व धन,संपत्ती संचय करण्याची बंदी होती.त्यामुळेच शंभूक मारल्या गेला,कारण त्याने शिक्षण व ज्ञान घेतल्यामुळे ब्राह्मणाचा मुलगा मेला होता.म्हणूनच मागासवर्गीय समाजाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता. भारत स्वतंत्र होऊन ७२ वर्ष होत आहेत तरी ग्रामीण भागातील मागासवर्गीय समाजाला स्वतंत्र पणे  जगण्यास मनाई केली जाते.सुवर्ण समाजाने त्यांच्या शेतात काम करण्यास सांगितले असता मागासवर्गीय समाजाच्या तरुणाने विरोध केल्यामुळे आठ दहा सुवर्ण तरुणांनी त्याला केवळ मारहाण केली नाही तर त्यांचे हात पाय मोडून काढले व त्यांची मोबाईल वर शूटिंग करून सोशल मीडियावर शेयर करण्याचे धाडस केले. गुजरात मध्ये एक मागासवर्गीय समाजाच्या तरुणांनी मोलमजुरी करून घोडी विकत घेतली आणि त्यावर तो बसुन गावांत जात होता ते गांवातील सुवर्ण समाजाला सहन झाले नाही त्यांनी त्याला घोडी सह मारून टाकल्याची बातमी सोशल मीडियावर देशभरात फिरत आहे,एकूण देशभरातील मागासवर्गीय समाजावर होणारे अन्याय,अत्याचार हल्ले व हत्याकांड त्यांची कायदेशीर नोंद घेऊन गुन्हे दाखल करणारा 
ऑट्रोसिटी कायदाच रद्द करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला म्हणजेच भारतीय संविधाना नुसार मागासवर्गीय समाजाची कवचकुंडले काढून घेतल्या गेली. त्यामुळे येत्या काळात राम राज्यात जे घडत होते तेच आता घडत आहे म्हणजेच रामराज्याची सुरुवात झाली!.
जगात भारत एकमेव असा देश आहे,जिथे जीवंत माणसा पेक्षा मेलेल्या माणसा वर जास्त प्रेम केल्या जाते.जिवंत पणी त्यांचे सन्मान पूर्वक आदर तिथ करण्यास वेळ नसतो,पण जेव्हा ती व्यक्ति मृत्यु पावते. त्यानंतर भटा ब्राम्हणाच्या सांगण्या वरील त्यांची खुप भक्तिभावाने फोटो लावून सेवा केली जाते,त्याच पद्धतीने या देशातील नागरिकाचे आहे, रामायण आणि महाभारत हे दोन महान कथानक, या दोन महानाट्यतील पात्र दर पांच वर्षांनी बदलत असतात. रामराज्य येणार आणि कंसराजा बनणार असे जनतेला आश्वासन दिल्या जाते.पण रामाने कधीच राज्य केले नाही. कंसाने भिती पोटी बहिण रुखमणी सह राज्यातील कोणत्याही समाजातील जन्म झालेल्या मुलाला जिवंत ठेवले नाही. त्यानुसारच या देशाची जनता ही दर पांच वर्षांनी आपली भूमिका बदलत असते. राजकारणी लोक पक्ष बदलला कि विचारधारा बदलतात. पण व्यवहार आणि व्यवसाय बदलत नाही.देशात साठ वर्ष काँग्रेसने राज्य केले.तेव्हा विरोधी पक्ष कशी भूमिका घेऊन जनतेला सरकार विरोधात उतरविण्याचे काम करीत होती. पण त्यांच्या जनांदोलनात पाहिजे तो दम नव्हता.जनता जास्त मनावर घेत नव्हती तेव्हा त्यांनी रामायणातील राम बाहेर काढला आणि महाभारत घडविले.त्याला थोडे यश प्राप्त झाले.२ चे ८९, ८९चे १२०,१२० चे .१४५ याघडीला १४५चे ३२० खासदार रामायण महाभारता घडविल्यामुळे आले आहेत.ते धर्म,अधर्माच्या लढाईतील कृष्णलीला भागवत गीता नुसार निर्णय घेतात.काळा धन,भ्रष्टाचार, दहशतवादी संपविण्या करीता त्यांनी पांचशे,हजारच्या नोटबंद करून जनतेला रामायण महाभारताची आठवण करून दिली.गेल्या काही दिवसात ती सोशल मिडिया वर फिरत आहे.प्रत्येक घराघरात माणसाला पैसे काढण्यासाठी रांगेत उभे राहावे लागले.आपलेच स्वकष्टाचे पैसे काढताना खूप त्रास सहन करावा लागला. तेव्हा राजकीय लोकांनी रांगेचा फायदा ही प्रसिद्ध महाभारता नुसार घेतला.त्यांचे ते अनुभव बेशरम पणे जनतेला कोणी किती आणि कसे पैसे काढले ते सांगतात गांधारी मी माझ्या शंभर कौरवांना ATM च्या रांगेत उभे करून प्रत्येकी "दोन हजार प्रमाणे" एकुण दोन लाख रुपये काढले. "कुंती" अगं हे तर काहीच नाही. माझ्या पांडवांनी तर द्रौपदी बरोबर लग्न दाखवून एका लग्नाला "अडीच लाख" या प्रमाणे एकुण "साडे बारा लाख" काढले...आहेस कुठे?. हे आहे महाभारत.आज प्रत्येक भारतीय यांचाच नक्की विचार करीत असेल की आपलेच पैसे कसे काढावे.हेच का ते रामराज्य. 
महाभारतात हजारो निरपराध बालकाचा बळी घेणारा कंस आणि गोद्रा हत्याकांडा सह संपूर्ण गुजरात राज्यात निरपराध लोकांचा बळी घेऊन देशाच्या प्रधान सेवक झालेला नरेंद्र मोदी यांची तुलना होऊ शकते काय?. महाभारत घडवून सत्ता परिवर्तन झाले.रामाने कधी राज्य केले नाही तरी राम वनवासातून आल्यावर राम राज्य येईल त्यावेळेस जनतेला वाटत होते तसेच भारतीय नागरिकांना काँग्रेसचे राज्य गेल्या अच्छे दिन येतील या आशा होत्या त्या किती पूर्ण झाल्या यांचा वाचकांनी विचार करावा.
धर्म अधर्माच्या लढाईत मनुवादी भाजपा नेहमी दुतोंडी असते.सत्तेवर नसतांना गोवंश हत्याला कडाडून विरोध करत होती.पण सत्तेवर आल्यावर भारत देश जगातील इतर देशा पेक्षा बीफ एक्सपोर्ट करणारा नंबर एकचा देश कसा काय झाला?. पाकिस्तान जेव्हा जेव्हा भारताच्या सीमेवरील जवानावर हल्ले करीत होते, तेव्हा तेव्हा सत्ताधारी लोकांचा डरपोक म्हणुन उल्लेख करीत होते. आमच्या हाती सत्ता द्या एका तासात पाकिस्तान जगाच्या नकाशा वरून नष्ट करू असे ५६ इंच छाती फुगवुन सांगत होते.आता सत्ता धारी होऊन किती दिवस झाले.?.काय घडले रामायण आठवत नाही.विदेशात जेव्हा सर्व देशाचे पंतप्रधान एकमेकांना भेटून मनमोहन सिंह आणि नवाज शरीफ हात मिळवीत होते.तेव्हा ते नालायक होते.मोदी जेव्हा नवाज शरीफच्या जन्म दिनाचा केक,बिर्याणी खाण्यासाठी न बोलविता पाहुणे म्हणुन जातात ते कोणत्या धर्मात बसते?. हे रामायण आहे की महाभारतात ?.
भारतात सर्वात मोठी सार्वजनिक सेवा म्हणजे भारतीय रेल्वे सेवा,२००४ ते २०१४.रेल्वे भाडे केवळ एक रुपया वाढले तर देशभरात भाजपाने चक्क जाम करून दाखविला.आता सत्तेवर आल्यावर चार वर्षात सत्तर टक्के रेल्वे भाडे वाढविल्याचे बोलले जाते.हे माहित असूनही जनता आंधळी आणि सरकार बहिरे झाले आहे.दोघाची तोंड बंद आहेत.भाजपा विरोधी पक्षात एफ डी आय,जी एस टी, आधार कार्ड,मनरेगा,कोयला खान लिलाव सारख्या अनेक योजनेला प्रचंड विरोध करून जन आंदोलन करीत होती.आता मात्र त्याचं योजन किती महत्वपूर्ण आहेत यांचे गुणगान करीत आहेत.हेच काय ते एकवचनी राम भक्त ?.
दिल्लीच्या निर्भया नांवाच्या एका ब्राम्हण मुलीवर बलात्कार झाला म्हणुन देशभरात तीन महिने जन आंदोलन करीत होती.आता भाजपा प्रणित राज्य सरकारच्या मध्ये प्रदेशात दररोज बारा आणि दिल्ली नऊ बलात्कार होत असतांना देशभक्त रामभक्त डोळे,कान आणि तोंड बंद करून शांत बसले आहेत. हेच का कृष्णाची पवित्र भागवत गिता आदर्श मानणारी भाजपा.
अंतर राष्ट्रीय बाजार भावाने सर्वच देशाला पेट्रोल कच्चा तेल प्रति बैरल भावाने विकले जाते.काँग्रेस सरकारच्या मनमोहन सिंह यांनी १२५ ते १४० डालर प्रति बैरल तेल खरीदी करून देशात ७० ते ७५ रुपये लिटर पेट्रोल विकल्या जात होते ते आजच्या सत्ताधाऱ्यांनी बैलगाडी मोर्चा कडून विरोध केला होता. आताचे सरकार ४० ते ५० डालर प्रति बैरल कच्चे तेल खरीदी करून देशात ७० रुपये प्रती लिटर पेट्रोल विकल्या जात आहे.या मुळे अंतर राष्ट्रीय पातळीवर सरकार कोणत्या विचारांचे आहे ते त्यांच्या देशातील जनतेशी किती प्रामाणिक आहे.यांची नोंद जागतिक पातळीवर जरूर घेतल्या जात असेल.तेव्हा विदेशी पत्रकार ,साहित्यिक अभ्यासक यह राम कोण था?.और रामराज्य क्या है?..क्या इसी तरहा देशवाशी के साथ व्यवहार चालता था!
मनुवादी विचारांच्या भाजपा प्रणित राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कोणता ही घोटाळा केल्यास जनतेने त्याला माफ करावे. म्हणजे शिवराज सिहं चा व्यापम व खान घोटाळा, वसुंधरा राजेंचा ललित मोदी घोटाळा, रमण सिंह यांचा पस्तीस हजार करोड़चा अन्न वितरण घोटाला झाला तरी त्यांच्या कडून कोणी राजीनामा मांगीतला नाही. काँग्रेस मधील कोणी ही घोटाळा केल्यास दुसऱ्या दिवसा पासुन राजीनामा मांगण्याची मोहीम चालविल्या जात होती.हाच फरक राम राज्यात होता काय?.रामायण महाभारताचा कोणता आदर्श आज भारतीयांना घेतला आहे.तरुणांना नोकरी देणार,धनगर, मराठा समाजाला आरक्षण देणार,शेतकऱ्यांना हमीभाव देणार हे सांगुण केंद्र व राज्य सरकारने रामराज्याची सुरुवात झाली केली आहे.
सागर रामभाऊ तायडे.भांडूप,मुंबई-९९२०४०३८५९.

भारतला हिन्दुस्थान कधीच बनु देऊ नका

भारतला हिन्दुस्थान कधीच बनु देऊ नका.
जगाच्या नकाशावर हिंदुस्तान कुठे आहे?.हे आर एस एस प्रणित भाजपाच्या केंद्रीय सरकारने दाखवुन द्यावे.राज्यात केंद्रात भाजपा सरकार आल्या पासुन त्यांनी सर्व ठिकाणी हिंदुस्थान हिंदुस्थान हा शब्द प्रयोग करण्याचा झपाटा लावला आहे.त्यामुळे देशभरात बजरंग दल हिंदू वाहिनी, हिंदू जनजागृती समितीचे अंधभक्त गुंडागर्दी करणारे तरुण मागासवर्गीय समाजावर नहाक अन्याय अत्याचार करीत आहेत.तर काही ठिकाणी एकाच पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न करून जातीय दंगली घडविण्याचे षड्यंत्र करीत आहेत.ते स्वतःला किती ही हिंदू म्हणून घेत असले तरी हिंदूंचा खरा अर्थ चोर गुलाम,फारशी शिवी आहे हा इतिहास आहे आणि तो संशोधन करून सिद्ध झालेला आहे. त्यामुळे भारत हा कधीच हिंदुस्थान नव्हता यांचा इतिहास हिंदू म्हणून घेणाऱ्यांनी वाचावा.
आर एस एस प्रणित भाजपा केंद्रीय सरकार पुढच्या २०१९ नंतर आले तर भारतातील सर्व चित्र बदलले जाईल.ते खरे राम राज्य असेल, आणि राम राज्य निर्माण करण्यासाठी प्रथम इंग्रजांनी जे जे निर्माण केले ते नष्ट करावे लागेल. इंग्रजांनी भारतीयांना काय दिले?.इंग्रजांनी दीडशे वर्ष राज्य केले आणि कायम स्वरूपी भारतीयांना उपभोगाच्या योजना सोडून गेले.इंग्रज आले नसते तर भटा ब्राम्हणांनी देशात मंदिर बांधुन दरवर्षी महाकुंभ मेळा भरविला असता. म्हणुन इंग्रजांचे राज्य चांगले होते कि साडे तीन टक्के ब्राम्हणाचे प्रशासकीय राज्य चांगले आहे.हे जरा आजच्या सुशिक्षित तरुणांनी डोळसपणे तपासुन पाहिले पाहिजे. आता प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे त्यात गूगल इंजन आहे.ते सुरू करून पहा. 
भारतात सर्व प्रथम रेल्वे इंग्रजांनी सुरु केली.भारतात टेलिफोन दुरभाष्य यंत्रणा इंग्रजांनी सुरु केली,भारतात उद्योग धंदे उभारून त्यात भारतीयांना रोजगार उपलब्द करून दिला.शिक्षण घेण्यासाठी शिक्षण संस्था निर्माण करुन सर्वाना शिक्षण घेण्याची समान संधी उपलब्ध करून दिली.वर्णव्यवस्थेत सर्वाना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता तो इंग्रजांनी भारतीय लोकांना विशेष बहुजन समाजाला दिला,(म्हणजेच मागासवर्गीय एस सी,एस टी, व्ही जे एन टी, ओ बी सी,आदिवासी, अल्पसंख्याक समाज) भारतात डाक विभाग,सार्वजनिक हॉस्पिटल,महाविद्यालय निर्माण करुन हजारो लोकांना रोजगार नोकरी दिली आणि जनतेला सेवा मिळवुन दिली. भारतात मनोरंजन आणि खेळाला प्रतिष्ठा इंग्रजांनी मिळवुन दिली.गाणे,बजावणे, नाचणे हा फक्त मागासवर्गीय समाजाचा जन्म सिद्ध अधिकार होता,तो इंग्रजांनी मोडुन त्याला कला क्रिडा कौशल्य असे गुणवत्ता असलेले नांव दिले,म्हणुन आज माधुरी,ममता,शिल्पा,सोनाली,मृणाल स्पृशा, स्मुर्ती, सुषमा,रेखा,जया,हेमा सर्व क्षेत्रात उगड्या नागड्या दिसतात. 
भारतात ''पुरातत्व विभाग'' इंग्रजांनी सुरु केला त्यामुळे भारताची प्राचीन सभ्यता और प्राचीन बौद्ध/जैन धर्म धर्माचा शोध लागला.भारतात कापसा पासुन कपडा बनविण्याचा कारखाना इंग्रजांनी सुरु केला.समुद्राच्या किनाऱ्यावर बंदरे बनवुन भारताचा मोठा विकास इंग्रजांनी केला.त्यामुळे समुद्र किनाऱ्यावर मोठया मोठया शहराचा विकास इंग्रजांनी केला.भारतात लोकशाही पद्धतीने निवडणुका आणि समान नागरिक अधिकार इंग्रजांनी सुरु केला.बाल विवाह,सती प्रथा इंग्रजांनी कायदे करुन बंद केले आणि विधवा विवाह इंग्रजांनी सुरु केले.भारतात सावित्री बाई आणि ज्योतिराव फुले यांनी महिला आणि अस्पृश्य स्त्रीया करीता शाळा खोलून स्वता शिकविले त्याला इंग्रजांनी योग्य आर्थिक मदत केली.जाहीर सत्कार केला.भारतात दळण वळणा करीता रोड रस्ते,ब्रिज पूल प्रथम इंग्रजांनी बनविले.ग्रामपंचायत,पंचायत समिती,जिल्हा परिषद,सह सर्व प्रशासकीय व्यवस्थेत सहभागी करुन घेण्याचे काम इंग्रजांनी केले,इंग्रज भारत सोडुन १९४७ साली गेले. तेव्हा एका डॉलर ची किंमत एक रुपया होती आज एका डॉलर ची किंमत 64 रुपये आहे.म्हणजे भारतात इंग्रजांनी भारताचा विकास आणि कल्याण केला.पण वर्णव्यवस्था मानणाऱ्या ब्राम्हणानी भारताची शासन प्रशासन व्यवस्था हाती घेतल्यावर देशात मंदिर निर्माण करुन देव आणि धर्माचे थोतांड मांडून स्वर्ग ,नरकाचे चित्र उभे करून भारतीयांवर राज्य केले.म्हणुन त्यांना भारत नको आहे त्यांना हिंदुस्थान हवा आहे. हा धोखा घटनाकारांनी ओळखला होता म्हणून त्यांनी घटनेत तशी कायम तरतूद निर्माण करून ठेवली आहे. राज्यात,केंद्रात कोणतेही सरकार आले तरी भारत म्हणजे इंडिया हाच शब्द वापरावे लागेल.भारताला हिंदुस्तान लिहण्याचा व बोलण्याचा प्रयत्न या देशातील भट ब्राम्हण दररोज करतात.पण जागरूक अधिकारी कर्मचारीवर्ग त्याची योग्य वेळी दाखल घेतात म्हणून भारत हिंदुस्थान होत नाही आणि होणार नाही.भारतातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे आपण पहिला भारतीय आहेत आणि भारतीय राहू नंतर जात,धर्मं,पंथ,राज्य येईल याची काळजी घ्यावी.भारतात जो प्रर्यंत भारतीय संविधान आहे तो पर्यंत सर्व जाती धर्माचे पंथाचे राज्याचे लोक, सुरक्षित राहतील जेव्हा संविधान नसेल तेव्हा हा देश हिंदुस्थान होईल त्या नंतर कोणीच सुरक्षित नसेल.म्हणून भारताला भारत इंडियाच राहूद्या हिंदुस्थान होऊ देऊ नका.
आज देशभरात जे काही चालले ते खूप भयानक आहे.आर एस एस चा प्रमुख शत्रु डॉ बाबासाहेब आंबेडकर आहे. त्यांनी बनविलेली राज्य घटना जो पर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत राम राज्य म्हणजेच भटा ब्राह्मणांचे वर्णव्यवस्था असलेले राज्य येणार नाही म्हणूनच देशभरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा समाज प्रत्येक राज्यात टार्गेट केला जात आहे. या समाजाला चिरडून टाकले की इतर मागासवर्गीय आपोआप गुलाम बनतील ही आजच्या हिंदुस्थानची परिस्थिती आहे.
अन्याय अत्याचारा विरोधात उभा ठाकणारा,बोलणारा, लिहणारा म्हणजे आंबेडकरी विचाराचा एकमेव माणूस किंवा समाज होय यांची जाणीव भटा ब्राम्हणांना आहे.ते  ओळखण्यासाठी जास्त डोके चालविण्याची गरज नाही.फक्त डोळे उघडे ठेवून पाहिल्यास लगेच दिसते. रोडवर जाणाऱ्या शंभर मोटरसायकल पहा त्यात ज्याच्या गादीवर अशोक चक्र दिसलं तर लोक लगेच म्हणतात, हा आंबेडकरी विचाराचा व बौद्ध तरुण आहे! कोणत्याही फोर व्हीलर गाडीवर अशोक चक्र दिसलं तरलोक म्हणतात,हे बौद्धाचं कुटूंब आहे! घरावर निळा झेंडा व दरवाजा वर अशोक चक्र दिसलं तर लोक म्हणतात,हे बौद्धाचं घर आहे!मग राष्ट्रध्वजावर(तीरंगा)अशोक चक्र पाहून कोणीच का म्हणत नसेल,की "हा भारत बौद्धांचा देश आहे"  आणि त्याला अडीच हजार वर्षाचा तथागत गौतम बुद्धाचा जम्बु दीप प्रबुद्ध भारत यांचा ऐतिहासिक इतिहास आहे.पण हिंदुस्थान कोणाचं होता त्याला कोणता इतिहास आहे हे कोणी सांगत नाही.म्हणून भारतला हिन्दुस्थान कधीच बनु देऊ नका.आज रात्र नव्हेतर दिवस सुध्दा वैऱ्याचा आहे.तेव्हा उठा जागे व्हा भविष्यात स्वाभिमानाने जगण्यासाठी!. भारत माता की जय बोलणाऱ्यास विचार हिंदुस्थानची माता पिता कोण ?. 
आपला 
सागर रामभाऊ तायडे - ९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई

शिवराय ते भिमराय समता मार्च महाड​ चवदार तळे ​

शिवराय ते भिमराय समता मार्च महाड
​ चवदार तळे ​
छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर या दोन महामानवांना देव करून त्यांचा फक्त जयजयकार करण्याचे काम भटा ब्राम्हणांनी चालविले आहे.त्यात मराठा व महार बौद्ध समाज अलगत अडकत चालला आहे.या दोन्ही महापुरुषांच्या क्रांतिकारी विचारला आणि कार्यप्रणालीला मूठमाती देऊन जातीजातीत बंदिस्त करण्याचे काम वस्ती पातळीवर जोरात सुरू आहे. चवदार तळे महाडच्या सत्याग्रहातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या खांद्याला खांदा लावुन उभे राहिलेले सहकारी गंगाधरपंत सहस्त्रबुद्धे, अनंतराव विनायकराव चित्रे,सुरबा नाना टिपणीस, प्रधान बंधु, संभाजी तुकाराम गायकवाड, सुभेदार विश्राम सवादकर, आर बी मोरे,शिवराम जाधव,सी ना शिवतरकर, पा न राजभोज,एन टी जाधव हे मुख्य सहकारी होते.यांना ही त्यांच्या जाती बांधवांनी संघटनांनी ब्रहिस्कृत केले होते.त्यावेळी दर्याखोऱ्यातील सर्व जाती पातीच्या मावळ्यांना एकत्र करून रायगड ते महाड चवदार सत्याग्रहाची किती झळ पोहचली होती.शिवरायांच्या रयतेच्या राज्यात जातीव्यवस्था तीव्र नव्हती.नंतरच्या काळात पेशव्यांनी शुद्रा अतिशूद्रांचे जिने हराम केले.त्यात सार्वजनिक ठिकाणी पिण्याचे पाणी मिळत नव्हते.म्हणूनच महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह झाला.हा चवदार तळ्याचा इतिहास नव्याने सांगण्याचे काम विचारांचा जागर व त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी विविध संस्था संघटनांच्या किर्याशील कार्यकर्त्यानी संकल्प जाहीर केला आहे.१९ मार्च १९२७ ला महाड मध्ये काय घडले होते त्यात कोण कोण सहभागी जाते.त्यांची आठवण म्हणून २०१८
​​ 
ला रायगड पाचाड ते महाड चवदार तळे समता मार्च निघत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १९ व २० मार्च १९२७ रोजी महाडच्या चवदार तळ्यावर समताधिष्ठित बहुजन समाजासाठी सत्याग्रह केला. यंदा या सत्याग्रहाला ९० वर्ष पूर्ण होत आहेत.त्या निमित्ताने दरवर्षा प्रमाणे या ही वर्षी लाखो लोक महाडला दर्शनासाठी येतील आणि जातील. 
महाडचा रणसंग्राम हा केवळ पाण्यासाठी नसून तो मानवी मूलभूत हक्कांसाठी होता. बाबासाहेब त्या वेळी सांगत होते चवदार तळ्याचे पाणी प्यायल्याने आम्ही काही अमर होऊ अशातला भाग नाही. आज पावेतो चवदार तळ्याचे पाणी प्यायलो नव्हतो तर तुम्ही-आम्ही काही मेले नव्हतो. चवदार तळ्यावर जावयाचे ते केवळ त्या तळ्याचे पाणी पिण्याकरीता जावयाचे नाही. तर इतरां प्रमाणे आम्ही ही या समाजातील माणसे आहोत हे सिद्ध करण्या करीताच त्या तळ्यावर आपणास जावयाचे आहे. असे अंगावर शहारे आणणारे उद्धगार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९ मार्च १९२७ रोजी चवदार तळ्याच्या ऐतिहासिक सत्याग्रह आंदोलनाच्या वेळी काढले होते. त्याला २० मार्च २०१८ ला ९​१​ वर्षे पूर्ण होत आहेत.पण त्या महाड रण संग्राम सत्याग्रहचा आंबेडकर अनुयायीनी कोणता आदर्श घेतला?. यांचे आत्मचिंतन आणि परीक्षण करण्याची तयारी आंबेडकरी चळवळीतील नेत्यात आणि अनुयायात नाही.म्हणूनच १९ मार्च २०१८ ला रायगड पाचाड ते महाड चवदार तळे समता मार्च निघत आहे.२० मार्चला लाखो लोक दरवर्षी येतात, पण १९ मार्चला काय झाले होते यांची माहिती घेत नाही.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचाराचा जाहीरपणे खुन करणे हा आंबेडकर अनुयायीचा जन्म सिद्ध अधिकार आहे असेच ते वागतात.१४ एप्रिल १८९१ ते ०६ डिसेंबर १९५६ या काळात जे जे ऐतिहासिक कार्य डॉ भिमराव आंबेडकर यांच्या हातून घडले.त्या त्या दिवसाला आंबेडकरी अनुयायी लाखोच्या संख्येने एकत्र येऊन जाहीर पणे क्रांतिकारी विचाराचा त्याच ठिकाणी खून करून तो उत्सव म्हणुन खूप मोठ्या प्रमाणात साजरा करतात.कारण तो दिवस त्याच्या साठी खूप महत्वाचा असतो.कारण त्याच दिवसी गल्लीबोळातील नेत्याचा ८x१० चा बॅनर, होडींग आणि १०x १२ चा स्टेज बांधून जनतेला आपली शक्ती दाखविण्याची सुवर्ण संधी मानतात.ती गमवायला कोणीच तयार नाही.या दिवसाचे त्या काळाचे महत्व आज आमच्यासाठी काय आहे. हे आम्हाला विचारण्याचे, सांगण्याचे धाडस कुणी करू नये.आम्हाला आंबेडकर अनुयायी,भक्ता एवढे तुम्हाला त्याचे महत्व कळणार नाही. आमच्या रक्तात आंबेडकरी चळवळ असते.जन्मताच आम्ही आंबेडकरवादी असतो.२० मार्चला लाखो लोक महाडला जातात आणि काय करतात?.२० मार्च १९२७ चे गांभीर्य कोणत्या गटाच्या नेत्याकडे असते.किंवा नगरा नगरातील मंडळ ,महिला मंडळाकडे असतो?.मनसे, राष्ट्रवादी यांच्या दादा,भाऊ,नाना,काका यांच्या कडून बस घेऊन महाड चवदार तळ्याला जाऊन दर्शन,भोजन करणारे सत्याग्रहा चा अर्थ जाणतात काय?.त्यातुन त्यांनी गेल्या वीस पंचवीस वर्षातून कोणती प्रेरणा घेतली?.
महाराष्टातील खेड्या पाड्यातील गांवकुसा बाहेर राहणारी महार फक्त महार माणस महाडला पाणी पिण्यासाठी जाणार नव्हते.तरी बाबासाहेबांनी महाराना पिण्याचे पाणी खुले करण्यासाठी महाडचा सत्याग्रह केला. आणि महाडचे चवदार तळे अजरामर झाले.ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या सत्याग्रहामुळे.महाडच्या चवदार तळ्याच्या ऐतिहासिक सत्याग्रहाला आज २० मार्च २०१६ ला ९१ वर्ष पूर्ण होत आहेत.डॉ बाबासाहेब आंबेडकरानी आजच्याच दिवसी २० मार्च १९२७ साली चवदार तळ्याचा सत्याग्रह केला आणि तळ्याचे पाणी सर्व मानवजाती साठी खुले केले.केवळ महार जाती साठी चवदार तळे नव्हते.डॉ बाबासाहेबाच्या क्रांतिकारी विचाराने चवदार तळाच्या पाण्याला हात लावताच आग लागली. ती महाड मध्ये सुरु झालेली आग राज्यातून देशभर पसरली.ते क्रांतिकारी वैचारिक संघटन कैशल्य आज कोणत्याही नेत्या कडे नाही.त्या ऐतिहासिक घटनेला ९१ वर्ष पूर्ण होत असले तरी नेहमी सारखे कार्यकार्माचे आयोजन महाडला सर्वच गटा कडून करण्यात येईल प्रत्येक कोणा कोपरयात एका एका गटाचा स्टेज असणारच, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समताधिष्ठित समाजनिर्मिती करण्यासाठीच अहोरात्र प्रयत्न केले. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी महाड मुक्कामी चवदार तळे सत्याग्रह आंदोलन केले.बाबासाहेबांनी म्हटल्या प्रमाणे हा केवळ पाणी प्राशन करण्याचा हेतू नाही तर समाजात सर्वच माणसे सारखी.अमुक वरच्या जातीचा-तमुक खालच्या जातीचा असा जातीभेद कशाला? बाबासाहेबांच्या मते, राजकीय, धार्मिक, सामाजिक व आर्थिक बाबतीत समतेचे तत्त्व लागू करणे म्हणजे समाजरचनेतील नीतीच्या पायावर उभे राहण्यासारखे आहे. परंतु घुबडाला सूर्यप्रकाश सहन होत नाही.त्याप्रमाणे सामाजिक विषमतेमुळे ज्यांना जाती श्रेष्ठता मिरवायला मिळते त्यांच्या जातीभेदावर कुऱ्हाड पडलेली पाहून साहजिकच त्यांचा संताप तीव्र होतो.आज ही खेड्या पाड्यातील वातावरण त्याची साक्ष देते.त्यातून आंबेडकरी चळवळी नेते अनुयायी काही शिकायला तयार नाही.
आज देशात जातीभेदाचा जो काही प्रकार अनुभवयास मिळत आहे. तो अत्यंत निंदनीय आणि संतापजनक आहे. जातीपातीच्या या विषारी झाडाला केवळ उच्चवर्णीयां कडूनच खतपाणी घातले जाते, असे म्हणणे चुकीचे ठरेल.जोपर्यंत एका समाजाकडून दुसऱ्या समाजात रोटी-बेटी व्यवहार होत नाही तोपर्यंत समताधिष्ठ समाजाची निर्मिती अशक्य आहे, असे बाबासाहेबांनी सांगितलेले असताना ही अनेक वेळा बौद्ध आणि नवबौद्ध समाजातील लोकांचा विवाहाच्या वेळी जातीलाच अग्रक्रम असतो. महाडच्या रणसंग्राम भूमीच्या संपूर्ण कोकणात मातृसंस्था आणि पंचायत यातील गावकी भावकी च्या कथा तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या तथागत बुद्धाच्या धम्माच्या चैकाटीत न सुटणाऱ्या आहेत. एकीकडे बाबासाहेबांचे स्वप्न साकार करायचे असा टेंभा मिरवायचा आणि दुसरीकडे वेळ येताच जाती-पातीला खतपाणी घालायला लावणारी कामे करायची अशी दुटप्पी भूमिका बाबासाहेबांना मानणाऱ्या सुशिक्षित वर्गाने सोडून द्यायला हवी.त्या पेक्षा खेड्यातील अज्ञानी अशिक्षित असंघटीत माणूस आंबेडकरी चळवळी करिता लाख मोलाचा ठरतो. आंबेडकरी चळवळीला मानणाऱ्या समाजाने स्वतःचे आत्मपरिक्षण करून बाबासाहेबांनी केलेल्या महाडच्या रणसंग्रामतून योग्य बोध घ्यावा. आज महाड चवदार तळे म्हणजे पिकनिक झाली आहे.हे आंबेडकरी चळवळीतील जागृत अनुयायी यांनी लक्षात घेण्याची वेळ आली आहे, म्हणुन महाड रण संग्राम आजच्या तरुणांना आदर्श वाटत नाही,पिकनिक पॉईंट झाला आहे.​
म्हणूनच शिवराय ते भिमराय समता मार्च १९ मार्च २०१८ ला रायगड पाचाड ते महाड चवदार तळे समता मार्च निघत आहे.मराठी साहित्य संमेलनात क्रांतिकारी विचार मांडून वैचारिक खळबळ निर्माण करणारे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख,माजी मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष सकाळ समूहाचे मुख्य संपादक उत्तम कांबळे, प्रा.अंजली मायदेव कर्वे इन्स्टिट्यूट पुणे,फारूक अहमद सुराज्य सेना प्रामुख्याने उपस्थित राहतील.१९ मार्च १९२७ च्या सत्याग्रहात ज्यांनी सहभाग नोंदविला होता त्यांचे नातु पणतू पण सहभागी होतील.त्यात उल्का महाजन,मधुकर गायकवाड, मिलिंद टिपणीस,श्रीप्रकाश अधिकारी, आरिफ करंबेळकर, सुभाष वारे, युवराज मोहिते,अनिता पगारे,ललित बाबर,सुरेश सावंत,अविनाश कदम,भूषण सिसोदे,नागेश जाधव,कालीदास रोटे प्रदिप शिंदे असे विविध संस्था संघटनेचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.आणि एक नवी वैचारिक चर्चा घडविण्याचा प्रयत्न करणार आहे.आपण सहभागी होऊ शकत नसलो तरी यावर व्यापक चर्चा घडवुन शिवराय ते भिमराय समता कशी प्रस्थापित करता येईल यांचा विचार करूया. कोणती ही दळणवळणाची साधन नसतांना ज्यांनी या सत्याग्रहात सहभाग घेऊन यशस्वी संघर्ष केला त्या सत्यगृहींना कोटी कोटी प्रणाम!!!.
सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९ भांडूप,मुंबई.

रेल्वे भारतीय संपत्ती की दलालांचे कुरण?

रेल्वे भारतीय संपत्ती की दलालांचे कुरण?
भारतीय नागरिकांची सर्वात मोठी राष्ट्रीय व सार्वजनिक संपत्ती ही भारतीय रेल्वे आहे.ती देशातील करोडो  नागरिकांना
​ ​
रोजगार देते.त्याचं प्रमाणे करोडो नागरिकांना प्रवाशांना जाण्या येण्याची प्रवाशी सेवा देते.म्हणजेच देशातील सर्वात मोठी सोन्याचे अंड देणारी कोंबडी आहे.पण सद्या ही कोंबडी कापुन खाण्यासाठी लाखो दलाल राजकीय आशीर्वादाने कार्यरथ आहेत.त्यांना रोखण्यासाठी सर्वात पुढे कामगार कर्मचारी अधिकारी यांच्या राष्ट्रीय ट्रेंड युनियन यांनी यायला पाहिजे होते.
परंतु त्या सर्व युनियन डोळे बंद करून बसलेल्या आहेत. कारण त्यांना देशातील बहुसंख्य बहुजन मागासवर्गीय समाजाला कायमस्वरूपी न्याय हक्क आणि अधिकार मिळाला नाही पाहिजे.या विचाराच्या आहेत काय?. त्यांना जाती व्यवस्था सारखी वागणूक मिळाली पाहिजे हेच सर्व राष्ट्रीय ट्रेंड युनियन चे मुख्य ध्येय,उद्धिष्ट आहे
​ काय​?.
भारतीय रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना पिण्यासाठी पाणी नाही.पण २० रुपये लिटर बिस्लरी बाटल्या मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत.पिण्याच्या पाण्या पेक्षा आवश्यक काय असेल ज्यात दहा पंधरा टक्के कमिशन मिळेल ती सेवा देण्यास रेल्वे प्रशासन तयार आहे.भारतातील ४०० रेल्वे स्टेशन वर फ्री वाय फाय सेवा देणार आहे.त्यासाठी सरकारने गूगल सोबत "साडेचार लाख कोटी" रुपयांचा करार केला आहे.शेतकऱ्यांचे कर्ज माफ करायला ७६ हजार कोटी नाहीत आणि वाय फाय साठी साडेचार लाख कोटी आहेत
​?​
.माणसाला 
​प्रवासात खायापियाला ​अन्नधान्य पाणी
 पाहिजे कि वाय फाय?.रेल्वे ने प्रवास करणारे प्रवासी किती वेळ स्टेशनवर थांबणार आहेत?.तेव्हा त्यांना फ्री पिण्यास पाणी पाहिजे की फ्री वाय फाय ?.
भारतीय रेल्वे जगात आदर्श मानली जात होती.देशाची शान होती.लोक रेल्वेने प्रवास करणे जास्त पसंद करीत होते. प्रत्येक मोठ्या जंक्शन स्टेशनवर प्रवाशांना सर्व सुविधा उपलब्ध असत,रेल्वे कामगार कर्मचारी अधिकारी जातीने लक्ष ठेऊन सुविधा पुरवीत होते.प्रवाशांचे सहर्ष स्वागत करणारा स्पीकर कानांवर पडत असे.त्यामुळे प्रवाशांच्या मनाला समाधान वाटत होते.आणि रेल्वे कामगार कर्मचारी अधिकारी यांना आपण देशाच्या सर्वात मोठ्या क्षेत्रातील आहोत याचा गर्व वाटायचा.पण आज रेल्वे ची हालत खूपच खराब आहे.भारतीय रेल्वे ही सर्वात मोठे दलालांचे कुरण झाले आहे.प्रवाशांना कोणत्याही पद्धतीने लुटता येईल याचं हिशेबाने कामगार कर्मचारी अधिकारी लक्ष देऊन असतात. कारण देशातील सर्वात मोठ्या क्षेत्रात आज खासगीकरण, ठेकेदारी कंत्राटी कामगार भरती झाले आहेत.त्यांचा एकच उद्देश पैसे कमविणे!.कायमस्वरूपी लागणारे कामगार कर्मचारी अधिकारी यांच्या रिक्त जागा भरल्या जात नाही. त्या कायमस्वरूपी बंद करण्याचा झपाटा रेल्वे मंत्रालयाने रेल्वे बोर्डने लावला आहे.सरकारच भांडवलदारांच्या खर्चाने निवडून आले आहे.त्यात ब्राह्मणशाहीने पूर्णपणे प्रशासनावर कब्जा करून ठेवला आहे.त्याला रोखण्यास राष्ट्रीय ट्रेंड युनियन असमर्थ ठरत आहेत कारण ट्रेंड युनियनचे नेतृत्व आणि विचारधारा हे वर्णव्यवस्था समर्थन करणारी आहे. संघटीत कामगारांच्या त्या ट्रेंड युनियनच्या दोगल्या नीतीमुळे.आज सर्वात मोठ्या क्षेत्रातील संघटीत कामगार कर्मचारी आणि अधिकारी उध्वस्त होत आहेत. त्यामुळेच रेल्वेत असंघटीत कामगारांची कंत्राटी कामगार संख्या भरमसाठ वाढत चालली आहे.
संघटित कामगारांच्या राष्ट्रीय ट्रेंड युनियन कामगारांना न्याय मिळवून देण्यास असमर्थ का ठरत आहेत.आजच्या स्थितीत अकरा लाख कामगार कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता,घरभाडे दीड दोन वर्षांपासून दिला नाही.सरासरी एका कामगाराचा दिड लाख रुपये पकडला तर अकरा लाख कर्मचाऱ्यांचा किती रुपये होईल विचार करा (१५००००X११०००००=१६५,०००००००००) हा एरीयस कुठे गेला?. याबाबत अधिकृत ट्रेंड युनियन ने कोणतीही निर्णायक भूमिका किंवा आंदोलन घेतले नाही.संघटीत कामगार कर्मचारी अधिकारी वर्गाचे याबाबत काय मत आहे हे जाणुन घेण्यासाठी मतदान घेतले पाहिजे असते.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १२/१३ फेब्रुवारी १९३८ ला मनमाडला रेल्वे गँगमन कामगार परिषद मध्ये सांगितले होते स्वताच्या रक्षणासाठी मागासवर्गीय कामगार कर्मचारी यांनी स्वतःच्या विचारांच्या ट्रेंड युनियन बनवा आणि सरकार व प्रशासनावर कायमस्वरूपी दबाव निर्माण करा.त्यांना कोणताही निर्णय घेतांना तुम्ही समोर दिसले पाहिजे.तुमची संख्या लक्षवेधी आहे.परंतु देशातील मागासवर्गीय कामगारांनी बाबासाहेबांचे ऐकले नाही.त्यांचा परिणाम आज देशातील सर्व क्षेत्रातील सर्वच कामगार कर्मचारी भोगतात.कामगार विरोधी ब्राम्हणवादी भांडवलशाहीवादी राष्ट्रीय ट्रेंड युनियना हातात हात घालुन बहुसंख्य बहुजन मागासवर्गीय समाजाच्या कामगार कर्मचाऱ्यांवर राज्य करीत आहेत. संघटीत कामगारांची ही हालत असेल तर असंघटीत कामगारांचे काय?.करीता त्यांचे हातातील हात तोडा आणि आपले हात जोड २०१८ ला रेल्वेत च्या युनियन मान्यताप्राप्त होण्यासाठी होणाऱ्या निवडणूकीत आपली संघ शक्ती स्वतंत्र रेलवे बहुजन कर्मचारी युनियन(SRBKU) संलग्न स्वतंत्र मजदुर युनियन (ILU) च्या मागे उभी करा.
देशात आजच्या घडीला ९३ टक्के असंघटीत कामगार आहेत,ते सर्व बहुजन मागासवर्गीय,अल्पसंख्याक, आदिवासी समाजाचे ते सर्व मोठ्या संख्येने कंत्राटदाराकडे कंत्राटी कामगार म्हणून कायमस्वरूपी काम करतात.वास्तविक पाहता २४० दिवस सेवेत काम केल्यानंतर कायम करण्याचा कामगार - कर्मचाऱ्यांना कायदेशीर अधिकार केंद्रीय कामगार कायद्याने औद्योगिक विवाद कायदा १९४७ कलम २५ ब (Industrial Disputes act 1947 clause 25 B ) दिलेला आहे याच कायद्या आधारे देशभरात विविध क्षेत्रात लाखो कर्मचारी कायम झाले आहेत.खाजगी कंपन्या त्याची अंमलबजावणी करीत नसतील पण सार्वजनिक क्षेत्रातील राज्य व केंद्रातील उपक्रमात या कायद्याने अंमलबजावणी शंभर टक्के केली आहे.केंद्रातील सरकारने हजारो कामगार कायदे मोडीत काढले असतांना १३ राष्ट्रीय ट्रेंड युनियन ने या विरोधात ठोस निर्णय घेऊन तीव्र आंदोलन केले नाही. केवळ कामगारांचे समाधान व्हावे यासाठी आंदोलने झाली आहेत.त्यात तडजोड होऊन राजकीय पक्ष त्यांच्या नेतृत्वाखालील युनियन यांच्या नातलगांना किंवा कार्यकर्त्यांना कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम दिल्या गेले आहे. त्यासाठी हा कायदा काय मोडीत काढला आहे का ?.
कंत्राटी पध्दतीने निर्माण केलेली पदे कायमस्वरूपी समजण्यात येऊ नयेत या सर्वोच्च न्यायालयच्या निर्णयची अंमलबजावणी करण्याच्या तयारीत सरकार लागले आहे. सर्वोच्च न्यायालय, राज्य सरकार व केंद्रसरकार कंत्राटी कामगारांच्या विरोधात असून चालु आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून या तिमाही मध्ये कारखानदार क्षेत्रातील ८७ हजार कामगारांच्या नोकऱ्याची कपात झाली आहे.तसेच रेल्वे मध्ये ९० हजार कंत्राटी कामगार आहेत.अशा अनेक क्षेत्रातील कंत्राटी कामगारांच्या विरोधात न्यायपालिका,केंद्र व राज्य सरकार ठोस भूमिका घेत असतांना.सर्व राष्ट्रीय ट्रेंड युनियना कामगार कर्मचारी यांचे रक्षणासाठी एकत्र न येता आपल्या वैचारिक वारसदारांचे स्वरक्षण करण्यासाठी गप्प बसलेल्या आहेत.म्हणूनच तमाम कामगार कर्मचारी आणि अधिकारी यांनी भारतीय रेल्वे वाचवण्यासाठी ब्राम्हणशाही भांडवलशाही समर्थन करणाऱ्या ट्रेंड युनियनच्या विरोधात एकत्र येऊन रेल्वे भारतीय संपत्ती आहे.तिचे रक्षणासाठी दलालांचे कुरण मोडून काढावे लागेल.तेव्हाच रेल्वे भारतीय संपत्ती असल्याचा आपल्या सर्वांना गर्व असेल.

शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे?.

शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे?.
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे,जे ते 
​पिईल
 तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते.ज्यादेशात
तथागत गौतम बुद्ध आहेत त्याच देशात विज्ञान आहे.जिथे विज्ञान आहे तिथे शिक्षण आहे.ज्यादेशात शिक्षण संस्था काढण्यापेक्षा देवाची भव्यदिव्य मंदिर निर्माण करण्यावर भर दिला जातो त्या देशात शिक्षणाला काय महत्व असणार?.हे भारतात दिसणारे हे सत्य आहे.त्यांचे वर्णन खालील प्रमाणे केले जाते.दहावी आणि बारावीचे
​ निकाल नुकतेच ​
जाहीर झालेत
​.​युवकांचा म्हणजेच विद्यार्थ्यांचा भविष्याची सुरवात येथूनच होते.म्हणुन 
चांगल्या मार्कने पास झालेल्या पहिल्या नंबरच्या विद्यार्थ्यांना टेक्नीकलमध्ये प्रवेश भेटतो व ते डॉक्टर किंवा इंजिनिअर होतात.केवळ मार्क भेटले म्हणजे डॉक्टर, इंजिनिअर होता येत नाही. त्यासाठी आईबापाची आर्थिक परिस्थिती मजबूत पाहिजे.किंवा मोठ्या माणसाचा आशीर्वाद पाहिजे, तरच ते यशस्वी होतात.मग भरमसाठ पैसा कमवितात.
​पैसा कमविणे हाच त्यांचा उद्धेश असतो.त्याकरिता ते कोणत्याही थराला जाऊ शकतात.​
दहावी आणि बारावी
​त 
चांगले मार्कने पास झालेला पण दुसरा नंबरने पास झालेला विद्यार्थी यु पी एस सी,एम पी एस सी (UPSC,MPSC)  परीक्षा देणार व सरकार मध्ये प्रशासकीय अधिकारी (Administrator) बनतात आणि वरच्या डॉक्टर, इंजिनिअर, वकील, प्राध्यापक,शिक्षक यांच्यावर नियंत्रण ठेवतात
​.​
दहावी आणि बारावी
​त
.काठावर पास होणारे विद्यार्थी म्हणजे तिसऱ्या नंबरचे विद्यार्थी आर्ट म्हणजे कला क्षेत्रात जातात.सुरवात पासुनच त्यांच्या आंगी खुप कला कौशल्य असते.
 त्यामुळे त्यांना कुठेच प्रवेश भेटत नाही म्हणून नगरातील भांडणात भाग घेतात,भांडणे कसा मुळे होतात?. नळाच्या पाण्यामुळे, गटार तुंबल्यामुळे, साचलेल्या कचऱ्यामुळे मग हे भांडण जागेवर मिटविण्यास पुढाकार घेणारे किंवा पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर पुढाकार घेतल्यास आपोआप कार्यकर्ते समाजसेवक बनतात. राजकीय पक्षाचे दरवाजे आपोआप उघडली जातात,मग राजकारणात गेल्यामुळे वरील दोघांवर नियंत्रण ठेवतात. काही विद्यार्थी अभ्यासात कमजोर असतात,पण तोडफोड,मारामारी करण्यात पटाईत असतात. त्यामुळे नापास झालेले शाळेतून बेदखल झालेले असतात. पण त्यांच्या नावांची चर्चा दादागिरी,गुंडगिरी करणाऱ्या भाई लोकात आपोआप होते.मग ते अंडरवल्डमध्ये खेचले जातात आणि वरील तिन्ही वर्गाच्या लोकांना नियंत्रित करतात.आणि ज्यांनी कधी शाळेचं तोंड पण पाहिलेलं नसतं ते मुले लग्न झाल्यावर अपयशी झाल्यावर स्वामी,साधू,बाबा बनतात.आणि वरील चारी वर्गाचे लोक  त्याच्या पाया पडतात.
दहावी आणि बारावीच्या परीक्षेत मुली मोठ्या संख्येने पास होतात.ही अज्ञानावर विज्ञानाने केली प्रगती आहे.ही आनंदाची बाब असली तरी यातील किती टक्के मुली दहावीनंतर अकरावीला आणि बारावीनंतर एफ. वाय. ला प्रवेश घेतात हे वास्तव तपासण्याची गरज आहे.मुलींना पदवीपर्यंतचे शिक्षण सरकार मोफत देते असे म्हणतात, म्हणजे फक्त शैक्षणिक शुल्क (Tution Fee) माफ असाच अर्थ आहे ना?. आणि सध्या शिक्षणाच्या एकुण खर्चात शैक्षणिक शुल्काचे (tution fee) प्रमाण अत्यल्प असते आणि इतर खर्च भरमसाठ असतात जे माफ नसतात. एकुणच शिक्षण मोफतचा हाच अर्थ इतर ठिकाणी ही आहे. मुलींची सुरक्षा हा ग्रामीण भागातील पालकांच्या मनातील महत्वाचा मुद्दा असतो. महिला अत्याचाराची एक घटना मागे राहिलेल्या हजारजणींच्या मनमोकळ्या सार्वजनिक वावरावर 
​जगण्यावर ​
बंधने आणते. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मुलींसाठी सुरक्षित वसतीगृह जर उपलब्ध झाले तर अनेक पालक आपल्या मुलींना घरी बसवणार नाहीत. शिक्षणावरील सरकारी खर्च वाढला पाहिजे तो यासाठी.पण शिक्षणाचा कोणताही सबंध नसलेली देवी सरस्वती प्रत्येक शाळा,कॉलेजमध्ये विराजमान आहे.ती या मुलीचे रक्षण करण्यास असमर्थ आहे.तरी 
​शिक्षण संस्था,शिक्षक ​
तिचाच उदोउदो 
​करतात.​
.
दहावी बारावीनंतर घरी बसणाऱ्या मुली नेमक्या कुठल्या समाज घटकातील असतात हे वास्तव तपासले तर कुणालाही भारतीय समाजव्यवस्थेतील आणखी एका विषमतेचे म्हणजेच जातीच्या प्रश्नाचे गांभीर्य समजु शकेल. दहावीपर्यंत च्या प्रवासातही गळणाऱ्या अनेक मुली हया मागासवर्गीय बहुजन जातीजमातीतीलच असतात. त्याकडे कोणी फारसे लक्ष देत नाही.खेड्या पाड्यातील सोडा शहरातील झोपडपट्टीतील दहावी ,बारावी शिकणाऱ्या मुलीचे प्रमाण पाहिल्यास जन्मजात उच्चनिचतेचे तत्वज्ञान अजुनही आपल्या समाजात कसे जिवंत काम करते ते स्पष्ट दिसेल.फक्त त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्पष्ट असला पाहिजे.
देशात राज्यात महिलांना सरस्वती,शारदा,लक्ष्मी मंदिरात पूजा,अर्चा उपास व्रत यातच गुंतवून ठेवण्याचे काम चॅनेल मीडिया प्रिंट मीडिया करीत असतांना. "सावित्रीच्या लेकींची लढाई, तीन पावले पुढे आणि दोन पावले मागे" अशीच देशभर सुरू आहे. मुलींना जे काही मिळते ते घ्यावे आणि उरलेल्यासाठी लढाव लागेल!. सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांनी सुरु केलेली स्त्री शिक्षणाची सन्मानाची लढाई पुढे गेलीच पाहिजे. आणि ती पुढे जाईलच.
नुकतेच दहावी आणि बारावी
​त​
 वर्षभर मेहनत घेऊन परीक्षा दिल्यानंतर अनेकांना यात यश तर अनेकांना अपयश 
​आले​
​काहीना ​
अपेक्षेपेक्षा अधिक गुण मिळालेले
​.​
 
​त्यामुळे ​
मित्र-मैत्रिण 
​खूप आनंदा​
 असतात
​.​
 तर 
​काही ​
अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळालेले
​.​
त्यामुळे
​ 
हिरमुसलेले असतात.अनेक पालक तर पास झाल्याचा आनंद मानण्याऐवजी मुलाला कमी गुण मिळाल्याचा राग काढतात. परिणामी मुलांमध्ये नैराश्य येतं. केवळ दहावी आणि बारावी म्हणजे सर्व काही नाही, हे लक्षात घ्या. त्यानंतरही करिअरच्या विविध मोठ्या संधी उपलब्ध असतात. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. पुढील गोष्टींचा विचार केला तर तुमचं नैराश्य नक्कीच दूर होईल व तुम्ही नवीन उत्साहाने करिअरसाठी पुन्हा सज्ज व्हाल.आपल्या मुलांना शाळेत पाच दहा टक्के मार्क्स कमी मिळाले तरी चालतील पण त्यांना पोहणे,सायकलींग,जुडो ,कराटे
​,क्रिकेट,​
 कबड्डी
​,​
 फुटबँल
​,​
 खो-खो
​ खेळण्यात तरबेज करा.त्यांच्या अंगीकृत कलागुणाला प्राधान्य द्या.​शिक्षणा बरोबर वृतपत्र
 वाचन,समाजात
​,​
नातेवाईकां
​ ​मध्ये मिसळून वागणे सुखादुखाशी समरस होण्यासाठी मनाची तयारी असणे खूप महत्वाचे आहे.
 मुलांना फक्त मार्कवंत नका बनवू गुणवंत बनवा
​.​
जीवनाचा आनंद तुम्हीही घ्या आणि त्यांनाही आनंद घ्यायला शिकवा.
​आजचे राज्यकर्ते किती प्रामाणिक आणि सुशिक्षित आहेत.ते डोळ्यासमोरून घाला.​
  
​त्याच पद्धतीने दरोडेखोर आणि व्यापारी डॉक्टर यातील गुणवंतात्मक तुलना करा.देशातील सर्व भ्रष्टाचारांची प्रकरण पहा कोणी केले?.उच्च शिक्षित कि कमी शिकलेल्या लोकांनी?. शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे पण कोणते शिक्षण ?.समाजहित,देशहित,सर्वधर्मसमभाव,समता,स्वत्रंता
,स्वाभिमानी
​,बंधुभाव ज्या शिक्षणात नसेल तर ते शिक्षण काय कामाचे ???.


सागर रामभाऊ तायडे,भांडूप,मुंबई.९९२०४०३८५९.

विद्रोही सत्यशोधक

विद्रोही सत्यशोधक 
विद्रोहाची परंपरा खुप जुनी आहे,​ चावार्का पासुन बुद्ध,फुले,शाहु ते आंबेडकरां पर्यंत त्यात अनेक संत समाज व्यवस्था, जाती व्यवस्थेला सुरुंग लावुन वैकुंठ वाशी झाले.व्यक्तिगत फायद्या साठी केलेला संघर्ष हा विद्रोह म्हटल्या जात नाही.समाजातील गोरगरीब मागासवर्गीय जाती जमाती वर केलेला अन्याय अत्याचार हा उगड्या डोळ्याने पाहणे ज्यांना शक्य होत नाही.तो माणुस त्याशक्ती विरोधात लढण्यासाठी तयार होतो तो विद्रोही म्हणुन ओळखल्या जातो.अन्याय अत्याचाराच्या विरोधात प्रथम लढाई करावी लागते,नंतर त्याला वैचारिक वारसा लागतो.तेव्हा तो त्या एक विचारधारेचा विद्रोही गणल्या जातो,बहुचर्चित आदिवासी भागात आदिवासी लोकांनी जेवण बनविण्यासाठी जमिनीवर पडलेले लाकुड तोडले तर तो मोठा चोर समजुन अटक केली जाते.त्या दिवसापासून तो गुन्हेगार ठरतो.पण त्याच भागातील उभे सागाची झाडे कापून गाड्या भरून लाकूड घेऊन जाणारा उच्च वर्गीय,वर्णीय कोण ठरते?.कोणीच नाही पोलीस रिकार्ड मध्ये तो सदन व्यापारी असतो,मग त्या विरोधात गोरगरीबांच्या बाजूने आवाज उचलणारा गुन्हेगार, नक्षलवादी, विद्रोही कसा होतो. म्हणजे न्याय देतांना या देशात नेहमी हाच फंडा लावल्या जातो. त्यालाच मनुवाद म्हणतात.त्या वादाच्या विरोधात जो जो संघर्ष करेल, समाजात जनजागृती करेल, तो विद्रोही ठरतो,आदिवासी समाजाच्या न्याय हक्क साठी लढणारा नक्षलवादी ठरतो,मुस्लिम समाजाच्या न्याय हक्का साठी लढणारा अतिरेकी ठरतो. मागासवर्गीय समाजाच्या न्याय हक्का साठी लढणारा आंबेडकरी विद्रोही ठरतो.सर्वान साठी लढणारा सत्यशोधक विद्रोही ठरतो.
असंघटीत नाका कामगार,घरकामगर, विटभट्टी,रेती,आणि दगड फोडणारा कामगार एकूण बांधकाम करण्यासाठी लागणारा कामगार म्हणजेच असंघटीत कष्टकरी कामगार यांच्या साठी काम करणारा विद्रोही सत्यशोधक म्हणजे विजय गोविंद सातपुते. भांडुपच्या सिद्धार्थ नगर,मिलिंद नगर आणि आंबेडकर नगर या आंबेडकरी चळवळीच्या बाल्ले किल्ल्यातून असंघटीत कष्टकरी नाका कामगारांचे प्रबोधन करून संघटित करण्याचा संघर्ष सुरू केला.असंघटीत नाका कामगारांना समजावुन सांगणे साधे काम नव्हते,कारण नाक्यावर बहुसंख्येने मागासवर्गीय समाजातील लोक त्यात बौद्धांची सांख्य जास्त त्यांच्या रक्तातच बाबासाहेब असतो.त्यांना सामोरे जातांना विजय सातपुते कधीच मागे हटले नाही,वैचारिक पातळीवर चर्चा करतांना त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनेक जन आंदोलनाची अभ्यासपूर्ण माहिती नाक्यावरील कार्यकर्त्यांना देत असत.ज्यांची कोणती ओळख नाही असा नाका कामगारांना संघटनेत पद देऊन त्यांची समाजात ओळख निर्माण करीत असत,गरिबीचे चटके शोषलेला माणुसच गरिबांना संघटित करून त्यांच्या न्याय हक्क आणि प्रतिष्ठे साठी लढू शकतो,हे विजय सातपुते यांनी नाका कामगारांना दाखवुन दिले.म्हणूनच त्यांना पुरोगामी चळवळीत विद्रोही सत्यशोधक म्हणुन ओळखले जात होते.
भारतात गरीब कुंटुंबाची आर्थिक कोंडी नेहमीच होत असते.त्यामुळे त्यांची मुलंमुली शिक्षणा पासुन वंचीत राहतात.शिक्षण नाही तर नोकरी नाही.नोकरी नाही तर कोणतीच प्रगती नाही.त्यामुळे त्यांना शैक्षणिक, सामाजिक,शारीरिक आणि आर्थिक संकटांना सतत संघर्ष करावा लागतो.या सर्व संकटावर मात करून जो नेहमी विजय होतो.आणि स्वतःची वैचारिक ओळख निर्माण करतो तोच खरा विजय असतो.असा माझ्या जीवनात आलेला आणि मला भिम भक्ताचा वैचारिक भिमसैनिक, शिष्य बनविणारा माझा जिवलग मित्र म्हणजेच सातपुतेचा विजय.
विषय कोणताही असो सामाजिक,धार्मिक,शैक्षणिक, आर्थिक किंवा राजकीय यावर वैचारिक चर्चा,वादविवाद, संवाद,परिसंवाद यात अभ्यासपूर्ण उत्तर देऊन समोरच्याला निरुत्तर करून सातपुतेचाच विजय होत असे.ज्याला विजय सातपुतेचे विचार पटले नाही.त्यांनी त्यांचे म्हणणे खोडून काढण्याचा प्रयत्न केल्यास .कोणत्या पुस्तकात लिहले?. कोणी लिहले?.ते पुस्तक तुम्ही वाचले काय?.या रोख ठोक प्रश्नाने विजय सातपुते सर्वांची बोलती बंद करीत होते.यातुन मान्यताप्राप्त नेते,विचारवंत सुद्धा सुटले नाहीत.हे मी त्यांच्या सतत सोबत असल्यामुळे अनुभवले. मी नामांतर चळवळीतील जहाल नेते प्रा.जोगेंद्र कवाडे सर यांचा भक्त होतो.दलित मुक्ती सेना ते दलित मुस्लिम सुरक्षा महासंघ असा प्रवास असतांना.कवाडे सरांना महाराष्ट्रातील सविस जिल्ह्यापैकी सतरा जिल्हे प्रवेश बंदी होती.तेव्हा मला बाबासाहेबानंतर कोणी नेता असेल तर ते फक्त प्रा जोगेंद्र कवाडे सरच असु शकतात.असे वाटत होते. त्यांच्या ऐवढा जहाल नेता राज्यातच काय देशात असुच शकत नाही.असा माझा समज होता.तो समज विजय सातपुते यांनी खोडून काढला.मला त्यांनी विचारले भारतीय संविधान जे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहले ते तुम्ही कधी वाचले काय?.शुद्र पूर्वी कोण होते?.प्रॉब्लेम ऑफ रुपी, बुद्ध आणि त्यांचा धम्म, बाबासाहेबांची विलायते वरून पत्र,चांगदेव खैरमोडे यांची किती पुस्तक वाचली?.यांचे उत्तर माझा कडे नव्हते,कारण आम्ही कधी पुस्तक,ग्रंथ वाचण्याची तसदी घेतलीच नाही.आम्हाला आवड फक्त नेत्यांची भाषण ऐकण्याची.नेते जे बोलतात तेच लक्षात ठेवणे आणि तेच लोकांसमोर बोलणे.त्यात आपला नेता किती प्रामाणिक आणि धाडसी आहे.मोठमोठ्या नेत्याची चड्डी लाल करते याचेच अप्रूप वाटत होते.जहाल भाषा तीही फक्त सत्यानाश करणारी त्यामुळे दोन समाजात दोस्ती होण्या ऐवजी दुश्मनी निर्माण होणार अशी भाषण कवाडे सर तेव्हा करीत होते.त्याभाषणा करीत त्यांना जिल्हा बंदी होती.भारतीय संविधान असे भाषण करून दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्यास जिल्हा बंदी,भाषण बंदी घालते.कारण त्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडून समाजात असणारी शांतता भंग होईल म्हणुन पोलीस असा नेत्यावर योग्य कारवाई करते हे विजय सातपुते कडून समजले तेव्हा पासुन मी भिम भक्ताचा भिमसैनिक शिष्य झालो.त्यांच्यामुळे वैचारिक ग्रंथ,पुस्तक,कथा, कांदबरी वाचण्याची सवय झाली.ती आज ही कायम आहे.त्यांच्यामुळे मी पत्रकार प्रशिक्षण घेतले.मासिक,पाक्षिक,साप्ताहिकात बातम्या लेख लिहण्यास सुरुवात केली.आजच्या घडीला मी राज्यातील आठ वृत्तपत्रात नियमितपणे स्तंभ लेखन करीत आहे.
चळवळ म्हणजे काय?. हे जाणुन घेण्या करीता आम्ही १९८२ ते १९८४ पर्यंत समाजवादी, राष्ट्र सेवा दल,डाव्या आणि आंबेडकरी चळवळीतील विचारवंतांच्या गाठी भेटी घेऊन.परिसंवाद, व्याख्यान,चर्चा सत्र घेऊन अनेक कार्यक्रम राबविले.त्यामुळे सर्वांची जवळून ओळख झाली.कॉम्रेड शरद पाटील यांच्या मुळे डावी चळवळ तिची विचारधारा कार्य आणि कृती दिसुन आली.नामांतर आंदोलनात कॉम्रेड शरद पाटील यांनी आदिवासीनां मोठ्या प्रमाणात मोर्चा,आंदोलनात उतरून स्वतः जेलची शिक्षा भोगली.जातीच्या प्रश्नावर रोख ठोक भूमिका त्यांनी घेतली त्यातुन डाव्या विचारधारेची मंडळी जगातील कामगारांना भांडवलदारांच्या शोषणा विरोधात संघर्ष करण्यास उतरतात.पण जातीव्यवस्थे मुळे होणाऱ्या शोषणा विरोधात लढण्यास तयार होत नाही.नि रोखठोक भूमिका घेत नाही.हे विजय सातपुते यांच्यामुळे कॉम्रेड शरद पाटील सोबत काम करण्यास मिळाल्या मुळे समजले. आजही असंघटीत कामगाराच्या न्याय हक्क साठी लढणारी इंटक,आयटक सिटू रस्त्यावर लढते मोर्चे आंदोलन करते,पण विधानसभेत, लोकसभेत यांचे लोकप्रतिनिधी ४५ दिवस अगोदर ह्याच मांगण्या पक्षाच्या वतीने रीतसर नोंद करून चर्चा घडवून आणीत नाही.तिथे ते पंचतारीक प्रश्नाच्या नांवे गोंधळ घालुन लक्षवेधण्याचे काम करता. वृत्तपत्रात छायाचित्रासह बातमी छापून आली की हे आम्ही तुमच्या साठी भांडतो हे दाखविण्यास मोकळे.हे सर्व समजवून घेण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल्या संविधानाचा अभ्यास करावा लागतो. त्यातील न्याय हक्क आणि अधिकार कसे मिळवायचे यांची उत्तर मिळतात.रस्त्यावर किती ही आंदोलन करा त्यातुन तुम्ही सत्ताधाऱ्यावर आणि प्रशासनावर दडपण आणू शकता.वृत्तपत्रात बातम्या छापुन आणू शकता, तुम्हा ते नेता बनण्यासाठी आणि संघटना वाढीसाठी पूरक असेल,पण न्याय हक्क आणि अधिकार मांगण्या साठी पूरक नसतात. त्याकरिता तुम्हाला सनदशीर मार्गाने पत्रव्यवहार, चर्चा,आणि संवाद साधावा लागेल.ही विजय सातपुते यांचे मांडणी आज ही मला मार्गदर्शक ठरत आहे.
विजय सातपुतेचा वैचारिक अभ्यास खूप होता,त्याबळावरच ते अनेक सुप्रसिद्ध विचारवंत,पत्रकार,साहित्यिक,नेते यांच्या बरोबर चर्चा करून वादविवाद घालुन वैचारिक संघर्ष करीत असत.त्यात प्रा.अरुण कांबळे,नामदेव ढसाळ,राजाभाऊ ढाले,निलिनी पंडित ते शेवटी कॉम्रेड शरद पाटील यांच्या पर्यंतचा संघर्ष तोंडी आणि लेखी मी अनुभवला आहे. एवढेच नाही तर राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे छत्रपती शिवाजी महाराज,मराठी आणि मुंबई वरील प्रेम किती ढोंगी आहे हे त्यांनी वेळोवेळी सिद्ध करून दाखविले,ठाकरे कंपनी ने कधीच सनद शीर मार्गाने आंदोलन केले नाही.तोडफोड गुंडगिरी,विशिष्ट समाजाच्या विरोधात जातीवादी गरळ ओकुन कायदा सुव्यवस्था बिगडविण्याचे काम एक नाही हजारदा केले पण मनुवादी विचाराचे समर्थन करणाऱ्या सत्ताधारी,प्रशासकीय यंत्रणेने कधीच संविधानाच्या चौकटीत राहुन कारवाई केली नाही.

विजय सातपुते यांच्यात एकच कमजोरी होती.ते तडजोड करीत नसत.त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या युपी,बिहारी विरोधातील मोहीम ही फक्त गरीब फेरीवाले टॅक्सीवाल्या पुरती होती.पण मोठमोठे बिल्डर,त्यांच्याकडे माणस पुरविणारे ठेकेदार,सुरक्षा रक्षक पुरविणाऱ्या ठेकेदारा विरोधात त्यांनी कधी आवाज नाही उचलला.युपी बिहारच्या उच्च वर्णीय वर्गीय लोकांना पायघड्या टाकणार आणि मागासवर्गीय कष्टकरी लोकांना मारहाण करणार या विरोधात विजय सातपुते यांनी "उत्तर भारतीय हटाव मुंबई बचाव" आंदोलन केले होते.त्यात शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते,काही नगरसेवकानी पाठिंबा दिला होता.पण जाहीर भूमिका घेऊ शकत नव्हते. ते व्यक्तिगत भाग घेण्यासाठी तयार होते.त्यांची मदत घेतली असती तर या आंदोलनाला तीव्र धार आली असती.आणि नेतृत्व त्यांच्या कडे गेले असते.हा सातपुतेनां धोका वाटत होता.यामुळेच हे आंदोलन थांबले.दलित ऐक्य हा विषय भी सातपुतेनी खुप चांगल्याप्रकारे प्रबोधन करून सोडविण्याचा प्रयत्न केला.सर्वच आंबेडकरी बाल्ले किल्यात असंघटीत कष्टकरी कामगार,मजुर मोठ्या प्रमाणात आहेत.त्यांची सामाजिक दृष्ट्या एकजूट झाल्यास त्यांनी आपल्या नगरातील विविध गटाच्या कार्यकर्त्या पैकी एकाचीच निवड करावी.ते ही सर्वाना विहारात किंवा मैदानात एकत्र बसवुन चर्चा करून कार्यकर्ता नेता निवडावा,त्याला असंघटीत कामगार मजूर कोण आहेत,त्यांचे कोणते प्रश्न आहेत,त्यांच्यासाठी कोणता कायदा आहे यावर चर्चा करावी,तरच त्यांना आपण बाबासाहेबांच्या विचाराचा कार्यकर्ता,नेता मानावे,हा प्रयोग अनेक ठिकाणी यशस्वी झाला.दारू पिऊन शिवीगाळ करणे,त्या विरोधात पोलीस तक्रार करणे,यात अटक झालेल्या माणसाला सोडवून आणने ही ओळख असणाऱ्या कार्यकर्त्यांना सातपुते यांचे नेतृत्व खटकायला लागले.त्या कार्यकर्त्यांनी सातपुते कम्युनिस्ट आहे लाल बावट्यावाला आहे.असा प्रचार सुरू केला.पण विजय सातपुते हा साधा माणुस नव्हता.तो विद्रोही सत्यशोधक होता.
असंघटीत नाका ​कामगारांना केवळ कामगार ,मजूर म्हणून संघटीत करणे अशक्य आहे,करिता त्यांना दुख मुक्तीचा मार्ग दाखविणाऱ्या तथागत बुद्धाचा धम्म सांगणे आवश्यक आहे.मग त्याकरिता विजय सातपुते यांनी बुद्धगया महाबोधी महाविहार 
मुक्ती अभियान समितीची स्थापन केली आणि मुंबईतील सर्व बुद्ध विहार समिती,कमिटीच्या लोकांना भेटून बुद्धगया महाबोधी महाविहार 
बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे.यासाठी जनप्रबोधन करण्यास सुरवात केली.ख्रिचन समाजाचे चर्च ख्रीचनाच्या ताब्यात असते.मुस्लीम समाजचे मझीद मुस्लिमाच्या ताब्यात असते. शीख समाजाचे गुरुद्वारा शीख समाजाच्या ताब्यात असते.हिंदूचे सर्व मंदिर हिंदुच्या ताब्यात असतात.मग बुद्धाचे बुद्ध विहार महंताच्या ताब्यात का ?.या अभियानात अनेक मान्यवर सहभागी झाले होत.बारावर्ष बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती अभियान चालले माननीय अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असतांना त्यांना पाच लाख सह्याचे निवेदन दिले त्यामुळेच पाच हिंदू ,पाच बौद्ध भिक्खू एक जिल्हा अधिकारी अध्यक्ष एकूण अकरा लोकांची कमिटी झाली त्यात भन्ते प्रज्ञावंत सेक्रेटरी झाले.याची माहिती बुद्धगया येथील भन्ते नी मुंबईच्या लोकांना दिली.बुद्धगया येथे सुशिक्षित लोकांच्या वार्षिक धम्म पर्यटन करण्यासाठी गेलेल्या लोकांना विचारले कुठून आला त्यांनी सांगितले मुंबई वरून भन्तेनी विचारले विजय सातपुते,सागर तायडे,चंद्रकांत गमरे,गौतम जाधव,अनंत तपासे यांना ओळखता?.ज्यांनी मुंबईतून बुद्ध गया महाबोधी महाविहार मुक्तीचे अभियान राबवून पंतप्रधान यांना पाच लाखाचे निवेदन दिले त्यामुळे पाच बौध्द भिक्खू या कमिटी वर आहेत.बुद्धगया फिरून आलेल्या अनेक लोकांनी मुंबईत आमची भेट घेतली.हा विजय सातपुते यांच्या वैचारिक संघर्षाचा इतिहास खूप लोकांना माहित नाही.त्यांच्या स्मुर्ती दिना निमित्य याची आठवण येते.विजय सातपुते खरे विद्रोही सत्यशोधक होते.त्यांनी कॉम्रेड शरद पाटील यांच्या विरोधात लिहण्यास मागे पुढे पहिले नाही.पूर्णवेळ कार्यकर्ता,नेता,साहित्यिक,संपादक,कामगार नेता बनण्यासाठी त्यांनी सेवा निवृत्ती स्वीकारली होती.पण शाररीक दुघर आजाराने त्यांना पछाडले बायपास होऊन दोन वर्ष जगतील असे डॉक्टरने सांगितल्यावर ते दहा वर्ष जगले.तरी ते घरात बसून अनेक विषयावर लिहत असत.आणि मित्र मंडळीशी चळवळी बदल चर्चा करीत असत.अशा या विद्रोही सत्यशोधक विजया सातपुते यांना स्मृती दिनानिम्मित विनम्र अभिवादन!.
सागर रामभाऊ तायडे.भांडूप मुंबई.९९२०४०३८५९ 

रिपब्लिकन ​पक्षाचे अंतिम उद्धिष्ट कोणते ?.

रिपब्लिकन ​पक्षाचे अंतिम उद्धिष्ट कोणते ?.
आजच्या तरुणांना रिपब्लिकन पक्ष कोणाचा आहे असे विचारले तर काय उत्तर मिळेल?.ते ऐकण्याची तयारी कोणाचीच नसणार, कारण त्यांच्या आजू बाजूच्या नगरातील विभागातील कार्यकर्ते नेते दररोज सकाळी कुठे भेटतात आणि संध्याकाळी काय करतात. त्यांचे उधोगधंदे व उत्पन्नाची साधन व मार्ग कोणते यांची पूर्ण कल्पना विभागातील समाजाच्या लोकांना असते.त्यांनी जर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे क्रांतिकारी तत्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न केला तर लोक त्यांच्या कडे तिरक्या नजरेने पाहतात.कारण क्रांतिकारी विचाराचे आचार कुठेच दिसत नाही.दलाली,गुलामगिरी आणि लाचारी नसानसात भरलेली माणस जेव्हा स्वाभिमानाची गोष्ट करतात तेव्हा जवळची लोकच त्यांच्या कडे संशयाने पाहतात.ते तसे जगण्यासाठीच एकाच नगरात एकाच गटाशी प्रामाणिक राहत नाही,तथागत बुद्ध वाचनालय काढतील पण त्यावर बुद्ध आंबेडकर यांच्या फोटो पेक्षा राष्ट्रवादी नेत्याच्या भाऊ,वहिनी,आईचा फोटो किती महत्त्वाचा आहे हे नगरातील विभागातील लोकांना दाखवुन देतील त्याला स्वाभिमानी,आंबेडकरी विचारांचे माणस विरोध करण्याचे धाडस कधीच करणार नाहीत. मागे जरूर बोलतील पण समोर नाही.मूर्ख आहे तो त्यांच्या कशाला नादी लागावे असे म्हणूनच त्याला सोडून देतील.पुढे जयंतीला,वर्षावास समारोप, महापरिनिर्वाण दिनाला भोजन दान व बॅनर त्यांच्या कडुन मात्र न चुकता घेतील.त्यामुळे नगरात विभागात रिपब्लिकन कार्यकर्ता नेता जातीने व कार्याने ओळखला जातो.आज माझी मुले विचारतात रिपब्लिकन पक्षाचे अंतिम उद्धिष्ट काय होते ?.ते कुठे दिसते काय ? प्रत्येक नेत्याचे समाजा बाबत काय मत आहे हे जर ऐकले तर लढावे की रडावे हाच प्रश्न पडतो.क्रांतिकारी विचाराचा शब्द रिपब्लिकन आणि बहुसंख्येने असलेला समाज म्हणजे हत्ती सारखी शक्ती तीच आपली निशाणी.कुठे आहे?.
भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अधिकृत नाव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असे आहे. भारतीय रिपब्लिकन पक्ष हा भारतातील शोषित पिडीत आदिवाशी मागासवर्गीय समाजाचा म्हणजे बहुजन समाजाचा रिपाई म्हणूनच ओळखला जातो.तसा भारतातील सर्वात मोठी संख्या असणारया समाजाचा हा राजकीय पक्ष आहे. डॉ.भिमराव आंबेडकरांनी सुरू केलेल्या शेडूयूल्ड कास्टस फेडरेशन या सामाजिक संघटनेतून हा पक्ष उदयास आला.या पक्षाचे मुख्य बलस्थान महाराष्ट्र होते.शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन या सामाजिक संघटनेने राजकारणात उतरून  निवडणुकीत भाग घेतल्यामुळे अनेक समाजाचे समीकरण बदललेले होते. त्याचमुळे त्याची राजकीय पक्षात गणती होत होती.आज तो सत्ता मिळवुन देणारा समाज म्हणूनच ओळखला जातो.
शेडूयूल्ड कास्टस फेडरेशन या सामाजिक संघटनेतून राजकीय पक्ष. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही संकल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची होती.त्याच्या महापरीनिर्वाणा नंतर ३ ऑक्टोबर १९५७ रोजी त्यांच्या निष्टावंत अनुयायांनी रिपाईची स्थापन केली.पण सुरवात पासूनच या पक्षाचा संपूर्ण इतिहासच अहंकाराचा आणि फाटाफुटींनी भरलेला आहे. तेव्हा पासून आज पर्यंत दररोज ‘रिपब्लिकन’ हा शब्द असलेला एक राजकीय पक्ष (गट) स्थापन होतो आणि पुढे तो फुटतो, असे या ऐतिहासिक रिपाई प्रक्रियेचे एकूणच वर्णन करता येईल.  त्यामुळेच रिपब्लिकन पक्ष त्यांच्या अंतिम उद्धिष्ठा पर्यंत पोचला नाही.भारताला आणि भारतीयांना कठीनातील कठीण प्रश्न,समस्या सोडविण्यासाठी त्यांनी लोकशाही दिली.संविधानाची योग्य अमंलबजावणी केली तर कोणत्याही समस्या सुटू शकते.पण रिपाई ने त्याला महत्व न देता स्वार्थ व अहंकार या शब्दाला यांनी खूप महत्व दिले आहे.म्हणून आज ही यांची संपूर्ण इमारत त्यावरच उभी आहे.बाबासाहेबांनी १४ ऑक्टोबर १९५६ बौद्ध धम्माची दिक्षा देताना त्यात त्यांनी त्रिसरण,पंचशील,आणि बावीस प्रतिज्ञा दिल्या होत्या हे सर्वच कार्यकर्ते नेते विसरले आहेत म्हणून रिपाई किंवा इतर समाजिक,धार्मिक संघटना नेहमी अहंकारा पायी फुटतात असे म्हटले तर चूक ठरणार नाही.त्यांनी संविधान मान्य केले असते तर आज रिपब्लिकन समाज रिपब्लिकन पक्षाचे अंतिम उद्धिष्ठ गाठण्याच्या स्पर्धेत असता.  
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पक्ष म्हणून ओळखणारा रिपाई पहिल्यांदा फुटला तो १९५८ साली. म्हणजे पक्ष स्थापने नंतर एक वर्षांच्या आतच. तेव्हा ही नेतृत्व कुणी करायचे, यावरूनच पक्ष फुटला होता. त्यातून खोब्रागडे -गायकवाड आणि कांबळे-रूपवते असे दोन गट निर्माण झाले. १९६४ मध्ये गायकवाड गटातून आर. डी. भंडारे बाहेर पडले तर १९६५ मध्ये कांबळे गटात फूट पडून रूपवते बाहेर पडले आणि गायकवाड गटाशी त्यांचे ऐक्य झाले.म्हणजे ज्यांना विरोध केला त्यांच्या कडेच गेले.पुढे आर डी भंडारे आणि रुपवते कॉंग्रेसवासी झाले. त्यानंतर आजपर्यंतचा या पक्षाचा संपूर्ण प्रवास फाटाफूट आणि ऐक्य यांनी रंगलेला आहे. वारंवार झालेल्या या फाटाफुटी व ऐक्यामुळे ‘फूट’ आणि ‘ऐक्य’ या दोन्ही शब्दांचे रिपब्लिकन चळवळीच्या संदर्भातले गांभीर्यच नष्ट झाले आहे.आता पर्यंत या पक्षाची ५० हून अधिक छकले झाली आहेत, आणि अशा प्रत्येक छकलाचा एक स्वतंत्र राजकीय पक्ष झाला.रिपाई नांवा शिवाय हे स्वताचे अस्तित्व दाखऊ शकत नाही.
आंबेडकर अनुयायाची आत्मपरीक्षण करण्याची तयारी नसल्या मुळे मी बरोबर बाकी सर्व चूक हे सिद्ध करण्यात या नेत्यांनी आपली "व्यापक रिपब्लिकन पक्ष अस्तित्वात येउच शकत नाही ?" अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आंबेडकरी चळवळ संपली आहे  पुस्तकरुपी निष्कर्षा नंतर त्यांनी आंबेडकरी चळवळीचे काम सोडून दिले आणि डाव्या विचाराच्या विविध गटांना जवळ करून नक्षलवादी विचाराच्या तरुणाना जाहीर पाठिंबा दिला त्यातूनच महाराष्ट्र लोकशाही आघाडी निर्माण झाली
.प्रा.जोगेंद्र कवाडें सारखा प्रामाणिक नेता खासदाराचे मागच्या दराने आमदार झाले.आणि रिपाई मधील उरला सुरला प्रामाणिकपणा संपवला.रिपब्लिकन चळवळ नावापुरती शिल्लक राहली असा धोक्याचा गंभीर इशारा देणाऱ्या बाळासाहेबांनी आंबेडकरी चळवळीच्या वाताहताची शोधून काढलेली कारणे आणि मांडलेले निष्कर्ष पाहता त्यावर सविस्तर चर्चा खूप झाली.पण ते केवळ कार्यकर्त्याच्या लेवलवर ती बुद्धीजीवी वर्गाच्या पातळीवर झाली असती तर समाजाला नेमखी दिशा देता आली असती.परंतु बहुसंख्य बुद्धीजीवी भिती पोटी सत्य मांडण्याचे धाडस करीत नाही. अनेकांनी आंबेडकरी चळवळ संपली नसल्याचे दावे केले, पण तिच्या जीवंतपणाची लक्षणे कोणती ह्याबाबत ठामपणे स्पष्टीकरण दिले नाही.आज आंबेडकरी चळवळीचे बालेकिल्ले संपूर्णपणे उध्स्त झालेले (वैचरिक पातळीवर) स्पष्ट दिसतात.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल एक पत्र १ ऑक्टोबर १९५७ रोजी 'प्रबुध्द भारत' मध्ये भारतीय जनतेला उद्देशून प्रसिद्ध झाले होते. हे पत्रच रिपब्लिकन पक्षाची घटना मानली जावी असा सर्व नेत्याचा आग्रह होता. त्यात न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता हि पक्षाची ध्येय असतील, पक्षाच स्वरुप प्रादेशिक न राहता ते देशव्यापी असेल असे स्पष्ट करुन, आपल्या अनुयायांना बाबासाहेब सांगतात, 'हा पक्ष देशातील सर्व कष्टकरी मागासवर्गीय समाजातील शोषित,वंचित ,पिडीत जनतेच्या हिताचा रक्षणकर्ता असेल.अनुसूचित जाती-जमाती, बौद्ध आणि मागासवर्गीय लोकांच्या हितासाठी प्रयत्न करण्याची बांधिलकी स्विकारलेला असेल. शासनकर्ती जमात बनतांना जो पक्ष आपल कल्याण करील, त्यांच्याशी हातमिळवणी करावी. दुस-या पक्षाशी सहकार्य करतांना आपला पक्षाच्या तत्वज्ञान, ध्येय आणि उदिष्ट यांना धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी. नेता एकच असावा आणि पक्षही एकच असावा. पक्षाच चिन्ह हत्ती हे बुद्ध संस्कृती मधिल प्रतिक तर, अशोक चक्रांकित निळा झेंडा हे निशाण असे बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या पक्षाबद्दलचे मत स्पष्टपणे मांडलेले होते.हा इतिहास आजचा तरुण वाचायला तयार नाही.म्हणून तो इतिहास वाचून इतिहास घडविण्यास तयार नाही.तो दिशाहीन झाला आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर ३ ऑक्टोबर १९५७ साली बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाची नागपूर दिक्षा भूमीवर स्थापना झाली होती. त्यानंतरच्या सार्वत्रिक निवडणूकात पक्षाने दैदिप्यमान, नेत्रदिपक यश संपादन केले होते. त्यावेळी त्याची राजकीय शक्ती प्रभावशाली आणि सर्व समाजाचे लक्षवेधनारी होती, त्यात सतर टक्के असंघटीत कष्टकरी मजूर, शेतमजूर, कामगार होता.त्यांचा नेत्यावर विश्वास होता.पण त्यानंतरच्या काळात बाबासाहेबांच्या क्रांतिकारी विचाराचा नेत्यांना विसर पडला आणि युती आघाडी वर भर देण्यात आला.त्या काळी एका मान्यताप्राप्त नेत्याचा एक मंत्र होता गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली.बाबासाहेब आंबेडकरांनी उभी केलेली पोलादी, प्रभावशाली, बलाढ्य एकसंघ असलेली संघटना, रिपब्लिकन पक्षाची चळवळ सामाजिक, राजकीयदृष्ट्या सक्षम नेतृत्वा अभावी, मतभेद,अहंकार, स्वार्थी राजकीय महत्त्वकांक्षापोटी फुटत गेली. इतर राजकीय पक्षांशी तडजोड करीत.प्रत्येक गटाचे नेतृत्व बेफिकीर, दिशाहीन बनत गेले. गटा तटाच्या निच राजकारणामुळे आपल्या समाजातील अनेक लोक इतर राजकीय पक्षात कार्यरत होत गेले.या सर्व घडामोडींवर बारीक लक्ष ठेवणारा फार मोठा बुद्धिजीवी वर्ग अलिप्त राहिला.आज आमचे काही दैनिक आहेत पण त्या दैनिकाच्या संपादकाचे आंबेडकरी चळवळी बाबत कोणत्याही विषयावर एक मत होत नाही.राजकीय नेत्या सारखे ते एकमेकाच्या जवळ बसून किमान एक कार्यक्रम बनवून समाजा समोर भूमिका मांडण्याची हिंमत दाखवत नाही.त्याच बरोबर आंबेडकरी विचारांची एक राष्ट्रीय ट्रेंड युनियन नाही जे देशातील तमाम कामगार,कर्मचारी आणि अधिकारी यांच्या दबावाखाली काम करेल.मग देशातील ९३ % असंघटीत कामगार मजुरांचे समाज प्रबोधन कोण करेल ?.
१९२७ ते १९५६ पर्यंत मागासवर्गीय शोषित वंचित समाज जो असंघटीत कामगार शेतमजूर होता तो असुशिक्षित अज्ञानी मोठ्या प्रमाणत होता तरी तो डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रत्येक जनआंदोलनात अक्षरशः आपले जीवन कुर्बान करीत होता, समाजातील असंघटीत कामगार मजुरांच्या ध्येय धोरणांशी, कार्याशी आपण जितके प्रामाणिक राहू, तितकी बाबासाहेबांची चळवळ आपल्यात जीवंत राहिल. रिपब्लिकन पक्षाच्या गटा तटांना अनेकदा भावनिकतेवर आधारित ऐक्य करावे लागले आणि ते करण्यास भाग पडणारा कोणी पदवीधर प्राध्यापक,डॉक्टर,वकील,इंजिनियर नव्हता. आंबेडकर चळवळ संपली या छोट्या पुस्तकात लेखक बाळासाहेब आंबेडकर यांनी ऐक्यासाठी उपोषण करणारे कोण आहेत आणि त्याचे शिक्षण व रोजगार काय आहे हे नांवासह दिले आहे.सर्व असंघटीत कामगार मजूर होता.हे लक्षात घ्या.आताही त्यांनाच पुढाकार घ्यावा लागेल.कारण समाजात असंघटीत कामगारंचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढत आहे.त्यांच्या पाठीवर कोण कधी हात ठेऊन आपले करेल हे सांगता येत नाही. रिपाईच्या सर्व बालेकिल्ले कुठे आहेत हे शोधावे लागेल. अहंकार, मतभेद, प्रलोभन, अमिषापायी आंबेडकरी चळवळीतील सामाजिक, राजकीय निष्ठा गौण ठरत आहे. आज आपला सामाजिक, राजकीय पाया काय आहे ?. ज्या क्रांतिकारी चळवळीला तत्वज्ञान आहे, क्रांतिकारी सामाजिक बांधिलकी असलेले कार्यकर्ते आहेत, परंतु त्याच समाजासमोर,चळवळीसमोर पर्याय नसल्याने आज अनेक प्रश्नचिन्ह आहेत.अत्याचार आणि भावनिक प्रश्नापुरती चळवळ फक्त लढते आहे.पण निकाल काय ?.संविधाना नुसार ग्रामपंचायत ते राष्ट्रपती पर्यंत निवडणुका होऊन निकाल लागतो.त्याकरिता भारतीय नागरिक म्हणून नांव नोंदणी झाली तरच मतदानाचा अधिकार असतो ,ग्रामपंचायत सदस्य ते आमदार,खासदार कोण कोणाला कसे निवडून देते हे उठता बसता भारतीय घटनेच्या शिल्पकारांचे नांव घेणाऱ्या समाजाला सांगणे मला शोभणारे नाही.   
डॉ.बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या राजकीय पक्षाची आपण काय अवस्था करुन ठेवली आहे ? पक्षाची राजकीय मान्यता, निवडणूक चिन्ह ही आपण केव्हाच गमावून बसलो आहोत. अत्याचार, अन्याय,भावनिकता आणि बाबासाहेबांच्या नावाचे भांडवल करुन अजून किती सोयीच राजकारण आपण सर्व करणार आहोत?. राजकारणात बेरीज चालते,आपण तर वजाबाकी व भागाकार करीत आहोत.आपली निर्णायक बलाढ्य शक्ती असतांना, आपण राजकारणात अदखलपात्र का ठरु लागलो ? आंबेडकरी चळवळ राजकीय, सामाजिक चळवळीचे होत असलेले पतन आंबेडकरी अनुयायांना अभिमानास्पद आहे का ? प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे प्रत्येक गटा तटाचा फायदा इतर राजकीय पक्षांना होणार असेल तर?. राजकारण कशासाठी, कोणासाठी आणि का करायचे ?.
३ ऑक्टोबर २०१७ रोजी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या स्थापनेला ६० वर्ष पुर्ण होत आहेत.काही रिपाई गटाची मान्यता रद्ध करण्यात आल्याचे आपण वाचले असेलच.कारण त्यांनी रीतसर हिसाब ठेवला नाही आणि सादर केला नाही.तीच परिस्थिती सामाजिक धार्मिक शौक्षणिक संस्था,संघटना यांची आहे.मग आता कोणता रिपाईचा गट बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचाराचे नेतृत्व करण्यास सक्षम आहे.
राज्यात आणि देशात ​एका रिपब्लिकन गटाचे नांव सतत चर्चेत असते.ते म्हणजे नामदार खासदार रामदास आठवले देशातील एकमेव नेता ज्यांना भेटण्यास कोणतीही वेळ व जागेचे बंधन नाही.वैचारिक शत्रूच्या कळपात जरी असले तरी आपला ठसा सर्व समाजात ठेऊन आहेत.त्यांच्या सोबत जो फौजफाटा आहे तो सर्वच क्षेत्रात संघर्ष आणि नेतृत्व करण्यास तयार असतो.रामदास आठवले यांची बहुजन समाजात रिपब्लिकन नेते म्हणून ओळख समाजमान्य आणि लोकमान्य आहे. रिपब्लिकन पक्षाचा वर्धापनदिन अधिकृत पणे साजरा करणारा एकमेव गट असला.तरी तो रिपब्लिकन पक्षाचे अंतिम उद्धिष्ट गाठण्यास असमर्थ आहे.कारण त्यांच्याही गटाला संविधान किती मान्य आहे हे त्यांच्या कार्यप्रणाली आणि जाहीर सभेच्या स्टेजवरील नेत्याच्या गर्दीवरून लक्षात येते.सर्वच रिपब्लिकन गटाचे नेतृत्व करणारे एक नंबर नेतृत्व सोडल्यास राज्यात दोन,तीन चार पाच नंबर राज्याचे नेतृत्व करणारे नेते नाहीत. प्रशिक्षित कार्यकर्ते नाहीत.लेटर हेड वर जगणारे कार्यकर्ते समाजाला स्वाभिमानी बना सांगु शकत नाही. सरकारी योजनांची अभ्यासपूर्ण माहिती नाही.समाजाचा आणि जनतेला कसा लाभ मिळवुन द्यावा यावर जनांदोलन उभे न राहता स्वतःला किती कमिशन अथवा दलाली भेटलं यावर सर्व लक्ष केंद्रित असलेले कार्यकर्ते, नेते पक्षाला कोणती दिशा दाखवून पुढे नेतील. त्यामुळेच असंघटीत कष्टकरी कामगार,मजूर,शेतमजूर मोठ्या संख्येने इतर पक्ष संघटने कडे वळतो आहे.याचा सर्वच जागृत कार्यकर्ता,बुद्धीजीवी,साहित्यिकांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे.रिपब्लिकन विचारधारा किती हि चांगली असली तरी तिचे आचरण करणारे अनुयायी नसतील तर रिपाई रिपब्लिकन पक्षाचे अंतिम उद्धिष्ट गाठूच शकत नाही.लोकशाहीचे बंधन मान्य नसणारे कार्यकर्ते लगेच पन्नास शंभर लोक सोबत घेऊन पक्ष संघटना काढत राहिले म्हणजे काय होईल?.म्हणून सर्व गल्लीबोळातील तरुणांनी प्रथम आपल्या विभागातील   स्वार्थी,अहंकारी कार्यकर्ते संपविण्याची जबाबदारी घ्यावी.आणि आपल्या परीसारतील आंबेडकरी समाज एकसंघ करण्याचा प्रयत्न करावा.भारताला दिलेल्या लोकशाहीच्या मार्गाने नेता निवडावा जो लोकशाही मान्य करीत असेल आणि लोकशाहीने पक्ष संघटना चालवीत असेल तोच रिपाईचा नेता असेल.रिपाईच्या वर्धापन दिना निमित्य एक संकल्प करूया आणि रिपाईला संविधान मान्य असेल.त्याची अमंलबजावनी करून रिपाई ​अहंकार मुक्त करून ​येणाऱ्या एकष्टाव्या वर्षात रिपब्लिकन रिपब्लिकन पक्षाचे अंतिम उद्धिष्ट कोणते ? ते ठरवुन काम करूया आणि ते करण्यासाठी आत्मचिंतन आत्मपरीक्षण करून तरुणांना संधी देऊ या  
सागर रामभाऊ तायडे,भांडूप मुंबई,९९२०४०३८५९.​