शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०२०

नव्या युगाची वटपौर्णिमा

 नव्या युगाची वटपौर्णिमा

  १९व्या शतकात म.फुले व सावित्रीमाई यांनी आपले हक्काचे घर सोडले,अनेक हालअपेष्टा सहन केल्या,समाजाची दुषने झेलली. ते फक्त मुलींना शिकता यावे म्हणून. त्यांना वाटायचं
मुली शिकल्या म्हणजे मानसिक गुलामी तुटेल.त्या स्वतंत्रपणे विचार करु शकतील.पण आज २१ व्या शतकात आम्ही शिक्षणाने वरकरणी बदल स्वीकारले. पण सावित्रीमाईंच्या शिक्षणाचा अर्थ खूप व्यापक होता. आपण जे जे करतो त्याची चिकित्सा करता यावी हे शिक्षणाने साध्य व्हाव असं सावित्रीमाईंना वाटायंच.लहानपणापासून आपली आजी,आई काय करते त्या साच्यात तिचे मडके घडत असते. पूर्वीच्या काळाचा जर विचार केला तर त्यांना शिक्षणापासून जाणिवपूर्वक दूर ठेवले होते त्या व्यवस्थेने जे जे सांगितले ते सर्व त्यांनी निमूटपणे केले. पण आज स्री कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. तिने सर्व क्षेत्रांत उत्तुंग भरारी मारलीय. त्यामूळे जसे आले तसे स्वीकारण्यापेक्षा प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करणे गरजेचे आहे. वटपौर्णिमा हे प्रत्येक हिंदू स्री ने सात जन्म हाच पती मिळावा म्हणून करायचे व्रत आहे. बरं सहज प्रश्न पडतो प्रत्येक हिंदू स्री हे व्रत दरवर्षी करते तर एकही "विधवा" स्री दिसलीच नसती!.
 बरं असा एखादा उपवास आहे का की नवरा हीच बायको सात जन्म मिळावी म्हणून करतो. या व्रताबाबत विशेष म्हणजे दारु पिवून गटारात लोळून  येणाऱ्या व बायकोला बेदम मारणाऱ्या नवऱ्यासाठी ही हे व्रत बायका करतांना दिसतात.याला काय म्हणायंच???.
वटपौर्णिमे बाबत एक मार्मिक किस्सा डॉ.नरेंद्र दाभोळकरांनी सांगितला होता की एका गावात काही बायका मनोभावे हे वडाला प्रदक्षिणा घालीत व्रत करत आसतात. तेवढ्यात एक बाहेर गावचा तरुण येतो व एका स्री ला ओढत घेऊन जातो,वेढे मारायला विरोध करतो.जेव्हा त्याला गावकरी याबाबत विचारतात तर असे कळते की ती त्याची बायको आहे व गेल्या दोन वर्षापासून ती सासरी नांदत नसून माहेरातच रहात आहे.नवऱ्याच म्हणणे अगदी योग्य की याच जन्मात आमचे पटत नाही तर पुढच्या सात जन्मी मी तसाच राहू काय?.कशाला हे व्रत करते?.
या व्रताची आख्यायिका हे सांगते की अश्वपती नावाचा एक राजा असतो.त्याला अपत्य नसते.देवीच्या पूजेनंतर १८ वर्षांनी त्याला मुलगी होते. तिचे नाव "सावित्री ". ती खूप सुंदर,रुपवान असते.ती उपवर झाल्यावर अमात्यांना सोबत घेऊन वराच्या शोधात निघते.एका जंगलात तिला सत्यवान भेटतो.त्याचे राज्य जावून तो परागंदा झालेला असतो. तसेच सत्यवानाचे वडील हे अंध असतात.तरीही अश्वपती या लग्नाला तयार होतात. जंगलात मोठ्या थाटामाटात हा विवाह संपन्न होतो.लग्न झाल्यावर बरोबर १ वर्षाने सत्यवान- मरतो.यम त्याचे प्राण घेऊन निघतो.त्यावेळी सावित्री त्याचा पाठलाग करते. यम तिला समजावतो पण ती परत जात नाही.ती पतीच्या प्राणासाठी खूप हट्ट धरते.त्यावेळी यम तिला वरदान देतो.ती तीन वर मागते ते असे की 
(१) माझ्या सासऱ्याला त्यांचे राज्य व ते बघण्याची दृष्टी,(२) निसंतान पित्याला १०० पुत्र होवू दे व (३.) माझा संसार सुखी व दीर्घायु होवू दे.
व त्यानंतर वडाच्या झाडाखाली सत्यवान जिवंत होतो..अशी ही कथा आपल्याला आदर्श घालून देते की स्वतःसाठी काहीच मागायचं नाही. ही कथा आणि अशा अनेक व्रतांच्या कथा पुरुषप्रधान संस्कृतीला खतपाणीच घालतात. बाईचं समाजातील स्थान हे धर्मग्रंथांनी नेमून दिलेलं आहे.ते ती कशाप्रकारे पार पाडते यावरुन तिची समाजातील किंमत ठरते.या प्रथा परंपरांची बाई उत्तम वाहक असते. ज्याप्रकारे पुरुषाच्या कर्तृत्वाचं मुल्यमापन होतं,तसं बाईच्या कर्तृत्वाचं मुल्यमापन होत नाही.त्यामुळे बाया परंपरा सोडायला तयारच होत नाहीत.कारण त्यांना त्यातूनच मान मिळतो. बाई त्यात स्वतःला सुरक्षित समजत असते. वटसावित्रीसारखी व्रते काही  बायका केवळ हे पटत नसतांनाही समाज काय म्हणेल या धाकापोटी करतात.केवळ दबावापोटी करतांना दिसतात. समजा एखाद्या स्रीने लग्नाच्या दोन-तीन वर्ष हे व्रत केले व पुढे त्यांचे बिनसले व घटस्फोट घेण्याची वेळ आली तर हाच नवरा तिला सात जन्म मिळाला तर चालेल काय?.
भारतीय संस्कृतीत व्रतवैकल्यांची योजना एकप्रकारे निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी होती. खरं तर काळ बदलला आपण आपल्या कृतीने आधीच निसर्गाची अपरीमित हानी केलीय. शहरीकरणाने, रस्तारुंदीकरणाने  मोठमोठाल्या वडांच्या झाडांच्या कत्तली झाल्यात व त्यात भर म्हणजे वटपौर्णिमेच्या निमित्ताने बायका सर्रास या दिवशी महानगरांमधे वडाच्या झाडांच्या फांद्या विकत घेवून पूजतात. कहर म्हणजे एक वनस्पती शास्राची डॉक्टरेट प्राध्यापिकाही असेच वागते, तेव्हा तिच्या  शिक्षणाचा उपयोगच काय? 
ही एक प्रकारे निसर्गाप्रती कृतघ्नताच नाही का?
व्रतांच्या निमित्ताने उपवास आलाच,आधीच आम्हा बायकांच हिमोग्लोबीन लेवल कमी, त्याची किंमत ढासळत जाणाऱ्या आरोग्याने मोजावी लागते. भारतीय संस्कृतीतील सर्व व्रते सवाष्ण बायकांनी करावयाची आहेत.म्हणजे जिचा पती जिवंत आहे तिलाच सगळीकडे मान.यानिमित्ताने आपण विधवा,परीत्यक्ता स्रियांच माणूस असणं तर नाकारत नाही ना?यासाठी आता कालसुसंगत विचार होणे गरजेचे आहे. आनंदाच्या नव्याने व्याख्या कराव्या लागतील.वडाला फेरे घालत स्वतःच्या वेळ अन् श्रमाचा अपव्यय करण्यापेक्षा पतीला व कुटूंबाला आयुष्यभर पुरेल एवढे "ऑक्सिजन देणारे एक वडाचे झाड लावले तर ही तुमच्या पतीप्रती असलेल्या प्रेमाची सच्ची पावती ठरेल". पूरोगामी विचाराच्या पतीने बऱ्याचदा सांगितले पण फारस मनावर न घेता सगळ्याजणी करतात म्हणून करत आले.या लॉकडाऊनच्या निमित्ताने अनेक वैचारिक पुस्तके वाचण्याचा योग आला व एक नवी दृष्टी लाभली.यंदाची वटपौर्णिमा निश्चितच माझ्यासाठी खास...मस्तपैकी कुंडीत वडाची फांदी लावायची.त्याच बाळसेदार रोपटं झालं की मुले फिरण्यासाठी जातात त्या जवळच्या टेकडीवर रोपण करायचं.      सौ.ज्योती थोटे-गुळवणे ९८५०२११९४३,अंबड,जालना
jyotithotegulwane@gmail.com                           

तड-फडणवीस महाराष्ट्राचा मित्र की शत्रु ?.

 तड-फडणवीस महाराष्ट्राचा मित्र की शत्रु ?.

गात सर्वत्र कोरोनाने हाहाकार माजवला आहे. जगात ज्या ज्या देशात कोरोना आहे त्या देशातील सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष, नागरिक, डॉक्टर, परिचारिका, पोलिस यंत्रणा, मिडिया, इतर सेवेकरी हे एकत्र येऊन कोरोनाशी लढा देत आहेत.आणि आमच्या देशात कोरोना विरूद्ध लढा फक्त सत्ताधारी पक्ष, नागरिक, डॉक्टर, परिचारिका, इतर सेवेकरी , पोलिस यंत्रणा, मिडिया इतर सेवेकरी हे एकत्र येऊन कोरोना लढा देत आहेत यांची तुलना केली.तर भाजपा प्रणित राज्यात सत्ताधारी नागरिकांना सेवा देतांना उघड उघड पक्षभेद जातीभेदाच्या नांवावर भेदभाव दाखवीत आहे. आणि त्या विरोधात केंद्र व राज्यातील विरोधीपक्ष याविरोधात बोलतो तेव्हा तो देशद्रोही ठरत आहे.महाराष्ट्र राज्यात विरोधी पक्ष फक्त आणि फक्त असहकार आणि सरकार विरोधात आंदोलन करत आहे. देश, राज्य जेव्हा संकटात असतो तेव्हा सारे मतभेद विसरून आलेल्या संकटाला एकत्रीत येऊन लढा द्यायचा असतो. हे साधं आजच्या सुजाण विरोधी पक्षनेत्यानां कळत नाही हे महाराष्ट्राचे व महाराष्ट्रातील जनतेचे दुर्दैव आहे.वृत्तवाहिन्या हि पक्षपाती बातम्या देतांना दिसतात.जे उघडया डोळ्याने दिसते ते सत्य दाखविणे आणि सांगणे हे त्यांचे काम असते.त्यामुळेच प्रसार माध्यमावरील जनतेचा विश्वास उडत चालला आहे.
कोरोना गरिब,श्रीमंत,उद्योगपती,सत्ताधारी पक्षाचे नेते,विरोधी पक्षनेते वगैरे असा भेदभाव करत नाही,कोरोनाची लागण कोणालाही व कधींही होऊ शकते.तेव्हा विरोधी पक्षनेत्यांना एकच हात जोडून विनंती आहे की, तुर्तास तरी राजकारण बाजूला ठेवून जनतेसाठी एकत्र येऊन काम करा.राज्याची जनता तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल आणि राजकारण करत बसाल तर हिच जनता तुम्हाला पायदळी तुडविल्या शिवाय राहणार नाही.आज तुम्ही जे जे काम कराल त्यांचा इतिहास लिहला जाणार आहे.आणि जगातील विचारवंत त्यांची बारकाईने नोंदी करून ठेवतात.
महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा म्हणून जगात ओळखल्या जातो.त्यांचा ऐतिहासिक म्हणी त्या त्या देशात प्रसिद्ध आहेत.नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा,विधानसभा निवडणुकीत छत्रपती शिवाजी महाराजाचा आशीर्वाद घेऊन मतदारांना मतदान मांगीतले होते.म्हणत होता कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र?. 
"जर शिवाजी महाराज आमच्या देशात जन्माला आले असते तर पृथ्वीवरच काय पण परग्रहावरही आम्ही राज्य केले असते !" -- लॉर्ड माउंटबँटन,इंग्लंड.यांचे वाक्य जग प्रसिद्ध आहे. भारताला जर स्वातंत्र्य मिळवून द्यायचं असेन तर एकच पर्याय आहे, शिवाजी महाराजान प्रमाणे लढा!.-- नेताजी सुभाषचंद्र बोस.म्हणत होते. नेताजी, तुमच्या देशाला स्वातंत्र्यासाठी कुठल्या ‘हिटलर‘ची गरज नाही, तर तुमच्याच देशात जन्माला आलेल्या शिवाजी महाराजाच्या इतिहासाची गरज आहे.असे ऑडॉल्फ (अॅडॉल्फ) हिटलर सांगत होता. शिवाजी महाराज हे फक्त नांव नाही, तर शिवाजी महाराज ही आजच्या तरूण पिढीसाठी उर्जा आहे; जिचा वापर हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी होऊ शकतो !.-- स्वामी विवेकानंद.जर शिवाजी महाराज आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही त्यास ‘सुर्य‘ संबोधले असते ! -- बराक ओबामा, अमेरिका. जर शिवाजी महाराज अजून १० वर्षे जगले असते, तर इंग्रजांना पुर्ण हिंदुस्थानचा चेहरा सुध्दा पाहता आला नसता !.-- इंग्रज गव्हर्नर यांनी त्यांच्या नोंद वहीत लिहून ठेवले.
काबुल पासुन कंदहार पर्यंत माझ्या तैमुर खानदानाने मोघली सत्ता निर्माण केली. इराक, इराण, तुर्कस्तानच्या कित्येक नामांकित सरदारांना माझ्या तैमुर खानदानाने पाणी पाजलं ! पण हिंदुस्थानात मात्र आम्हाला शिवाजी महाराजांनी रोखलं ! सर्व शक्ती मी शिवाजी महाराजांना पराभव करायला खर्च केली पण शिवाजी महाराज काही माझ्या हाती नाही आले ! या अल्लाह ! दुश्मन दिया भी तो कौण दिया? "सिवा भोसला" जैसा दिया. अपने जन्नत के दरवाजे खुले रखना खुदा क्योंकि दुनिया का सबसे बहादुर योध्दा और दिलदार दुश्मन तेरे पास आ रहा है . -- औरंगजेब (छत्रपति शिवाजी महाराजांच्या मृत्यू नंतर नमाज पढताना काढलेले उदगार, संदर्भ- खाफिखानाची बखर) उस दिन "सिवा भोसलाने सिर्फ मेरी उंगलियां नही काटी, बल्कि मेरी ताकद के घमंड को भी उतारा. मै अब निंद मे भी "सिवा भोसला" से मिलना नही चाहता.-- शाहीस्तेखान, संदर्भ- खाफिखानाची बखर.
क्या उस गद्दारे दख्खन से "सिवा" नाम का लोहा लाने के लिए एक भी मर्द नही है, इस दरबार में? लालत है ऐसी मर्दानगी पे !.-- बडी बेगम अलि आदिलशाह.
१७ व्या शतकात युरोप खंडात "लंडन गॅझेट" नावाचं आघाडीचं वृत्तपत्र होतं. जेव्हा महाराज आग्र्यावरून सहीसलामत सुटले, तेव्हा या वृत्तपत्राने पहिल्या पानावर जी पहिली बातमी छापली होती आणि त्यात महाराजांचा Shivaji, The King of India असा उल्लेख केला.महाराष्ट्राचा आजचा राजकीय सत्ता संघर्ष समजून घ्याचा असेल तर प्रथम छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यावे लागतील.त्यासाठी कॉम्रेड शरद पाटील यांचे शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण?.हा ऐतिहासिकदृष्ट्या संदर्भ ग्रंथ वाचवा लागेल.
वरील उदाहरणावरून आम्ही आंबेडकरी,सत्यशोधक चळवळीचे लोक नेहमी जाणिवपुर्वक छत्रपती शिवरायांचा आंतरराष्ट्रीय किर्तीचे राजे म्हणुन उल्लेख करतो, जागतिक दर्जाचे योद्धे म्हणून शिवरायांची ओळख आहे ती यामुळेच, महाराजांनी त्यांच्या ३० वर्षाच्या आयुष्यात ज्या ज्या सेनानींचा पराभव केला त्यामध्ये फक्त २ च भारतीय, बाकी सर्वजण हे परकिय सरदार आणि त्या त्या देशाचे नामांकित सरदार होते.
ज्या शाहीस्तेखानाची बोटे महाराजांनी लाल महालात छाटली आणि त्याच्या मनात शिवाजी महाराज या नावाचा खौफ निर्माण केला, तो शाहीस्तेखान साधासुधा मामुली सरदार नव्हता. तर तो अबू तालिबानचा नवाब होता, तुर्कस्तानचा नवाब होता.प्रति औरंगजेब म्हणुन ओळखणारा हा शाहीस्तेखान औरंगजेबाचा सख्खा मामा होता. त्याने प्रचंड मोठा पराक्रम करून मोघलांना मोठा बंगाल प्रांत जिंकुन दिला होता. पण एका रात्रीत महाराजांनी लाल महालात घुसुन त्याची बोटे छाटली आणि काही कळायच्या आत पसार झालेपरिणामी शाहीस्तेखानाने त्यानंतर शिवाजी महाराज या नावाची इतकी भिती घेतली की शिवाजी महाराजांना आता मला स्वप्नात देखील भेटायचं नाही. असं त्याने औरंगजेबाला सांगितलं इतका खौफ या नवाबाच्या मनात निर्माण केला होता.
बेहलोलखान पठाण, सिकंदर पठाण, चिडरखाण पठाण इ. ज्यांना महाराजांनी रणांगणावर धुधु धुतलं, हे सर्व अफगाणिस्तानचे मातब्बर सरदार होते.दिलेरखान पठाण, मंगोलियन सरदार, मंगोलिया देशाचा सर्वोत्तम योध्दा होता. महाराजांनी याचा पराभव केला.सिध्दी जौहर,सिध्दी सलाबत खान हे इराणी होते, इराणचे शुर सरदार होते. महाराजांनी यांना रणांगणात पाणी पाजलं.
उंबरखिंडीत ज्याचा कोंडुन पराभव केला, तो कारतलब खान उझबेकिस्तानचा सरदार होता, म्हणजे आत्ताच्या रशियाचा, या महाराजांच्या विजयाची नोंद साक्षात गिनिज बुकाने देखील घेतली. कमीत कमी सैन्याने जास्तीत जास्त सैन्याचा केलेला पराभव. (१००० मावळे विरूध्द ३०,००० गनिम आणि या ३०,००० पैकी एकही जिवंत राहीला नाही. आणि १००० पैकि एक ही मावळा गमावला नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा इतिहास मराठा,ओबीसी, मागासवर्गीय, आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजाने वाचला नाही.आणि ज्यांनी वाचला त्यांनी सांगितला नाही.मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड यांच्या कडून खूप मोठ्या प्रमाणात प्रबोधन होत आहे. पण हजारो वर्षाची मानसिकता बदलायला वेळ लागणार आहेच.म्हणूनच पेशव्यांचे वारसदार फडणवीस डोके वर काढत आहे.महाराष्ट्रातील मराठा,ओबीसी,मागासवर्गीय,आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजाजाच्या खांद्यावर उभा राहून भाजपा मोठा झाला.भाजपानी फडणवीस मोठा केला. आज त्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अभिमान राहिला नाही.त्याचं बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील मराठा,ओबीसी,मागासवर्गीय,आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजाला ही राहिला नाही.असे लिहले तर चुकीचे ठरणार नाही.म्हणून कोरोनाच्या महामारीत नागरिकांना विविध प्रकारच्या सोयी सुविधा,सहकार्य मदतीची गरज असतांना वैचारिक,सामाजिक,राजकीय पक्षभेद,जातीभेद,प्रांतभेद निर्माण करण्याचे काम विरोधी पक्षनेते करीत आहेत. त्यामुळेच हा प्रश्न निर्माण होतो.तड फडणवीस त्यांचा पक्ष महाराष्ट्राचा मित्र की शत्रु?.
 सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई.

राजकारणातील तड फडणीस

 राजकारणातील तड फडणीस

वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जळून गेल्यावर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते.डोळे बंद केले म्हणून संकट जात नाही.आणि संकट आल्या शिवाय, डोळे उघडत नाहीत.राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं,तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात.मी पुन्हा येईन,मी पुन्हा येईन म्हणणारे राजकारणातील तड फडणीस आपण पाहत असाल,वाचत असाल. 
जल बिन मछ्ली म्हणजे पाण्याच्या बाहेर जिवंत मासळी काढली तर ती कशी करते कधी पाहिले काय?. ती पाण्यात जाण्यासाठी ज्या जिद्दीने तडफड करते ते पाहिल्यावर कोणत्याही माणसांचे मन हेलावून निघते. असाच प्रकार सध्या महाराष्ट्र राज्यात सुरू आहे, माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते सन्माननीय देवेंद्र फडणविस साहेबांची   परिस्थिती त्या माश्या सारखी झाली आहे. अहोरात्र खोटे बोलून शेतकरी,मराठा, धनगर, ओबीसी, मागासवर्गीय आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजाची दिशाभूल करून ई व्ही एम मुळे निवडणूक जिंकली आणि सर्वात मोठा पक्ष म्हणून मुख्यमंत्री पद आपले हक्काचे आहेशंभर टक्के गृहीत धरून चालले असतांना शिवसेनेच्या वाघांची डळकाळी फोडून शिकाऱ्याने शिकार सहजतेने करून नेली.. त्यामुळेच देवेन्द्र ची हालत एका वाटसरू सारखी झाली.
विश्रांतीसाठी एखाद्या झाडाखाली बसावं. समोरचं एक विंचू दिसावा.त्याला मारण्या साठी दगड उचलावा.दगडाखालून साप निघावा. त्याने आपला पाठलाग करावा.पळताना ठेच लागून विहीरीत पडावं. विहीरीत मोठी मगर असावी.तिने वेग घेण्यापूर्वी, एखाद्या फांदीचा वेध घ्यावा.वर येण्याचा प्रयत्न करावा. वरती भूकेला वाघ असावा. त्याच्या भितीने फांदीचा हात सुटावा.फांदी वरील मधमाशांनी भडका करावा. आणि अशा अवस्थेत मधाच्या पोळीतून पडणारा, मधाचा एक थेंब तोंडाने झेलण्याचा प्रयत्न करावा.तर हात सुटून विहीरीत पडण्याची भिती यालाच तोंडाशी आलेला घास गेला असे म्हणतात.
देशात कोरोनाचा धुमाकूळ सुरु आहे. केवळ महाराष्ट्रात नाही?,सर्व राज्यासह देशभरात सुरू असतांना देवेंद्रजी फडणविस यांना रात्रंदिवस झोप लागत नाही.आजचा महारष्ट्र आणि मुख्यमंत्री दिसतो. त्यांना सारखा शेतकरी आत्महत्या करतो, वयोवृद्ध शेतकरी धर्मा पाटील मंत्रालयात येऊन आत्महत्या करतो.जेंव्हा ऐशी वर्षाच्या शेतकऱ्याने आपल्या कार्यकाळात मंत्रालयात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला व आपन कित्येएक दीवस त्याच्या कुटुंबियांना आपण नजरकैदेत ठेवले होते.हा इतिहास शेतकरी विसरला नाही.विसरला असेल तर तो शेतकरी नसावा.
 "एक मराठा लाख मराठा"  मराठ्यांचे लाखोंचे क्रांती मुक मोर्चे शिस्तप्रीय पद्धतीने निघाले होते व बावीस बांधवांनी बलीदान दिले तरी आपन मुग गिळून गप्प बसलात होता.म्हणे अभ्यास सुरु आहे. जेंव्हा न्याय्य मागण्यासाठी आमचा आदिवाशी कष्टकरी बांधव नाशिक ते मुंबई पायी प्रवास करत आसताना उन्हामुळे पिगळनाऱ्या डांबरी रस्त्यावर चालल्यामुळे त्याचे पाय सोलुन निघत असतांना ही तो आझाद मैदानात आला होता.त्याच्या सातबाराचे काय केले.हा इतिहास वनविभागाची जमीन कसणारा आदिवासी विसरला नाही.विसरला असेल तर तो भूमुहीन आदिवासी नसावा. 
फडणविस साहेब आज महाराष्ट्र कोरोना महामारीमुळे आर्थिक आडचणींचा सामना करत सताना, तुम्ही मोदीच्या पी एम केयरला मदत करा असे आवाहन करता हे सांगताना थोडी तरी लोकलज्जा ठेवली पाहिजे होती. आपन फार अभ्यासू राजकारणी व्यक्तीमत्व आहात असे तुमचे लोक म्हणतात. 
सध्या संपूर्ण जग कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे परंतु जगाच्या पाठीवर कोरोनाचे राजकारण करनारे आपन एकटेच आहात. आपनही पाच वर्षे  महाराष्ट्रातचे मुख्यमंत्री राहीलात आपन कीती हॉस्पिटल व पायाभुत सुविधा ऊभ्या केल्या व आजच्या महाआघाडी सरकारने त्या बंद केल्या त्यामुळे महाराष्ट्र संकटात सापडला. हे सांगितले पाहिजे ना?.
अच्छे दिन दाखविण्यासाठी तुम्हाला वृतपात्रांना संपूर्ण पाच वर्षात दरदिवशी ऐशी हजार रुपये जाहीरातींवर खर्च करावे लागले. हे आम्ही सांगत नाही माहिती अधिकारात ऊघड झाले आहे.देवेंद्रजी संपुर्ण देशामध्येच कोरोनाच्या रुग्नांचा आकडा वाढतोय मग ते अपयश सन्माननिय मोदी साहेबांचे अपयश नाही का?. जी,एस,टी चे एकविस हजार कोटी केंद्राकडे अडकुन पडलेत ते घेऊन येण्यास मदत करण्या ऐवजी महाराष्ट्राला संकटात टाकण्याचे महापाप आपण करीत आहात असे वाटत नाही काय?. सांगली महापुराच्या वेळी आपण विरोधी पक्षांच्या नेत्यांना काय मार्गदर्शन करीत होता त्याच्या बातम्या आणि व्हीडीवो क्लिप पाहता काय?.राजकारणात यशस्वी होण्यासाठी सहकार्याचा आणि मतदारांचा विश्वासघात करण्याचा अनुभव प्रचंड असतांना आज आपण विरोधीपक्ष नेते आहात आणि कोणताही राजकारणात विश्वासघात करण्याचा अनुभव नसणारे मुख्यमंत्री ऊध्दवजी ठाकरे साहेब हे महाराष्ट्रात अतीशय चांगले काम करत आहेत. त्यांना ते शांतपणे करू द्या.
आप तरुण तड फड करणारे राजकारणातील तड फडणीस आहात.मतदारांनी पुढच्या निवडणुकीत महाराष्ट्र संकटात असतांना काय करीत होता?. असे विचारले नाही पाहिजे यासाठी महाराष्ट्रातील जनतेला मतदारांना वाचविण्यासाठी संविधानाच्या चौकटीत काम करा.हीच आपणास मतदारांच्या वतीने विनंती करतो.
सागर रामभाऊ तायडे ,९९२०४०३८५९,भांडूप मुंबई.

कोरोना मागासवर्गीय हत्याकांड ,ओबीसी आणि उच्चवर्णीय विवेकवादी लोकांचे कर्तव्य?.

 कोरोना मागासवर्गीय हत्याकांड ,ओबीसी आणि उच्चवर्णीय विवेकवादी लोकांचे कर्तव्य?. 

    साऱ्या भारतात मनुस्मृती प्रणित धर्म व्यवस्थेने ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या उच्चवर्णीय लोकांना भारतातील इतर 85 टक्के मागासवर्गीय ओबीसी,एस सी ,एस टी,विजेएनटी आदिवासी आणि अल्पसंख्याक यांचे शोषणाचे अधिकार दिले होते. सर्व स्त्रियांना शूद्र ठरवून, उच्चवर्णीय आणि मागासवर्गीय सर्वच स्त्रियांना मानवी हक्कांपासून वंचीत करण्याचे हे देशव्यापी अधिकार होते. हीच ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशी वर्णव्यवस्था कायम रहावी त्यात व्यत्यय येऊ नये म्हणून बंड करणाऱ्या मागासवर्गीय लोकांच्या विरोधात तीन उच्चवर्णीयांना हाती शस्त्र घेन्याचे अधिकार मनुस्मृतीनेच दिले. परन्तु आगरी कोळी भंडारी माळी यासारख्या 52 टक्के शूद्र ओबीसींना,कितीही अन्याय झाला अगदी परकीय देशाने आक्रमण केले तरीही शस्त्र हाती घेऊ नये अशी बंधने घातली.. आणि आजचे अतिशूद्र यांच्यावर, अर्थात(बौद्ध) sc st वर कल्पनाही करता येणार नाहीत अशी बंधने घालून अत्याचार करण्यात आले. आगरी कोळी कराडी समाजाने आम्ही मनुस्मृती नुसार शूद्र आहोत हे समजून घ्यावे. शूद्र म्हणजेच जातीच्या दाखल्यावरील ओबीसी म्हणजेच इतर मागासवर्गीय होय. 
      उच्चवर्णीय जातींना मागासवर्गीय लोकांवर धार्मिक,राजकीय आणि सामाजिक अन्याय अत्याचार करण्याची जन्मतःच प्रेरणा आपला हिंदू वैदिक धर्म देतो. अर्थात या अन्याय अत्याचारांना सहन करण्याची सहनशीलता,संयम, मानसिक गुलामी मनुस्मृती प्रणित धर्मच देतो हेही आपण समजून घेतले पाहिजे. आगरी कोळी भंडारी सागरपुत्र समाजाने जागतिक वैभवाचे दिवस 2000 वर्षांपूर्वी सम्राट अशोकाच्या काळात अनुभवले. त्यानंतर थेट छत्रपती शिवरायांच्या काळात आरमार आणि जमिनीचे मालकी अधिकार मिळाले.  मात्र समुद्रावर कोणताही व्यवसाय करायला मनुस्मृतीने कायमस्वरूपी विरोधच केला होता. छत्रपती शिवरायांचे मनुस्मृतीला आव्हान देत तयार झालेले सागरी आरमार पेशवे व  मराठ्यांनी बुडविले! पेशवे काळातच खोती सावकारी आली.    
      मनुस्मृती जाळण्यासाठी महाड, रायगड येथे आम्ही आदरणीय नारायण नागु पाटील यांच्या नेतृत्वाखाली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत लढलो. मनुस्मृतीच्या समर्थक उच्चवर्णीय खोती सावकारी विरोधात लढण्याची हिम्मत केवळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच मिळाली. पुढे बाबासाहेबानी सांगितलेल्या 'शिका! जागृत व्हा! संघटित व्हा!' या समाज उद्धारक मंत्राने आम्ही शिक्षणाची शाळांची मोहीम हाती घेऊन कोकण एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून 108 शाळांचे जाळे कोकणात उभे केले. नारायण नागु पाटील, त्याचे चिरंजीव अॅड दत्ता पाटील, प्रभाकर पाटील यांचे फार मोठे योगदान यात होते. अर्थात हा शिक्षणाचा विचार बाबसाहेबाकडून आला. मी स्वतः जनता विद्यालय बेलोशी अलिबाग,आताच्या अॅड दत्ता पाटील हायस्कुल मधूनच दहावी पर्यंत शिक्षण पूर्ण केले. हजारो गरीब ओबीसी शिक्षक आणि लाखो यशस्वी विद्यार्थी येथुन पुढे आले. याच लोकांनी पुढे जमीन आणि शिक्षणाची चळवळ रायगड जिल्ह्यात चालवली.
      गरीब ओबीसी विद्यार्थ्यांची ही चळवळ आज ही रायगडात चालू असताना नवी मुबंईचे शिक्षण महाग झाले. उच्च शिक्षण डी वाय पाटील, पतंगराव कदम, दत्ता मेघे या शिक्षण सम्राटांच्या हाती गेले. प्राथमिक शिक्षण लाख रुपयात तर उच्च शिक्षण कोटी रुपयात विकत मिळतेय हे अजूनही आमच्या रायगडच्या खेड्यात कळले नाहीय. परन्तु महिन्यास 3 ते 5 हजार रुपये खोली भाडे घेणाऱ्या नवी मुबंईच्या आगरी कोळी बांधवांसाठी ते अशक्य होईल एव्हढे महाग झाले आहे. ते कळण्यासाठी महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी पहिले जागृतीचे काम केले होते. यांच्यानंतर दोनशे वर्षानी आज कोरोनाच्या महामारी मुळे 2020 मध्ये शिक्षण हकांची जाणीव नवी मुबंईस होत आहे. रायगड जिल्ह्यातील शिक्षण चळवळ गरीब ओबीसी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे, यासाठी समाजाच्या वर्गणी मधून सुरू झाली होती. अनेक ठिकाणी गावकरी एकत्र येऊन जागा, श्रमदान आणि वर्गणी देऊन कर्मचारी लोकांच्या पगाराचा भार घेऊन शासकीय अनुदान येईपर्यंत हा भार सोसत होते. आज शिक्षणाच्या जागी बुवा बापू नाना दादा यांनी लोकांचे मेंदू ताब्यात घेऊन, शिक्षणा साठीची वर्गणी दान थांबविलीय. त्यामुळे शाळांपेक्षा मंदिराचे कळसच उंच झालेले दिसतात. कोरोनाच्या महामारीत देवांनी मैदान सोडले! तरीही सर्व अध्यात्मिक बुवा आणि मंदिराच्या दानपेटीतील पैसा, औषधे, अन्न धान्य गरजू मागासवर्गीय माणसाच्या उपयोगी येत नाही. आज रायगडचे लोक निसर्ग वादळात उध्वस्त आहेत परन्तु धर्म संप्रदाय मंदिर ट्रस्ट गप्प आहेत.हे काम राजकीय पक्ष आणि सरकारचे आहे असे सांगून पैसा सोडायला तयार नाहीत. कोरोना नंतरच्या काळात मुलांच्या शिक्षणासाठी पैसे कुठून आणायचे?. यातून नवी मुबंईच्या तरुणांनी विकास पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण हक्काचे जे आंदोलन उभे केले आहे त्यास पूर्ण देशाने पाठींबा द्यावा अशी माझी नम्र विनंती आहे 
       सुरुवातीस मंदिराची आणि देवाचीही निर्मिती मागासवर्गीय माणसानेच आपल्या मेहनतीने केली. नंतर त्याचा ताबा मात्र उच्चवर्णीय ब्राह्मण ट्रस्टीनी घेतला. अर्थात ते आज मालकच झाले!. नवी मुबंईतील 95 प्रकल्पग्रस्त गावातील करोडो रुपयांच्या म्हणजे दोन कोटी रुपये गुंठा भावाचे सरासरी तीन एकरचे म्हणजेच( 240 कोटी रुपयांचे भूखंड) प्रस्थापित शिक्षण सम्राटांनी पाच ते सहा या संख्येनी गिळले यात ब्राह्मण मराठा उच्चवर्णीय पुढे आहेतच परन्तु काही आगरी कोळी राजकीय नेतेही आहेत. हे भूखंड मुख्यतः साडेबारा टक्के योजनेतील शेतकऱ्याच्या हक्काच्या जमिनीतून सिडकोने परस्पर कापून विकले आहेत. यात सिडकोने मोठी फसवणूक केली आहेच. परन्तु सिडको ही मागासवर्गीय ओबीसींच्या शिक्षणाच्या विरोधात आहे हे सत्य समोर आले आहे. अर्थात ज्यांनी आमचे भातशेती मासेमारी हे व्यवसाय संपविले ते शिक्षणाचा अधिकार नाकारणारे उच्चवर्णीय ब्राह्मण क्षत्रिय लोक आम्हास शिक्षण देतील यावर कुणी ओबीसी आगरी कोळी कराडी तरुणांनी विश्वास ठेवू नये. आम्ही पावणेचार टक्के सिडकोने चोरलेली जमीन मिळवून देतो अशी सामाजिक न्यायाची हाकाटी देणाऱ्याचे ?.. काम विकास पाटील यांच्या माहिती अधिकाराने बिनपैशात साध्य झाले आहे. ओबीसी वरच्या अन्यायाची माहिती असूनही उच्चवर्णीय लोकांविरोधात बोलायची हिम्मत नसलेले लोक गप्प बसतात याचे कारण ते त्याचे समर्थकच असतात.
      सध्या महाराष्ट्रात नागपूर ते पुणे आणि देशात मागासवर्गीय तरुणांच्या हत्या सुरू आहेत. परन्तु त्याविरोधात बोलायची हिम्मत असलेले मोजके लोक आहेत. केंद्र सरकारने ओबीसी तरुणांच्या डाॅक्टर होऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या 11 हजार जागा आपल्या उच्चवर्णीय मुलांसाठी परस्पर वळवल्या,खाल्ल्या परन्तु त्याकडे लक्ष देणारे आगरी कोळी ओबीसी तरुण अजून जागे झाले नाहीत. आपल्याच धर्मातील ब्राह्मण क्षत्रिय लोकां विरोधात लढणारे ओबीसी जसे दुर्मिळ?तसेच स्वतःच्याच जातीतील फसवणूक करणाऱ्या लोकांविरोधात आवाज उठविणारे विकास पाटील यांच्यासारखे धाडसी तरुण आम्ही जपले पाहिजेत. सक्षम केले पाहिजेत.मुबंईच्या गावठाण हक्कात लढणारे माहीम कोळीवाड्यातील तरुण जयेश आकरे,वयोवृद्ध निजाई बाबा हे साऱ्या मुबंईस न्याय देऊ शकतात. परन्तु सामान्य माणसांनी त्यासाठी सेठ सावकार प्रस्थापित नेत्यांना न घाबरता समोर आले पाहिजे. ज्या भूखंडाच्या जोरावर नवी मुबंईतील उच्चवर्णीय आणि आपल्याच ओबीसी जातीतील शिक्षण सम्राट शिक्षणाचा बाजार मांडत आहेत त्या जागा आमच्या शेतजमिनीच्या पुनर्वसन भूखंडाच्या हक्काच्या जागा आहेत. न्यायालयात आणि जमिनीवरच्या आंदोलनातून आपण त्या लढून मिळवू. परन्तु गावठाण हक्काचा विस्तार करून शाळा कॉलेजेस आरोग्यासाठी सोयी म्हणून आवश्यक भूखंड मा जिल्हाधिकारी यांनी द्यावेत हा कोळीवाडा गावठाण विस्तार हक्काचा वेगळा विषय आहे.सिडकोची लढून मिळविलेली पाच हुतात्मे आणि दि बा पाटील यांच्या महान नेतृत्वामुळे मिळालेली, साडेबारा टक्के योजना म्हणजे गावठाण हक्क नाही. नवी मुबंई विमानताळात विस्थापित गावाचे पुनर्वसन गावठाण विस्तारासह होत आहे. अर्थात मूळ जागेच्या तीनपट जागेसह होतेय.  तर शेतजमिनीच्या बाबतीत मूळ जागेच्या 20 टक्के जागा पुनर्वसन म्हणून मिळतेय. दोन्ही योजना वेगळ्या आहेत. यात आगरी कोळी जातीतील आणि उच्चवर्णीय सर्वपक्षीय जातीतील प्रस्थापित नेते प्रकल्पग्रस्त ओबीसींची फसवणूक करीत आहेत.
      सध्या महाराष्ट्रात बौद्ध तरुणांच्या हत्या मूळच्या क्षत्रिय लोकांकडून होत आहेत. आम्ही उच्चवर्णीय असल्याच्या 'सैराट' अहंकारातून हे घडतेय. उद्या पोलिसांकडून आरोपी पकडले जातीलही. परन्तु ज्या उच्चजातीय शोषक जातींकडून मनुस्मृतीच्या मानसिकते आधारे हे दुष्कृत्य होतेय ते देशासाठी अत्यन्त धोकादायक आहे!. त्यावर मनुस्मृतीप्रणीत  उच्च वर्णात सर्वोच्च सत्ताधारी ठिकाणी असलेल्या ब्राह्मण लोकांनी बोलले पाहिजे. त्यानंतर वैश्य लोकांनीही बोलायला हवे. मनुस्मृती 11 (33) या श्लोकात म्हणते, 'ब्राह्मणाची वाणी हेच त्यांचे शस्त्र आहे.' समाज शत्रूच्या बाबतीत त्यांनी हे शास्त्र वापरावे. 'क्षत्रियांना धडा शिकविण्यासाठी ब्राह्मणांनी शस्त्र हाती घ्यावे.' 2 (24 18) नुसार  'गाईच्या रक्षणासाठी आणि वर्ण व्यवस्था कायमस्वरूपी राखण्यासाठी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांनी कोणतीही किंमत देऊन धर्मव्यवस्था अबाधित ठेवावी.' परन्तु मागासवर्गीय तरुण याचे जीव आणि शिक्षण हक्क याबाबतीत उच्चवर्णीय विरोधात जात असतील तर मागासवर्गीय लोकांनी शस्त्र सोडाच?लोकशाहीतील भाषण लेखन न्याय असे कोणतेही अहिंसक शस्त्र हाती धरू नये; असे स्त्री शूद्रातीशूद्र यांचे वागणेही मनुस्मृती नुसारच चालू असणे हे अशोभनीय निंद निय आहे.
     अमेरिकेतील गोऱ्या पोलिसी अत्याचार आणि काळ्या भूमिपुत्र हत्याकांडा विरोधात लोकशाही मार्गाने चाललेली आंदोलने ही भारतातील मागास ओबीसी,एससी,एसटी,  विजेएनटी यांच्यासाठी जागतिक आदर्श देणारी आहेत. मी पिंपरी चिंचवड येथील विराज जगताप आणि नागपूर येथील अरविंद बनसोडे या तरुणांच्या हत्येसंदर्भात शासनास सामाजिक न्यायासाठी विनंती करीतच आहे. या देशातील उच्च जातीतील समस्त विचारवन्त लोकशाहीवादी सुसंस्कृत नागरिकांनी अमेरिकेतील गोऱ्या लोकांप्रमाणेच ,मागासवर्गीयन्यायाच्या बाजूने पाठींबा द्यावा अशी विनंतीही करीत आहे. 
     देशातील समस्त मागासवर्गीय आणि विवेकवादी उच्चवर्णीय यांनी एकत्र येऊन भारतीय जनतेच्या मनास संविधानिक साक्षर करण्यासाठी पुढे यावे. राष्ट्रीय एकात्मता अखंडता टिकवावी. आम्ही आगरी कोळी कराडी ओबीसी तरुणांनी प्रथम आमच्याच जातीतील शिक्षण विरोधी जमीनदार सरंजामी लोकांना विरोध करून राज्य स्तरावरील उच्चवर्णीय शिक्षण सम्राटांच्या अत्याचारी स्वभावास बदलण्याचे अहिंसक आंदोलन नवी मुबंई तुन सुरू केले आहे. मला विश्वास आहे ओबीसीसह सारे भारतीय त्यास पाठींबा देतील..आणि मागासवर्गीय तरुणांच्या हत्येविरोधात एकत्र येऊन समतेचे न्यायाचे एकत्रित आंदोलन उभे करून जगास नवा आदर्श देतील. जय भारत!
           
राजाराम पाटील 8928452112
ओबीसी संघर्ष समन्वय समिती महाराष्ट्र   

विराज जगताप हत्याकांड :सरकारचे मनुवैदिक मानस शास्त्र?.

 विराज जगताप हत्याकांड :सरकारचे मनुवैदिक मानस शास्त्र?.

   लोकसभेच्या मावळ मतदारसंघात विराज जगताप या तरुणाची हत्या करण्यात आली आहे. त्या हत्येमागचे कारण साऱ्या देशासाठी अत्यन्त लज्जास्पद आहे. मी याच मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीतून लोकसभा निवडणूक लढलो. उरण पनवेल ते रायगड या समुद्री हवामान ते घाटमाथा या परस्पर भिन्न भौगोलिक सामाजिक आणि राजकीय परिस्थिती ने परस्पर विरोधी वातावरणातली ही चुरशीची निवडणूक होती. या मतदारसंघात विजयी झालेल्या शिवसेना भाजपा युती चे खासदार श्रीरंग बारणे आणि कॉग्रेस राष्ट्रवादीच्या पार्थ अजित पवार यांच्यातील लढतीत मी आगरी मागासवर्गीय  उमेदवार होतो. पिंपरी चिंचवड परिसरातील जनतेचा साधा भावनिक प्रेमळ पाठींबा, लोकशाहीशी प्रामाणिक नाते सांगणारा मतदार पाहून मी भारावून गेलो होतो.  
     विराज सारख्या विशीतल्या तरुणांची जेव्हा हत्या होते तेव्हा माता पित्याच्या पितृवत्सल काळजाच्या तुमच्या माझ्यासारख्याचे काळीज पिळवटून जाते. जी अवस्था विराजच्या आईची आहे ती माझ्यासारख्या प्रत्येकाची असावी. आई वडिलांचे आपल्या मुलांविषयी जे प्रेम असते त्याची तुलना जगात कुणाशीही होऊ शकत नाही. वयाच्या सत्तेचाळीसाव्या वर्षी मी स्वतः हे अनुभवतोय. आपल्याला मुलासारख्या असणाऱ्या विराजच्या हत्या ज्या कारणामुळे होतात त्याचे दुःख फार मोठे आहे. 
     या मतदार संघात आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांकडून ही मोक्याची तेव्हढीच धोक्याची जबाबदारी मिळे पर्यंत आणि निवडणुकीच्या अंतिम निकाळा पर्यंत बाळासाहेब आणि प्रत्येक कार्यकर्ता मतदार बंधू भगिनींच्या सहकार्याची आठवण चिरस्मरणीय ठरली. विराजची हत्या ही संतापजनक घटना कानावर येईपर्यंत मी माझ्या सर्वच कार्यकर्ते आणि मतदार बंधू भगिनींशी केवळ कौटूंबिक मायेने ममतेने बांधला गेलोय!अर्थात या परिसरातील बांधवांचे दुःख तेच माझेही दुःख आहे.
     मागासवर्गीय पाटील असतात याची जाणीव घाटमाथ्यावर बऱ्याच लोकांना नसावी! निवडणुकात सांम,दाम,दंड,भेद,पैसा,धमक्या आणि ईव्हीएम चा कल्पक वापर करून लोकांची मते लीलया घेऊन जिंकायचे पवार-मोदी (क्षत्रिय वैश्य युती) कृत्रिम राजकारण, विसरायला लावणारी प्रेमळ मागासवर्गीय माणसे मी येथे घरा घरात पाहिली. 
      जगाला प्रेमाने जिंकायचे, तर स्वतःला पंचशीलाने! याच कार्ला मातृसत्ताक संस्काराने शिकलेल्या सागरपुत्र आगरी कोळी कराडी भंडारी स्वभावाचा मी एक सामान्य माणूस या घटनेने प्रचंड दुःखी झालोय. सार्वत्रिक निवडणुकीत नेता म्हणून जेव्हा कुणी आपले अमूल्य मत देतो, तेव्हा त्या नेत्यांचे विचार आचार आणि व्यवहार यास दिलेली ती जाहीर मान्यता असते. आपल्या घरातही आपण आपल्या रक्ताच्या नातेवाईकांना असे मत देताना अंतर्मनात त्याचे किती कठोर मूल्यमापन करतो याची जाणीव मला स्वतःस आहे. मावळ मधले 75 हजार मतदार हे याच कौटूंबिक नात्याने मला मनातून जोडले गेलेत. 
     शासन कर्ता कसा असावा याचे उत्तर देताना एकविरा पुत्र बुद्ध म्हणाले होते, "शासन कर्त्याने चुकणा-या जनतेस शिक्षा करणे म्हणजे शासनकर्ता होणे नाही! तर आपण आपल्या मुलाशी जसे पित्याप्रमाणे वागतो तसे जनतेचा पिता होणे होय." मूल चुकते त्यास कोणताही पिता मृत्युदंड देत नाही. बाप झालेल्या प्रत्येक माणसाला माझे शब्द समजत असतील. यामुळेच सम्राट अशोका सारखा जगातील सर्वश्रेष्ठ लोककल्याणकारी राज्यकर्ता घडविणारा, मातृसत्ताक आई एकविरापुत्र बुद्ध हे माझे राजकीय मार्गदर्शक  झाले. 
      विराजची क्रूर हत्या ही साऱ्या देशातील माता पित्यासाठी आता, राज्यकर्त्यांची विचारसरणी कशी असावी याचे चिंतन करायला लावणारी घटना आहे. पश्चिम महाराष्ट्र हा वारकरी विचारांचा आहे. संत तुकारामांचा एक अभंग पंडित भीमसेन जोशींनी गायला. 'जे का रंजले गांजले.. त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा..।। दया करणे जे "पुत्रासी"तेचि दासा आणि दासी।। तुका म्हणे सांगू किती? त्याची  भगवंताच्या मूर्ती...।।' वारकरी साहित्याचे गाढे अभ्यासक माळी समाजाचे प्रा शंकर महाजन हे माझ्याबरोबर होते. आमच्याकडे आई एकवीरेंच्या वात्सल्याने आणि घाटावर विठू माऊलीच्या प्रेमाने वाढलेल्या महाराष्ट्राला माझी विनंती आणि प्रश्नही या लेखातून मी करत आहे. माता पित्याच्या मनाचे राजकारणी आम्ही घडवू शकत नाही का?. 
     मी पहिला प्रश्न मला म्हणजे राज्यकर्त्यांना विचारीन. साऱ्या देशाचे प्राण वाचविण्या साठीच लाॅकडाऊन जाहीर केलेय ना?केंद्रीय आणि राज्याच्या गृहमंत्र्यांना हा माझा प्रश्न आहे! सरकारच्या उद्देशा बाबत शंका येण्याचे कारण महाराष्ट्रात मागासवर्गीय तरुणांच्या हत्या जात वर्चस्वातून होणे म्हणजे शासनाची उच्चवर्णीय मानसिकता प्रकट होणे आहे!  ही अत्यंत घातक स्थिती आहे. नोटबंदी आणि लाॅकडाऊन याचे पंतप्रधान मोदींचे हेतू उदात्त असले तरी 85 टक्के मागासवर्गीय जनतेच्या जगण्यावरचे मृत्यूचे नवनवे प्रयोग अशीच वास्तव स्थिती लोकांना जाणवतेय! रांगेत उभे राहून आणि नोटबंदीच्या मंदिने आलेले मृत्यू या थंड डोक्याने केलेल्या हत्याच होत्या!.
      बेरोजगारी गरिबी यामुळे झालेले मागासवर्गीयांचे स्थलांतर, रेल्वेखाली चिरडलेल्या कामगारांचे मृत्यू आणि घरा घरात उपासमारीने आणि गरिबीमुळे औषध पाण्याविना मरणारे कोरोनाग्रस्त नागरिक या सरकारी हत्याच आहेत ना?. जमावबंदी असताना उच्च जातीचा विषाणूग्रस्त माथेफिरू सहाच्या संख्येने येऊन एखाद्या प्रेम करणाऱ्या तरुणास रस्त्यात मारतो ही उच्चवर्णीय मानसिकतेच्या सरकारने केलेली मागासवर्गीय नागरिकांची हत्याच आहे ना? केंद्र आणि राज्याच्या फडणवीस पवार वादात या कोवळ्या मुलांचे हत्येचे विकृत राजकारण कुणी करू नये!!.   
       विराज जगताप हा देशाच्या सरकारी मानसिकतेचा प्रश्न आहे. लाॅकडाऊन ही आता लोकशाही विरोधी आणीबाणी वाटू लागली आहे. त्यात मागासवर्गीय माणसाच्या हत्या अधिक ठळकपणे दिसतात. अर्थात विराज जगताप हा केंद्र सरकारचा विरोधक नव्हता ना? मोदी सरकारला लोकसभेत विरोधकच उरला नसताना विराजची हत्या होते यापाठीमागे कोणते दहशतवादी राजकारण असावे? अमेरिकेतील जॉर्ज प्लॉईड या काळ्या अमेरिकन नागरिकाच्या रस्त्यावरील गोऱ्या पोलिसाने केलेल्या क्रूर हत्येने हा प्रश्न देशाच्या अध्यक्षांच्या मानसिकतेकडे बोट दाखवू लागला. आम्हीही विराजची हत्या ज्या सरकारी मानसिकतेने घडली आहे; ते मनुवादी क्षत्रिय राजकारण आहे हे मान्यच करायला हवे! 
     जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या अध्यक्ष ट्रम्पना गोऱ्या मानसिकतेची वर्णभेदी घृणास्पद शिवी ऐकावी लागते. मग मनुस्मृती समर्थक भाजपाचे केंद्रीय आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री यांची मानसिकता एकविरापुत्र बुद्धाच्या करुणेची निश्चितच नाही ना? मी आगरी ओबीसी जातीचा प्रतिनिधी पराभूत खासदार म्हणून देशाच्या जनतेस हा प्रश्न विचारतोय!. 
      आम्ही पंतप्रधानांच्या मानसिकते बाबत नोटबंदीच्या काळातच हे प्रश्न विचारायला हवे होते. 'शूद्रांना संपत्तीचे काडीचेही अधिकार नसतात'; याच मनुस्मृतीच्या तत्वाने गरीब कष्टकरी महिलांनी पिठाच्या डब्यात जपून ठेवलेल्या कष्टकऱ्यांच्या एखाद्या पाचशेच्या नोटेला बाहेर काढण्यासाठी ही कारवाई होती का?. ज्यास जन्म आहे त्यास मृत्यूही आहे हे सत्य आम्ही जाणतो. परन्तु विराज या तरुणास मागासवर्गीय जावई म्हणून स्वतःची क्षत्रिय कन्या स्वीकारत असताना, तिचा निर्णय नाकारणारी मानसिकता नक्की आहे तरी कोणती?विराजची हत्या आमच्या मराठा मुलीवर प्रेम केले म्हणून जाहीर रित्या करण्याची मनुवादी नैतिकता ज्या मनात जन्म घेते, गुन्हा तेथे मना मनात घडलाय!!. 
   आपल्या देशात मनुस्मृतिस धार्मिक नैतिकतेचे अधिष्ठान सांगणारे जे लोक आहेत त्यांनी राग न मानता आता तरी पुढे यावे! त्याच प्रमाणे मनुस्मृतीच्या विरोधक लोकांनी हे लक्षात घ्यावे हत्या या प्रथम मानवी मनातच घडतात. पोलिसांनी गुन्हेगाराच्या मनाचा वेध घेणारे पुरावे शोधावेत. अॅट्रोसिटी हा कायदा मनुस्मृती च्या मागासवर्ग विरोधी उच्चवर्णीयांच्या आक्रमक हल्य्या पासून संरक्षण देणारा कायदा आहे. तो मागासवर्गीय रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये या शिवरायांच्या स्वराजनीतीचा ऐतिहासिक कायदा आहे. शिवरायांचा पराक्रमी वारसा सांगणाऱ्या मराठा महाराष्ट्राला तो समजू नये? हे आम्हा प्रबोधनकारांचे अपयश आहे. आपल्या आजूबाजूला असलेली अशी विकृत मने ओळखून आम्ही अत्यंत अमूल्य असे जीवन वाचविण्याची एकविरापुत्रांची जीवनविद्या समजून घेतली पाहिजे.
     विराजची हत्या ही मला देशाची मानसिक फाळणीचा परिणाम म्हणून अधिक भीतीदायक वाटते. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना मा अनिल देशमुख यांना संशयाच्या नजरेने पहायला लावते! अर्थात माझेही आडनाव पाटील असल्यामुळे याचा देशमुख पवार काटे पाटील आडणावाशी संबंध जोडणे चुकीचेच आहे. केंद्र आणि राज्याच्या सरकारने आज जो धर्म वंश जात संघ सेना आणि राष्ट्रवादी उपाध्या धारण करतात तरीही जनतेच्या मनातून उतरलेल्या राजकीय पक्ष संघटनांनी,याच्यापेक्षा अधिकचा विश्वास मागासवर्गीय जनतेला देणे गरजेचे झालेय! जनमानसात आज सरकारविषयी संशयाचे वातावरण निर्माण झालेय याची कबुली मी देत आहे.
      विराजची हत्या झालीय त्याचा गुन्हा पोलीस स्टेशनमध्ये नोंदला गेलाय. मला पूर्ण विश्वास आहे मावळ मतदार संघ भीमा कोरेगावमुळे अत्यन्त संवेदनशील झालाय सरकारला न्याय देण्याऐवढं संविधानिक वातावरण येथे आहे. अर्थात उरण पनवेल रायगडचा कोकणातील मातृसत्ताक मानसिकतेचा प्रदेश हे पुरुषसत्ताक मानसिकतेच्या मागासवर्ग विरोधी मानसिकतेच्या प्रदेशावर नैतिक दबाव निर्माण करीलच! 
     प्रेम हे आंधळे असते हे मानवी मनाच्या निर्णय स्वातंत्र्याला नाकारणारे वाक्य आहे. प्रेम म्हणजे मालकीची भावना नव्हे. माझ्या मुलीने कुणावर प्रेम करावे हा मुलीच्या स्वातंत्र्याचा विषय आहे असे हुंडा नाकारणारे मातृसत्ताक कोकण मानते. आईच्या मानसिक स्वातंत्र्या सह शारीरिक हत्या करणाऱ्या परशुरामाची ही भूमी नाहीती लग्नात हुंडा नाकारणाऱ्या ,महिलांना धार्मिक आर्थिक आणि शस्त्रास्त्रांचे अधिकार देणाऱ्या सागरपुत्र एकविरापुत्र बुद्धाची भूमी आहे!! म्हणूनच विराजला मनाने वरणाऱ्या मुलीची मानसिक हत्या विराजला मारणाऱ्या लोकांनी केलीय. हे हत्या प्रकरण बौद्ध एससी एसटी या अत्याचार प्रतिबंधक अर्थात अट्रोसिटी कायद्याची सुरक्षा दिलेल्या अतिशूद्र जातींचेच नाही. तर शूद्र ओबीसी जातीच्या तरुणांना उच्चवर्णीय जातीची मुलगी नाकारणाऱ्या त्यासाठी हत्या करणाऱ्या हत्या-यांचे आहे. ओबीसींना हे माहीत असावे!. 
     आम्ही अंदाजे 85 टक्के मागासवर्गीय आणि 15 उच्चवर्णीय ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या जन्माने श्रेष्ठ लोकांचा उल्लेख अशा शोषण, हत्या आणि मागासलेपण आरक्षण समजण्यासाठी करतो. प्रेम प्रकरणातून कायदा हातात घेण्याची परंपरा पाहता अशा उच्चवर्णीय वस्त्या दहशतवादी घोषित करणे मागासवर्गीय जातीसाठी अतिशयोक्तीचे ठरू नये. अर्थात मुस्लिम आतंकवादी असे जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा विराजची हत्या हा वैदिक क्षत्रिय आतंकवाद आहेच ना?गांधीहत्या ही ब्राह्मणी आतंकवाद आहे. समाजात दहशत पसरविणे हाच तर जाहीर हत्याकांडात हेतू असतो. माझ्यासारख्या उमेदवारास पुण्याकडे लोकसभा लढविताना याचा विचार यापुढे करावाच लागणार कारण मी ही विराजसारखाच मागासवर्गीय आहे. विराजने फक्त प्रेम केले. मी तर सर्व सत्ताधारी जमीनदार जातींची सत्ता घेण्याची मानसिकता ठेवतोय!.
      प्रश्न आहे प्रत्येक घरात जन्मणा-या मुलींचा ज्या प्रेम करताना जात नाही तर मुलांचे कर्तृत्व आणि प्रेमच पाहून निर्णय घेतात. आमच्या ठाणे, रायगड, मुबंई या अपरांत प्रदेशात मुलींचा निर्णय अंतिम असतो बंधनकारक असंतो. माझा प्रश्न माझ्या मतदार संघातील सर्वच निवडणूक लढलेल्या जिंकलेल्या हरलेल्या खासदार आमदार आणि नगरसेवक सरपंच सदस्य यांना आहे. हत्या केवळ विराजची दिसतेय; परंतु विराजच्या प्रेमिका मुलींचीही झालीय! तिच्या मनाचा विचार कोण करणार?.  
    गोऱ्या मानसिकते विरोधात एका जॉर्ज साठी अमेरिका हलवून सोडणाऱ्या काळ्या लोकांपेक्षा एकविरापुत्र बुद्धाच्या देशातील आम्ही सारे लोक प्रेम प्रकरणात आपल्या प्रियकराची भावी पतीची हत्या करणारे जन्मदाते, रक्ताचे भाऊ यांच्याबद्दल ती मुलगी काय विचार करीत असेल? वंचित बहुजन आघाडीचे आमचे नेते आदरणीय प्रकाश आंबेडकर यांच्या सुविध्य पत्नी अंजलीताई आंबेडकर यांच्या मनात विराजच्या आईला समजाविताना सांत्वन करताना, विराजच्या मृत्यूचे कारण ठरलेल्या मुलीच्या दुःखाची जाणीव निश्चितपणे झाली असावी!.  
     सावित्री माई या शूद्र ओबीसी महिलेच्या आग्रहाने शिकलेल्या सर्वच भारतीय महिलांनी पुरुष प्रियकर मारण्याची कृती ही स्त्री विरोधी आहे हे समजून घेण्याची वेळ आलेली आहे. जाती बाहेर जाऊन लग्न केलेल्या स्त्रिया या बंडखोर स्त्री स्वातंत्र्याचे महत्व माझ्यापेक्षा अधिक सांगू शकतील! मी विराजची हत्या ही माझ्या मानसपुत्र आणि मानस कन्येची हत्या समजतो!!. या मावळ मतदार संघात आई एकवीरेंच्या बलशाली मातृसत्ताक विचारांची गौरवशाली परंपरा घेऊन कोकणच्या महिला स्वातंत्र्याचे गीत धार्मिक आर्थिक सामाजिक स्वातंत्र्याचे आगरी कोळी पद्धतीचे काती कोयते घेऊन स्वतःच्या शिलाचे रक्षण करण्याचे जीवन कौशल्य अभ्यासण्याची विनंती करीन. ही लढाई पुरुषसत्ताक पुरुषांपेक्षा कोळीवाड्यातील मातृसत्ताक महिला लढतील. भेटूया कार्ला बौद्ध लेण्यात आई एकवीरेंच्या विचारासोबत. लढाई सुरू झालीय विराजच्या तुमच्या माझ्या प्रेमाची.....! मानवी हक्कांची ..!!
         
राजाराम पाटील 8928452112,माजी खासदार (पराभूत)
मावळ मतदार संघ,वंचीत बहुजन आघाडी, 
(विशेष विनंती लेख प्रसिद्ध केल्यास pdf पाठवावी.)

मुलमुली प्रेम करतांना जात धर्म पाहत नाही.

 मुलमुली प्रेम करतांना जात धर्म पाहत नाही.

जगात सायन्स ने खुप प्रगती केली. त्यामुळे शहरातून खेडयाकडे टीव्ही मुळे सिनेमा आणि सीरियल घराघरत पोचले त्यात चांगले आणि वाईट दाखविल्या मुळे मुलामुलीवर चांगलाच परिणाम होत आहे.त्यात स्मार्ट मोबाईल आणि नेटने मुलामुलीना याड लावले. प्रेम आणि सेक्स हया वेगवेगळ्या पण खुप महत्वाच्या गोष्टी आहेत.त्यातुन होणाऱ्या परिणामाला अनेक पालकांना तोंड द्यावे लागते. त्यात अत्यंत महत्वाची भूमिका पोलिसांना निभवावी लागते, म्हणून पोलिसां कडून सर्व पालकांसाठी नेहमी सूचना दिली जाते.शाळा कॉलेजे संपत आले आहेत. मागील कांही दिवसा पासुन वयात आलेल्या तरुण मुली निघुन जाण्याच्या तक्रारी मध्ये व प्रकरणा मध्ये शहरा पेक्षा ग्रामीण भागातील भागात वाढ झाली आहे.मुलींनी शैक्षणिक वर्षात केलेले प्लॅनिंग प्रत्यक्षात उतरवतना दिसुन येत आहे.दहावी बारावीत मुलीची टक्केवारी लक्षवेधी असते. त्यात अशा घडलेल्या घटना मुळे काही गंभीर सामाजिक प्रश्न देखील निर्माण होतात.आणि तशातच हिंदी मराठी फिल्म इंडस्ट्रिकडून दाखविण्यात येणारे कामुक व अश्लील चिञपट, काल्पनिक लव्हस्टोरी याचा पगडा भारतातील तरुण तरूणींवर पडत असलेमुळे मुला मुलींवरील संस्कार ढासळले आहेत.या अनुषंगाने पालकांनी आपल्या पाल्यांची (मुलगा/मुलगी) खालील प्रकारे काळजी घेणे आवश्यक आहे.
मुले-मुली एकांतामध्ये फोन वरुन जेंव्हा बोलत असतात त्या वेळी त्या/ते कोणाशी आणी काय बोलत असतात हे पहावे.मी मैत्रणी/नाते वाईकाकड़े चालली आहे असे  मुली पालकाना सांगुन घरातून जातात, परत येत नाहीत. अशा वेळी मुलीला एकटी न-पाठवता इतर नातेवाईका सोबत पाठवावे.
मुलगी/मुलगा घरातुन शाळा कॉलेजला जातात त्या वेळी ते घरातुन किती वाजता निघाले शाळा कॉलेज मध्येच गेले का ? किती वाजता पोहचले ? पिरेडला बसले का ? शाळा कॉलेज मधुन बाहेर कधी पडले ? सरळ घरी आले का ? किती वाजता आले ? या कड़े लक्ष देणे आवश्यक आहे. बहुतांशी मुला-मुलींनी निघुन जाण्या आगोदर मोबाइल फोनचाच वापर/आधार घेतल्याचे दिसुन येत आहे.
चैनल मिडिया आणि प्रिंट मिडिया बातम्या तुम्ही जरूर पाहली,वाचली असेल. परंतु या गोष्टीची ज्या पालकाना काळजी घेणे आवश्यक आहे.दुर्दैवाने अशा पालकाकडे सोशल मीडियाचा अभाव असतो. त्यामुळे ही बाब कृपया आपण आपला भाऊ, बहिण, मामा, मामी, मावशी, मित्र, चुलते, पुतने, शेजारी यांना अवगत करून सतर्क करावे.धक्का धक्कीच्या व धाव-पळीच्या दुनियेत पालकाना कुटुंब चालवण्यासाठी खुप आटा-पिटा करावा लागतो त्यामुळे पाल्याकड़े पुरेसे लक्ष देवु शकत नाही. परंतु लक्ष देणे खूप आवश्यक आहे.
घटना घडल्या नंतर माता-पित्यानी अश्रु ढाळण्यापेक्षा त्या आधीच काळजी घ्यावी म्हणजे समाजात (नसलेली )इज्जत जात नाही, आणि जात किती ही लपविली तरी ती जात नाही. मुलींनीही विचार करावा की ज्या माता पित्याने जन्म देऊन लहानाचे मोठे करताना मुलीचा तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळ केला.तो त्यांना उतारवयात डोळ्यात पाणी आणून रडवण्यासाठी आणि मानसिक त्रास देण्यासाठी असे कृत्य करू नये.मुलीच्या परपुरुषा बरोबर पळून जाण्याने तीच्या मागे तीच्या भावाला कुटुंबाला समाजात आत बाहेर तोंड दाखविणे अवघड होऊन जाते. त्यांच्या संपूर्ण घरावर चारिञ्यहिन घराने म्हणून ठपका बसतो.व नंतर त्या पळून गेलेल्या मुलीच्या भावाचेही लग्न ठरतच नाही.त्यामुळे पालकांनो सावधान तुमची मुलगी तुम्हाला काॅलेज एक्झाम व क्लासच्या बाहाण्याने केव्हा ही फसवू शकते हे शंभर टक्के लक्षात घ्या.एक सैराट सिनेमा पाहिल्याने रातोरात मुलमुली बिगडत नाही, त्यावर आजु बाजूच्या सामाजिक,शैक्षणिक,आर्थिक, सायन्स आणि सोशल मिडियाचा परिणाम होतो म्हणुन मुलमुली प्रेम करतांना जात धर्म पाहत नाही. म्हणुन पालकांनो मुला मुलींनी आपली सत्य संस्कृती सांगा, जात धर्म माणसाने स्वार्था करीता निर्माण केलेले आहेत.त्यामुळेच संस्कार धर्म आणि शरीर धर्म केव्हाच बिघडून टाकल्या गेला आहे.केवळ शरीराची वासना शांत करणे म्हणजे प्रेम हेच उद्धीष्ट मुला मुलींचे झाले आहे.म्हणूनच सर्वच पालकांनी सतर्क राहिले पाहिजे. मुलामुलीच्या प्रेम प्रकरणाने एक सामाजीक जबाबदारी मोठया प्रमाणात वाढते आहे, ती योग्य वेळी समजून घेतली तर देशातील जाती जातीतील प्रेम प्रकरणातून होणारे भीषण हत्याकांड थांबविता येतील.
 प्रेम आणि हिंसा यांचे सर्वात मोठे प्रबोधन करणारे क्षेत्र म्हणजे सिनेमा.यात दाखविलेल्या हिंसक घटना सर्वांच्या कायमस्वरूपी लक्षात राहतात काही लोक त्यातूनच प्रेरणा घेतात.प्रेमासाठी केलेला संघर्ष आणि त्याग हे लक्षात घेतले जात नाही.'सैराट' च्या आर्चीचा परशा वरील प्रेमासाठी मंग्या भावा बरोबरच संघर्ष नंतर वडिलांच्या विरोधात पोलीस स्टेशन मध्ये प्रेमासाठी दाखविलेले धाडस का पाहिल्या जात नाही.फक्त शेवट का अंमलात आणल्या जातो?. प्रेम हे कधीच जात,धर्म आणि आर्थिक बाजू पाहून होत नसते .प्रेम हे प्रेमच असत पण जाती जातीचे प्रेम खूप हिंसक असते.प्रेम हे प्रेम असते.पण तुमचे आमचे कधीच सेम नसते. मराठा समाज हा बहुसंख्य ब्राम्हणाचा मानसिक गुलाम आहे. त्याच्या धडावर त्यांचे डोके नसते त्यातील मेंदू हा ब्राम्हणाच्या नियंत्रणात असतो.त्यामुळे ते जन्मा पासुन मरे पर्यंत त्यांनी सांगितलेल्या हिंदू धर्माच्या रीतीरिवाजानुसार संस्कारानुसार आचरण करतात. मग तो आर्ट,सायन्स,कॉमर्स कोणतीही पदवीधर असला,कितीही उच्च शिक्षित डॉक्टर,इंजिनिअर,प्राध्यापक ,वकील,आय पी एस,आय ए एस,एम डी असला तरी भटा ब्राम्हणांच्या शब्दा बाहेर वागू शकत नाही. त्याच ब्राम्हणाच्या मुली किती मुस्लिमाच्या,मागासवर्गीय समाजांच्या मुलासोबत प्रेम विवाह करून सुखाने नांदतात.एकाही भटा ब्राम्हणांनी कोणत्या मुलांचा खून हत्या करण्याची नोंद नाही.त्यामुळे त्यांची कोणतीही इज्जत गेल्याची इतिहासात नोंद नाही. पण मराठा समाजातील मुलीवर प्रेम केले म्हणूनच मागासवर्गीय मुलाचा सामूहिकरीत्या एकत्र येऊन हत्याकांड घडवून समाजाची घराण्याची इज्जत खुनी गुन्हेगार हिंस प्रवृतीचे माणस म्हणून सर्व ठिकाणी सुवर्ण अक्षरांनी नोंद करून ठेवली आहे.
शेतमजुरी आणि वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुराचा कॉलेजमध्ये जाणारा मुलगा नितीन आगे केवळ मुली बरोबर बोलतो.त्यात त्याचे प्रेम असेल या शंकेने शाळेतून वीट भट्टी पर्यंत गावातील सर्व लोकांच्या समोर मारहाण करून जीव जाये पर्यत मारल्या जातो.मुलीच्या मनाचा विचार न करता भाऊ,वडील इतर नातलग एका निरपराध मुलांना जीवे मारतात.पुढे काय?. गुन्हेगार म्हणून जेलची हवा, कुठे राहिली घराण्याची समाजाची इज्जत मुलीच्या भविष्याचे काय?.अशा अनेक घटना घडल्यावर ही काही लोकांच्या मनातील जात धर्माचा अदुष्य किडा मरत नाही.तर ते संपूर्ण मानव जातीला बदनाम करून ठेवतात. 
  पिंपरी- चिंचवडच्या तक्षशीलानगरच्या बौद्ध विहाराजवळ राहाणारा वीस वर्षांचा विराज जगताप कॉलेजात शिकत होता. नवी स्वप्नं बघत होता. काही नराधमांनी या कोवळ्या पोराचा जीव घेतला. अमानुष अशी मारहाण करून त्याला संपवून टाकले. कारण काय, तर विराजची एका मुलीसोबत मैत्री होती. त्यांचं एकमेकांवर प्रेम होतं.प्रेम असेल तर आईवडील भावाला प्रेमासाठी संघर्ष करणारी तिच्यातील आर्ची का पुढे आली नाही. 
प्रेम करणं हा काही समाजात गुन्हा झाला आहे.या देशाचा कायदा त्यांना लागू नाही अशी त्यांची खात्री झाली आहे.म्हणून असे प्रकरण अधून मधून निर्भयपणे घडत आहेत.
प्रेम करताना जात बघायची, हा निकष त्यांनी आपल्या वयात येणाऱ्या मुलीला शिकविला पाहिजे. तरूण-तरूणी एकमेकांच्या प्रेमात पडतांना हिंसा होणार नाही यांची काळजी घेतली पाहिजे.ज्यांच्या मेंदूत उच्च,नीच,जात धर्माचे विष भिनलेले असते. ते कोणावर ही कधी ही कुठे ही असतांना प्रेम करू शकत नाही. त्यांच्या डोक्यात हिंसेचा विखार कायम धगधगत असतो.पोलीस प्रशासन व सरकारी नोकरीत असणारे असे लोक प्रत्येक ठिकाणी आपली मानसिकता दाखवून देतात.
छत्रपती शिवाजी महाराज,राजर्षी शाहूमहाराज यांच्या क्रांतिकारी विचारांची साधी ओळख या नराधमांना नाही.म्हणूनच हे मराठा जातीला ही कलंक आहेत.त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी स्वाभिमानी मराठा समाजातील जागरूक समाजसेवक,पत्रकार,संपादक,साहित्यिक विचारवंत,जाणकार राजकीय कार्यकर्ते नेते यांनी पुढे आले पाहिजे.कारण इतिहास वाचला तर इतिहास घडविता,लिहता येतो.ज्या शाहूंनी स्वतःच्या बहिणीचं लग्न धनगर जातीतल्या मुलाशी केलं होते किती नालायकांना माहिती आहे?. त्या राजर्षी शाहूंचा सोडामधुकर चौधरी यांच्या मुलीनी दादासाहेब रुपवते यांच्या मुला बरोबर लग्न करून आणि विलासराव देशमुखांच्या मुलांनी आंतरधर्मीय, आंतरजातीय लग्नं केली हे तरी माहिती आहे काय?. राजकारणातील जाणते राजे शरद पवारांच्या मुलीनं आंतरजातीय लग्न केलं. ब्राह्मण प्रमोद महाजनांच्या बहिणीनं वंजारी असलेल्या गोपीनाथ मुंडेंशी लग्न केलं. डॉ.पद्मसिंह पाटलांचे पुत्र राणा जगजितसिंह पाटील यांनी चांभार जातीतील मुलीशी लग्न केलं.मोहन भागवत ची पुतणी उर्मिला मातोंडकर प्रसिद्ध अभिनेती हिने मुस्लीम मुला बरोबर लग्न केले त्यांची कुठे साधी चर्चा झाली नाही.आर एस एस ,विश्व हिंदू परिषद यांनी हिंदू खतरेमे पडला नाही.किंवा लव्ह जिहाद झाला नाही. यांनी कोणीही खालची जात किंवा वरची जात असं काही पाहिले नाही. म्हणूनच लिहावावे वाटते हे कसले मराठे आणि कसले पाटील?. हे जातीला,धर्माला देशाला आणि मानव जातीला कलंक आहेत.
अशा नराधमांना पोलीस आणि न्यायलयीन यंत्रणेने कडक कारवाई करून धडा शिकविला पाहिजे.यांना साथ देणारी पोलीस प्रशासन यंत्रणा असेच वागली तर जनतेचा विश्वास पोलिसांवर राहणार नाही.
आम्ही सुवर्ण मराठा क्षत्रिय,वैश्य,ब्राह्मण म्हणजे मोठे थोर आणि कोणी मागासवर्गीय ओबीसी विशेष बौद्ध,मांग व चांभार म्हणजे खूपच हलके. हे ज्यांच्या ज्यांच्या मनात आजही येते, जातींची उतरंड आजही जे स्वीकारतात, ते सगळे विराज जगतापचे मारेकरी आहेत. त्यांनी अशा वेळी चूप बसून राहणे म्हणजे विराज जगतापच्या मारेकरी नराधमाचे मुख समर्थन करणे होय. ब्राह्मणांना शिव्या घालताना 'शिव- शाहू-फुले-आंबेडकर' क्रांतिकारी विचारांचा पुरोगामी महाराष्ट्र सांगायचे आणि बौद्ध पोराला मारून टाकताना मात्र मनुस्मृतीला डोक्यावर घेऊन नाचायचे, हा दुटप्पीपणा बंद झाला पाहिजे. सगळे असेच आहेत असे नाही. पण जे नेहमी प्रबोधनाची परिवर्तनाची भाषा बोलणारे अशा वेळी तोंड,डोळे,कान बंद करून बसत असतील तर,निश्चितच काळजी करावे एवढे हे प्रमाण नक्कीच आहे.म्हणूनच जातीव्यवस्था आज ही देशात कायम आहे.असे म्हणता येईल.
शिवराय,शाहू,विठ्ठल रामजी शिंदे न समजलेल्यांना आता तरी मूल्यव्यवस्था समजावून सांगावी लागेल. नराधमांना वेळीच तुरूंगात डांबावे लागेल. जातीचा माज करणा-यांची नांगी ठेचावी लागेल.एक लक्षात घ्यावे लागेल. अशा जात्यंधांना जात नसते. हिंसा करून दहशत निर्माण करणारी विखारी हीच त्यांची जात असते. त्यामुळे सगळ्या जातबांधवांना आरोपी मानण्याचे कारण नाही. पण त्याच वेळी, 'हे आपल्या जातीचे आहेत', म्हणून त्यांना मदत करण्याचा वा वाचवण्याचा विचारही कोणाच्या मनात येता कामा नये.तरच आम्ही भारतीय आहोत.आणि भारतीय म्हणून जाती जातीचे हत्याकांड नुसते पाहत राहिलो तर देशातील जाती जातीतील प्रेम प्रकरणातून होणारे भीषण हत्याकांड थांबविता येणार नाहीत.
अश्वेत माणसाला गोऱ्या पोलिसांनी मारले म्हणून आख्खी अमेरिकन माणस सर्व वर्णव्यवस्था एकत्र येऊन निषेध करते. आणि भारतात?. अरविंद बनसोडे (रा- पिपळधरा ता- नरखेड, जि- नागपूर) विराज जगताप (रा- पिंपळे सौदागर, जि- पुणे) दगडू धर्मा सोनवणे (रा- महिंदळे ता. भडगाव, जि. जळगाव) साळापुरी जि- परभणी येथे पाच बौद्ध तरुणावर 15 ते 16 जातीयवाद्यांनी भीषण हल्ला केला. राहुल अडसूळ – कोरेगाव, ता.कर्जत, जि.अहमदनगर.बीड जिल्ह्यातील पारधी समाजाचे तिहेरी हत्याकांड नुकतेच महाराष्ट्रभर गाजले आहे. हा प्रकार जातीयवाद्यांकडूनच घडलेला आहे. चंदनापुरी खुर्दी, ता. अंबगड, जि. जालना येथे बौद्ध परिवाराला २०-२५ जणांच्या टोळीने मारहाण करुन जातीवाचक शिवीगाळ केली.मंठा, जि. जालना येथील दलित शिक्षकाला गावातील उच्चवर्णींयाकडून केल्या जाणाऱ्या शिवीगाळाला, मारहाणीला कटांळून त्यांना आत्महत्या करायला भाग पाडले. त्यांच्यामागे त्यांचा परिवार आहे. त्यांच्या जीवीताला धोका आहे. निळा. ता.सोनपेठ, जि. परभणी या गावातील बौद्ध महिला संरपचांना गावातील बौद्ध कुटूंबांना कोरोना काळात गावातील शाळेत क्वारंटाईने केले म्हणून मारहाण करण्यात आली. यात सरपंचाच्या पतीस बेदम मारहाण झाली आहे. गावातीव उच्चवर्णीय आरोपींवर एट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. वैजापूर, औरंगाबाद येथे आंतरजातीय प्रेम प्रकरणातून कुटूंबातील सदस्यांची हत्या करण्यात आली. नागदरा ता. परळी, जि, बीड येथे दि. १२ जून रोजी होलार समाजातील बांधवांवर हल्ला. या सारख्या प्रकरणात तरुण आजही अमानुष पद्धतीने मारले जातातत्यांचे दुख फक्त बौद्धांनी करायचे, बाकी भारतीय अशा पद्धतीने वागतात कि आम्ही त्या गावातील राज्यातील आणि देशातील कोणी नाहीच.या अशा भयंकर घटनेमुळे तरी जातीयवाद संपायला हवा. जातीचं निर्मूलन करण्यासाठी 'माणसां'नी उभं राहायला हवं. अशा घटनांनंतर दोन जातींमधील तेढ आणखी वाढवली जाणार असेल, तर जातीअंताकडे नव्हे, जगाच्या अंताकडे आपली वाटचाल सुरू आहे. असे खेदाने म्हणावे लागेल.प्रेमावर हा देश उभा करायचा की विखारावर, याचं उत्तर आता तरी आपल्याला द्यावंच लागेल. ह्या घटना योग्य वेळी समजून घेतल्या आणि प्रबोधन केले, तर देशातील जाती जातीतील प्रेम प्रकरणातून होणारे भीषण हत्याकांड थांबविता येतील. 
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९.भांडूप,मुंबई

कोरोना जागतिक महामारीत चर्चा नव्या जीवनमूल्यांची : एकविरा ते वीरमाता जिजाऊ.

 कोरोना जागतिक महामारीत चर्चा नव्या जीवनमूल्यांची : एकविरा ते वीरमाता  जिजाऊ.

      'मृत्यूचे भय दाखवून लावलेली जागतिक आणीबाणी' असे आजच्या लाॅकडाऊनचे वर्णन लोक करीत आहेत. एका क्षणात साऱ्या जगाला नष्ट करू शकणाऱ्या, अण्वस्त्रधारी देशांना कोरोना पासून 'माणूस' वाचविणारी लस किंवा प्रतिबंधक औषधे तीन महिन्यात बनविता येत नसतील; तर हे जग जितक्या सहज निसर्ग आणि प्राणिजगताचा विनाश करू शकते ते आपले प्राण वाचवू शकत नाही..असा त्याचा अर्थ आहे. 
     2500 वर्षांपूर्वी झाडाचे तोडलेले पान, तुम्हास जोडता येत नसेल तर तोडताना विचार करा.. असा निसर्ग संदेश देणारे एकविरापुत्र बुद्ध या जगास खूप काही सांगून गेले. जागतिक महामारी कोरोना हे नियोजित मानवी षड्यंत्र आहे हे जगातील शोषित लोकांना पावलो पावली प्रत्ययास येते आहे. 
        "आपकी जान बचानेके लिये लाॅकडाऊन है" असे धादांत खोटे बोलणारे व्यापारी पंतप्रधान मोदी आता अदानीच्या चोरपावलांनी लाईट बिले मागायला येत आहे आहेत. सरकारी रोजगार बंदी मुळे लोक घरी आहेत. दमडीची कमाई नाही मग लाईट, शिक्षण, आरोग्यासाठी पैसे आणायचे कुठून? नोटबंदी आणि लाॅकडाऊन मुळे भारतीय पंतप्रधानांना  स्वतःच्या (महंमद तुघलकी) वागण्यातून विकृती तयार झाली आहे. लोक जरी घरात बसले तरी विचार करीत आहेत. हालचाल आणि फिरण्याचे स्वातंत्र्य मोदींनी नाकारले असले तरी मनाचे स्वातंत्र्य जपणारे बुद्ध फुले आंबेडकरी लोक जागृतीचा अग्नी मनामनात पेटवीत आहेत; ज्यावर लोकशाही टिकून आहे. ज्यांच्या डोक्यात व्यापार आणि व्यापारच आहे. छुपे भारत पाकिस्तान युद्ध, पुलवामा हत्याकांड,नोटबंदी किंवा कोरोना यात आपला फायदा पाहण्याची मोदी शहा गुजराती विचारसरणी लोकांनी पुरेपूर ओळखली! अनुभवली!!.     
     मनुस्मृतीच्या ब्राह्मण क्षत्रिय सत्तेची दाहकता देशाने हजारो वर्षे अनुभवली होती. वैश्य व्यापारी, कर्जबुडवे उद्योजक वर्ग या दोघांपेक्षा मानवी भयाचाही मृत्यू आणि त्याच्या भीती भयाचा व्यापार करू शकतात; हे लोकांनी अनुभवले नव्हते ! ते या कोरोनाच्या रूपाने अनुभवले. निसर्ग वादळाने कोकणातली (कोरोनामुळे) रिकामी झालेली घरे सर्वार्थाने उध्वस्त झाली आणि सरकारी मदतीच्या क्षमतांची लायकी लोकांनी याची देही याची डोळा पहिली. 2 कोटी रुपयांचे गुंठ्याला मूल्य असलेल्या रायगड जिल्ह्याच्या 60 टक्के जमिनी बाजारात विकून, महाराष्ट्र शासन चालविणाऱ्या उच्चवर्णीय सरकारने रायगडास 100 कोटी रुपये देण्याची फक्त 'घोषणा' केली! यावरून सरकारची कोकण विरोधी मानसिकता समोर आली. नवी मुबंई तील एका शेतकऱ्यांची एक एकर जागा 80 कोटी रुपयांना सिडको विकते, पोलिसी जबरदस्तीने 3 ते 30 हजार रुपये एकरने घेते. तर 1970 चे सिडको भूसंपादन 95 गावे, नवी मुबंई विमानतळ 20 गावे, सिडको नयना क्षेत्र, रिलायन्स सेझ ही अंदाजे 300 गावे शेतजमिनिसह घेताना; रायगडची गावे लुटली किती? आणि मदत केली किती? अर्थात केंद्र काय आणि राज्य काय मंत्र एकच! "आगरी कोळी ओबीसी की लूट लगी है लूट॥ अंत काल मे पछतायेगा?? मोदी लूट सके तो लूट।। नही तो कोरोनामे प्राण जायेंगे छुट....।।" रायगड सह कोकणची विकासाच्या नावे लूट करणाऱ्या मुख्यमंत्री ठाकरे यांचे तोंड आणि हात बांधून ठेवणाऱ्या महायुतीचा जाहीर निषेध मी मातृसत्ताक कोकणपुत्र करत आहे. 
     जागतिक महामारीच्या साथीत पुरून उरलेला भारतीय माणूस रेल्वेखाली,कुठे उपासमार तर कुठे सवर्णांच्या संघटित हत्याकांडात मारण्याचे ठरवूनही मृत्युंजय ठरलेल्या मागासवर्गीय भारतास मी सॅल्युट करतो. आज सुशांतसिंग राजपूत याने आत्महत्या केल्याबरोबर मा पंतप्रधान मोदी मा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सारे मंत्रिमंडल पोपटा सारखे बोलू लागले. माणसाच्या मृत्यू बाबत क्षत्रिय ब्राह्मण वैश्य यांचा मृत्यू सार्वजनिक दुःख व्यक्त करण्याचा, सरकारी श्रध्दांजलीचा? आणि अरविद बनसोडे विराज जगताप हे मागासवर्गीय(अनुल्लेखाने) मृत्यूनंतरही मारण्याचे शुद्रअतिशूद्र तिरस्काराची ही मनुवादी मानसिकता नव्हे काय?. 
     आज कोकणाचे वादळ हे कोकणासाठी आणि सरकारसाठी लक्षवेधी ठरलंय. न्हावा शेवा, उरण बंदर, नेव्ही उरण, राष्ट्रीय केमिकल्स थळ अलिबाग, ओएनजीसी प्रकल्प, सिडको, विमानतळ हे सारे प्रकल्प अगदी जैतापूर रत्नागिरीत आहे एवढे असूनही पंतप्रधान मोदी तेथे भेट देत नाहीत की मदतीचे एखादे वाक्यही बोलतही नाहीत?कारण सध्या कोकण ओबीसी मागासवर्गीय कुळांचा ताबा असलेले कोकण आहे. उचवर्णीय खोत सावकारांना 1932 साली डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि नारायण नागु पाटील यांनी पुण्या मुबंईत हाकलून दिलेय. उच्चवर्णीय जमीनदारी संपल्यामुळे येथे विराज जगताप सारखी सैराट हत्याकांड घडत नाहीत.
      आर्थिक समतेच्या आंदोलनाने सामाजिक समतेकडे कोकण वाटचाल करतेय. तरीही आमचे महसूल मंत्री थोरात आणि चक्क प्रधान मंत्रीही कोकणातल्या गुरचरण आणि जिल्हाधिकारी यांच्या अखत्यारीतील सर्व जागा शोधून पंतप्रधान आवास योजनेचा फायदा घेऊन बिल्डर लॉबीला विकत आहेत.
      आज वादळात उडालेल्या कौलांना द्यायला शासनाकडे पैसे नाहीत ते गरिबांना घरे देतील हे तुमच्या पचनी पडते काय? आज कोकणच्या मूळ कष्टकऱ्याला फयान वादळ असो की निसर्ग वादळ..  तसेच राष्ट्रीय महामार्ग असो की विमानतळ प्रकल्प यात पुनर्वसन मिळतच नाही. कारण प्रत्यक्षात शेती कसणा-या कुळाच्या नोंदी सरकारने आजही घेतल्या नाहीत. शिवसेनेला मुबंई कोकणात आगरी कोळी भंडारी या ओबीसींनी आपले रक्त आणि प्राणाची आहुती देऊन मोठे केले. सरकारही आणले. परन्तु मनोहर जोशी या ब्राह्मण खोत माणसाला सेनेने 1996 च्या सरकारात मुख्यमंत्री केले आणि बाबासाहेबांच्या खोती जमीनदारी विरोधी, कूळकायद्यास मातीत गाडून, शहरात पळून गेलेल्या आपल्या ब्राह्मण जातीच्या नावावर सातबारा करून खोतांच्या घरा घरात पोहचविणारे मनोहर पंत जोशी आज कृतकृत्य झाले. जीवन पेशवाई साठी सार्थकी लावणारे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर नारायण राणे यांनी आपल्या जातीस सातबारा आणि ओबीसी आरक्षणही बहाल केले. आगरी कोळी भंडारी ओबीसींना वाली राहिला नाही. आपल्या प्रबोधनकार आजोबांचे वारसा हक्काने प्राप्त विचार सेनेने सोडून दिल्यामुळे आज कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे महसूलमंत्री थोरात आणि गृहमंत्री देशमुख मागासवर्गीय महाराष्ट्राला लुटत आहेत. अर्थात पुन्हा भाजपची पेशवाई येणार अशी भीती ओबीसींना वाटू लागलीय. क्षत्रिय पराभवानंतर पेशवाई आणि पेशवाईनंतर वैश्य मोदिशाही या दुष्टचक्रातून बाहेर पडण्याचा उपाय आपण शोधुया!. 
      स्वातंत्र्या नंतर भारतीय संविधान आले तरी सर्वार्थाने बलवान असलेले उच्चवर्णीय  लोक महाराष्ट्र आणि केंद्रातही सत्तेवर आले. ओबीसींच्या प्रबोधन आणि जमीन पाणी जंगल शिक्षण आरक्षणाच्या चळवळी हिंदुत्ववादी आंदोलनाच्या आडून संपविण्याच्या चाणक्य नीतीने समतेचा विचार बाजूला पडला. जगातल्या वर्णभेदी गोऱ्या अमेरिकन ट्रम्प  प्रमाणे आपल्याकडे खुलेआम लूट करणारे बाबा दादा नाना आसाराम शेटजी भटजी सारखे महाराज हे मागासवर्गीयांना पुन्हा मनुस्मृतिकडे नेत आहेत. यावर उपाय म्हणजे प्रबोधनातून नवी संविधानिक मूल्यं देशाला देणे होय. "कसेल त्याची जमीन आणि राहील त्याचे घर" या नैसर्गिक न्याय हक्काची अंमलबजावणी करणे ओबीसी चळवळीस अजून जमलेले नाही.
       अर्थात उच्चवर्णीय जिल्हाधिकारी आणि तहसील दार यांना, उच्चवर्णीय पोलीस अधिकारी वर्गाच्या सोबत पाठविणारा  ब्राह्मण मराठा सत्ताधाऱ्यांनी पुन्हा नवी सावकारी कोकणात आणली. अर्थात या जमीनदारीची नवी नावे सरकारी विकास प्रकल्प! सिडको एमडीआयडीसी म्हाडा, नवी मुबंई विमानतळ प्रकल्प, जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प अशी ठेवून कोकणास विकासाच्या नावे भूमिहीन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे उच्चवर्णीयांच्या बागायती नारळी सुपारी आंबे यात वाचविली जात आहे. आगरी कोळी कराडी भंडारी यांची गावेच का संपविण्यात येत आहेत? मासेमारी,जलवाहतूक बंदरे,रेतीविटामिठागरे उध्वस्त होत आहेत. हा प्रश्न मला ठाकरे सरकारला विचारायचा आहे. 
        निसर्ग वादळात फक्त नारळ सुपरीच्याच बागा मीडिया दाखवतोय. मच्छिमार आणि आगरी कोळी ओबीसीची उध्वस्त मच्छिमार गावे, गावठाणे कोळीवाडा पाहण्यासाठी एकही आमदार आणि खासदार नसावा?उच्चवर्णीय मनु नीतीने महाराष्ट्र सरकार कुठे चाललंय??. मी महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्र्यांच्या सल्लागार मंडळास विनंती करीन. येथे मागासवर्गीय प्रशासकीय अधिकारी तात्काळ नेमावेत. ज्यांना समुद्रावरचे मच्छीमारांचे हक्क कळत नाहीत ते आयएएस असूनही मनुस्मृतीच्या अंध भक्तीने आंधळे झालेत!  सिडकोतील आणि मुबंई महागर पालिकेतील विश्वास पाटील, संजय भाटिया, भूषण गगराणी यांनी ही परंपरा सुरू केलीय! आता अशा अधिकाऱ्यांची पलटण येथे बसलीय. कूळ कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी. स्त्री,शूद्र आणि अतिशूद्र शोषक अशी मनुस्मृती पेशवाईत राबविणाऱ्या पडद्या मागील उच्चवर्णीय नोकरशाहीस उत्तर म्हणून सातबारा आणि घरावर महिलांची पत्नी, मुली, बहिणी याची नावे लिहावीत. अर्थात कोकण हे मातृसत्ताक आहे. येथील मासेमारी,शेती, वीटभट्टी, रेती, पोल्ट्री व्यवसाय यात महिलांना मालकी अधिकार द्यावेत. एकविरा मातृसत्तेमुळेच येथे हुंड्यासाठी महिलांना जाळले जात नाही, स्त्रीभ्रूण हत्या होत नाही आणि जातीच्या उच्च मानसिकतेने मनोरुग्ण झालेले लोक स्त्रि शूद्र अतिशूद्र याना सांस्कृतिक पुण्यातील विराज जगताप सारखी हत्याकांडेही करत नाहीत. 
       म्हणूनच नवी जीवन मूल्ये देत असताना, मातृसत्ताक एकवीरा पुत्र बौद्ध संस्कृती ही कोकणची 2500 वर्षाची वैभवशाली लोकशाही पूरक स्त्री संस्कृती आपण पुढे आणली पाहिजे. महाराष्ट्रात जे आताचे मागासवर्गीय तरुणांचे हत्याकांड समर्थक राजकीय वातावरण पेटले आहे;  अमेरिकन जागतिक वर्णभेदी चळवळी पाहता ते महाराष्ट्राला अशोभनीय आहे. या अंधारमय वातावरणात नवी जीवन मूल्ये देणाऱ्या विवेकवादी विचारवंतांनी पुढे यावे. फेस बुकवर जाती जातीत भांडणे लावणारे मेसेज व्हायरल होणे हा बुद्धिवादी सुधारक महाराष्ट्राचा अपमान आहे. या क्षणाला मराठा ब्राह्मण जैन बौद्ध ख्रिश्चन मुस्लिम डावे उजवे सारे विवेकवादी समोर येऊन तरुणांना मार्गदर्शक ठरले पाहिजेत. कोरोनाच्या संकटकाळात घरी लपून बसलेल्या राजकारणी आणि विचारवंत यांना नंतर कुणी स्वीकारणारच नाही. संघर्षातूनच आंबेडकर आणि शिवराय जन्म घेतात. स्थितीशीलतेतून विकृती जन्म घेते हा निसर्ग नियम आहे. जग हे परिवर्तनशील आहे. म्हणूनच वाहणाऱ्या नद्या आणि नित्य नव्या लाटांनी फेसाळणारा समुद्र पवित्र राहतो!  तुंबलेल्या गटारांची डबकी होतात. म्हणूनच सद्य सामाजिक वादावर चर्चा ही एकमेकांची उणी धुणी काढण्याची नको तर भारतीय संविधानिक मूल्यांची व्हावीत, असे या लेखाच्या हेतूत मला सांगायचे आहे. स्त्रियांना शिक्षण संपत्ती धर्म आणि मानवी अधिकार नाकारणाऱ्या पुरुषसत्ताक क्षत्रिय ब्राह्मण वादात, आईला मारणाऱ्या परशुराम संस्कृतीस उत्तर, जिजाऊ सारखी विरमाताच देऊ शकते! प्रेमाने जग जिकणा-या बुद्धाने; प्रथम स्वतःतील एक एक वाईट सवयी त्यागून म्हणजेच दारू सोडून दूध पिण्याच्या चांगल्या सवयीने,(पंचशील) स्वतःचे आणि समाजाचे जीवन सुन्दर करणाऱ्या पुरुषाला "वीर" म्हटले आहे. अशा वीर पुरुषाला जन्म देणारी कार्ले गडातील ती एकविरा आई! बुद्धाच्या बरोबरीनेच स्वतःतील दुर्गुणावर विजय मिळविणारा जीन, विजेता अर्थात जैन! निःशस्त्र अहिँसक  म्हणजेच "महावीर" होतो हे सांगितले. जिंकलेल्या साठ टक्के लढाया छत्रपती शिवराय हे रक्त न सांडता जिंकले हा "गनिमी कावा" म्हणजे रक्तरंजित मानवी हिंसा न करता सत्ता मिळविणे. भारतीय लोकशाहीला रक्ताचा एकही थेंब न सांडता सत्तांतर करण्याची एकविरापुत्र बुद्ध नीती डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सार्वत्रिक निवडणुकीत सर्वांना समान मताधिकार देऊन दिली. मोदींनी आता caa/ nrc आणि  evm मशीन आणून त्यात नथुरामी सत्ता आणि हिंसा आणली. जिजाऊ म्हणजे मातृसत्ता जी आईच्या मायेने आम्हा मुलांना जन्मास घालते. अर्थात जगात प्रथम शेतीचा शोध लावणाऱ्या स्त्रिया, जात मानीत नव्हत्या. पुरुष धर्मगुरूंनी स्त्रियांनाच धार्मिक अधिकार नाकारून मनुस्मृती सारखे स्त्री विरोधी धर्म जगात सर्वत्र आणले आणि जन्मदात्री आई विरोधी वर्णभेदी, जातिशोषक उच्चनीच प्रथा आणली. 
      आंतरजातीय आणि आंतरराष्ट्रीय धर्म विवाह करणाऱ्या बाबासाहेब आंबेडकर सविता माई आंबेडकर;डॉ भारत पाटणकर gail omvedt  बाळासाहेब आंबेडकर अंजलीताई आंबेडकर; अभिनेते आमिर खान किरण राव,डॉ हर्षदीप कांबळे थायलंड देशाच्या उद्योजिका रोझाना कांबळे या विवाहातील स्त्रियांचे राजकारणा पलीकडे जाऊन कौतुक केलं पाहिजे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव अभिनेते रितेश देशमुख जेनेलिया डिसुझा,आंतरधर्मीय विवाह करून मुख्यमंत्री पदापेक्षा मोठा आदर्श आम्हाला दिलाय! या सारखे हजारो लोक देशात आज आहेत. त्यांनी जो आदर्श दिलाय तो संविधानवादी आदर्श देणारा आहे.आई एकविरा ही कोलीय वंशाची महामाया,महामाता तिचे लग्नही शाक्य वंशाच्या राजा शुद्धोधन यांच्याबरोबर झाले. जगास शांती समृद्धी आणि दुःख मुक्ती म्हणजेच सुख देणाऱ्या बुद्धांना जन्म देणारे हे जोडपे होते. जिजाऊंनी स्त्री म्हणून निर्माण केलेले रयतेचे राज्य सागरी आरमार आणि छत्रपती शिवरायांचा स्वराज्य विचार पाहण्यासाठी, मनुस्मृतीच्या दैववादाच्या पलीकडे पाहण्याची दृष्टी लागेल. अर्थात स्त्री स्वातंत्र्यात, विवाहाचे स्त्री स्वातंत्र्य, हुंड्यात उच्च जातीय मानसिकतेत जाळून, जिजाऊ एकविरा सावित्री अहिल्या कशा तयार होणार? म्हणूनच 2000 वर्षांपासून हुंडा नाकारणारी लग्नविधी करणारी, सर्व आर्थिक व्यवहार करून आपले सांस्कृतिक अस्तित्व 2000 वर्षे जपणाऱ्या मातृसत्ताक कोलीय आरमारी, सागरी विचारास समजून घेतले पाहिजे. मुबंईचे पाच हजार महिलांचे सुक्या मासळीचे मरोळ मुबंई मार्केट सांभाळणारी वर्सोव्याची राजश्री भानजी ही कोलीय महिला एमबीए झालेल्या उच्चशिक्षित महिलांसाठी आदर्श का ठरू नये? मुबंईच्या आंतरराष्ट्रीय मार्केट मध्ये काती कोयते घेऊन आपल्या शिलाचे रक्षण करणारी महिला आणि तलवार हाती घेऊन आपल्या मुलास रायगडावर राज्याभिषेक करणारी वीरमाता जिजाऊ ह्या समजावून घेऊ या.
      अंधाराला दूषण देण्यापेक्षा सोशल मीडियावर प्रबोधनाचे दिवे आणि एकविरा जिजामाता सावित्रीमाई या ज्ञानज्योति पेटवू या!आकाशातल्या देव देवता सोडून मानवी संघर्षाचे जीवन जगणाऱ्या महिलांकडे आदर्शरूपी प्रेरणा शोधणाऱ्या महाराष्ट्राच्या मातृसत्ताक आगरी कोळी भंडारी,बौद्ध मराठा तरुणांचे स्वागत या खंडप्राय राष्ट्राने करावे ही एक फार मोठी समाज सुधारणा आहे...
         
राजाराम पाटील,8928452112,उरण,रायगड.
ओबीसी संघर्ष समन्वय समिती महाराष्ट्र

कोरोना आणि लोकनेते ओबीसी नेते दि बा पाटील यांचा ७ वा स्मृतिदिन!

 कोरोना आणि लोकनेते ओबीसी नेते दि बा पाटील यांचा ७ वा स्मृतिदिन!

देवांनी मैदान सोडले! अशी लढाई म्हणजे कोरोना महामारीच्या लाॅकडाऊनूची लढाई!एरवी कोणतेही संकट आल्यावर देवाचिया द्वारी उभा क्षणभरी...हे ओबीसी हिंदू माणसाचे खरे खुरे वर्णन कोरोनाच्या काळात खोटे ठरले. महाभारताची प्रत्यक्ष मैदानी लढाई घर बसल्या पाहणाऱ्या संजयाची दिव्य दृष्टी  वर्तमान काळात मोदीभक्तीने अंध झालेल्या देशात, सेनेच्या खासदार संजय राऊत यांना प्राप्त झाली. जवळ जवळ सर्वच माणसांना कोरोनाच्या काळात देवांची गरज असताना मंदिरांना आणि देवांच्या तिजो-यानांही टाळे लागले. भक्तांना देवांनी वाचविण्या अगोदरच, देव आणि देवालये यांना बेरोजगार भक्तांपासून वाचविण्याचा निर्णय कपटी पुजारी भटजी पुरोहितशाही सरकारने घेतला. कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून मंदिरांना टाळे लावले गेले, हे तेथे देव नाही! हे सत्य प्रकट करणारे विश्वरूप दर्शन लोकांना झाले. परन्तु मंदिरातला पैसा उपाशीपोटी जनतेसाठी खुला करण्याची मानवतेची हाक देव, देवळाचे उच्चवर्णीय ट्रस्टी आणि सरकारलाही ऐकू येऊ नये? म्हणूनच संजय राऊत याचे कौतुक आपण सर्वांनी करायला हवे.
        देव नाकारून दि बा पाटील साहेबांनी आगरी कोळी कराडी ओबीसी समाजासमोर जो मानवी कर्तृत्वाचा हिमालय उभा केला आहे, ते समजण्यासाठी वर्तमान कोरोना सारखा उपयुक्त दुसरा काळ नाही. मानवी जीवनाच्या बेरोजगारी, शिक्षण, आरक्षण, साथीचे रोग आणि जन्म मृत्यु यात देवाचा काडीचाही उपयोग नाही हे कटुसत्य कुणी स्वीकारत नाही. अर्थात देव नाकारून,पाच हुतात्मे आणि स्वतःचेही रक्त सांडून,सिडको पुनर्वसनाचे साडे बारा टक्के भूखंड देणाऱ्या ,दि बा ना स्वीकारणे अवघड काम आहे. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी सिडको भूखंड स्वीकारले! दि बा ना स्वीकारणे अजून बाकी आहे. अर्थात कठीण काम आहे.
        नेहमीच देव देवतांच्या जयंत्या साजऱ्या करणाऱ्या भारतीय समाज मनाला मानवी जयंती साजरी करण्याचा संस्कार अजूनही नीट झालाय असे म्हणणे धोक्याचे ठरेल. देवापुढे माणूस पालापाचोळा आहे अश्या विचारामुळे माणसाचे कर्तृत्व नाकारले गेले आणि देवपूजेची अपरिहार्य स्थिती माणसासमोर आणली गेली. 2500 वर्षांपूर्वी बुद्ध महावीर यांनी देव नाकारला. अर्थात देव नाकारून माणसाची पूजा करा असेही सांगितले नाही.तर देव आणि मानवी व्यक्तिपूजा माणसाला गुलामीकडे घेऊन जाते,पूजा आदर्शाची सद्गुणांची आणि जीवनमूल्यांची करावी. आम्ही देव नाही. देवपूजा आणि मानवी व्यक्तिपूजाही नाकारली. जमिनीवरची संकटे जमिनीवरचा माणूसच सोडवू शकतो, आकाशातला देव नाही. असे तत्वज्ञान स्वीकारून ते जगण्याचा यशस्वी प्रयत्न करणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी रायगड जिल्ह्यात जो आदर्श आगरी कोळी कराडी भंडारी ओबीसींना दिला त्याच विचारांनी दि बा पाटील जगले. रायगड जिल्ह्यातील खोती जमीनदारी विरोधातील आंदोलन आदरणीय नारायण नागु पाटील यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली केले ते खऱ्या अर्थाने देवाचे मालक असलेल्या शेटजी भटजी या उच्चवर्णीय जमीनदारी विरोधात होते. 
        लोकमान्य टिळक हे ब्राह्मणी खोतशाहीचे समर्थक होते. राष्ट्रीय  स्वयंसेवक संघाचे दुसरे संघचालक हे स्वतः खोत सावकारी कुप्रेथेचे लाभार्थी होते. आठवले, बिवळकर,धर्माधिकारी जोशी ही आज गाजलेली आडनावे खोत लोकांचीच आहेत. अर्थात रायगड जिल्ह्यातील  अॅड दि बा पाटील आणि अॅड दत्ता पाटील ही महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधीपक्ष नेतेपदी पोहचलेली दोन महान ओबीसी माणसे, भूमिहीन कुळे विरुद्ध जमीनदार खोत सावकार संघर्षातून मानवी कर्तृत्वातून पुढे आलेली माणसे होती. दोन दिवसांपूर्वीच महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते माजी मुख्यमंत्री सांगतात "ब्राह्मण म्हणून लोक त्यांना विरोध करतात याचे वाईट वाटते. माझे कर्तृत्व पहा." देवेंद्रजी आपले वडीलही जमीनदार होते. त्या खानदानी श्रीमंतीचा फायदा निवडणुकीत घेऊनच आमदार मुख्यमंत्री झालात, नव्हे विधान सभेतील दोनशे आमदार असेच पिढीजात धर्मसत्ता जमीनदारी आणि सावकारी यातूनच पुढे आलेत! यात भूमिहीन ओबीसी एससी एसटी यातील दि बा पाटील यांच्यासारख्या गरिबीतून पुढे आलेल्या आगरी ओबीसींचे कर्तृत्व हे पहायचे असते. तुमच्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या उच्चवर्णीय जातीतून जे जे मुख्यमंत्री महसूलमंत्री गृहमंत्री आजही झालेत , त्यामुळे महाराष्ट्र विधानसभा ही मनुस्मृतीच्या जुन्या परंपरागत लोकशाही विरोधी मार्गे निघाल्याचे अधोगतीचे संकेत आहेत. आपण विरोधीपक्ष नेतेपदी असताना ,निसर्ग वादळाने बंद पडले कोकणाचे दिवे पंधरा दिवसात पेटवू शकत नाहीत, मागासवर्गीय तरुणांच्या हत्या थांबवू शकत नाहीत. यात आपण आणि शरद पवार हे उच्चवर्णीय महायुतीचेच सरकार चालवताय हे आम्हा आगरी कोळी भंडारी ओबीसींना समजते. 
        दि बा पाटील यांनी विरोधीपक्ष नेतृत्वाची उंची जी महाराष्ट्राला प्राप्त करून दिली ती पहाता देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा विधानसभेतील दि बा पाटील यांची छापील भाषणे अभ्यासावीत आणि मगच बोलावे.माझी जात न पाहता कर्तृत्व पहा. खऱ्या कर्तृत्वाने पुढे येण्यासाठी कोकणातील ओबीसींना केवढा संघर्ष करावा लागतोय.?हे नवी मुबंई विमानतळ,कोळीवाडा गावठाण प्रश्न ,मच्छिमार बांधवांचे नाकारलेले पुनर्वसन हे तुमच्या आणि विद्यमान सरकारने प्रलंबित ठेवलेले प्रश्न आहेत.सत्ताधारी ठाकरे पवार सरकार आणि विरोधी पक्ष नेते म्हणून देवेंद्रजी आपणही या महापापाचे वाटेकरी आहात.महाराष्ट्राच्या सत्तेत कायम ब्राह्मण मराठा मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळाचे वर्चस्व राखण्यात देवांचे देवालय आणि कोकणातल्या दादा बापू नाना यांचेच आशीर्वाद लाभलेत. म्हणूनच दि बा ना कोणत्याही सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्काराने पुरस्कृत केले नाही. ते ओबीसी मागासवर्गीय आहेत म्हणूनच ना?
         शेतकऱ्यांना न्याय देव आणि देव समर्थक जमीनदार देऊ शकत नाहीत म्हणून दि बा पाटील साहेबांनी देव नाकारला. अर्थात मी सांगितलेल्या मार्गानेच चला ,असा दुराग्रह कधीच धरला नाही! कारण हा मार्ग विवेकाचा ,प्रज्ञा, आणि स्वतः च्या शहाण्या अनुभवाने स्वीकारण्याचा विषय आहे. हजारो वर्षे मनुस्मृतीच्या वैदिक हिंदू कायद्याने शंभरच्या शंभर नोकऱ्या आणि राजसत्तेच्या जागा १५ टक्के ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांनाच देणाऱ्या अन्याया विरोधात जाऊन ५२ टक्के आगरी कोळी कराडी माळी भंडारी ओबीसींना तसेच एससी एसटी या मागासवर्गीय भावांसहित ८५ टक्के लोकांना किमान ५० टक्के जागा मिळाव्यात यासाठी मंडल  आयोगाचे आंदोलन राष्ट्रीय पातळीवर करणारे दि बा पाटील वैदिक हिंदू मानसिकतेच्या ओबीसी आगरी कोळ्यांना जेव्हा कळतील तेव्हा कदाचित आरक्षणाचा अधिकार संपविण्याच्या मार्गात पवार फडणवीस मोदी युती यशस्वी झालेली असेल. शरद पवार हे पुरोगामी नाहीत हे ब्राह्मण फडणविसच सांगू शकतात. अर्थात मनुस्मृती धर्मात क्षत्रिय सत्तेपेक्षा परशुधारी पुरोहित श्रेष्ठ आहेत.महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते  नागपूर, पुणे, खालापूर, रायगड येधे मागासवर्गीयाची जी अन्याय अत्याचाराची हत्याकांड घडवीत आहेत त्यामुळे पवारवादी राष्ट्रवादीचे पुरोगामीपण उध्वस्त झाले आहे.     
        दि बा पाटील याचा स्मृतिदिन साजरा होणे ही ओबीसी आगरी कोळी कराडी समाजासाठी खूप मोठी ऐतिहासिक गोष्ट आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती ज्या पद्धतीने जपल्या जातात तोच आदर्श ओबीसी समाजाने घेतला पाहिजे. तो भव्यपणा, पुस्तके वैचारिक साहित्याची करोडो रुपयांची विक्री,विदवत्तापुर्ण भाषणे,हे स्मृती जपण्याचे संस्कार साऱ्या देशासाठी आदर्श आहेत. साडेबारा टक्के घेतलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या आजोबासारख्या होणाऱ्या पारंपरिक पुण्यतिथीच्या पद्धतीने दि बा सारख्या विचारवन्त नेत्यांच्या आठवणी स्मृती न जपता त्यांच्या समाज हक्कांसाठीचा संघर्ष, राजकीय सामाजिक जीवन,सिडको विरोधात कधीही न संपणारा संघर्ष, धर्म देव देवळे यांच्याकडे पहाण्याचा खरा वास्तववादी आदर्श दृष्टिकोन,आचरणात आणणे गरजेचे आहे. नवी मुबंई विमानतळ प्रश्न, नवी मुबंई गावठाण प्रश्न, मुबंई गावठाणे कोळीवाडे, ओबीसी आरक्षण यात तरुण मोठया संख्येने भाग घेताहेत ही आशादायक दिलासा देणारी बाब आहे. तरीही देव नाकारून विज्ञाननिष्ठ मागासवर्गीय भारतासाठी काम करणाऱ्या बुद्ध ,सावित्री जोतिबा फुले ,डॉ बाबासाहेब आंबेडकर नारायण नागु पाटील दि बा पाटील दत्ता पाटील यांना अजूनही आपल्याच ओबीसी भावाच्या नजरेतील उपेक्षेतून किती काळ जावे लागणार ?. याचे शल्य आजच्या या स्मृतिदिनी जाणवतच राहील!

राजाराम पाटील 8928452112
ओबीसी संघर्ष समन्वय समिती महाराष्ट्र
 (विशेष विनंती लेख आपल्या वैचारिक,राजकीय अडचणीचा असेल तर प्रसिद्ध केला नाही तरी हरकत नाही. आणि लेख प्रसिद्ध केल्यास कृपया pdf पाठवावी.)

कोरोना लॉक डाऊनने जगण्याची नवीन शिकवण दिली.

 कोरोना लॉक डाऊनने जगण्याची नवीन शिकवण दिली.

असंघटित नाका कामगारांच्या न्याय हक्क व प्रतिष्ठेसाठी १९८२ पासुन शहरातील नाक्यावर कामासाठी उभे राहणाऱ्या कामगारांना संघटित करून न्याय मिळवून देण्यासाठी लढत असतांना अनेक अनुभव आले. सकाळी सात वाजता पासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कोणताही कामगार नाक्यावर उभा राहिला तर त्याला शंभर दोनशे रुपये मिळण्याची शंभर टक्के खात्री होती.आठवड्यातून दोन तीन दिवस काम मिळाले तरी त्याच्या कुटुंबातील सदस्य उपाशी पोटी राहणार नाही यांची व्यवस्था केली जात होती. कोरोना लॉक डाऊन मुळे सर्व कामधंदे पूर्णपणे बंद असल्यामुळे नाका कामगार नाक्यावर उभाच राहुचं शकत नव्हता. त्यामुळेच सर्वात मोठा फटका या नाका कामगारांना आणि असंघटित कामगारांना बसला आहे. त्यांचे वर्तमान व भविष्य कायमच अंधारात होते.तरी तो कोरोना संकटात लॉक डाऊन शी संघर्ष करून जिवंत आहे. कोणत्याही असंघटित कामगारांनी आत्महत्या केली नाही. कारण जगण्यासाठी संघर्ष करणे हे त्यांच्या जन्मा पासुनच त्याच्या नशिबी आहे. म्हणूनच तो प्रत्येक संकटातून काही तरी शिकत असतो. आता कोरोना लॉक डाऊनने त्याला जगण्याची नवीन शिकवण दिली.
 जगातील काही देशात २०२० सालाची सुरवात होण्या अगोदर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये कोरोनाची लागणं झाली होती.जानेवारी फेब्रुवारी महिन्यात लक्षवेधी संख्या झाली होती.परिस्थिती हाताबाहेर जात होती.आपल्या देशभक्त प्रधान सेवकाला जानेवारीत सर्व प्रकारची माहिती होती तरी त्याने अमेरिका अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प च्या दोन हजार सेवकांची सेवा स्वागत भारतात केले.नंतर २२ मार्चला घोषणा आणि २३ मार्च पासुन लॉक डाऊन सुरू झाला. निसर्गाने अनेक संकटे दिलीत पण मोदी सरकारने कोरोना च्या नांवाने लॉक डाऊन हे मानव निर्मित संकट दिले हे इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहल्या जाणार आहे.
    भारतीय नागरिक 2020 सालाने आपल्याला काय काय दिलं?. शेपन्न इंच छातीचा प्रधानसेवक दिला. करोना,लॉक डाऊन,चक्रीवादळ, व्यवसाय- नोकरीत आर्थिक फटका, मानसिक तणावात आणि आत्महत्या.यापासुन लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी निरपराध सैनिकांचा बळी म्हणजेच चीन,पाकिस्तानच्या कारवाया करून दाखविणारा गोध्रा हत्याकांडात गुजरातमध्ये निर्दयपणे जाळपोळ जातीय दंगली घडविण्याचा अनुभव असलेला मुख्यमंत्री देशाचा प्रधानमंत्री झाल्यावर काय करू शकतेहे त्यांनी एक हाती केंद्रीय सत्ता असतांना मनुस्मृतीची अंमलबजावणी करून दाखवली. हेच राम राज्य आणि हिंदुराष्ट्र आहे. अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी यांना जे सत्तर वर्षात करता आले नाही. ते करून दाखविले.मी सुरवात नाका कामगारांच्या समस्या वरून केली आणि कुठे पोचलो समजलेच नाही.
   देशातील बहुसंख्य ९३ टक्के असंघटित कामगार हे हिंदू आहेत जसे ते नाक्यावर आपले श्रम विकून पाच सहाशे रुपये कमवितात तसेच ते निवडणूकीत पाच सहाशे रुपयांत मतदान विकून आपल्या न्याय हक्क व अधिकाराचा खून करतात. त्यामुळे त्यांची फारशी गांभीर्याने नोंद घेण्याची गरज नाही.हे सर्वच पक्षांच्या करोडपती आमदार खासदारांना कळून चुकले आहे. म्हणूनच महामानव, महापुरुषांच्या नांवाचा वापर फक्त कामा पुरता होतो.लोकसंख्येच्या हिसेबाने जिसकी संख्या भारी उतनी उसकी भागेदारी असली पाहिजे होती.पण विकावू माणस टिकाऊ संघटना देऊ शकत नाही.हा इतिहास आहे.
  संघर्ष कोणताही असो तो त्या त्या संकटाच्या विरोधात असतो. व्यक्तिगत जातीगत ब्राम्हणशाही आणि भांडवलशाही विरोधात अन्याय अत्याचार, हत्याकांड विरोधात न्याय हक्क व अधिकार मागण्यासाठी संघर्ष करावा लागतो.कोरोना लॉक डाऊन २०२० ने आम्हाला संघर्ष करायला शिकवलं.तो खूपच वेगळा आहे.घरात परिसरात गांवात आणि देशात स्वच्छता किती गरजेची आहे, त्याने शिकवलंय.एकमेकांची काळजी घेणे,एकमेकांना मदत करने. निसर्गाला वाचवने.अन्नधान्याची किंमत, माणसांच्या मानसिक भावना. मानसिक, शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या मदत करणे किती आवश्यक असते हे कोरोना लॉक डाऊन ने वेगवेगळ्या पद्धतीने शिकविले.
मान सन्मान, प्रतिष्ठा आणि लोक समाज काय म्हणेल इज्जत जाईल यासाठी लाखो रुपयांची उधळपट्टी होणारे लग्न. कमी खर्चात लग्न कसं आनंदात साजरे झाले.ना बॅड बाजा, डी जे, फटाके, घोडागाडी,डेकोरेशन, चविष्ट वेगवेगळे खाण्याच्या पदार्थाचा मेनू. ना रुसने फुगणे. पैसा वेळ आणि कष्टाची किती बचत झाली.म्हणजेच कोरोना लॉक डाऊनने जगण्याची नवीन शिकवण दिली की नाही?.
आई वडिलांची जिवंतपणी खाण्यापिण्याची दवा औषधची योग्य काळजी घेतली जात नाही. पण मृत्यूनंतर घरातुन बॉडी उचलल्या पासुन अंत्यसंस्कार पर्यत पाणी पाजणे,जीवखडा, मटका फोडी असे अनेक विधी ब्राम्हण नाव्ही यांच्या सांगण्यावरून केली जातात.
कोरोनामुळे किती लोक मृत्यू झाले.काही ठिकाणी घरातील रक्ताच्या नात्यातील लोकांनी बॉडीला हात लावणे नाकारले,तर काही ठिकाणी कमी लोकांमध्ये अंत्यसंस्कार..कोणतीही विधी न होता शांतपणे पार पडले.म्हणजेच कोरोना लॉक डाऊनने जगण्याची नवीन शिकवण दिली अनेक विधी वर होणारा खर्च वाचविला आणि कायमस्वरूपी मनावर आत्मा,भूत नावांची भीती घालविली की नाही.
घराच्या बाहेर पडतांना महिला पुरुष मुलं मुली तोंडाला काय काय लावत होते, सिनेमा, टीव्ही सिरीयल दिसणाऱ्या लोकांचे आपण नेहमीच अनुकरण करत असतो, ते आता विना मेकअपचे खरे चेहरे जनतेला दिसले.त्यांच्यामुळेच घरात राहण्यासाठी लागणारा संयम मिळाला. घरातील लोकांशी संवाद साधण्यासाठी मिळालेली अमूल्य संधी उपलब्ध करून दिलीय. त्याच बरोबर आपल्या अवतीभवतीचे शेजारी, नातेवाईकांपेक्षा ऐनवेळी कसे महत्वाचे असतात ते अनुभवले त्यातूनच कोरोना लॉक डाऊनने जगण्याची नवीन शिकवण दिली असे म्हणता येईल.
कोरोना लॉकडाऊनच्या काळात आपण खूप मौल्यवान लोक सुद्धा गमावलीत. गरीब श्रीमंतांना एकाच पातळीवर आणले मंदिरा पेक्षा दवाखाने किती महत्वाचे आहेत.हे समजले.याचवेळी खरे देवदूत डॉक्टर,नर्स,पोलीस पालिका कामगार आम्हाला दिसले, जे देवदूत आजवर आम्ही फक्त आमच्या प्रार्थनास्थळात बघत होतो.त्यामुळेच जगण्याची खरी किंमत कळली,जीवन किती मौल्यवान आहे ते आता प्रत्येकाला समजले असेलच.
सकाळ संध्याकाळ मंदिरात देवाला दान दिलेला पैसा कोणाच्या हक्काचा असतो हे आता प्रत्येकाला कळले असेलच म्हणूनच दान देण्याचे इच्छा असेल तर शाळा, दवाखान्यात द्या त्यांचा तुम्हाला तुमच्या कुटुंबातील लोकांना आज नाही तरी भविष्यात फायदा मिळाल्या शिवाय राहणार नाही. कोरोना लॉक डाऊन ने सर्वानाच जगण्याची नवीन शिकवण दिली असे समजून आपल्या आचरणात बदल घडविला पाहिजे.
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडूप मुंबई