कोरोना जागतिक महामारीत चर्चा नव्या जीवनमूल्यांची : एकविरा ते वीरमाता जिजाऊ.
'मृत्यूचे भय दाखवून लावलेली जागतिक आणीबाणी' असे आजच्या लाॅकडाऊनचे वर्णन लोक करीत आहेत. एका क्षणात साऱ्या जगाला नष्ट करू शकणाऱ्या, अण्वस्त्रधारी देशांना कोरोना पासून 'माणूस' वाचविणारी लस किंवा प्रतिबंधक औषधे तीन महिन्यात बनविता येत नसतील; तर हे जग जितक्या सहज निसर्ग आणि प्राणिजगताचा विनाश करू शकते ते आपले प्राण वाचवू शकत नाही..असा त्याचा अर्थ आहे.
2500 वर्षांपूर्वी झाडाचे तोडलेले पान, तुम्हास जोडता येत नसेल तर तोडताना विचार करा.. असा निसर्ग संदेश देणारे एकविरापुत्र बुद्ध या जगास खूप काही सांगून गेले. जागतिक महामारी कोरोना हे नियोजित मानवी षड्यंत्र आहे हे जगातील शोषित लोकांना पावलो पावली प्रत्ययास येते आहे.
"आपकी जान बचानेके लिये लाॅकडाऊन है" असे धादांत खोटे बोलणारे व्यापारी पंतप्रधान मोदी आता अदानीच्या चोरपावलांनी लाईट बिले मागायला येत आहे आहेत. सरकारी रोजगार बंदी मुळे लोक घरी आहेत. दमडीची कमाई नाही मग लाईट, शिक्षण, आरोग्यासाठी पैसे आणायचे कुठून? नोटबंदी आणि लाॅकडाऊन मुळे भारतीय पंतप्रधानांना स्वतःच्या (महंमद तुघलकी) वागण्यातून विकृती तयार झाली आहे. लोक जरी घरात बसले तरी विचार करीत आहेत. हालचाल आणि फिरण्याचे स्वातंत्र्य मोदींनी नाकारले असले तरी मनाचे स्वातंत्र्य जपणारे बुद्ध फुले आंबेडकरी लोक जागृतीचा अग्नी मनामनात पेटवीत आहेत; ज्यावर लोकशाही टिकून आहे. ज्यांच्या डोक्यात व्यापार आणि व्यापारच आहे. छुपे भारत पाकिस्तान युद्ध, पुलवामा हत्याकांड,नोटबंदी किंवा कोरोना यात आपला फायदा पाहण्याची मोदी शहा गुजराती विचारसरणी लोकांनी पुरेपूर ओळखली! अनुभवली!!.
मनुस्मृतीच्या ब्राह्मण क्षत्रिय सत्तेची दाहकता देशाने हजारो वर्षे अनुभवली होती. वैश्य व्यापारी, कर्जबुडवे उद्योजक वर्ग या दोघांपेक्षा मानवी भयाचाही मृत्यू आणि त्याच्या भीती भयाचा व्यापार करू शकतात; हे लोकांनी अनुभवले नव्हते ! ते या कोरोनाच्या रूपाने अनुभवले. निसर्ग वादळाने कोकणातली (कोरोनामुळे) रिकामी झालेली घरे सर्वार्थाने उध्वस्त झाली आणि सरकारी मदतीच्या क्षमतांची लायकी लोकांनी याची देही याची डोळा पहिली. 2 कोटी रुपयांचे गुंठ्याला मूल्य असलेल्या रायगड जिल्ह्याच्या 60 टक्के जमिनी बाजारात विकून, महाराष्ट्र शासन चालविणाऱ्या उच्चवर्णीय सरकारने रायगडास 100 कोटी रुपये देण्याची फक्त 'घोषणा' केली! यावरून सरकारची कोकण विरोधी मानसिकता समोर आली. नवी मुबंई तील एका शेतकऱ्यांची एक एकर जागा 80 कोटी रुपयांना सिडको विकते, पोलिसी जबरदस्तीने 3 ते 30 हजार रुपये एकरने घेते. तर 1970 चे सिडको भूसंपादन 95 गावे, नवी मुबंई विमानतळ 20 गावे, सिडको नयना क्षेत्र, रिलायन्स सेझ ही अंदाजे 300 गावे शेतजमिनिसह घेताना; रायगडची गावे लुटली किती? आणि मदत केली किती? अर्थात केंद्र काय आणि राज्य काय मंत्र एकच! "आगरी कोळी ओबीसी की लूट लगी है लूट॥ अंत काल मे पछतायेगा?? मोदी लूट सके तो लूट।। नही तो कोरोनामे प्राण जायेंगे छुट....।।" रायगड सह कोकणची विकासाच्या नावे लूट करणाऱ्या मुख्यमंत्री ठाकरे यांचे तोंड आणि हात बांधून ठेवणाऱ्या महायुतीचा जाहीर निषेध मी मातृसत्ताक कोकणपुत्र करत आहे.
जागतिक महामारीच्या साथीत पुरून उरलेला भारतीय माणूस रेल्वेखाली,कुठे उपासमार तर कुठे सवर्णांच्या संघटित हत्याकांडात मारण्याचे ठरवूनही मृत्युंजय ठरलेल्या मागासवर्गीय भारतास मी सॅल्युट करतो. आज सुशांतसिंग राजपूत याने आत्महत्या केल्याबरोबर मा पंतप्रधान मोदी मा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सारे मंत्रिमंडल पोपटा सारखे बोलू लागले. माणसाच्या मृत्यू बाबत क्षत्रिय ब्राह्मण वैश्य यांचा मृत्यू सार्वजनिक दुःख व्यक्त करण्याचा, सरकारी श्रध्दांजलीचा? आणि अरविद बनसोडे विराज जगताप हे मागासवर्गीय(अनुल्लेखाने) मृत्यूनंतरही मारण्याचे शुद्रअतिशूद्र तिरस्काराची ही मनुवादी मानसिकता नव्हे काय?.
आज कोकणाचे वादळ हे कोकणासाठी आणि सरकारसाठी लक्षवेधी ठरलंय. न्हावा शेवा, उरण बंदर, नेव्ही उरण, राष्ट्रीय केमिकल्स थळ अलिबाग, ओएनजीसी प्रकल्प, सिडको, विमानतळ हे सारे प्रकल्प अगदी जैतापूर रत्नागिरीत आहे एवढे असूनही पंतप्रधान मोदी तेथे भेट देत नाहीत की मदतीचे एखादे वाक्यही बोलतही नाहीत?कारण सध्या कोकण ओबीसी मागासवर्गीय कुळांचा ताबा असलेले कोकण आहे. उचवर्णीय खोत सावकारांना 1932 साली डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि नारायण नागु पाटील यांनी पुण्या मुबंईत हाकलून दिलेय. उच्चवर्णीय जमीनदारी संपल्यामुळे येथे विराज जगताप सारखी सैराट हत्याकांड घडत नाहीत.
आर्थिक समतेच्या आंदोलनाने सामाजिक समतेकडे कोकण वाटचाल करतेय. तरीही आमचे महसूल मंत्री थोरात आणि चक्क प्रधान मंत्रीही कोकणातल्या गुरचरण आणि जिल्हाधिकारी यांच्या अखत्यारीतील सर्व जागा शोधून पंतप्रधान आवास योजनेचा फायदा घेऊन बिल्डर लॉबीला विकत आहेत.
आज वादळात उडालेल्या कौलांना द्यायला शासनाकडे पैसे नाहीत ते गरिबांना घरे देतील हे तुमच्या पचनी पडते काय? आज कोकणच्या मूळ कष्टकऱ्याला फयान वादळ असो की निसर्ग वादळ.. तसेच राष्ट्रीय महामार्ग असो की विमानतळ प्रकल्प यात पुनर्वसन मिळतच नाही. कारण प्रत्यक्षात शेती कसणा-या कुळाच्या नोंदी सरकारने आजही घेतल्या नाहीत. शिवसेनेला मुबंई कोकणात आगरी कोळी भंडारी या ओबीसींनी आपले रक्त आणि प्राणाची आहुती देऊन मोठे केले. सरकारही आणले. परन्तु मनोहर जोशी या ब्राह्मण खोत माणसाला सेनेने 1996 च्या सरकारात मुख्यमंत्री केले आणि बाबासाहेबांच्या खोती जमीनदारी विरोधी, कूळकायद्यास मातीत गाडून, शहरात पळून गेलेल्या आपल्या ब्राह्मण जातीच्या नावावर सातबारा करून खोतांच्या घरा घरात पोहचविणारे मनोहर पंत जोशी आज कृतकृत्य झाले. जीवन पेशवाई साठी सार्थकी लावणारे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर नारायण राणे यांनी आपल्या जातीस सातबारा आणि ओबीसी आरक्षणही बहाल केले. आगरी कोळी भंडारी ओबीसींना वाली राहिला नाही. आपल्या प्रबोधनकार आजोबांचे वारसा हक्काने प्राप्त विचार सेनेने सोडून दिल्यामुळे आज कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे महसूलमंत्री थोरात आणि गृहमंत्री देशमुख मागासवर्गीय महाराष्ट्राला लुटत आहेत. अर्थात पुन्हा भाजपची पेशवाई येणार अशी भीती ओबीसींना वाटू लागलीय. क्षत्रिय पराभवानंतर पेशवाई आणि पेशवाईनंतर वैश्य मोदिशाही या दुष्टचक्रातून बाहेर पडण्याचा उपाय आपण शोधुया!.
स्वातंत्र्या नंतर भारतीय संविधान आले तरी सर्वार्थाने बलवान असलेले उच्चवर्णीय लोक महाराष्ट्र आणि केंद्रातही सत्तेवर आले. ओबीसींच्या प्रबोधन आणि जमीन पाणी जंगल शिक्षण आरक्षणाच्या चळवळी हिंदुत्ववादी आंदोलनाच्या आडून संपविण्याच्या चाणक्य नीतीने समतेचा विचार बाजूला पडला. जगातल्या वर्णभेदी गोऱ्या अमेरिकन ट्रम्प प्रमाणे आपल्याकडे खुलेआम लूट करणारे बाबा दादा नाना आसाराम शेटजी भटजी सारखे महाराज हे मागासवर्गीयांना पुन्हा मनुस्मृतिकडे नेत आहेत. यावर उपाय म्हणजे प्रबोधनातून नवी संविधानिक मूल्यं देशाला देणे होय. "कसेल त्याची जमीन आणि राहील त्याचे घर" या नैसर्गिक न्याय हक्काची अंमलबजावणी करणे ओबीसी चळवळीस अजून जमलेले नाही.
अर्थात उच्चवर्णीय जिल्हाधिकारी आणि तहसील दार यांना, उच्चवर्णीय पोलीस अधिकारी वर्गाच्या सोबत पाठविणारा ब्राह्मण मराठा सत्ताधाऱ्यांनी पुन्हा नवी सावकारी कोकणात आणली. अर्थात या जमीनदारीची नवी नावे सरकारी विकास प्रकल्प! सिडको एमडीआयडीसी म्हाडा, नवी मुबंई विमानतळ प्रकल्प, जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प अशी ठेवून कोकणास विकासाच्या नावे भूमिहीन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे उच्चवर्णीयांच्या बागायती नारळी सुपारी आंबे यात वाचविली जात आहे. आगरी कोळी कराडी भंडारी यांची गावेच का संपविण्यात येत आहेत? मासेमारी,जलवाहतूक बंदरे,रेती, विटा, मिठागरे उध्वस्त होत आहेत. हा प्रश्न मला ठाकरे सरकारला विचारायचा आहे.
निसर्ग वादळात फक्त नारळ सुपरीच्याच बागा मीडिया दाखवतोय. मच्छिमार आणि आगरी कोळी ओबीसीची उध्वस्त मच्छिमार गावे, गावठाणे कोळीवाडा पाहण्यासाठी एकही आमदार आणि खासदार नसावा?. उच्चवर्णीय मनु नीतीने महाराष्ट्र सरकार कुठे चाललंय??. मी महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्र्यांच्या सल्लागार मंडळास विनंती करीन. येथे मागासवर्गीय प्रशासकीय अधिकारी तात्काळ नेमावेत. ज्यांना समुद्रावरचे मच्छीमारांचे हक्क कळत नाहीत ते आयएएस असूनही मनुस्मृतीच्या अंध भक्तीने आंधळे झालेत! सिडकोतील आणि मुबंई महागर पालिकेतील विश्वास पाटील, संजय भाटिया, भूषण गगराणी यांनी ही परंपरा सुरू केलीय! आता अशा अधिकाऱ्यांची पलटण येथे बसलीय. कूळ कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी. स्त्री,शूद्र आणि अतिशूद्र शोषक अशी मनुस्मृती पेशवाईत राबविणाऱ्या पडद्या मागील उच्चवर्णीय नोकरशाहीस उत्तर म्हणून सातबारा आणि घरावर महिलांची पत्नी, मुली, बहिणी याची नावे लिहावीत. अर्थात कोकण हे मातृसत्ताक आहे. येथील मासेमारी,शेती, वीटभट्टी, रेती, पोल्ट्री व्यवसाय यात महिलांना मालकी अधिकार द्यावेत. एकविरा मातृसत्तेमुळेच येथे हुंड्यासाठी महिलांना जाळले जात नाही, स्त्रीभ्रूण हत्या होत नाही आणि जातीच्या उच्च मानसिकतेने मनोरुग्ण झालेले लोक स्त्रि शूद्र अतिशूद्र याना सांस्कृतिक पुण्यातील विराज जगताप सारखी हत्याकांडेही करत नाहीत.
म्हणूनच नवी जीवन मूल्ये देत असताना, मातृसत्ताक एकवीरा पुत्र बौद्ध संस्कृती ही कोकणची 2500 वर्षाची वैभवशाली लोकशाही पूरक स्त्री संस्कृती आपण पुढे आणली पाहिजे. महाराष्ट्रात जे आताचे मागासवर्गीय तरुणांचे हत्याकांड समर्थक राजकीय वातावरण पेटले आहे; अमेरिकन जागतिक वर्णभेदी चळवळी पाहता ते महाराष्ट्राला अशोभनीय आहे. या अंधारमय वातावरणात नवी जीवन मूल्ये देणाऱ्या विवेकवादी विचारवंतांनी पुढे यावे. फेस बुकवर जाती जातीत भांडणे लावणारे मेसेज व्हायरल होणे हा बुद्धिवादी सुधारक महाराष्ट्राचा अपमान आहे. या क्षणाला मराठा ब्राह्मण जैन बौद्ध ख्रिश्चन मुस्लिम डावे उजवे सारे विवेकवादी समोर येऊन तरुणांना मार्गदर्शक ठरले पाहिजेत. कोरोनाच्या संकटकाळात घरी लपून बसलेल्या राजकारणी आणि विचारवंत यांना नंतर कुणी स्वीकारणारच नाही. संघर्षातूनच आंबेडकर आणि शिवराय जन्म घेतात. स्थितीशीलतेतून विकृती जन्म घेते हा निसर्ग नियम आहे. जग हे परिवर्तनशील आहे. म्हणूनच वाहणाऱ्या नद्या आणि नित्य नव्या लाटांनी फेसाळणारा समुद्र पवित्र राहतो! तुंबलेल्या गटारांची डबकी होतात. म्हणूनच सद्य सामाजिक वादावर चर्चा ही एकमेकांची उणी धुणी काढण्याची नको तर भारतीय संविधानिक मूल्यांची व्हावीत, असे या लेखाच्या हेतूत मला सांगायचे आहे. स्त्रियांना शिक्षण संपत्ती धर्म आणि मानवी अधिकार नाकारणाऱ्या पुरुषसत्ताक क्षत्रिय ब्राह्मण वादात, आईला मारणाऱ्या परशुराम संस्कृतीस उत्तर, जिजाऊ सारखी विरमाताच देऊ शकते! प्रेमाने जग जिकणा-या बुद्धाने; प्रथम स्वतःतील एक एक वाईट सवयी त्यागून म्हणजेच दारू सोडून दूध पिण्याच्या चांगल्या सवयीने,(पंचशील) स्वतःचे आणि समाजाचे जीवन सुन्दर करणाऱ्या पुरुषाला "वीर" म्हटले आहे. अशा वीर पुरुषाला जन्म देणारी कार्ले गडातील ती एकविरा आई! बुद्धाच्या बरोबरीनेच स्वतःतील दुर्गुणावर विजय मिळविणारा जीन, विजेता अर्थात जैन! निःशस्त्र अहिँसक म्हणजेच "महावीर" होतो हे सांगितले. जिंकलेल्या साठ टक्के लढाया छत्रपती शिवराय हे रक्त न सांडता जिंकले हा "गनिमी कावा" म्हणजे रक्तरंजित मानवी हिंसा न करता सत्ता मिळविणे. भारतीय लोकशाहीला रक्ताचा एकही थेंब न सांडता सत्तांतर करण्याची एकविरापुत्र बुद्ध नीती डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सार्वत्रिक निवडणुकीत सर्वांना समान मताधिकार देऊन दिली. मोदींनी आता caa/ nrc आणि evm मशीन आणून त्यात नथुरामी सत्ता आणि हिंसा आणली. जिजाऊ म्हणजे मातृसत्ता जी आईच्या मायेने आम्हा मुलांना जन्मास घालते. अर्थात जगात प्रथम शेतीचा शोध लावणाऱ्या स्त्रिया, जात मानीत नव्हत्या. पुरुष धर्मगुरूंनी स्त्रियांनाच धार्मिक अधिकार नाकारून मनुस्मृती सारखे स्त्री विरोधी धर्म जगात सर्वत्र आणले आणि जन्मदात्री आई विरोधी वर्णभेदी, जातिशोषक उच्चनीच प्रथा आणली.
आंतरजातीय आणि आंतरराष्ट्रीय धर्म विवाह करणाऱ्या बाबासाहेब आंबेडकर सविता माई आंबेडकर;डॉ भारत पाटणकर gail omvedt बाळासाहेब आंबेडकर अंजलीताई आंबेडकर; अभिनेते आमिर खान किरण राव,डॉ हर्षदीप कांबळे थायलंड देशाच्या उद्योजिका रोझाना कांबळे या विवाहातील स्त्रियांचे राजकारणा पलीकडे जाऊन कौतुक केलं पाहिजे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव अभिनेते रितेश देशमुख जेनेलिया डिसुझा,आंतरधर्मीय विवाह करून मुख्यमंत्री पदापेक्षा मोठा आदर्श आम्हाला दिलाय! या सारखे हजारो लोक देशात आज आहेत. त्यांनी जो आदर्श दिलाय तो संविधानवादी आदर्श देणारा आहे.आई एकविरा ही कोलीय वंशाची महामाया,महामाता तिचे लग्नही शाक्य वंशाच्या राजा शुद्धोधन यांच्याबरोबर झाले. जगास शांती समृद्धी आणि दुःख मुक्ती म्हणजेच सुख देणाऱ्या बुद्धांना जन्म देणारे हे जोडपे होते. जिजाऊंनी स्त्री म्हणून निर्माण केलेले रयतेचे राज्य सागरी आरमार आणि छत्रपती शिवरायांचा स्वराज्य विचार पाहण्यासाठी, मनुस्मृतीच्या दैववादाच्या पलीकडे पाहण्याची दृष्टी लागेल. अर्थात स्त्री स्वातंत्र्यात, विवाहाचे स्त्री स्वातंत्र्य, हुंड्यात उच्च जातीय मानसिकतेत जाळून, जिजाऊ एकविरा सावित्री अहिल्या कशा तयार होणार? म्हणूनच 2000 वर्षांपासून हुंडा नाकारणारी लग्नविधी करणारी, सर्व आर्थिक व्यवहार करून आपले सांस्कृतिक अस्तित्व 2000 वर्षे जपणाऱ्या मातृसत्ताक कोलीय आरमारी, सागरी विचारास समजून घेतले पाहिजे. मुबंईचे पाच हजार महिलांचे सुक्या मासळीचे मरोळ मुबंई मार्केट सांभाळणारी वर्सोव्याची राजश्री भानजी ही कोलीय महिला एमबीए झालेल्या उच्चशिक्षित महिलांसाठी आदर्श का ठरू नये? मुबंईच्या आंतरराष्ट्रीय मार्केट मध्ये काती कोयते घेऊन आपल्या शिलाचे रक्षण करणारी महिला आणि तलवार हाती घेऊन आपल्या मुलास रायगडावर राज्याभिषेक करणारी वीरमाता जिजाऊ ह्या समजावून घेऊ या.
अंधाराला दूषण देण्यापेक्षा सोशल मीडियावर प्रबोधनाचे दिवे आणि एकविरा जिजामाता सावित्रीमाई या ज्ञानज्योति पेटवू या!आकाशातल्या देव देवता सोडून मानवी संघर्षाचे जीवन जगणाऱ्या महिलांकडे आदर्शरूपी प्रेरणा शोधणाऱ्या महाराष्ट्राच्या मातृसत्ताक आगरी कोळी भंडारी,बौद्ध मराठा तरुणांचे स्वागत या खंडप्राय राष्ट्राने करावे ही एक फार मोठी समाज सुधारणा आहे...
राजाराम पाटील,8928452112,उरण,रायगड.
ओबीसी संघर्ष समन्वय समिती महाराष्ट्र
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा