कोरोनाने विघ्नहर्ता देवांचे अस्तित्व सिद्ध केले
आजच्या कोरोना संक्रमणाच्या काळात प्रत्येक धर्माच्या देवांनी आपापले दरवाजे पटापट बंद केले आहेत आणि म्हणतात काय, तर "भक्तांच्या सोयीसाठी बंद करण्यात आले." मग त्याआधी कुणाच्या सोयीसाठी हे मंदिरे सुरू होती?. कारण मंदिरात येणारा भक्त कसा आहे त्यालाच माहिती असते,देवाला व भट,ब्राम्हण पुजाऱ्याला माहीत नसणार?. देवाकडे भक्तांची एकच मांगणी असते, मला दुःख मुक्त ठेवून सुख,संपत्ती सुमृद्धी दे.
कोरोना हा संसर्गजन्य रोग आहे.त्याला रोखण्यास विज्ञान अपुरे पडले तिथे देवाचे काय चालणार?. हे भटा ब्राम्हणास शंभर टक्के माहिती आहे.त्यांनी स्वताच्या स्वरक्षणार्थ मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला, सरकारने दर्दी भक्तांची गर्दी पाहून सुरक्षिता म्हणून निर्णय घेतला. सर्व जनतेचे रक्षण करण्याची जबाबदारी ही सरकारची असते ती कोणतेही सरकार आले तरी टाळता येणार नाही. भक्तांचे रक्षण करणे ही कोणत्याही देवांची जबाबदारी नाही.
म्हणजेच कोरोनाने पण हेच आता सांगितले की,देवांचे खुळं मनातून काढून टाका अन् विज्ञानवादी व्हा. हीच खरी शिकवण आहे.कैलासवासी माननीय प्रबोधनकार सीताराम ठाकरे यांनी ७/२/१९५८ ला श्रद्धा आणि अंधश्रद्धा याबाबत सांगितले होते.माफ करा वाचकानो मी कुणाच्या धार्मिक भावना दुखविण्यासाठी हे लिहत नाही.माझ्या विवेक बुद्धीचा जे असत्य दिसते.जे अज्ञान आहे ते सर्वा समोर मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे.
श्रद्धा शब्दाचा समानार्थी शब्द आहे विश्वास,माणूस विश्वास तिथेच ठेवतो की जे वास्तव आणि सत्ये असते. जे वास्तव आणि सत्ये नसते त्यावर जर माणूस विश्वास ठेवत असेल त्याला अंधश्रद्धा किंवा अंधविश्वास असे म्हणतात. परंतु श्रद्धा या शब्दाचा वापर अंधश्रद्धे करीताच जास्त होतांना दिसतो. जे सत्ये आणि वास्तव नसते त्यावरच माणूस विश्वास ठेवतो आणि त्याला तो श्रद्धा म्हणत असतो.मुळात ते सत्ये आणि वास्तव नसल्यामुळे ती अंधश्रद्धाच असते.जो मनुष्य सत्ये आणि वास्तव नसलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवतो, त्या मनुष्यावर आभासी काल्पनिक पोथ्या पुरानांचा पगडा असतो. असा मानुस आपल्या बुद्धीचा विवेक गमावून बसलेला असतो. त्याच्या मध्ये भितीचा न्युनगड निर्माण झालेला असतो. असा व्यक्ती एखाद्या गोष्टीची चिकित्सा करु शकत नाही.तो मानसिक दृष्ट्या कमजोर झालेला असतो. त्यामुळे तो सत्य आणि वास्तवतेचा शोध घेवू शकत नाही. असा मानुस स्वतःच्या व इतरांच्या अधोगतीला कारणीभूत ठरत असतो.आज उच्चशिक्षण घेतलेले डॉक्टर,इंजिनियर,प्राध्यापक,वकी ल,न्यायधीश,साहित्यिक,थोर विचारवंत,संपादक विमान चालविणारे पायलट,रेल्वे इंजेन चालविणारे लोक जेव्हा श्रद्धा,अंधश्रद्धा आणि वास्तव,सत्ये समजून न घेता परंपरा रीतीरिवाजाचे चुपचाप अनुकरण करतात तेव्हा त्याचे समाजावर काही तरी चांगला वाईट परिणाम होणारच.
या उलट सत्ये आणि वास्तवतेवर विश्वास ठेवणाऱ्या मानसावर ज्या संत महापुरुषांनी या काल्पणिक थोटांडावर प्रहार करुन सत्ये आणि वास्तवता जगापुढे आणली त्यांच्या विचाराचा व साहित्याचा पगडा असतो.अशा मानसाची बुद्धी नेहमी चिकित्सक व विवेकी असते. तो मानसिक दुष्ट्या सशक्त व निर्भिड असतो.त्यामुळे तो सत्ये आणि वास्तवतेचा शोध घेवू शकतो.असा माणूस स्वतःच्या व इतरांच्या प्रगतीला पोषक ठरत असतो. डॉक्टर,पोलीस,पालिका कामगार कर्मचारी यांना कोरोना महामारीच्या वातावरणात सुख करता दुःख हरता देवांची कुठंच गरज वाटली नाही.कोरोना झाला म्हणता बरोबर रक्ताचे नातेसंबंध मनातून दूर झाले.त्यामुळेच मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो पण मनातून हरलेला माणूस कधीच जिंकू शकत नाही.जेव्हा आपण गप्प राहून सगळं सहन करत असतो.तेव्हा सगळ्यांसाठी आपण खूपच चांगले असतो, पण आपण एकदा जरी सत्य बोलायचा प्रयत्न केला,तरी अचानक आपण सर्वात वाईट व्यक्ती ठरतो.
सत्य आणि स्पष्ट लिहणार,बोलणारा कडू वाटत असला तरी तो धोकेबाज कधीच नसतो. कोरोनाने विघ्नहर्ता देवाचे अस्तित्व सिद्ध केले,पण सत्य बोलण्याची लिहण्याची कोणाची हिंमत नाही,उच्चशिक्षित लोकचं मानसिक गुलाम झाले आहेत. इलेक्ट्रॉनिक आधुनिक तंत्रज्ञानाचा परिपूर्ण वापर करून विज्ञान खोटे आणि अज्ञान अंधश्रद्धा मोठी करून दाखविल्या जात आहे. लिहिणारे नालायक निर्दयी आहेत,दाखविणारे कसाई धंद्यावाले आहेत,त्यांना समाजाचे किती नुकसान होते त्यांचे त्यांना काही घेणेदेणे नाही,पैसा कमविणे हाच त्यांचा मुख्य उद्देश आहे. एक ग्रामीण भागात प्रसिद्ध म्हण आहे,नवरा मरो की नवरी मरो भटा ब्राम्हणांना दक्षिणा देणेच आहे. यानुसार कोरोनाने विघ्नहर्ता देवांचे अस्तित्व सिद्ध केले तरी माणसांच्या मनात खोलवर बसलेली मानसिकता बदलणे अशक्य झाली आहे.
कोरोनाच्या महामारीतून सुखरूपपणे बाहेर निघालेल्या प्रत्येक माणसांनी आपली विचार करण्याची मानसिकता बदलली पाहिजे. आणि इतरांना बदल घडविण्यासाठी तयार केले पाहिजे.
विचार करा आपण कसे बदलले पाहिजे.आपण शिक्षण कुणाकडे घेतो..?. देवाकडे का?.उत्तर - नाही. शाळेतील शिक्षकांकडे जातो.आपण आजारी पडतो तेव्हा कुणाकडे जातो..? देवाकडे का?. उत्तर - दवाखान्यात डाॅक्टरकडे जातो.आपल्यावर अन्याय अत्याचार झाल्यावर कुठं जातो..? देवाकडे का?. उत्तर - नाही. पोलिस स्टेशनमध्ये पोलिसांकडे अथवा रीतसर तक्रार नोंदणी करून न्यायालयातील न्यायाधिशांकडे जातो.आपला चरितार्थ कसा चालतो..?. देव कडे जाऊन का?. उत्तर - नाही. कष्ट करून पोट भरावे लागते. भूक लागल्यावर काय आठवतं?.देव का?. उत्तर - नाही. अन्न,त्यासाठी घर किंवा हॉटेल आठवते.आपल्याला धान्य, किराणा, कपडा, पाहिजे असेल तर काय शोधतो?. देव आणून देतं का?. उत्तर - नाही. दुकानात जाऊन आणावे लागते. माणसाला जगण्यासाठी अन्नधान्य व भाजीपाला कोण पिकवतं? देव का?. उत्तर- नाही. शेतकरी पिकवतात.देशाचे रक्षण कोण करते?. देव का?. उत्तर- नाही. सीमेवरील सैनिक करतात. असे अनेक प्रश्न देवाच्या संदर्भात उपस्थित करता येऊ शकतात.मग सांगा…देवाची खरंच गरज आहे का?. नाही हे भटा ब्राम्हणांची शंभर टक्के जन्मसिद्ध रोजगार हमी योजना आहे. देशातील जनता कोरोनाच्या महासंकटात असतांना.जगातील प्रत्येक देशांनी ठिकठिकाणी सुसज्य हॉस्पिटल निर्माण केली.भारताने काय केले राम मंदिर शिलापूजन कोणासाठी?.याचा विचार कोणी केला पाहिजे?.
प्रबोधनकार ठाकरे- बाळ ठाकरे यांचे वडील व आताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आजोबा म्हणतात "ही देव-देवळं आणि या देव धर्माच्या नावानं चाललेले कर्मकांड ही सगळी पुरोहितांची चालणारी रोजगार हमी योजना आहे". देवळात जाऊन समाधान,शांती अनुभवाचेच शोषण होत असतं, पण जळवा जसं माणसाचं रक्त फुंकर मारून पितात तरीही माणसांना त्याचा पत्ताच नसतो. तसंच हे शोषण आहे, हेच भक्तांना कळत नाही. देव या शब्दाची फुंकर घालून हे शोषण करणं बेमालूमपणे सुरू असतं. तेव्हा देव असलाच तर भटांच्या पोटात आहे, मंदिरात नाही. हे नक्की...कोरोनाने विघ्नहर्ता देवांचे अस्तित्व सिद्ध केले.
कोरोना संकटाने देव ही संकल्पना भीती आणि आमिषापोटी निर्माण झाली. देव आहे हे विज्ञानाने अजूनही सिद्ध केले नाही.भगवान बुद्धांनी देव नाकारला, संत तुकाराम महाराजांनी देव नाकारला, संत सेवालाल महाराजांनी देव नाकारला, संत गोरोबा महाराजांनी देव नाकारला, संत नरहरि महाराजांनी देव नाकारला.संत भगवान बाबांनी देव नाकारला,बाबासाहेबांनी देव नाकारला, पेरियार रामस्वामी यांनी ही देव नाकारला.कोरोनाच्या संकटाना सामोरो जाण्याची हिंमत माणसात राहिली नाही माणसांचा शंभर टक्के विश्वास देवावर असतो.आणि देवांनी मंदिरांचे दरवाजे बंद केले.कोरोनाने विघ्नहर्ता देवांचे अस्तित्व सिद्ध केले.पण बहुसंख्य मराठा ओबीसी मागासवर्गीय समाज सत्य स्वीकारणार नाही.आणि मानसिक गुलामी सोडणार नाही.हे सत्य मांडण्याचे प्रबोधनाचे काम संत,महापुरुष यांनी कधीच सोडले नाही.मी त्यांच्याकडून प्रेरणा घेतली त्यांना आदर्श मानतो म्हणून मी पण हे लिहण्याचे काम करीत आहे.संपादक या लेखकांच्या मताशी सहमत असतीलच असे नाही.वाचकांना आवडले तर ते वाचतील आणि विसरून जातील.प्रबोधन परिवर्तन कासवाच्या गतीने होत राहणार.कारण आम्हाला लहानपणा पासून शिकवल्या गेले ते मनावर,मेंदूवर कोरून ठेवले.ससा आणि कासवाच्या शर्यतीत कासवच जिंकते.
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९.भांडू प,मुंबई
(संपादक या लेखकांच्या मताशी सहमत असतीलच असे नाही.वाचकांना आवडले तर ते वाचतील आणि विसरून जातील.परंतु प्रबोधन झाले पाहिजे.)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा