आपण कोणत्या परिवाराचे सभासद आहात ?.
दुःखाचा डोंगर चढून उतरल्यावर सुखाचा महासागर लागतो.डोंगरातील दऱ्या खोऱ्यातून नदी नाल्यातून पाणी खाली आलेल्या त्या पाण्यापासून महासागर निर्माण होतो. त्यांची लांबी रुंदी, खोली मोजता येत नाही. तथागत गौतम बुद्ध म्हणतात मानव प्राण्यांच्या डोळ्यातील अश्रू एकत्र केल्यास महासागर तयार होतो.एवढे सुख दुःख मानव प्राण्यांच्या जीवनात असते.मनाची कायमस्वरूपी शांतता ठेवली तर दुःखाचे अश्रू येणार नाहीत, तर आनंदाचेच अश्रू येत राहणार.दुःख होणार नाही असे कामे आपल्या हातुन घडले नाही तर आनंद मिळतो. त्यामुळेच शांतमनाचा विचारांचा परिवार तयार होते.त्या परिवाराची चांगली नोंद केली जाते.
मानव प्राण्यामध्ये काम,क्रोध,लोभ,मत्सर निर्माण होत असतो.मग त्यांचा ही एक परिवार निर्माण होत राहतो. तो मनाची शांतता भंग होऊ न देता तो एक शांत परिवार तयार होतो. त्यातील एका परिवाराची निर्मिती सुरू झाली की त्यात एक एक करून सर्व जवळपास येतात. मग ठरवायचे आपण कोणत्या परिवाराचे सभासद आहात ?.
दुसरा असतो राग तो कुठे कधी भेटेल हे सांगता येत नाही. म्हणूनच
क्रोधाचा म्हणजेच रागाचा पण स्वत:चा एक पूर्ण परिवार असतो.क्रोधाची म्हणजे रागाची एक लाडकी बहिण भाऊ आहे "हट्टी" व "हट्ट" ही सदैव रागा बरोबर असतात.
रागाची पत्नी आहे "हिंसा" हि मागे लपलेली असते, कधी कधी आवाज ऐकुन बाहेर येत असते.रागाच्या मोठ्या भावाचे नाव आहे "अहंकार" रागाचा पिता आहे तो या दोघानाही घाबरतो त्याचे नाव "भय" (भिती) आणि त्याला दोन मुली सुद्धा आहेत "निंदा" व "चुगली", एक सतत तोंडा जवळ असते, तर दूसरी काना जवळ असते. "वैर" हा रागाचा मुलगा आहे. "इर्षा" ही या परिवाराची सुन आहे. या रागाची नात सुद्धा आहे तिचे नाव "घृणा", ही नेहमी नाका जवळच असते, नाक मुरडने एवढेच हिचे काम. "उपेक्षा" ही रागाची आई आहे.असा हा "रागा" चा छोटासा परिवार आहे.हा प्रत्येक मानव प्राण्यांच्या आजूबाजूला असतोच.हा छोटासा पण माणसाच्या संपुर्ण आयुष्याची वाट लावण्याचे सामर्थ्य असणारा परिवार आहे. मग आपण कोणत्या परिवाराचे सभासद आहात ?.
तथागत बुद्ध मनाला शांती लाभण्यासाठी त्रिसरण पंचशिलेचे पालन करण्यास सांगतात. जो मानव प्राणी यांचे पालन करतो तो राग या परिवारा पासून दूर राहतो, त्यामुळेच त्यांच्या घरात सर्व मंगल मांगल्य, सुख, सम्पत्ती, समाधान व मुख्य म्हणजे शांती राहते.कुटुंबात कितीही सभासदाची संख्या वाढली तरी ते कुटुंब एकत्रित राहते.आजच्या जमान्यात पांच भाऊ लग्न झाल्यावर आईवडीलानां सांभाळू शकत नाही. तेव्हाचे पांच भाऊ आपल्या नातवाच्या मुलाला आणि पणजोबाला वयाच्या शंभर वर्षा नंतर ही एकत्रीत कुटुंबात सांभाळून घेतात.हे संस्कार त्यांना लहानपणापासून केले असतात. आज बहुसंख्य उच्च सुशिक्षित सुरक्षित नोकरी करणाऱ्या वर्गाचे आईवडील वृद्धाश्रमात जीवन जगत आहेत. म्हणजे हे शांतमनाचा व रागाचा परिवार या दोन पैकी एका परिवारातील लोक आहेत. मग आपण कोणत्या परिवाराचे सभासद आहात ?.
माणूस कृती कधी करतो?. जेव्हा गरज असते तेव्हा माणूस कृती करतो. ही गरज आर्थिक व शारिरिक स्वरूपाची असते.आर्थिक म्हणजे पैसा गोळा करणे व शारिरिक म्हणजे शरीराची काम तृष्णा भागविणे.माणूस चांगल्या व वाईट या दोन्ही कृत्या करू शकतो. पैसा गोळा करण्याचा चांगला मार्ग म्हणजे दिलेले काम चोख करून पैसा मिळविणे. तर वाईट मार्ग म्हणजे खोटे बोलून, फसवणूक करून,किंवा चोरी करुन पैसा मिळविणे. शारिरिक व्यभिचार न करणे हा चांगला मार्ग असेल, तर शारिरिक व्यभिचार करणे हा वाईट मार्ग असतो. आपल्यापुढे चांगले व वाईट हे दोन्ही प्रसंग येतात. ज्याचा मनावर ताबा असतो ते वाईट कृती करीत नाही. पण ज्याचा मनावर ताबा नसतो ते वाईट कृती करतात. मनावर ताबा ठेवण्याच्या अभ्यासाला धम्मात आनापानसती व विपश्यना हे नांव आहे. तर धर्मात व्रत,उपास, पूजापाठ, यज्ञ होम करावे लागतात. अग्नी मध्ये तुप जाळले आणि काही मंत्र म्हटले तर पाप नष्ट होते व पुण्य लाभते. त्यांचा उद्देश एकच असतो मनाची शुद्धता व शांती राखणे.ते सत्य किती आणि असत्य किती हा श्रद्धेचा भाग असल्यामुळे यांची चिकित्सा कोणी करू शकत नाही. ती केली तर शांतमनाचा व रागाचा परिवार आपल्या समोर उभा आहेच. आपणच ठरवायचे आहे. कोणत्या परिवाराचे सभासद आहात ?.
शांतमनाचा व रागाचा परिवारा पासून लांब राहण्यासाठी काय दक्षता घ्यावी?. जिथं आपली कदर नाही, तिथं कधीही जाऊच नका. ज्यांना खर सांगितल्यावर राग येतो,त्यांना समजवून सांगण्याच्या भानगडीत पडू नये.जे नजरेतून उतरलेत त्यांच्या बाबत विचार करून मनस्ताप करून घेऊ नये. आपल्या हातून एखाद्याचे चांगले काम होत असेल तर ते निःस्वार्थ बुद्धीने आणि निःसंकोचपणे करावे. नेहमी दुसऱ्याला मदत करावी दुसऱ्याला आपल्या मुळे त्रास होईल असे कदापि वागू नये. नेहमी स्वतःसोबत स्पर्धा लावा, जिंकलात तर आत्मविश्वास जिंकेल आणि हारलात तर अहंकार हारेल. एखाद्या व्यक्तीजवळ आपल्या अशा आठवणी ठेवून जा की नंतर त्याच्या जवळ आपला विषय जरी निघाला तर, त्याच्या ओठांवर थोडसं हसू आणि डोळ्यात थोडसं पाणी नक्कीच आलं पाहिजे.असंघटित कष्टकरी कामगार मजुरांना न्याय हक्क व प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी संघटनेचे काम करीत असतांना हा अनुभव मी खूप वेळ घेतला. रेल्वे स्टेशन वर बूट पॉलिश काम करणाऱ्यांना कामगारांनी मान सन्मानाची अपेक्षा करावी काय?.ती आम्ही मिळवून दिली. मुंबई ते दिल्ली पर्यत कोणत्याही स्टेशनवरचा बूट पॉलिशवाला आमचे नांव गर्वाने सांगुन आपली समस्या ताबडतोब सोडवून घेतो.आयुष्यात तुम्ही किती मालमत्ता,सोने,चांदी, जमीन कमावली याला समाजात काही किंमत नाही.पण समाजासाठी गोरगरीब लोकांसाठी काय केले याला आयुष्यात खुप महत्व आहे.हे काम कोण करू शकतो?. शांतमनाचा परिवार की रागाचा परिवार?.आपण कोणत्या परिवाराचे सभासद आहात ?.
माणसाचे शिक्षण,आरोग्य आणि रोजगारांच्या नांवावर शोषण करणाऱ्या संस्था, संघटना माणसंच चालवितात. त्यांची नोंद शांतमनाच्या परिवार घेतो. क्रोधाचा परिवार कधीच घेणार नाही. त्यामुळेच जगातील सर्वात सुंदर रोपटे विश्वासाचे असते आणि ते कोठे जमिनीवर नाही तर आपल्या मनात रुजवावे लागते.भारतीय माणसांच्या मनात कोणावरही कोणाचा विश्वास नाही.तेहतीस कोटी देवावर ही नाही.म्हणूनच ते मनाला सुख शांती समाधान मिळावे म्हणून सर्वांवर श्रध्दा ठेऊन पूजा अर्चना करतात.जगात एकमेव तथागत गौतम बुद्ध महामानव आहेत त्यावर सर्वच माणसं शंभर टक्के विश्वास ठेवतात.बुद्धाचे नांव घेणाऱ्या कोणत्याही देशात माणूस माणसाला फसवीत नाही.180 देशात शांतमनाचा परिवार जोडला आहे. रागाचा परिवार जोडलेला एकही माणूस शोधून सापडणार नाही. शांतमनाचा परिवार सांगतो जेव्हा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक रहा. जेंव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेंव्हा साधे रहा. जेव्हा एखादे पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील रहा. जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा शांत रहा. तुम्ही कोणासाठी कितीही केले, तरी ते कोठेतरी कमीच पडते. पण सत्य हे सत्यच असत ते सहा महिने,वर्ष भर लपवून ठेवले तरी ते सत्यच राहते.उलट असत्य गांवभर देश भरात शंभर तोंडातुन फिरले तरी ते असत्य असते. बुद्ध पंचशिलेचे पालन करण्यास सांगतात.ते जगातील कटू सत्य हेच आहे की, माणसं त्यांचे खूप कमी प्रमाणात आचरणार आणतात.पंचशिलेचे पालन केल्यास जगात शांतता निर्माण होते तेव्हाच आपण समाजात व देशातील वातावरणात, दळणवळणात शांतमनाचा परिवार तयार करू शकतो. भारतात गर्वसे कहो हम हिंदू है म्हणणारे खूप संस्था संघटना आहेत.त्या समाजात देशात शांतता निर्माण होण्यासाठी कोणते काम करतात?. देशात दहशतीचे वातावरण कायमस्वरूपी राहावे असेच शिक्षण प्रशिक्षण संस्कार हा परिवार रागाचा परिवार देत राहतो. यातूनच आपले,समाजाचे देशाचे न भरून येणारे नुकसान होत आहे.कोरोना थाळी वाजवून,दिवा बत्ती करून गेला नाही.पण राम मंदिरामुळे लॉकडाऊन कोरोना कुठे आहे?.प्रत्येक माणसाला प्रश्न पडला असेल तर?. माणसाने कोणत्या परिवाराचे सभासद असावे ते ठरवावे. शांतमनाचे की क्रोधाचे. मग आपण कोणत्या परिवाराचे सभासद आहात ?.
सागर रामभाऊ तायडे,9920403859,भांडुप,मुंबई
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा