कोरोना लॉक डाऊनने जगण्याची नवीन शिकवण दिली.
असंघटित नाका कामगारांच्या न्याय हक्क व प्रतिष्ठेसाठी १९८२ पासुन शहरातील नाक्यावर कामासाठी उभे राहणाऱ्या कामगारांना संघटित करून न्याय मिळवून देण्यासाठी लढत असतांना अनेक अनुभव आले. सकाळी सात वाजता पासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कोणताही कामगार नाक्यावर उभा राहिला तर त्याला शंभर दोनशे रुपये मिळण्याची शंभर टक्के खात्री होती.आठवड्यातून दोन तीन दिवस काम मिळाले तरी त्याच्या कुटुंबातील सदस्य उपाशी पोटी राहणार नाही यांची व्यवस्था केली जात होती. कोरोना लॉक डाऊन मुळे सर्व कामधंदे पूर्णपणे बंद असल्यामुळे नाका कामगार नाक्यावर उभाच राहुचं शकत नव्हता. त्यामुळेच सर्वात मोठा फटका या नाका कामगारांना आणि असंघटित कामगारांना बसला आहे. त्यांचे वर्तमान व भविष्य कायमच अंधारात होते.तरी तो कोरोना संकटात लॉक डाऊन शी संघर्ष करून जिवंत आहे. कोणत्याही असंघटित कामगारांनी आत्महत्या केली नाही. कारण जगण्यासाठी संघर्ष करणे हे त्यांच्या जन्मा पासुनच त्याच्या नशिबी आहे. म्हणूनच तो प्रत्येक संकटातून काही तरी शिकत असतो. आता कोरोना लॉक डाऊनने त्याला जगण्याची नवीन शिकवण दिली.
जगातील काही देशात २०२० सालाची सुरवात होण्या अगोदर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये कोरोनाची लागणं झाली होती.जानेवारी फेब्रुवारी महिन्यात लक्षवेधी संख्या झाली होती.परिस्थिती हाताबाहेर जात होती.आपल्या देशभक्त प्रधान सेवकाला जानेवारीत सर्व प्रकारची माहिती होती तरी त्याने अमेरिका अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प च्या दोन हजार सेवकांची सेवा स्वागत भारतात केले.नंतर २२ मार्चला घोषणा आणि २३ मार्च पासुन लॉक डाऊन सुरू झाला. निसर्गाने अनेक संकटे दिलीत पण मोदी सरकारने कोरोना च्या नांवाने लॉक डाऊन हे मानव निर्मित संकट दिले हे इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहल्या जाणार आहे.
भारतीय नागरिक 2020 सालाने आपल्याला काय काय दिलं?. शेपन्न इंच छातीचा प्रधानसेवक दिला. करोना,लॉक डाऊन,चक्रीवादळ, व्यवसाय- नोकरीत आर्थिक फटका, मानसिक तणावात आणि आत्महत्या.यापासुन लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी निरपराध सैनिकांचा बळी म्हणजेच चीन,पाकिस्तानच्या कारवाया करून दाखविणारा गोध्रा हत्याकांडात गुजरातमध्ये निर्दयपणे जाळपोळ जातीय दंगली घडविण्याचा अनुभव असलेला मुख्यमंत्री देशाचा प्रधानमंत्री झाल्यावर काय करू शकते. हे त्यांनी एक हाती केंद्रीय सत्ता असतांना मनुस्मृतीची अंमलबजावणी करून दाखवली. हेच राम राज्य आणि हिंदुराष्ट्र आहे. अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी यांना जे सत्तर वर्षात करता आले नाही. ते करून दाखविले.मी सुरवात नाका कामगारांच्या समस्या वरून केली आणि कुठे पोचलो समजलेच नाही.
देशातील बहुसंख्य ९३ टक्के असंघटित कामगार हे हिंदू आहेत जसे ते नाक्यावर आपले श्रम विकून पाच सहाशे रुपये कमवितात तसेच ते निवडणूकीत पाच सहाशे रुपयांत मतदान विकून आपल्या न्याय हक्क व अधिकाराचा खून करतात. त्यामुळे त्यांची फारशी गांभीर्याने नोंद घेण्याची गरज नाही.हे सर्वच पक्षांच्या करोडपती आमदार खासदारांना कळून चुकले आहे. म्हणूनच महामानव, महापुरुषांच्या नांवाचा वापर फक्त कामा पुरता होतो.लोकसंख्येच्या हिसेबाने जिसकी संख्या भारी उतनी उसकी भागेदारी असली पाहिजे होती.पण विकावू माणस टिकाऊ संघटना देऊ शकत नाही.हा इतिहास आहे.
संघर्ष कोणताही असो तो त्या त्या संकटाच्या विरोधात असतो. व्यक्तिगत जातीगत ब्राम्हणशाही आणि भांडवलशाही विरोधात अन्याय अत्याचार, हत्याकांड विरोधात न्याय हक्क व अधिकार मागण्यासाठी संघर्ष करावा लागतो.कोरोना लॉक डाऊन २०२० ने आम्हाला संघर्ष करायला शिकवलं.तो खूपच वेगळा आहे.घरात परिसरात गांवात आणि देशात स्वच्छता किती गरजेची आहे, त्याने शिकवलंय.एकमेकांची काळजी घेणे,एकमेकांना मदत करने. निसर्गाला वाचवने.अन्नधान्याची किंमत, माणसांच्या मानसिक भावना. मानसिक, शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या मदत करणे किती आवश्यक असते हे कोरोना लॉक डाऊन ने वेगवेगळ्या पद्धतीने शिकविले.
मान सन्मान, प्रतिष्ठा आणि लोक समाज काय म्हणेल इज्जत जाईल यासाठी लाखो रुपयांची उधळपट्टी होणारे लग्न. कमी खर्चात लग्न कसं आनंदात साजरे झाले.ना बॅड बाजा, डी जे, फटाके, घोडागाडी,डेकोरेशन, चविष्ट वेगवेगळे खाण्याच्या पदार्थाचा मेनू. ना रुसने फुगणे. पैसा वेळ आणि कष्टाची किती बचत झाली.म्हणजेच कोरोना लॉक डाऊनने जगण्याची नवीन शिकवण दिली की नाही?.
आई वडिलांची जिवंतपणी खाण्यापिण्याची दवा औषधची योग्य काळजी घेतली जात नाही. पण मृत्यूनंतर घरातुन बॉडी उचलल्या पासुन अंत्यसंस्कार पर्यत पाणी पाजणे,जीवखडा, मटका फोडी असे अनेक विधी ब्राम्हण नाव्ही यांच्या सांगण्यावरून केली जातात.
कोरोनामुळे किती लोक मृत्यू झाले.काही ठिकाणी घरातील रक्ताच्या नात्यातील लोकांनी बॉडीला हात लावणे नाकारले,तर काही ठिकाणी कमी लोकांमध्ये अंत्यसंस्कार..कोणतीही विधी न होता शांतपणे पार पडले.म्हणजेच कोरोना लॉक डाऊनने जगण्याची नवीन शिकवण दिली अनेक विधी वर होणारा खर्च वाचविला आणि कायमस्वरूपी मनावर आत्मा,भूत नावांची भीती घालविली की नाही.
घराच्या बाहेर पडतांना महिला पुरुष मुलं मुली तोंडाला काय काय लावत होते, सिनेमा, टीव्ही सिरीयल दिसणाऱ्या लोकांचे आपण नेहमीच अनुकरण करत असतो, ते आता विना मेकअपचे खरे चेहरे जनतेला दिसले.त्यांच्यामुळेच घरात राहण्यासाठी लागणारा संयम मिळाला. घरातील लोकांशी संवाद साधण्यासाठी मिळालेली अमूल्य संधी उपलब्ध करून दिलीय. त्याच बरोबर आपल्या अवतीभवतीचे शेजारी, नातेवाईकांपेक्षा ऐनवेळी कसे महत्वाचे असतात ते अनुभवले त्यातूनच कोरोना लॉक डाऊनने जगण्याची नवीन शिकवण दिली असे म्हणता येईल.
कोरोना लॉकडाऊनच्या काळात आपण खूप मौल्यवान लोक सुद्धा गमावलीत. गरीब श्रीमंतांना एकाच पातळीवर आणले मंदिरा पेक्षा दवाखाने किती महत्वाचे आहेत.हे समजले.याचवेळी खरे देवदूत डॉक्टर,नर्स,पोलीस पालिका कामगार आम्हाला दिसले, जे देवदूत आजवर आम्ही फक्त आमच्या प्रार्थनास्थळात बघत होतो.त्यामुळेच जगण्याची खरी किंमत कळली,जीवन किती मौल्यवान आहे ते आता प्रत्येकाला समजले असेलच.
सकाळ संध्याकाळ मंदिरात देवाला दान दिलेला पैसा कोणाच्या हक्काचा असतो हे आता प्रत्येकाला कळले असेलच म्हणूनच दान देण्याचे इच्छा असेल तर शाळा, दवाखान्यात द्या त्यांचा तुम्हाला तुमच्या कुटुंबातील लोकांना आज नाही तरी भविष्यात फायदा मिळाल्या शिवाय राहणार नाही. कोरोना लॉक डाऊन ने सर्वानाच जगण्याची नवीन शिकवण दिली असे समजून आपल्या आचरणात बदल घडविला पाहिजे.
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडूप मुंबई
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा