गुरुवार, २७ ऑगस्ट, २०२०

राम भक्त म्हणजेच परिपक्व व्यक्तिमत्व

राम भक्त म्हणजेच परिपक्व व्यक्तिमत्व 
माणूस नांवाचा प्राणी खूप हुशार असतो,त्यातही तो जर राजकारणी असेल तर त्यांच्या अंगातील कलाकौशल्याची यांची तुलना कुणा बरोबरच होऊच शकत नाही.ती कला त्याला जन्मापासून अंगीभूत नसते तर ते तो अनुभवाने शिकतो.राम भक्त खरे ज्या गांवात आहेत ते कधीच आपसात भांडत नाही त्यांचे मैत्रीपूर्ण जिव्हाळ्याचे संबंध असतात.ते पाहण्यासाठी अयोध्येत जाण्याची गरज नाही, कोकणात जा, खानदेश मध्ये जा,मराठवाडात,विदर्भात अनेक दर्ग्यात उरूस, आणि जत्रा,यात्रा मोठ्या उत्साहात साजरे होतात.या परंपरेला राजकीय राम भक्त म्हणजेच परिपक्व व्यक्तिमत्व कसे सुरुंग लावतात त्यांचे काही उदाहरण अनुभवले ते लिहतो. रोजगार हमी म्हणजे अर्धी आम्ही अर्धी तुम्ही, संजय गांधी निराधार योजना, अंत्योदय योजना,वृद्धापन योजना, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या योजना चारा, ढेप, बीज बिवाई ,सुशिक्षित बेरोजगारासाठी कागदावर किती योजना आहेत, लाभ कोण घेते?. राजकीय राम भक्त म्हणजेच परिपक्व व्यक्तिमत्व!, कोणत्याही पक्षांत असु द्या कोणत्याही विचारधारा असणाऱ्या संस्था, संघटना मध्ये किर्याशील असु द्या बरोबर जनतेला समाजाला योग्य वेळी आपले कौशल्य दाखवतात. राजकिय पक्षातील किर्याशील कार्यकर्ते,नेते कधीच चोर नसतात.ते खूप हुशार हर हुनेरी असतात, ते गांवातील योजना गांवातील लोकांपासून कशा पळवितात, फसवितात. सरकारी योजना नेहमी वृत्तपत्रात जाहिराती देऊन किंवा एस टी डेपोच्या जवळ सर्व भिंती जाहिरात लिहून रंगविली जातात,तरी पण त्यांच्या कडे सर्व सामान्य मानस गांभीर्याने पाहून वाचून घेत नाही.राजकीय राम भक्त म्हणजेच परिपक्व व्यक्तिमत्व कार्यकर्ते सरकारवर दोषारोप करतात.म्हणजेच गावांतील योजना पळवायची असेल तर लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविले पाहिजे की नाही. ज्या प्रमाणे गावांतील माणसं गाय, म्हशीच्या गळ्यात घंटा बांधून ठेवतात,कोणी तिला रात्री चोरून नेण्याचा प्रयत्न केला तर तिच्या गळ्यातील घंटा जोरात वाजत जाणार त्यामुळेच लोक जागी होतात. राजकीय परिपक्व कार्यकर्ते प्रथम तिच्या गळ्यातील घंटा कडून टाकतात म्हणजे आवाज होत नाही. त्यातील एक पक्षांचा कार्यकर्ता घंटा घेऊन जोरात वाजवत दुसऱ्या दिशेला पळत सुटतो,दुसऱ्या पक्षांचे कार्यकर्ते लोकांना त्या घंटा वाजविणाऱ्या कार्यकर्त्यांचे मागे घेऊन जातो. म्हणजे कोरोना साठी केंद्र सरकारने काय उपाय योजना केली.हे विचारणारे पक्ष राज्य सरकारने काय उपाय योजना केली त्यासाठी जनतेचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलने करतात.जिल्ह्यातील कोरोना केंद्रांना भेटी देऊन रुग्णांची जिव्हाळ्याने चौकशी करतात. अडचणीची माहिती घेऊन ताबडतोब मदत करत नाही, तर पत्रकार परिषद घेऊन सरकार राज्य सरकार अपयशी कसे ठरले यांचे नमुने सांगतात. आम्ही राम भक्त म्हणजेच परिपक्व व्यक्तिमत्व आज सत्ताधारी असतो तर ????. त्यामुळेच मुख्य भूमिका असणारे केंद्र सरकार नाम निराळे राहते,आणि राज्य सरकार जनतेची शिवीगाळ खाते,जेव्हा जनतेला कळते की राज्य सरकारला केंद्राच्या अधिपत्या खाली काम करावे लागते. केंद्रांच्या नियमांचे पालन करावे लागते आणि उल्लंघन केले तर सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करता येते.तेव्हा राज्यांच्या विरोधात जनआंदोलन करणारे कार्यकर्ते हातातील घंटा फेकून देतात.जनतेत असंतोष निर्माण करण्यासाठी आपण किती यशस्वी झालो त्यानुसार आमचा वाटा वेगवेगळ्या मार्गाने वसूल करतात.मग जनतेच्या हाती काय राहते फक्त घंटा!!!. गाय, म्हीस मात्र चोरी जाते रीतसर नोंद कुठेच होत नाही. गांव,तालुका,जिल्हा पातळीवर कोणत्या योजनेचा आल्या, किती निधी आला आणि खर्च झाला हे कुणी विचारतांना पाहिले काय?.का सर्वच राजकीय पक्ष,नेते कार्यकर्ते गप्प बसून असतात.का त्याविरोधात जनआंदोलन करीत नाही.कारण राम भक्त म्हणजेच परिपक्व व्यक्तिमत्व असतात नां!. आमची जनतेची गाय,म्हीस कोणती?. शिक्षण, रोजगार, आरोग्य,महिला सुरक्षा,परिवहन,कायदा सुव्यवस्था,महागाई, भ्रष्टाचार हे जनतेची दररोजची मुख्य समस्या आहेत.त्यावर उपाय योजना कोणत्या गाय म्हीसच्या गळ्यातील घंटा म्हणजेच मंदिर मस्जिद,हिंदू मुस्लिम, वंचित शोषित सुवर्ण,उत्तर भारतीय, बिहारी, गुजराती, नेहरू पटेल, हिरवे,निळे,भगवे,याने जास्त मोठा असंतोष होत नाही म्हणून मग नोट बंदी,जी एस टी, याने समस्या सुटत नाही म्हणून मग अमेरिका,पाकिस्तान सर्जिकल स्ट्राइक, मुस्लिम जमाती,कोरोना,पाकिस्तान-चीन,राफेल गाय म्हशीच्या गळ्यातील घंटा आणि भारतीय जनतेच्या समस्या सतत लक्षवेधण्यासाठी घंट्या सारख्या वाजत गाजत राहतात.भारतीय जनमानसावर रामायण,महाभारताचा हजारो वर्षा पासून प्रभाव आहे.भट ब्राम्हण सांगतात म्हणजे शंभर टक्के सत्य आणि त्यांनी लिहून ठेवलेले म्हणजे शंभर टक्के सत्य असे समजणारा समाज आज ही वृत्तपत्रात छापून आलेले सर्व सत्यच असते. वृत्तवाहिनीण्यानी दाखविलेले सत्यच असते असे समजतात.ज्या लोकांन मध्ये आपली प्रतिष्ठा पाहीजे असे कोणाला वाटत असेल तर ती प्रतिष्ठा लोक आपल्याला देतीलच असे नाही. म्हणूनच राम भक्त म्हणजेच परिपक्व व्यक्तिमत्व कोणाला प्रतिष्ठा देण्यासाठी किंवा कोणाकडुन मिळविण्या साठी जे लोक "धडपड" करीत असतात. असत्या सत्य आणि सत्यला असत्या करण्याची स्पर्धा राजकीय नेत्यात कार्यकर्त्यात लागली असते. माणुस पदाने किंवा अधिकाराने कितीही मोठा झाला तरी तो प्रतिष्ठीत झाला अस होत नाही. रामनाथ कोविंद घ्या हा माणूस पदाने आणि अधिकाराने कोण आहे.राम भक्त म्हणजेच परिपक्व व्यक्तिमतत्वा समोर त्याला प्रतिष्ठा आहे काय?. दिवशी सर्वसामन्य माणुस त्याचे कोणतेही काम नसतांना एखाद्याला मोठा म्हणाला, तर तो माणुस खरंच मोठा असावा किंवा असेल असे मान्य करण्यास हरकत नसावी. त्यात त्याचा स्वार्थ नाही हे तरी सिध्द होईल.पण स्वार्थापोटी तर खलनायकाला सुध्दा नायक बनवणारी दलालवृतीची टोळी प्रत्येक ठिकाणी कार्यरत असुन ती टोळी खलनायकाला नायक बनविण्यासाठी अधिक परिश्रम घेत असते.रामायण महाभारत पासून आज पर्यंत राम भक्त म्हणजेच परिपक्व व्यक्तिमत्व घडविण्याचे राजकारण सुरु आहे.भारतीय नागरिक दरवर्षी नव्हे तर दररोज अग्निपरीक्षा देत असतात.कोणी शिक्षणासाठी,कोणी आरोग्यासाठी कोणी रोजगारासाठी तर कोणी सुरक्षेसाठी. 
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडूप मुंबई

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा