कोरोनातील भ्रष्टाचार आणि मोदींची भाईगिरी
कोरोना ने जगावर संकट आणले त्यांनी ताबडतोब त्यांची दखल घेतली आणि लॉक डाऊन इतर उपाय योजना आखणी करून नियोजन केले. भारताचे प्रधानमंत्री (मालक) यांनी कोणते नियोजन करून उपाय योजना करून लॉक डाऊन जाहीर केला?. देश कोरोनाच्या विळख्यात असतांना राम मंदिर शिलापूजन आयोजन आणि त्यामागचे नियोजन आयोजन किती योजनाबद्ध होते हे आता अनेकांना समजले असेल, लोक फक्त कोरोनाचाच विचार करत होते. मरतो की वाचतो?. त्यात भ्रष्टाचार किती झाला आणि मोदीची भाईगिरी बहुमत असल्यामुळे ती किती वाढली. मान्यवर भारतीय संविधानच मानत नाही.
भारतात मनुष्य जन्मच जो इतरांना संपविण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही हीच नियती आहे. संकटकाळात माणसाला मदत करणे आवश्यक असते.तेव्हा त्याची जात,धर्म,प्रांत गरीब,श्रीमंत, किंवा जाडा, कडक्या पाहिले जाऊ नये. फक्त मदत केली जावी.हीच अपेक्षा माणुसकी असणाऱ्या माणसा कडून असते.काही माणसं दुसऱ्याची वाट लावता-लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे त्यांनाही कळत सुद्धा नाही. म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा. कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा,
माणसाचा दर्जा हा मिळकती वरून ठरत नसतो तर तो विचारांवरून ठरत असतो. कारण चांगला माणूस बना.शेवटी हिशोब हा कुशल कर्माचाच होतो धर्माचा नाही.मेलेल्या माणसाला खांदा देण्याचे काम कितीही पवित्र आणि परोपकारी असले तरी जो मेलेला आहे त्याला त्याचा काहीच उपयोग नसतो.पण किती मेलेल्या माणसांना खांदा दिला यापेक्षा किती जीवंत माणसांना मदतीचा हात दिला यावर आपली माणूसकी ठरत असते. धर्माचे गोडवे गातांना देवांचे महत्व पटवून देतात. माणूस मेलेला कळताच धाऊन जाणारी माणसे,तो जिवंत असताना, आर्थिक अडचणीत असतानाच का बरं धाऊन जात नाहीत?.
खरे तर माणूस मेल्यानंतर धावणाऱ्या माणसांची धावपळ व्यर्थ असते, कारण तुम्ही नाही गेला तरी माणसे त्याला जाळल्या शिवाय राहणार नाहीत. पण ही व्यर्थ धावपळ करणारेच खूप आहेत जीवंतपणी,जीवंत माणसासाठी,जीवनात असणाऱ्या शारीरिक,आर्थिक,आणि मानसिक समस्या अडचणीत सापडलेल्या एकाला तरी आयुष्यात खरा प्रामाणिक हात दिला काय?. हा प्रश्न प्रत्येकांनी स्वताला विचारला पाहिजे.
कोरोनाच्या महामारीत सुरवातीला सरकारी हॉस्पिटल आणि डॉक्टर नर्स देव दूत वाटत होते. त्यावेळी खासगी हॉस्पिटलमध्ये जाण्यास लोक घाबरत होते. कारण खाजगी हॉस्पिटल हा कॉर्पोरेट बिझनेस झालेला आहे.हे सर्वांनाच माहिती आहे. सर्वसामान्यांनी सरकारी रुग्णालयातुन उपचार घ्यायचे आणि उच्च मध्यमवर्गीय व श्रीमंतांनी फक्त खाजगीतून उपचार घ्यायचे असा अलिखित नियम झाला आहे, सामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेर खाजगीतील उपचार पद्धती गेली आहे, सरकार ने या महामारीच्या माध्यमातून काही तरी बंधने कायदेशीररीत्या आणले पाहिजे होते.आरोग्य विषयी कायदे कलम खूप आहेत. पण त्यांची अंमलबजावणी काटेकोरपणे होत नाही.कॉर्पोरेट बिझनेस वाले पक्षाला आणि अधिकृत अधिकाऱ्यांना योग्य तो मलिदा दान दक्षिणा देत असतात.त्यामुळेच सरकार कोणाचे ही असो,कडक कारवाई होत नाही.
हॉस्पिटल सरकारच्या कंट्रोलमध्ये नाहीत म्हणूनच तर एवढा बिले आकारली जातात. PPE किट,गरम पाणी,जेवण, खाट,टेबलचा सात आठ लाख रुपये बिल येते. त्यात अजूनही कोरोना वर मेडिसिन आली नाही.त्याचा खर्च नाही. सरकारी सार्वजनिक हॉस्पिटल फुल झाले आहेत का?.म्हणूनच लोक खाजगी हॉस्पिटलमध्ये जातात.कोरोनाचा धंदा सुरु झाला आहे.जे लोक सरकारी डॉक्टरांना देवदूत म्हणत होते.तेच आता कमिशन टक्केवारी वर मध्यमवर्गीय नोकरदारांना खासगी हॉस्पिटलमध्ये जाण्यास सांगतात.प्रथम त्याची पूर्ण माहिती काढल्या जाते.कुठे नोकरी करोत.मेडीकिम,एल आय सी,मेडिकल पॉलीशी असेल त्यांनाच पाठविल्या जाते.असंघटीत कामगार असला तर घरी जाण्याचा सल्ला दिला जातो.काळजी कशी घ्यावी ते सांगितल्या जाते. उच्चशिक्षित लोक नेहमीच पैसे कसे कमवायचे यांचे निर्दयी पणे नियोजन करतात.सुशिक्षित लोक कोणत्या धंद्यात असो ते कॉर्पोरेट बिझनेसचाच विचार करतात.
इमारती बांधणारे बिल्डर घराचे दर वाढत असतात कोटीच्या कोटी, खाजगी क्लासेस वाले पालकांना लाखो रुपयाने लूटत असतात. आणि आजारी पडल्या वर हॉस्पिटलवाले लूटत आहे. माणसांच्या देशाच्या संकटाशी त्यांना काही घेणे देणे नाही.कुठल्याही मेडिकल वाल्याचा नातेवाईक ह्या हॉस्पिटल मधे दाखल होत नाही. आणि खाजगी लेबोरेटरीज आहेतच रक्त प्यायला हॉस्पिटल,मेडिकल आणि खाजगी लेबोरेटरीज यांची अखंड साखळी आहे.
राजकीय नेता कोणत्याही हाॅस्पिटल मध्ये जाऊन बिल कसे आकारण्यात येते याची माहिती घेऊन बोलण्याची हिंमत दाखवीत नाही.काही शिवसैनिक,मनसैनिक ठरविक ठिकाणी राडे करण्याचे धाडस करतांना दिसतात ते च धाडस ते त्यांच्या नेत्याच्या गांडूगिरी विरोधात का करीत नाही. आता ते सत्ताधारी आहेत ना, त्यांच्या विरोधात का बोलत नाही.
मध्यमवर्गीय नोकरदार लोकांच्या आयुष्याची संपूर्ण कमाई कोरोना झाला की खासगी हॉस्पिटलमध्ये अवघ्या 10 ते 15 दिवसात संपवतात. महाराष्ट्र ने राजीव गांधीं आरोग्य योजना ( सध्याचे नाव महात्मा जोतिबा फुले) काही खाजगी हॉस्पिटलमध्ये लागू केल्या आहेत. योजनेत आधी पासुन पॅनलवर असणारे डॉक्टर लाभ देखील घेतात.आज बऱ्याच राजकीय पुढाऱ्यांची हाॅस्पिटल मध्ये छुपी भागीदारी असते किंवा मॅनेजमेंटचे लोक त्यांचे मित्र/ व्यवसायीक मित्र असतात. त्यामुळे खुप थोडे राजकीय पुढाऱ्यांना ही गोष्ट लक्षात येते. बाकी लोकांना माहीत असूनही ते बोलत नाहीत याचे कारण तुम्ही समजू शकतात. आजच्या घडीला सर्वात चांगला व्यवसाय म्हणजे हाॅस्पिटल व शिक्षण हे दोन्ही व्यवसाय आहेत. त्यासाठी राजकीय आशीर्वाद लागतो.
नानावटी हॉस्पिटलमध्ये कोरोनावर काही रुग्णावर उपचार केले गेले असतांना दहा पैकी सात रुग्णांनी हॉस्पिटलने प्रचंड बिलाची आकारणी केली होती. म्हणून त्यांनी लेखी तक्रार केली असता हॉस्पिटलची प्रतिमा खराब झाली होती व सर्वदूर हॉस्पिटल व त्यांच्या डॉक्टरवर मीडिया, वृत्तपत्र व जनमानसात एकूणच रोषाचे वातावरण झाले होते, हे वाचकांना चांगले माहिती असेलच असे नाही कारण वाचक नेहमीच वाचतात आणि विसरून जातात.नोंद कोण ठेवते.उच्चवर्णीय उच्चशिक्षित कॉर्पोरेट बिझनेसचाच विचार करणारे.कुठे कशी काडी लावतील सांगता येत नाही.
अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन हे दोघेही नानावटी हॉस्पिटलमध्ये कोरोना झाल्यामुळे ऍडमिट झाल्यामुळे देशातील सर्व समस्या सुटलाय सर्वत्र एकच बातमी चर्चा चोवीस तास सुरु होती. खरे तर त्यांना कोरोनाची फारसी लक्षणे नसून (Asymptomatic) ते एकदम फाईन (Fine) आहेत.त्यांच्याकडे जुहू येथे तीन बंगले असून एकूण अठरा रूम्स आहेत आणि त्या रूम्स मिनी आय सी यु (ICU) असून त्यांचे 24 तास काळजी घेणारे फर्स्ट क्लास 2 पगारी डॉक्टर्स असतात. असे असतांना दोघेही पिता-पुत्रांनी होम क्वारांटाइन (Home Quarantine) होऊन कोरोनाची खास लक्षणे नसतांना आपल्या बंगल्यावरच इलाज करायला काही हरकत नव्हती.अनेक सोसायटी तसे होम क्वारांटाइन केल्याची महानगरपालिका सरकारकडे नोंदी आहेत.
उच्चवर्णीय उच्चशिक्षित कॉर्पोरेट बिझनेसचाच विचार करणारे. ते दोघेही नानावटी हॉस्पिटलमध्ये भरती (ऍडमिट) झालेत एव्हढेच नाही तर बिग बी (अमिताभ) ट्विट्स (tweets) करून आपल्या खास शब्दात हॉस्पिटलची तारीफ करून आभार सुद्धा मानले. राजकारणात आणि धंद्यात ग्यानबाची मेख अशी असते कि ते मोठ मोठ्यांना समजत नाही. ज्या रेडिअंट ग्रुप (Radiant Group) च्या मालकीचे नानावटी हॉस्पिटल आहे त्यात स्वतः अमिताभ बच्चन भागीदार असून सन्माननीय बोर्ड मेम्बर सुद्धा आहेत. (मालकानेच मालकाचे आभार मानणे !) यावरून आपल्या लक्षात आले असेलच की, पहिल्या पॅरिग्राफमध्ये जो मुद्धा आहे त्यावर सुंदर स्क्रिप्ट लिहून आपल्या बेहतरीन अदाकारीने अमिताभने आपल्या हॉस्पिटलची खराब झालेली प्रतिमा सावरण्याचा एक हिट शो केला असे असे तज्ञ सांगतात.आणि हे तज्ञ कोण?.उच्चवर्णीय उच्चशिक्षित कॉर्पोरेट बिझनेसचाच विचार करणारेचना म्हणजेच दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहीये.कोरोनातील भ्रष्टाचार आणि मोदीची भाईगिरी कुठे कुठे जुळली आहे. ते आता राम नाम सत्य आहे.हेच सांगेल.
सुख आणि दुःख हे पाहुणे आहेत वारंवार येतील आणि जातील.जर ते आलेच् नाहीत तर आपल्याला अनुभव कुठून येणार जीवन खुश राहून जगायला शिका, कारण रोज सायंकाळी फक्त सूर्यच् मावळत नाही तर आपले मौल्यवान जीवन सुद्धा कणा कणाने कमी होत जाते.माणूस जसा बदलत चालला आहे,तसा निसर्ग देखील बदलत चालला आहे.निसर्गाची ताकद किती आहे बघा निसर्गातील एक विषाणू सांगून गेला, पैसा,संपत्ती,गाडी,बंगला,सोने, श्रीमंती याहीपेक्षा आपला जीव महत्त्वाचा आहे.आपल्या वाईट काळात आपली किंमत कमी करण्याचा प्रयत्न अनेकदा केला जातो.मात्र संयम राखला तर आपल अस्तित्व कुणीच संपवू शकत नाही.फक्त स्वत:चा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात.पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते.
आता भारत प्रगती पथावर आहे कि अधोगतीच्या कोणत्या पथावर आहे. राजकारणातील भ्रष्टाचार संपला असे समजून प्रधानमंत्री सार्वजनिक उद्योग धंदे बिधास्त विकत आहे.त्यांची भाईगिरी वाढत आहे.असे लिहले तर वाचका अगोदर संपादक संपादकीय मंडळाच्या पत्रकारांना वाईट वाटेल लेख प्रसिद्ध होईल यांची हमी नाही.कारण यांचे ही भष्ट्राचार आणि मोदीच्या भाईगिरीशी वैचारिक आर्थिक हितसंबध असतात. त्यामुळे आज देशातील सर्व समाजाला सत्य परिस्थिती सांगण्या ऐवजी असत्य सांगत आहेत.कोरोना लॉक डाऊन आणि भष्ट्राचार मोठ्या संख्याने होत असतांना राजकारणातील लोक गप्प आहेत.साहित्यिक,विचारवंत पत्रकार आप आपल्या सोयीने लिहतात.कोरोना संकट आले आणि गेले.पण भविष्यात काय काय शिकवून गेले.आता सर्वच समाजातील जागरूक नागरिकांनी घेतली पाहिजे. तरच चार आणि भाई गिरी मोडता येईल
सागर रामभाऊ तायडे९९२०४०३८५९,भांडूप मुंबई.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा