कोरोना मागासवर्गीय हत्याकांड ,ओबीसी आणि उच्चवर्णीय विवेकवादी लोकांचे कर्तव्य?.
साऱ्या भारतात मनुस्मृती प्रणित धर्म व्यवस्थेने ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या उच्चवर्णीय लोकांना भारतातील इतर 85 टक्के मागासवर्गीय ओबीसी,एस सी ,एस टी,विजेएनटी आदिवासी आणि अल्पसंख्याक यांचे शोषणाचे अधिकार दिले होते. सर्व स्त्रियांना शूद्र ठरवून, उच्चवर्णीय आणि मागासवर्गीय सर्वच स्त्रियांना मानवी हक्कांपासून वंचीत करण्याचे हे देशव्यापी अधिकार होते. हीच ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशी वर्णव्यवस्था कायम रहावी त्यात व्यत्यय येऊ नये म्हणून बंड करणाऱ्या मागासवर्गीय लोकांच्या विरोधात तीन उच्चवर्णीयांना हाती शस्त्र घेन्याचे अधिकार मनुस्मृतीनेच दिले. परन्तु आगरी कोळी भंडारी माळी यासारख्या 52 टक्के शूद्र ओबीसींना,कितीही अन्याय झाला अगदी परकीय देशाने आक्रमण केले तरीही शस्त्र हाती घेऊ नये अशी बंधने घातली.. आणि आजचे अतिशूद्र यांच्यावर, अर्थात(बौद्ध) sc st वर कल्पनाही करता येणार नाहीत अशी बंधने घालून अत्याचार करण्यात आले. आगरी कोळी कराडी समाजाने आम्ही मनुस्मृती नुसार शूद्र आहोत हे समजून घ्यावे. शूद्र म्हणजेच जातीच्या दाखल्यावरील ओबीसी म्हणजेच इतर मागासवर्गीय होय.
उच्चवर्णीय जातींना मागासवर्गीय लोकांवर धार्मिक,राजकीय आणि सामाजिक अन्याय अत्याचार करण्याची जन्मतःच प्रेरणा आपला हिंदू वैदिक धर्म देतो. अर्थात या अन्याय अत्याचारांना सहन करण्याची सहनशीलता,संयम, मानसिक गुलामी मनुस्मृती प्रणित धर्मच देतो हेही आपण समजून घेतले पाहिजे. आगरी कोळी भंडारी सागरपुत्र समाजाने जागतिक वैभवाचे दिवस 2000 वर्षांपूर्वी सम्राट अशोकाच्या काळात अनुभवले. त्यानंतर थेट छत्रपती शिवरायांच्या काळात आरमार आणि जमिनीचे मालकी अधिकार मिळाले. मात्र समुद्रावर कोणताही व्यवसाय करायला मनुस्मृतीने कायमस्वरूपी विरोधच केला होता. छत्रपती शिवरायांचे मनुस्मृतीला आव्हान देत तयार झालेले सागरी आरमार पेशवे व मराठ्यांनी बुडविले! पेशवे काळातच खोती सावकारी आली.
मनुस्मृती जाळण्यासाठी महाड, रायगड येथे आम्ही आदरणीय नारायण नागु पाटील यांच्या नेतृत्वाखाली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत लढलो. मनुस्मृतीच्या समर्थक उच्चवर्णीय खोती सावकारी विरोधात लढण्याची हिम्मत केवळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच मिळाली. पुढे बाबासाहेबानी सांगितलेल्या 'शिका! जागृत व्हा! संघटित व्हा!' या समाज उद्धारक मंत्राने आम्ही शिक्षणाची शाळांची मोहीम हाती घेऊन कोकण एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून 108 शाळांचे जाळे कोकणात उभे केले. नारायण नागु पाटील, त्याचे चिरंजीव अॅड दत्ता पाटील, प्रभाकर पाटील यांचे फार मोठे योगदान यात होते. अर्थात हा शिक्षणाचा विचार बाबसाहेबाकडून आला. मी स्वतः जनता विद्यालय बेलोशी अलिबाग,आताच्या अॅड दत्ता पाटील हायस्कुल मधूनच दहावी पर्यंत शिक्षण पूर्ण केले. हजारो गरीब ओबीसी शिक्षक आणि लाखो यशस्वी विद्यार्थी येथुन पुढे आले. याच लोकांनी पुढे जमीन आणि शिक्षणाची चळवळ रायगड जिल्ह्यात चालवली.
गरीब ओबीसी विद्यार्थ्यांची ही चळवळ आज ही रायगडात चालू असताना नवी मुबंईचे शिक्षण महाग झाले. उच्च शिक्षण डी वाय पाटील, पतंगराव कदम, दत्ता मेघे या शिक्षण सम्राटांच्या हाती गेले. प्राथमिक शिक्षण लाख रुपयात तर उच्च शिक्षण कोटी रुपयात विकत मिळतेय हे अजूनही आमच्या रायगडच्या खेड्यात कळले नाहीय. परन्तु महिन्यास 3 ते 5 हजार रुपये खोली भाडे घेणाऱ्या नवी मुबंईच्या आगरी कोळी बांधवांसाठी ते अशक्य होईल एव्हढे महाग झाले आहे. ते कळण्यासाठी महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी पहिले जागृतीचे काम केले होते. यांच्यानंतर दोनशे वर्षानी आज कोरोनाच्या महामारी मुळे 2020 मध्ये शिक्षण हकांची जाणीव नवी मुबंईस होत आहे. रायगड जिल्ह्यातील शिक्षण चळवळ गरीब ओबीसी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे, यासाठी समाजाच्या वर्गणी मधून सुरू झाली होती. अनेक ठिकाणी गावकरी एकत्र येऊन जागा, श्रमदान आणि वर्गणी देऊन कर्मचारी लोकांच्या पगाराचा भार घेऊन शासकीय अनुदान येईपर्यंत हा भार सोसत होते. आज शिक्षणाच्या जागी बुवा बापू नाना दादा यांनी लोकांचे मेंदू ताब्यात घेऊन, शिक्षणा साठीची वर्गणी दान थांबविलीय. त्यामुळे शाळांपेक्षा मंदिराचे कळसच उंच झालेले दिसतात. कोरोनाच्या महामारीत देवांनी मैदान सोडले! तरीही सर्व अध्यात्मिक बुवा आणि मंदिराच्या दानपेटीतील पैसा, औषधे, अन्न धान्य गरजू मागासवर्गीय माणसाच्या उपयोगी येत नाही. आज रायगडचे लोक निसर्ग वादळात उध्वस्त आहेत परन्तु धर्म संप्रदाय मंदिर ट्रस्ट गप्प आहेत.हे काम राजकीय पक्ष आणि सरकारचे आहे असे सांगून पैसा सोडायला तयार नाहीत. कोरोना नंतरच्या काळात मुलांच्या शिक्षणासाठी पैसे कुठून आणायचे?. यातून नवी मुबंईच्या तरुणांनी विकास पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण हक्काचे जे आंदोलन उभे केले आहे त्यास पूर्ण देशाने पाठींबा द्यावा अशी माझी नम्र विनंती आहे
सुरुवातीस मंदिराची आणि देवाचीही निर्मिती मागासवर्गीय माणसानेच आपल्या मेहनतीने केली. नंतर त्याचा ताबा मात्र उच्चवर्णीय ब्राह्मण ट्रस्टीनी घेतला. अर्थात ते आज मालकच झाले!. नवी मुबंईतील 95 प्रकल्पग्रस्त गावातील करोडो रुपयांच्या म्हणजे दोन कोटी रुपये गुंठा भावाचे सरासरी तीन एकरचे म्हणजेच( 240 कोटी रुपयांचे भूखंड) प्रस्थापित शिक्षण सम्राटांनी पाच ते सहा या संख्येनी गिळले यात ब्राह्मण मराठा उच्चवर्णीय पुढे आहेतच परन्तु काही आगरी कोळी राजकीय नेतेही आहेत. हे भूखंड मुख्यतः साडेबारा टक्के योजनेतील शेतकऱ्याच्या हक्काच्या जमिनीतून सिडकोने परस्पर कापून विकले आहेत. यात सिडकोने मोठी फसवणूक केली आहेच. परन्तु सिडको ही मागासवर्गीय ओबीसींच्या शिक्षणाच्या विरोधात आहे हे सत्य समोर आले आहे. अर्थात ज्यांनी आमचे भातशेती मासेमारी हे व्यवसाय संपविले ते शिक्षणाचा अधिकार नाकारणारे उच्चवर्णीय ब्राह्मण क्षत्रिय लोक आम्हास शिक्षण देतील यावर कुणी ओबीसी आगरी कोळी कराडी तरुणांनी विश्वास ठेवू नये. आम्ही पावणेचार टक्के सिडकोने चोरलेली जमीन मिळवून देतो अशी सामाजिक न्यायाची हाकाटी देणाऱ्याचे ?.. काम विकास पाटील यांच्या माहिती अधिकाराने बिनपैशात साध्य झाले आहे. ओबीसी वरच्या अन्यायाची माहिती असूनही उच्चवर्णीय लोकांविरोधात बोलायची हिम्मत नसलेले लोक गप्प बसतात याचे कारण ते त्याचे समर्थकच असतात.
सध्या महाराष्ट्रात नागपूर ते पुणे आणि देशात मागासवर्गीय तरुणांच्या हत्या सुरू आहेत. परन्तु त्याविरोधात बोलायची हिम्मत असलेले मोजके लोक आहेत. केंद्र सरकारने ओबीसी तरुणांच्या डाॅक्टर होऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या 11 हजार जागा आपल्या उच्चवर्णीय मुलांसाठी परस्पर वळवल्या,खाल्ल्या परन्तु त्याकडे लक्ष देणारे आगरी कोळी ओबीसी तरुण अजून जागे झाले नाहीत. आपल्याच धर्मातील ब्राह्मण क्षत्रिय लोकां विरोधात लढणारे ओबीसी जसे दुर्मिळ?. तसेच स्वतःच्याच जातीतील फसवणूक करणाऱ्या लोकांविरोधात आवाज उठविणारे विकास पाटील यांच्यासारखे धाडसी तरुण आम्ही जपले पाहिजेत. सक्षम केले पाहिजेत.मुबंईच्या गावठाण हक्कात लढणारे माहीम कोळीवाड्यातील तरुण जयेश आकरे,वयोवृद्ध निजाई बाबा हे साऱ्या मुबंईस न्याय देऊ शकतात. परन्तु सामान्य माणसांनी त्यासाठी सेठ सावकार प्रस्थापित नेत्यांना न घाबरता समोर आले पाहिजे. ज्या भूखंडाच्या जोरावर नवी मुबंईतील उच्चवर्णीय आणि आपल्याच ओबीसी जातीतील शिक्षण सम्राट शिक्षणाचा बाजार मांडत आहेत त्या जागा आमच्या शेतजमिनीच्या पुनर्वसन भूखंडाच्या हक्काच्या जागा आहेत. न्यायालयात आणि जमिनीवरच्या आंदोलनातून आपण त्या लढून मिळवू. परन्तु गावठाण हक्काचा विस्तार करून शाळा कॉलेजेस आरोग्यासाठी सोयी म्हणून आवश्यक भूखंड मा जिल्हाधिकारी यांनी द्यावेत हा कोळीवाडा गावठाण विस्तार हक्काचा वेगळा विषय आहे.सिडकोची लढून मिळविलेली पाच हुतात्मे आणि दि बा पाटील यांच्या महान नेतृत्वामुळे मिळालेली, साडेबारा टक्के योजना म्हणजे गावठाण हक्क नाही. नवी मुबंई विमानताळात विस्थापित गावाचे पुनर्वसन गावठाण विस्तारासह होत आहे. अर्थात मूळ जागेच्या तीनपट जागेसह होतेय. तर शेतजमिनीच्या बाबतीत मूळ जागेच्या 20 टक्के जागा पुनर्वसन म्हणून मिळतेय. दोन्ही योजना वेगळ्या आहेत. यात आगरी कोळी जातीतील आणि उच्चवर्णीय सर्वपक्षीय जातीतील प्रस्थापित नेते प्रकल्पग्रस्त ओबीसींची फसवणूक करीत आहेत.
सध्या महाराष्ट्रात बौद्ध तरुणांच्या हत्या मूळच्या क्षत्रिय लोकांकडून होत आहेत. आम्ही उच्चवर्णीय असल्याच्या 'सैराट' अहंकारातून हे घडतेय. उद्या पोलिसांकडून आरोपी पकडले जातीलही. परन्तु ज्या उच्चजातीय शोषक जातींकडून मनुस्मृतीच्या मानसिकते आधारे हे दुष्कृत्य होतेय ते देशासाठी अत्यन्त धोकादायक आहे!. त्यावर मनुस्मृतीप्रणीत उच्च वर्णात सर्वोच्च सत्ताधारी ठिकाणी असलेल्या ब्राह्मण लोकांनी बोलले पाहिजे. त्यानंतर वैश्य लोकांनीही बोलायला हवे. मनुस्मृती 11 (33) या श्लोकात म्हणते, 'ब्राह्मणाची वाणी हेच त्यांचे शस्त्र आहे.' समाज शत्रूच्या बाबतीत त्यांनी हे शास्त्र वापरावे. 'क्षत्रियांना धडा शिकविण्यासाठी ब्राह्मणांनी शस्त्र हाती घ्यावे.' 2 (24 18) नुसार 'गाईच्या रक्षणासाठी आणि वर्ण व्यवस्था कायमस्वरूपी राखण्यासाठी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांनी कोणतीही किंमत देऊन धर्मव्यवस्था अबाधित ठेवावी.' परन्तु मागासवर्गीय तरुण याचे जीव आणि शिक्षण हक्क याबाबतीत उच्चवर्णीय विरोधात जात असतील तर मागासवर्गीय लोकांनी शस्त्र सोडाच?. लोकशाहीतील भाषण लेखन न्याय असे कोणतेही अहिंसक शस्त्र हाती धरू नये; असे स्त्री शूद्रातीशूद्र यांचे वागणेही मनुस्मृती नुसारच चालू असणे हे अशोभनीय निंद निय आहे.
अमेरिकेतील गोऱ्या पोलिसी अत्याचार आणि काळ्या भूमिपुत्र हत्याकांडा विरोधात लोकशाही मार्गाने चाललेली आंदोलने ही भारतातील मागास ओबीसी,एससी,एसटी, विजेएनटी यांच्यासाठी जागतिक आदर्श देणारी आहेत. मी पिंपरी चिंचवड येथील विराज जगताप आणि नागपूर येथील अरविंद बनसोडे या तरुणांच्या हत्येसंदर्भात शासनास सामाजिक न्यायासाठी विनंती करीतच आहे. या देशातील उच्च जातीतील समस्त विचारवन्त लोकशाहीवादी सुसंस्कृत नागरिकांनी अमेरिकेतील गोऱ्या लोकांप्रमाणेच ,मागासवर्गीयन्यायाच्या बाजूने पाठींबा द्यावा अशी विनंतीही करीत आहे.
देशातील समस्त मागासवर्गीय आणि विवेकवादी उच्चवर्णीय यांनी एकत्र येऊन भारतीय जनतेच्या मनास संविधानिक साक्षर करण्यासाठी पुढे यावे. राष्ट्रीय एकात्मता अखंडता टिकवावी. आम्ही आगरी कोळी कराडी ओबीसी तरुणांनी प्रथम आमच्याच जातीतील शिक्षण विरोधी जमीनदार सरंजामी लोकांना विरोध करून राज्य स्तरावरील उच्चवर्णीय शिक्षण सम्राटांच्या अत्याचारी स्वभावास बदलण्याचे अहिंसक आंदोलन नवी मुबंई तुन सुरू केले आहे. मला विश्वास आहे ओबीसीसह सारे भारतीय त्यास पाठींबा देतील..आणि मागासवर्गीय तरुणांच्या हत्येविरोधात एकत्र येऊन समतेचे न्यायाचे एकत्रित आंदोलन उभे करून जगास नवा आदर्श देतील. जय भारत!
राजाराम पाटील 8928452112
ओबीसी संघर्ष समन्वय समिती महाराष्ट्र
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा