गुरुवार, २७ ऑगस्ट, २०२०

संविधान वाचवता येत नसेल तर धर्मांतर करा?.

 रामदास आठवले यांना जाहीर खुले पत्र

संविधान वाचवता येत नसेल तर धर्मांतर करा?. 
    रामदास आठवले साहेब.जयभिम 
     क्रांतिकारी विचारांच्या समतावादी व्यवस्थेचा कट्टर समर्थक विषमतावादी विचारांच्या व्यवस्थेचा गुलाम कधी झाला व कसा झाला कोणालाही कळले नाही. कार्यकर्त्यांना पोलिसांनी त्रास देऊ नये, त्यांच्या पोटपूजेची व्यवस्था समाजाचे शोषण करून करावी यांचे विनाअट शिपारस पत्र कधी कुठेही मिळत असल्यामुळे रामदास आठवले साहेब यांचे लाखो कार्यकर्ते व कार्यकर्त्यांच्या सोबतचा भक्त आज राज्यात आहे. त्याना आपण कोणतीही भूमिका घेतली तरी ते तुमचे भक्त तुमच्यावर श्रद्धा ठेवून सबुरीने वागले ते कायम लाचार राहतील असे आता वाटत नाही.म्हणून संविधान वाचवता येत नसेल तर धर्मांतर करा?.  
    आपले वृत्तपत्रातील प्रसिद्ध पत्रक वाचले कि खूप वाईट वाटते.आपल्यातील पँथर कुठेही दिसत नाही.आपण कुठे उभे आहात कोणत्या दिशेने वाटचाल करीत आहात.यांचे भान आपणास राहिले नाही.आपण कोणाचे प्रतिनिधी आहात हेच कळत नाही.आंबेडकरी विचाराचे बाळकडू आपण पूर्णपणे विसरलेले दिसता. म्हणून आपणास जाहीर पणे खुले पत्र लिहून विचारतो साहेब आपण भारतीय संविधान कधी वाचले काय हो?. ते संविधान वाचवता येत नसेल तर धर्मांतर करा?.  
    भारतीय दलित चळवळीत ज्यांनी स्वताची जागा निर्माण केली असे दलित पँथरचे तरुण तडपदार बिनधास्त बेधडक नेते रामदास बंडू आठवले यांचा जन्म २५ डिसेंबर १९५९ ला सांगली जिल्ह्यात झाला.१९७१ ला सिद्धार्थ होस्टेल मध्ये विध्यार्थी म्हणून दाखल झाले आणि १९७२ ला दलित पँथरची स्थापना झाली तेव्हा त्यात सतत सहभागी होणारा कार्यकर्ता म्हणून रामदास सर्वाना परिचित होता.त्यात त्यांची जडणघडण झाली. हॅन्डबिल वाटणारा आणि पोस्टर लावणारा कार्यकर्ता कालकथीत नामदेव ढसाळ,राजा ढाले, अरुण कांबळे आणि मान ज.वी पवार या साहित्यीक विचारवंत नेत्यापुढे कधी निघुन गेला त्यांना ही कळले नाही.आज त्याचे अस्तित्व कुठे ही दिसत नाही.मागासवर्गीय समाजावरील अन्याय अत्याचार झाल्यावर सर्वात पहिला धावून जाणारा नेता म्हणजे रामदास आठवले.आज ही ते अन्याय अत्याचार झाल्यावर काही दिवसांनी पोचतात आणि सर्व वृत्तपत्रात त्यांची फोटोसह बातमी छापून येते. ती धमक जी पँथर मध्ये असताना होती ती आज राहली नाही.निर्भीडपणे लढणारा दलित पँथर राजकारणाच्या सत्ता स्पर्धेत संपूर्ण बदलून गेला. दलित चळवळ नव्हे तर आंबेडकरी चळवळीचा केंद्र बिंदू असणारा रामदास आठवले काय होता आणि आज तो काय झाला आहे. हा प्रवास खूप दुख दायक आहे.म्हणूनच म्हणतो संविधान वाचवता येत नसेल तर धर्मांतर करा?.  
      दलित चळवळीत रामदास आठवले साहेब आपल्या बद्दल खूप नाराजी असली तरी तुमच्या सारखा समाजात कार्यकर्त्यात मिसळणारा दुसरा नेता नाही.त्यामुळेच समाजात तुमचे भक्त मोठ्या प्रमाणात आहेत.त्यामुळेच इतर सर्व दलित,आंबेडकरी चळवळीतील गटा तटात तुमचा गट दबंग म्हणून ओळखल्या जात होता. नेते भरपूर आहेत पण तुमच्या सारखा जिव्हाळा इतर नेत्या मध्ये नाही.वसतिगृहात राहून राजकारणात जागा बनविणारे रामदास आठवले सर्व दलिताचे प्रश्न विसरलेले दिसतात तेव्हा ते शिक्षण आणि विद्यार्थ्याच्या प्रश्नावर संघर्ष करीत होते.आज सिद्धार्थ होस्टेल ची जी दुरावस्था झाली. त्याला आठवले साहेब आपण काही प्रमाणात जबाबदार आहेत असे म्हटले तर चूक ठरणार नाही.कारण आपण पिपल सोसाईटी चे अध्यक्ष राहिले आहेत.राज्याचे आणि केंद्राचे सामाजिक न्याय मंत्री राहिला आहात. "समाज कल्याण" समाज तुम्हाला काय केले असे जाहीर पणे विचारू शकतो?. मनात आणले असते तर तुम्हाला ते अशक्य नसते. त्या करिता इच्छाशक्ती असावी लागते आठवले साहेब आपण ते का केले नाही?.
    एकदा खासदार झाल्यावर मरे पर्यंत पेन्शन आणि इतर सर्व सवलती मिळतात.तरी एका खासदार की करिता अख्खी आंबेडकरी चळवळ तुम्ही आणि काही नेत्यांनी वेटीस धरली असे म्हंटले तर वागवे ठरणार नाही.रामदास आठवले आपण कुशल संघटक आहेत तुम्ही सर्व गटाना एकत्र करून पंधरा वीस आमदार आणि पाच सात खासदार सहज निवडून आणु शकता.तुमची इच्छा शक्ती मेली आहे असे दिसते.तुमचा कॉंग्रेस,राष्ट्रवादी प्रवास अन्याय अत्याचाराच्या विरोधात संघर्ष करण्यात गेला.अन्याय अत्याचार थांबले नाहीत आणि राजकीयदृष्ट्या कोणताही ठोस फायदा समाजाला झाला नाही. घोर फसवणुक झाल्या मुळे तुम्ही शिवसेने बरोबर घरोबा केला.शिवसेना भिमसेनेचे मनोमिलन फारसे झाले नाही. त्याचा फायदा भाजपानी घेतला आणि तुम्हाला राज्यसभेवर पाठविले.पुढे तेच झाले जे अपेक्षित होते. रामदास आठवले साहेब आज ही समाज खूप आशेने तुमच्या कडे पाहतो.जरा भानावर या तीन,चार वर्ष सर्व आंबेडकरी संस्था संघटनेची मोट बांधा.आणि परिणाम पहा. ऐक्या करिता कुर्बान होणारे ऐक्या तूनबाहेर पडल्यास उद्याचा सूर्य दिसू देणार नाही असी भिमप्रतिज्ञा करणारे,म्हणणारे तुमच्या समोर आहेत.त्यांना ही सांगा संविधान वाचवता येत नसेल तर धर्मांतर करा?.  
    आंबेडकरी चळवळीच्या प्रत्येक नेत्याचे मतदार संघ वाटून घ्या.आपण सर्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार मानता.त्याचे भारतीय संविधान तुम्हाला लागू नाही का?. भारतीय संविधान देशातील सर्व जाती धर्माच्या प्रांताच्या लोकांना एकसंघ ठेऊ शकते मग आपण आपल्या सर्व समाजातील संस्था, संघटना,गटातटाचे एकत्रीकरण का करू शकत नाही.त्या करिता संविधान वाचले पाहिजे. आपल्या गटातील कोणत्याही कार्यकर्त्यांना संविधान लागु नाही. कारण त्यांनी ते वाचले नाही जर आपणच वाचले नाही तर त्याचा काय दोष.आपल्या जाहीर सभेत आम्ही पाहतो स्टेजवर कोणी बसावे आणि उभे कोणी राहावे त्याला कोणताही पोटोकॉल (राजशीस्टाचार ) लागु नाही काय?. भारतीय संविधाना नुसार या देशात ग्रामपंचायत ते राष्ट्रपती पर्यंत निवडणुका होऊ शकतात.मग आपन त्या संविधान नुसार एक पक्ष,एक नेता,एक झेंडा निवडणूका घेऊन का निवडत नाही.रामदास आठवले साहेब आपले आयुष्यमान किती बाकी आहे. कोणालाच माहित नाही.१९७२ ला पँथरची स्थापना झाली. आपण तेव्हा रिपाईच्या नेत्यांना सारखे स्वार्थी,लबाड, लाचार असे अनेक दुषणे देत होता.आता आज तीच वेळ तुम्ही समाजावर आणली आत्मचिंतन करून आत्मपरीक्षण करा.आठवले साहेब शेवटची संधी आहे.तुम्ही थोर साहित्यिक विचारवंत नाही. त्या ही पेक्षा कुशल संघटक आहात.राज्यातील दलित आंबेडकरी साहित्यिक विचारवंत तुमच्या समोर फेल गेले आहेत.त्याच्या कार्यकर्माला तुमची उपस्थिती आणि आशीर्वाद लागतो. त्यांना ही सांगा संविधान वाचवता येत नसेल तर धर्मांतर करा?.  
  आर एस एस प्रणित भाजपाचे मोदी सरकार संविधानाच्या एक एक चौकटी मोडून काढण्यासाठी आपल्या मनुवादी बौद्धिक कौशल्याचा योग्य वापर करून लोकशाहीचे चारी खांब मुळासकट बदलुन टाकत असतांना आंबेडकरी विचाराचा पँथर कुठेच डरकाळी सोडा,डोळे लाल करून पाहण्याची हिंमत करतांना दिसत नाही, एवढा तो जुन्या रिपाई नेत्या पेक्षा लाचार झालेला दिसतो.आज न्याय पालिका,सुरक्षा यंत्रणा,प्रशासकीय यंत्रणा,पत्रकारिता निर्भीड निःपक्षपाती राहिली नाही.त्यामुळेच मागासवर्गीय, ओबीसी, आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजावरील अन्याय अत्याचारांची नोंद होतच नाही, तीन चार महिन्याने त्याला वाचा फोडण्यासाठी दुसरी कडून प्रयत्न केला जातो तेव्हा ती जनतेला कळते.हे पँथर नेत्याला दिसत नाही. हा एक्रोश ऐकू येत नाही, त्यामुळेच आपली वाच्या गेली की काय अशी शंका येते. आपणच असे गुलाम बनुन राहिल्यास येणाऱ्या तरुण पिढीला त्यांची किती मोठी किंमत चुकवावी लागेल. संविधानाने दिलेल्या अधिकार हक्काची जाणीव ठेवा,आज मोदी सरकारने आपली ओळख संसदीय सभागृहात मनोरंजन करणारा विदूषक अशी करून ठेवली आहे. ती आपण आनंदाने स्विकारतात. तो स्वाभिमानी लढाऊ पँथर कुठेच दिसत नाही.देशातील विविध प्रिंट,चॅनल मीडिया आपली काय म्हणून दखल घेते. आंबेडकरी चळवळीचे नेते म्हणून दखल घेणे त्यांनी सोडून दिले.पण टीआरपी वाढविण्यासाठी विशेष कौशल्य असणारा शिग्रकवी, गंभीरातील गंभीर विषययातील गांभीर्य नष्ट करण्यासाठी आपल्या वक्तृत्वाने हसा पिकविणार विदूषक नेता अशी प्रतिमा आपली निर्माण झाली आहे.ती कायम ठेवण्यासाठी संविधान वाचवता येत नसेल तर धर्मांतर करा?.  
   उत्तर प्रदेश,बिहार,पंजाब,कर्नाटक,आंध्रप्रदेश,तेलंगणा,ओडिशा,छत्तीसगड, झारखंड सारख्या राज्यातील मागासवर्गीय ओबीसी आदिवासी आणि अल्पसंख्याक समाज रामदास आठवले म्हणजे संकट समयी धावून येणारा आपला नेता समजते म्हणून ते आपल्या सोबत आपल्या रिपाईला जोडला जातो.त्याला लाचार बनवू नका.त्याला स्वाभिमानी बनवा तुम्हीच स्वाभिमान विकून लाचार पणे आचरण करत असाल तर तुम्हाला डॉ बाबासाहेब आंबेडकर तथागत गौतम बुद्धांचे नांव घेण्याचा अधिकार राहणार नाही.म्हणूनच संविधान वाचवता येत नसेल तर धर्मांतर करा?.  
लोकशाहीचे चार खांब न्यायपालिका (judiciary) प्रशासकीय यंत्रणा, कार्यकारी मंडळ,अधिकारी वर्ग (Executive)विधिमंडळ.संसद,विधानसभा(Legislature),प्रसार मध्यम (Media) हया आज तरी स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची क्षमता विसरून पूर्णपणे दबावाखाली काम करतांना आपणास दिसत नाही काय?.आय ए एस,आय पी एस, पी एस आय,सचिवालय अधिकारी,लोकप्रतिनिधी आणि पत्रकार संपादक बहुसंख्येने भांडवलशाही, ब्राम्हणशाहीचे उघड समर्थक आहेत त्यात आपले नांव जोडल्या जात आहे. बहुसंख्य मागासवर्गीय कर्मचारी अधिकारी तर जीव मुठीत धरून संघर्ष करत नोकरीत आहेत. ते आपल्यातील मारून गेलेलेल्या पँथर दिसत नसेल.तरी आपल्यातील आंबेडकरी विचारधारा जिवंत पाहिजेत ना?. त्यासाठी संविधान वाचवता येत नसेल तर धर्मांतर करा?.   
लोकशाहीचे चार खांब या ठिकाणी उच्चशिक्षित, उच्चवर्णीय निर्णय देणारे म्हणून विराजमान आहेत. मागासवर्गीय केंद्रीय मंत्री व सर्वच मागासवर्गीय खासदार हे काय प्रधानमंत्री मोदीच्या ताटाखालचे मांजर झाले म्हणजे वैचारिक गुलाम झाले आहेत?.राष्ट्रीय चिन्ह सिंह स्तंभाच्या खालील सम्राट अशोकाचे जगप्रसिद्ध घोषवाक्य, "सत्यमेव जयते " सह अनेक बदल घडविण्यात येत आहेत. ते मागासवर्गीय ओबीसी खासदारांना दिसत नाही काय?.स्वताला पँथर,आंबेडकरी विचारांचे लोकनेते समजणारे नेते किती लाचार झाले.  
  देश्याच्या दृष्टीने साविधांची चौकट मोडून काढणे खूपच शर्मनाक व गंभीर बाब आहे. मोदी सरकार मध्ये जे मागासवर्गीय मंत्री व खासदार आहेत त्यांनी मानसिक गुलामी व चमचेगिरी सोडून सडेतोडपणे मोदींना देशहितासाठी,समाजहितासाठी कडाडून विरोध करून भारतीय राज्यघटनेनुसार स्वाभिमान दाखवून दिला पाहिजे. नाहीतर संविधान वाचवता येत नसेल तर धर्मांतर करा?. बहुजन महापुरुषांच्या त्यागाचे,बलिदानाचे व त्यांच्या क्रांतिकारी विचाराचे तुम्हाला काहीही देणे घेणे नसून तुम्ही प्रधानमंत्री मोदी यांचे पाळीव कुत्रे झाला आहात हे जाहीर करा.मागासवर्गीय केंद्रीय मंत्री व सर्वच खासदारांच्या मतदार संघातील मागासवर्गीय मतदारांनी कार्यकर्त्यांनी अनुयायांनी समाजातील जागरूक लोकांनी यांना राजीनामा देण्यास भाग पडावे.त्यांच्या या भूमिकेला तुम्ही विरोध केला नाही तर इतिहासात तुमची ही लाचार गुलाम अनुयायायी म्हणून नोंद होणार आहे.हे ही लक्षात घ्यावे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा